भारतातील सर्वात लांब नद्या माहिती मराठी | Longest rivers in India

By | February 25, 2023

Longest rivers in India : भारतामध्ये अनेक नद्या आहेत. ज्या वेगवेगळ्या राज्यामध्ये उगम पावतात आणि त्यांच्या उपनद्या बनत जातात. आजच्या या लेखात आपण भारतातील सर्वात लांब नद्या माहिती मराठी (Longest rivers in India) याविषयी माहिती जाणून घेणार आहोत.

Longest rivers in India
भारतातील सर्वात लांब नद्या (Longest rivers in India)

भारतातील सर्वात लांब नद्या (Longest rivers in India)

  • गंगा नदी
  • गोदावरी नदी
  • कृष्णा नदी
  • यमुना नदी
  • नर्मदा नदी
  • सिंधू नदी
  • महानदी
  • कावेरी नदी
  • ब्रह्मपुत्रा नदी
  • तापी नदी

भारतातील सर्वात लांब नद्या माहिती मराठी (Longest rivers in India in marathi)

गंगा नदी

भारतातील सर्वात लांब नद्यांच्या यादीमध्ये पहिल्या क्रमांकाची नदी आहे गंगा नदी. गंगा नदी ही दक्षिण आशियातील भारत व बांगलादेश या दोन देशांच्या मधून वाहणारी महत्त्वाची नदी आहे. गंगा नदी ही 2525 किलोमीटर वाहत जाते. गंगा नदीला बांगलादेशात पद्मा या नावाने ओळखले जाते. उगम स्थानापासून देवप्रयापर्यंत गंगा नदीला भागीरथी नदी असे म्हणतात.

भागीरथी ही भारताच्या उत्तराखंड राज्यातील नदी गंगेच्या दोन मूळ नद्यांच्यापैकी एक तर दुसरी अलकनंदा अलकनंदा आणि भागीरथी या दोन नद्यांचा संगम देवप्रयाग येथे होतो. तिथून या नदीला गंगा नदी म्हणून ओळखले जाते. मंदाकिनी नदी केदारनाथ प्रलयापासून आपणास परिचित आहेत. ही नदी आणि अलकनंदा नदी या दोन नद्यांचा संगम रुद्रप्रयाग या ठिकाणी होतो. गंगा नदी उत्तराखंड उत्तर प्रदेश बिहार पश्चिम बंगाल या भारतातील चार राज्यातून वाहते गंगा नदी आग्नेय दिशेला वाहत येते.

उत्तर भारतातील गंगेच्या खोऱ्यातून वाहतवाद बंगलादेशात प्रवेश करते पुढेही ब्रह्मपुत्र नदीला जाऊन मिळते. तिथून पुढे मेघना नदीला जाऊन मिळते आणि नंतर ती बंगालच्या उपसागराला जाऊन मिळते. तिथे सुंदरबन हा जगातील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश निर्माण होतो. सुंदर बनात बऱ्याच दुर्मिळ वनस्पती आणि बंगाली वाघ आढळतात. हिंदू धर्मात गंगा नदीला अतिशय पवित्र मानले आहे. तिला माता असे म्हटले आहे. गंगा नदी ही लक्षावधी भारतीयांची जीवनदायीनी आहे. पाटलीपुत्र कनोज कौशलंबी काशी प्रयाग मुर्शिदाबाद मुंगेर कमतिल्य कलकत्ता इत्यादी प्राचीन ऐतिहासिक व आधुनिक नगरे गंगेच्या किनारी वसले आहेत. 18 व्या शतकाच्या अखेरीपर्यंत गंगा नदी बंगालच्या उपसागरास मिळत होती. तर ब्रह्मपुत्रा नदी काही किलोमीटर पूर्वेस स्वतंत्रपणे मिळायची साधारण अठराव्या शतकाच्या अखेरीस ब्रह्मपुत्रेने पश्चिमेस वळण घेतले.

