अलंकार माहीती मराठी | Alankar In Marathi

Alankar In Marathi : अलंकाराचा अर्थ आहे दागिना दागिन्यामुळे माणसाचे सौंदर्य जसे खुलून दिसते त्याच पद्धतीने भाषेचे आहे. अलंकारामुळे भाषेचे सौंदर्य खुलून दिसते किंवा भाषेचे सौंदर्य वाढते तर या अलंकाराचे दोन भागात वर्गीकरण केले जाते त्याला आपण अलंकाराचे प्रकार म्हणतो.

Alankar In Marathi
अलंकार माहीती मराठी (Alankar In Marathi)

अलंकार माहीती मराठी (Alankar In Marathi)

  • शब्दालंकार
  • अर्थालंकार

शब्दालंकार

शब्दामुळे जेव्हा भाषेचे सौंदर्य वाढते तेव्हा त्यांना शब्दालंकार म्हणतात.

शब्दालंकार चे प्रकार 

  • अनुप्रास
  • यमक
  • श्लेष

अर्थालंकार

अर्थामुळे जेव्हा भाषेचे सौंदर्य वाढते तेव्हा त्याला अर्थालंकार म्हणतात.

अर्थालंकार चे प्रकार 

  • उपमा
  • उत्प्रेक्ष
  • रूपक
  • अनन्वय
  • अपन्हुती
  • व्यतिरेक
  • अतिशयोक्ती
  • अर्थान्तरन्यास
  • स्वभावोक्ती
  • अन्योक्ती
  • चेतनागुणोक्ती
  • दृष्टांत

अनुप्रास अलंकार

जेव्हा वाक्यात किंवा काव्यपंक्तीमध्ये तेच-तेच अक्षर किंवा तोच-तोच वर्ण जर पुन्हा-पुन्हा येत असेल तर तो अनुप्रास अलंकार असतो.

उदाहरणार्थ 

  • संत म्हणती सप्तपदे सहवासे सख्य साधूंशी घडते.

या ठिकाणी ‘स’ हा वर्ण पुन्हा-पुन्हा आलेला आहे आणि म्हणून या ठिकाणी हा वर्ण पुन्हा-पुन्हा आल्यामुळे भाषेचे सौंदर्य वाढलेले आहे. 

यमक अलंकार 

कवितेच्या एका ओळीच्या शेवटी एखादे अक्षर किंवा शब्द येतो आणि तोच दुसऱ्या ओळीच्या शेवटी आणि तोच शब्द तिसऱ्या ओळीच्या शेवटी येतो तेव्हा तो यमक अलंकार असतो.

उदाहरणार्थ 

  • जाणावा तो ज्ञानी,पूर्ण समाधानी,निसंदेह मनी सर्वकाळ.

या ठिकाणी ‘नी’ हे अक्षर तिन्ही वाक्याच्या शेवटी आलेली आहे. म्हणून हा यमक अलंकार आहे.

श्लेष अलंकार

एकच शब्द वाक्यात जेव्हा दोन अर्थाने वापरला जातो तेव्हा त्या अलांकराला श्लेष अलंकार म्हणतात.

उदाहरणार्थ 

  • शंकरास पूजिले सुमनाने.

सुमन या शब्दाचे अनेक अर्थ आहेत. 

अर्थालंकार चे प्रकार

उपमा अलंकार

दोन वस्तूतील साम्य म्हणजेच सारखेपणा चमत्कृती पूर्ण पद्धतीने जेव्हा वर्णन केलेला असते तेव्हा तो उपमा अलंकार असतो.

उदाहरणार्थ

या वाक्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या शूरपणा आणि सिंहाचा शूरपणा सारखा दाखविलेला आहे. म्हणून हा उपमा अलंकार आहे.

उत्प्रेक्ष अलंकार 

जेव्हा आपण दोन वस्तूंची तुलना करतो तेव्हा ती वस्तू दुसरी वस्तूच आहे असे जेव्हा वर्णन केलेले असते, म्हणजेच उपमेय हे उपमानच आहे असे वर्णन केलेले असते तेव्हा तो उत्प्रेक्ष अलंकार असतो.

उदाहरणार्थ

  • आकाशातील चांदण्या जनु फुलांची पकरनच.

यामध्ये चांदण्याची तुलना फुलांसोबत केलेली आहे.

अपन्हुती अलंकार 

उपमेय नाही असे सांगून ते उपमानच आहे असे जेव्हा वर्णन केलेले असते तेव्हा तो अलंकार अपन्हुती अलंकार असतो.

