रायगड किल्ला माहिती मराठी | Raigad Fort Information Marathi

Raigad Fort Information Marathi : रायगड किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांचा अत्यंत महत्त्वाचा किल्ला होता. स्वराज्याची दुसरी राजधानी म्हणजेच रायगड किल्ला. रायगड किल्ला पुणे शहरापासून 152 किलोमीटर अंतरावर आहे. मुंबई शहरापासून 161 किलोमीटर अंतरावर आहे. हा किल्ला समुद्रसपाटीपासून 820 मीटर म्हणजेच 2700 फूट उंच आहे. रायगड हा किल्ला स्वराज्यातील एक महत्त्वाचा किल्ला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी रायगडचे स्थान आणि महत्त्व पाहून सोळाव्या शतकामध्ये याला आपली राजधानी बनवण्याची ठरवली. आजच्या या लेखात आपण रायगड किल्ला माहिती मराठी (Raigad Fort Information Marathi) जाणून घेणार आहोत.

Raigad Fort Information Marathi
रायगड किल्ला माहिती मराठी (Raigad Fort Information Marathi)

रायगड किल्ला माहिती मराठी (Raigad Fort Information Marathi)

किल्लारायगड
ठिकाण रायगड, महाराष्ट्र
प्रकारगिरिदुर्ग
डोंगररांगसह्याद्री
उंची820 मीटर
रायगड किल्ला माहिती मराठी (Raigad Fort Information Marathi)

स्वराज्यातील एक अत्यंत महत्त्वाची घटना म्हणजेच शिवराज्याभिषेक हा या ठिकाणी झाला. इंग्रजांनी गड ताब्यात घेऊन गडावर लूट आणि नासधूस केली. सदर किल्ला हा महाराष्ट्र शासनाच्या पुरातत्व विभागाचे संरक्षित स्मारक आहे. रायगडचे प्राचीन नाव रायरी हे होते. युरोपची लोक त्यास पूर्वेकडील जिब्रालट असे म्हणत असत.रायगड हा महाराष्ट्राच्या कोकण विभागातील एक जिल्हा आहे जिब्रालट चे ठाणे जितके अजिंक्य आणि दुर्गम तितकाच रायगड अजिंक्य आणि दुर्गम पाचशे वर्षांपूर्वी त्यास गडाचे स्वरूप नव्हते व तो नुसता एक डोंगर होता. तेव्हा त्यास रासिवटा आणि तनस दोन नावे होती. त्याचा आकार, उंची आणि सभोवतालच्या दऱ्या यावरून यास नंदादीप असेही म्हटले जात असे.

निजामशाहीत रायगडाचा उपयोग कैदी ठेवण्यापुरता होत होता. मोरे यांचा प्रमुख यशवंतराव मोरे जावळीहून पळून रायगडावर जाऊन राहिला तर प्रतापराव मोरे विजयपूरला पळाला.महाराजांनी 6 एप्रिल 1656 रोजी सायरी म्हणजेच रायगडास वेढा घातला आणि मे महिन्यात राहिली महाराजांच्या ताब्यात आला. येथे असताना कल्याण चा सुभेदार मुल्ला अहमद खजिना घेऊन विजापूर कडे निघाल्याची बातमी महाराजांना समजली. त्यांनी तो खजिना लुटून रायगड वर आणला आणि त्या खजिनाचा उपयोग गडाच्या बांधनी साठी केला.

रायगडचा माथा राजधानी बनवण्यास सोयीचा आणि पुरेसा आहे. शत्रूला अवघड वाटणारे प्रदेशातले हे अधिक अवघड ठिकाणी आहे.सागरी दळणवळणासाठी हे ठिकाण जवळच आहे म्हणून महाराजांनी राजधानीसाठी या गडाची निवड केली. किल्ल्याचे पूर्वीचे नाव जंबुदीप असे होते.छत्रपती शिवाजी महाराज रायगडला पाहून म्हणाले राजा खासा जाऊन पाहता गढ बहुत चाकोठा चौतर्फा गडाचे कडे तासिल्याप्रमाने दीड गाव उंच पर्जन्य काळी गवत उगवत नाही आणि धोंडा तासिव एकच आहे.