आता दोन्ही नद्यांचा हरीचा येथे संगम होतो. याबद्दलच इसवी सन 1897 चा भूकंप काही आवश्यक कारणीभूत होता. गंगा नदीमध्ये डॉल्फिनच्या दोन प्रजाती सापडतात त्यांना गंगा डॉल्फिन आणि इरावती डॉल्फिन या नावाने ओळखले जाते. त्याशिवाय गंगेमध्ये असलेले शार्क सुद्धा प्रसिद्ध आहेत. गंगा नदीच्या प्रमुख उपनद्या यमुना घागरा गोमती या आहेत. यमुना ही गंगेची उपनदी स्वतःचे स्वतंत्र आणि मोठी नदी आहे. गंगा आणि यमुना या मुख्य नद्यांचा संगम अलाबाद सध्याचे नवीन नाव प्रयागराज या ठिकाणी संगम होतो. तसेच हा संगम गंगा ,यमुना व सरस्वती नद्यांचा त्रिवेणी संगम म्हटले जाते.

त्यामधील सरस्वती नदी ही गुप्त नदी आहे अशी अनेकांची भावना आहे. घागरा ही नदी गंगेस बिहारमधील छापरा या ठिकाणी येऊन मिळते. भागीरथी नदीवर छोटी मोठी मिळून एकूण 17 धरणे आहेत. यामध्ये भारतातील सर्वात उंच तसेच वीज निर्मितीमध्ये सर्वात पहिल्या क्रमांकाचे धरण आहे तेहरी धरण.

गोदावरी नदी

भारतातील सर्वात लांब नद्यांच्या यादीमध्ये दुसऱ्या क्रमांकाची नदी आहे गोदावरी नदी. या नदीला दक्षिणगंगा असेही म्हटले जाते. गोदावरी चा उगम त्रंबकेश्वर या ठिकाणी ब्रह्मगिरीच्या पर्वतरांगेतून होतो. गोदावरी नदी १४६५ किलोमीटर वाहते. इंद्रावती मंजिरा बिंदुसरा इत्यादी गोदावरी नदीच्या उपनद्या आहेत. गोदावरी नदीवरील महत्त्वाची धरणे पैठण येथील जायकवाडी नाशिक येथील गंगापूर ही आहेत.

कृष्णा नदी

भारतातील सर्वात लांब नद्यांच्या यादीमध्ये तिसऱ्या क्रमांकाचे नदी आहे कृष्णा नदी. कृष्णा नदीचा उगम सह्याद्रीमध्ये महाबळेश्वर येथे होतो. ही नदी भारताच्या महाराष्ट्र कर्नाटक आंध्र प्रदेश मधून वाहते. कृष्णा नदी 1400 किलोमीटर वाहते. कृष्णा नदी हंम्सीला देवी या ठिकाणी आंध्र प्रदेश राज्यात बंगालच्या उपसागरास मिळते. वारणा, पंचगंगा, तुंगभद्रा, भीमा ,घटप्रभा इत्यादी कृष्णा नदीच्या उपनद्या आहे. कृष्णा नदीवरील महत्त्वाची धरणे धोम धरण, अलमट्टी धरण, नागार्जुन सागर धरण ही आहेत .

यमुना नदी

भारतातील सर्वात लांब नद्यांच्या यादीमध्ये चौथ्या क्रमांकाची नदी आहे यमुना नधी . ही नदी भारताच्या उत्तराखंड उत्तर प्रदेश हरियाणा राज्यातून वाहते. यमुना नदीचा उगम उत्तरकाशी पासून 30 किलोमीटर अंतरावर यमुनोत्री या ठिकाणी होतो. यमुना नदी १३७६ किलोमीटर वाहते. यमुना नदीच्या किनारी जगप्रसिद्ध असा ताजमहाल यमुना नदीची शोभा वाढवतो. त्या नदीच्या काठावर दिल्ली आग्रा मथुरा इटावा ही प्रमुख शहरे आहेत. यमुना ही नदी गंगेस प्रयागराज या ठिकाणी येऊन मिळते.