उदाहरणार्थ

  • न हे नयन पाकळ्या उमलल्या सरोजातील.

या मध्ये डोळे हे डोळे नसून कमळाच्या पाकळ्याच आहेत असे सांगितले आहे.

रूपक अलंकार 

उपमेय व उपमान एकरूप आहेत असे जेव्हा वर्णन असेल तेव्हा समजायचं की तो रूपक अलंकार आहे.

उदाहरणार्थ 

  • लहान मूल म्हणजे मातीचा गोळा.

लहान मुल आणि मातीचा गोळा एकरूप आहेत,एकच आहे असे सांगितले आहे म्हणून तो रूपक अलंकार आहे.

व्यतिरेक अलंकार 

व्यतिरेक अलंकार म्हणजे उपमेय हे उपमानापेक्षा श्रेष्ठ आहे सरस आहे असे जेव्हा वर्णन केलेले असते तेव्हा तो व्यतिरेक अलंकार असतो.

उदाहरणार्थ

  • अमृताहुनी गोड नाम तुझे देवा

या वाक्यात देवाचे नाव हे अमृता पेक्षा गोड आहे असे सांगितलेले आहे.उपमेय आहे देवाचे नाव आणि उपमान अमृत आहे म्हणजे उपमेय हे उपमानापेक्षा श्रेष्ठ आहे असे सांगितले आहे.

अनन्वय अलंकार

उपमेय सारखेच उपमेय याला दुसऱ्या कशाचीच उपमा देता येत नाही तेव्हा तो अनन्वय अलंकार असतो.

उदाहरणार्थ

  • आहे ताजमहल एक जगती, तो त्याच परी.

ताजमहल हा ताजमहालच त्याची तुलना करता येत नाही.

अतिशयोक्ती

‘एखादी गोष्ट आहे त्या पेक्षा फार फुगवून सांगणे’

उदाहरणार्थ

  • वीर मराठे गर्जत आले, पर्वत सारे कंपित झाले.

स्वभावोक्ती

‘व्यक्तीचे, वस्तूचे, स्थळाचे हुबेहूब पण वैशिष्ट्यपूर्ण वर्णन’

उदाहरणार्थ

  • गणपत वाणी विडी पिताना चावयाचा नुसतीच काडी. म्हणायचा अन मनाशीच कि ह्या जागेवर बांधीन माडी.

अन्योक्ती

‘ज्याच्याबद्दल बोलायचे त्याच्याबद्दल काहीच न बोलता दुसर्याबद्दल बोलून सांगायचे’

उदाहरणार्थ

  • सरड्याची धाव कुंपणापर्यंतच.

चेतनगुणोक्ती

‘अचेतन, जड, निर्जीव वस्तू सजीव असल्याप्रमाणे वर्णन’

उदाहरणार्थ 

  • उरलेला रस्सा, उकडलेली अंडी, पुलाव, टोमॅटो खाऊन रस्ता तृप्त झाला.

दृष्टांत

‘एखाद्या गोष्टीचे वर्णन करून ती स्पष्ट करण्यासाठी दाखला किंवा उदाहरण दिले जाते’

उदाहरणार्थ

  • लहानपण दे गा देवा, मुंगी साखरेचा रवा. ऐरावत रत्न थोर, त्यासीं अंकुशाचा मार.

अर्थान्तरन्यास

‘सामान्य विधानाच्या समर्थानात विशेष उदाहरणे किंवा विशेष उदाहरणावरून सामान्य सिद्धांत काढणे’

उदाहरणार्थ 

  • होई जरी संतत दुष्टसंग, न पावती सज्जन सत्त्वभंग; असोनिया सर्प सदाशरीरीं; झाला नसे चंदन तो विषारी.

सतत विचारले जाणारे प्रश्न(FAQ)

उपमेय म्हणजे काय?

ज्याची तुलना केली जाते ती वस्तू किंवा गोष्ट म्हणजे उपमेय होय.

उपमान म्हणजे काय?

ज्याच्याशी तुलना केली जाते ती वस्तू किंवा गोष्ट म्हणजे उपमान होय.

निष्कर्ष(Summary)

आजच्या या लेखात आपण अलंकार माहीती मराठी (Alankar In Marathi) जाणून घेतली. तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे कॉमेंट मध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांना पण नक्कीच शेअर करा.

Leave a Comment