दौलताबाद पृथ्वीवरचा चखोटा खरा परंतु तो उंचीने ठोकळा दौलताबादचे दशगुनी गड उंच असे देखून बहुत संतुष्ट झाले आणि बोलले तक्तास जागा हाच गड करावा.गडाला सुमारे 1435 पायऱ्या आहेत. गडाच्या पश्चिमेकडे हिरकणीचा बुरूज आणि उत्तरेकडे टकमक टोक आणि मध्य भागी असलेला महाराजांचा पुतळा हे मुख्य आकर्षण आहे. शिवराज्याभिषेक हा या गडाने अनुभवलेला सर्वश्रेष्ठ प्रसंग आहे. महाराजांचा राज्याभिषेक म्हणजे महाराष्ट्राच्याच नव्हे तर भारताच्या इतिहासात एक लक्षणीय घटना आहे.

19 मे 1674 रोजी राज्यभिषेकांच्या विधी पूर्वी महाराजांनी प्रतापगडच्या भवानी मातीचे दर्शन घेतले आणि तीन मन सोन्याचे म्हणजेच 56 हजार किमतीचे छत्र देखील अर्पण केले. गडावरील राज सभेत सहा जून 1674 ज्येष्ठ शुद्ध 13 शके 1596 शनिवार या दिवशी राज्याभिषेक साजरा झाला. या मागचा खर हेतू हा जास्तीत जास्त लोकांना समाधान वाटावे हा होता. महाराजांचे निधन झाल्यावर पुढे साधारण सहा वर्षे रायगड स्वराज्याची राजधानी राहिला.

महाराजा नंतर छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक देखील रायगडावर झाला. सूर्याजी पिसाळ या फितूर झालेल्या किल्लेदारामुळे 3 नोहेंबर 1689 ला हा गढ मुघलांच्या ताब्यात गेला. पुढे शाहू महाराजांच्या कारकिर्दीत 5 जून 1733 ला रायगड पुन्हा एक वेळ महाराष्ट्राच्या ताब्यात आला. मात्र त्यानंतर इंग्रजांनी पेशव्यांच्या ताब्यातून हा गढ हिसकावून घेतला आणि गढ लुटला किल्ल्याची प्रचंड नासधूस केली आग लावली परिणामी आज हा किल्ला पदजडी च्या अवस्थेत उभा आहे.

छत्रपतींच्या कोल्हापूरच्या गादीचे वारस छत्रपती संभाजी राजे यांच्या मार्गदर्शनाखाली रायगडचे काम सुरू आहे. रायगडावर दोन मार्गाने जाता येत. खुबलढा बुरज आणि दुसरा मार्ग म्हणजे नाना दरवाजा.

रायगडावरील पाहण्यासारखी ठिकाणे

 • पाचाडचा राजमाता जिजबाईचा किल्ला
 • नाना दरवाजा
 • मदारमोर्चा किंवा मशीनमोर्चा
 • महादरवाजा
 • हत्ती तलाव
 • गंगासागर तलाव
 • पालखी दरवाजा
 • स्तंभ
 • मेणा दरवाजा
 • राजभवन
 • राजसभा
 • शीरकई देवूळ
 • जगदीश्वरा चे मंदिर
 • महाराजांची समाधी
 • वाघ दरवाजा
 • टकमक टोक
 • हिरकणी टोक

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)

रायगड किल्ला कोणी बांधला?

रायगड किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधला होता आणि मुख्य हिरोजी इंदुलकर होते.

रायगड किल्ला कोणत्या तालुक्यात आहे?

रायगड किल्ला महाड तालुक्यात आहे.

रायगड किल्ल्याचे जुने नाव

रायगड किल्ल्याचे जुने नाव रायरी होते.

रायगड किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे?

रायगड किल्ला रायगड जिल्ह्यात आहे.

रायगड किल्ला कुठे आहे?

रायगड किल्ला रायगड जिल्ह्यात आहे.

शिवरायांनी राजधानीसाठी कोणत्या किल्ल्याची निवड केली?

शिवरायांनी राजधानीसाठी रायगड किल्ल्याची निवड केली.

निष्कर्ष

आजच्या या लेखात आपण रायगड किल्ला माहिती मराठी (Raigad Fort Information Marathi) जाणून घेतली. तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे कॉमेंट मध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांना पण नक्कीच शेअर करा.

Leave a Comment