नर्मदा नदी

भारतातील सर्वात लांब नद्यांच्या यादीमध्ये पाचव्या क्रमांकाची नदी आहे नर्मदा नधी. नर्मदा भारताच्या मध्य प्रदेश महाराष्ट्र आणि गुजरात या तीन राज्यांच्या मधून वाहते. नर्मदा ही नदी एकूण 1312 किलोमीटर वाहते. यामध्ये मध्य प्रदेश राज्यात 1078 किलोमीटर तर महाराष्ट्र राज्यात 72 ते 74 किलोमीटर तर गुजरात राज्यात 160 किलोमीटर वाहते.

नर्मदा भारतीय उपखंडातील पाचव्या क्रमांकाची मोठी नदी असून सर्वात मोठी पश्चिम वाहिनी नदी म्हणून ओळखली जाते. नर्मदेला रेवा असेही नाव आहे. नर्मदा गुजरातच्या पश्चिम समुद्रकिनाऱ्यावरील भरुज शहराजवळ थांबायताच्या आखातास म्हणजेच अरबी समुद्रास जाऊन मिळत. नर्मदा नदीवर महत्त्वाची 30 धरने आहेत. यामध्ये भारतातील सर्वात मोठा जलसाठा असलेले धरण इंदिरा सागर धरण तर सरदार सरोवर हे दुसरे धरण आहे. हिंदू धर्मामध्ये नर्मदा नदीला फार पवित्र स्थानी मानले जाते त्यामुळेच बरेचसे भाविक नर्मदा परिक्रमा करतात.

सिंधू नदी

भारतातील सर्वात लांब नद्यांच्या यादीमध्ये सहाव्या क्रमांकाची नदी आहे सिंधू नदी. सिंधू नदी ही तिबेट भारत पाकिस्तान मधून वाहणारी प्रमुख नदी आहे. सिंधू नदीचा उगम तिबेट चीन या ठिकाणी होतो. ही नदी एकूण 3180 किलोमीटर वाहते. ही नदी भारतातून १००० किलोमीटर वाहते. भारतातून वाहणाऱ्या नद्यांच्या यादीमध्ये पहिल्या क्रमांकाची नदी आहे पण ती भारतातून कमी आणि पाकिस्तान मधून जास्त वाहते. म्हणून ही नदी सहाव्या क्रमांकाची नदी आहे.

सिंधू नदीला हिंदू धर्मात अनन्यसाधारण महत्त्व आहे. ही नदी पाकिस्तानात कराची येथे अरबी समुद्राला जाऊन मिळते. तरबेला व कुटु बंधाराही दोन धरणे सिंधू नदीवर आहे. काबुल, सतलब, चिनाब, शेलम, रावी या सात नद्या सिंधू नदीच्या उपनद्या आहेत. सिंधू नदी इंडस नावाने देखील ओळखली जाते.

महानदी

भारतातील सर्वात लांब नद्यांच्या यादीमध्ये सातव्या क्रमांकाची नदी आहे महानदी. महानदी 858 किलोमीटर वाहते. महानदी छत्तीसगड आणि ओडिसा या दोन राज्यांच्या मधून वाहते. महानदीचा उगम चा रायपूर छत्तीसगड या ठिकाणी होतो. महानंदा आणि निलोट आपण देखील महानदीची नावे आहेत. परदीं, सौंदुर, शिवनाथ, हसदेव, अर्पा, लीच इत्यादी महा नदीच्या उपनद्या आहेत. रुद्री, गंगालेप तथा हिराकुडे ही तीन धरणे महा नदीवर आहे. यामध्ये हिराकुडे हे जगप्रसिद्ध धरण आहे. हिराकुड हे धरण जगातील सर्वात जास्त लांबी असलेले धरण आहे.

कावेरी नदी

भारतातील सर्वात लांब नद्यांच्या यादीमध्ये आठव्या क्रमांकाची नदी आहे कावेरी नदी. कावेरी नदीचा उगम तळ कावेरी या ठिकाणी कर्नाटक राज्यामध्ये होतो. ही नदी 765 किलोमीटर वाहते. ही नदी कर्नाटक तामिळनाडू या दोन राज्यांमधून वाहते. या नदीवर प्रमुख दोन धरणे आहेत. ती म्हणजे कृष्णराज सागर, मेतुर धरण. कावेरी नदीच्या अकरा उपनद्या आहेत त्या पुढील प्रमाणे शिस्मा, हेमावती, अकरावती, लक्ष्मण तीर्थ, इत्यादी. कावेरी नदी बंगालच्या उपसागराला तामिळनाडूमध्ये मिळते. तेथे भारतातील सर्वात सुपीक त्रिभुज प्रदेश निर्माण होतो.

