मुंबई शहरातील धरणे माहिती मराठी | Information about dams in Mumbai

Information about dams in Mumbai : मुंबई ही भारतातील महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वाधिक लोकसंख्या असलेले शहर आहे. आज आपण या पोस्ट मध्ये मुंबई शहरातील धरणे माहिती मराठी (information about dams in Mumbai) पाहणार आहोत.

information about dams in Mumbai
मुंबई शहरातील धरणे माहिती मराठी (information about dams in Mumbai)

मुंबई शहरातील धरणे (dams in Mumbai)

  • भातसा धरण
  • अप्पर वैतरणा धरण
  • मिडल वैतरणा धरण
  • तानसा धरण
  • मोडक सागर धरण
  • विहार तलाव
  • तुळशी तलाव

मुंबई शहरातील धरणे माहिती मराठी (information about dams in Mumbai in Marathi)

भातसा धरण

मुंबई शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणाच्या यादीमध्ये पहिल्या क्रमांकाचे धरण आहे भातसा धरण. या धरणाची उंची 88.5 मीटर म्हणजे 290 फूट आहे. या धरणाची लांबी 959 मीटर म्हणजे 3146 फूट आहे. भातसा धरणाची पाणी साठवण्याची क्षमता 34.47 टीएमसी म्हणजेच 34470 दशलक्ष घनफूट इतकी आहे. मुंबई शहराचा 50% म्हणजेच 135 कोटी लिटरचा पाणीपुरवठा भातसा धरणातून होतो. विहार, तानसा, वैतरणा या धरणातून उरलेला 50 टक्के पाणीपुरवठा केला जातो.

अप्पर वैतरणा धरण

मुंबई शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांच्या यादीमध्ये दुसऱ्या क्रमांकाचे धरण आहे अप्पर वैतरणा धरण. हे धरण वैतरणीय नदीवर 1973 साली बांधलेले आहे.या धरणाची उंची 41 मीटर म्हणजे 135 फूट आहे. या धरणाची लांबी 2531 मीटर म्हणजेच 8304 फूट आहे. या धरणाची पाणी साठवण्याची क्षमता 11.71 टीएमसी म्हणजे 11710 दशलक्ष घनफूट इतकी आहे.

मिडल वैतरणा धरण

मुंबई शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांच्या यादीमध्ये तिसऱ्या क्रमांकाचे धरण आहे मिडल वैतरना. हे धरण वैतरण या नदीवर 2012 साली बांधलेले आहे. या धरणाची उंची 84 मीटर म्हणजे 276 फूट आहे. या धरणाची लांबी 565 मीटर म्हणजे 1853 फूट आहे. मिडल वैतरणा धरणाची पाणी साठवण्याची क्षमता 11 टीएमसी म्हणजेच 11000 दशलक्ष घनफूट इतकी आहे. मिडल वैतरणा हे धरण महाराष्ट्रातील तिसऱ्या क्रमांकाचे सर्वात उंच धरण आहे.

तानसा धरण

मुंबई शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांच्या यादीमध्ये चौथ्या क्रमांकावर आहे तानसा धरण. हे धरण तानसा या नदीवर 1892 साली बांधलेले आहे. या धरणाची उंची 41 मीटर म्हणजे 135 फूट आहे. त्याची लांबी 2804 मीटर म्हणजेच 9199 फूट आहे.या धरणाची पाणी साठवण्याची क्षमता 7.37 टीएमसी आहे.

मोडक सागर धरण

मुंबई शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणाच्या यादीमध्ये पाचव्या क्रमांकावर आहे मोडक सागर. अर्थात लोअर वैतरणा धरण. हे धरण वैतरणा या नदीवर 1957 साली बांधलेले आहे. या धरणाची उंची 82 मीटर म्हणजेच 269 फूट आहे. या धरणाची लांबी 567 मीटर म्हणजेच 1860 फूट आहे. या धरणाची पाणी साठवण्याची क्षमता 7.24 टीएमसी आहे.

विहार तलाव

मुंबई शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणाच्या यादीमध्ये सहाव्या क्रमांकावर आहे विहार तलाव. हे धरण नसून हा एक तलाव आहे. हा तलाव विहार या नदीवर 1860 साली बांधलेला आहे.या तलावाच्या बांधाची लांबी 817 मीटर म्हणजेच 2680 फूट आहे. या तलावाची पाणी साठवण्याची क्षमता 1.46 टीएमसी म्हणजेच 1460 दशलक्ष घनफूट इतकी आहे.

तुळशी तलाव

मुंबई शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांच्या यादीमध्ये सातव्या क्रमांकावर आहे तुळशी तलाव. हे धरण नसून हा एक तलाव आहे. हा तलाव तुळशी या नदीवर 1879 साली बांधलेला आहे. या तलावाच्या बांधाची उंची 26मीटर म्हणजेच 85 फूट आहे. या तलावाच्या बांधाची लांबी 186 मीटर म्हणजेच 610 फूट आहे. या तलावाची पाणी साठवण्याची क्षमता 0.37 टीएमसी म्हणजेच 770 दशलक्ष घनफूट इतकी आहे.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)

मुंबई शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांची नावे ?

विहार तलाव आणि तुळशी तलाव

मुंबई मधील धरणांची नावे?

भातसा धरण
अप्पर वैतरणा धरण
मिडल वैतरणा धरण
तानसा धरण
मोडक सागर धरण
विहार तलाव
तुळशी तलाव

मोडक सागर धरण कोणत्या नदीवर आहे?

मोडक सागर धरण वैतरणा नदीवर आहे.

तानसा धरण कोणत्या जिल्ह्यात आहे?

तानसा धरण मुंबई शहरात आहे.

भातसा धरण कोठे आहे?

भातसा धरण मुंबई शहरात आहे.

निष्कर्ष

आजच्या या पोस्टमध्ये आपण मुंबई शहरातील धरणे माहिती मराठी (information about dams in Mumbai) जाणून घेतली. मुंबई शहरातील धरणे माहिती मराठी (information about dams in Mumbai in Marathi) तुम्हाला कशी वाटली हे कॉमेंट मध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांनाही नक्की शेअर करा.

Leave a Comment