ब्रह्मपुत्रा नदी

भारतातील सर्वात लांब नद्यांच्या यादीमध्ये नऊव्या क्रमांकाची नदी आहे ब्रह्मपुत्रा नदी. खरंतर भारतातील हे दुसऱ्या क्रमांकाची नदी आहे. पण ही भारतातून फक्त 725 किलोमीटर व बाकी तिबेट बांगलादेश मधून वाहते. ही भारतातून वाहणाऱ्या नद्यांच्या यादीमध्ये नव्या क्रमांकाची नदी आहे. ही नदी तीन देशात मिळून एकूण 2900 किलोमीटर वाहत जाते. ब्रह्मपुत्रा हिमालयाच्या पर्वतरांगे तील तिबेटच्या बुरांग जिल्ह्यामध्ये सांगोपा किंवा यारलुग झांबो यातून पूर्वेकडे वाचून ब्रह्मपुत्रा भारताच्या अरुणाचल प्रदेश राज्यांमध्ये प्रवेश करते.

अरुणाचल आसाम मधून नैऋत्य दिशेने वाहत जाऊन ब्रह्मपुत्रा बांगलादेशमध्ये शिरते. बांगलादेश मध्ये या नदीला जमुना या नावाने ओळखले जाते. बांगलादेशात ब्रह्मपुत्रेला प्रथम पद्म ही गंगेपासून उगम पावलेली व नंतर मेघना या दोन प्रमुख नद्या येऊन मिळतात. गंगेच्या त्रिभुज प्रदेशामध्ये येऊन बंगाल च्या उपसागराला मिळते.

तापी नदी

भारतातील सर्वात लांब नद्यांच्या यादीमध्ये दहाव्या क्रमांकाची नदी आहे तापी नधी. या नदीला ताप्ती असेही म्हणतात. तापी नदीचा उगम मध्य प्रदेश राज्यात बैतुल जिल्ह्यात मुलताई येथे होतो. ही नदी मध्य प्रदेश महाराष्ट्र गुजरात या तीन राज्यातून वाहते. त्या नदीचे एक वैशिष्ट्ये भारतातील पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहणाऱ्या तीन प्रमुख नद्यांपैकी ही एक आहे.

ही नदी 724 किलोमीटरवर वाहते. तापी नदी सुरत शहारा शेजारी गर्ल्स ऑफ खंबत या ठिकाणी अरबी समुद्राला जाऊन मिळेल. या नदीवर तीन धरणे आहेत. ती म्हणजे काकरा पार धरण, उकाई धरण, हातनुर धरण. तापी नदीच्या पूर्णा, गिरणा, वाघोरा, या तीन उपनद्या आहेत.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)

दक्षिण भारतातील सर्वात लांब नदी कोणती?

गोदावरी ही दक्षिण भारतातील सर्वात लांब नदी आहे.

भारतातील सर्वात लहान नदी कोणती?

भारतातील सर्वात लहान नदी अर्वरी नदी आहे. ही केवळ 90 किमी लांबीची आहे.

भारतातील सर्वात लांब हिमनदी कोणती?

सियाचीन हिमनदी ही भारतातील सर्वात लांब हिमनदी आहे.

भारतातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात लांब नदी कोणती?

गोदावरी भारतातील दुसरी सर्वात लांब नदी आहे.

निष्कर्ष

आजच्या या लेखात आपण भारतातील सर्वात लांब नद्या (Longest rivers in India) याविषयी माहिती जाणून घेतली. भारतातील सर्वात लांब नद्या माहिती मराठी (Longest rivers in India in marathi) तुम्हाला कशी वाटली हे कॉमेंट मध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांना पण नक्कीच शेअर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *