harmonium information in Marathi:हार्मोनियम हे एक स्वर वाद्य असून संगीतामध्ये याला खूप महत्त्व आहे.हार्मोनियम वर गायल्याने गायकाचा आवाज खुलतो हार्मोनियम गायकाला सात संगत करत असते म्हणूनच हार्मोनियमला संवादिनी देखील म्हटले जाते.हार्मोनियम ला सोप्या भाषेत पेटी देखील म्हटले जाते.
हे मोठ्या आवाजात ऐकाहार्मोनियम : सुषिर वाद्यांपैकी एक लोकप्रिय वाद्य. त्याला’ बाजाची पेटी’ असेही म्हणतात. ते सुषिर असले, तरी त्यामध्ये आवाज पत्तीतून उत्पन्न होतो आणि पत्तीला कंपित करण्याचे काम हवा करते. त्याला’ बाजाची पेटी’ असेही म्हणतात.हार्मोनियम हे यूरोप खंडातून इंग्रजांच्या आगमनाबरोबर भारतात प्रविष्ट झालेले पाश्चात्त्य वाद्य आहे.
Contents
हार्मोनियम माहिती मराठी (harmonium information in Marathi)
हार्मोनियम ची पेटी ही सागवान च्या लाकडापासून बनते या पेटीला अनेक भाग असतात.पेटीमध्ये हवा मारण्यासाठी प्रथम भाता दिलेला असतो.हार्मोनियम ला काळ्या आणि पांढऱ्या रंगाची बटणे असतात.पेटीच्या मागच्या बाजूला स्टॉपर असतात तर आतल्या बाजूला पोट भाता, स्केल असे विभिन्न प्रकार असतात.
- कडुलिंब झाडाची माहिती मराठी (Neem tree information in marathi)
- अक्षवृत्ते व रेखावृत्ते (Axes and Circles in marathi)
पेटीच्या पुढच्या बाजूने हवा पेटीत ओढली जाते ही ढकललेली हवा आत पोटभात्यामध्ये साठते. पोटभात्यामध्ये ही गेलेली हवा स्टॉकरच्या माध्यमातून रीडस पर्यंत जाते या रीड्स वर धातूचा पट्ट्या बसविलेल्या असतात जेव्हा रीड्स वरून हवा जाते तेव्हा रीड्स वरील धातूच्या पट्ट्या कंप पावतात आणि त्यातून स्वर नाद होतो.रीड्स वर काळी व पांढऱ्या रंगाची बटणे बसवलेली असतात.या बटनांवरून हार्मोनियम चा आवाज बाहेर निघत असतो.
ज्या बटनावर आपण बोट ठेवू त्या बटनाच्या खालच्या बाजूने धातूची पट्टी असते ही धातूची पट्टी उचलली जाते आणि तेथून हवा पास होते हवा पास होत असताना ती धातूची पट्टी कंप पावते आणि त्यातून विशिष्ट असा आवाज यायला लागतो आणि त्यालाच आपण स्वर असे म्हणतो. प्रत्येक धातूच्या पट्टीला वेगवेगळी फ्रिक्वेन्सी सेट केलेली असते म्हणून प्रत्येक बटनाचा स्वर हा वेगळा असतो.
हार्मोनियम चे प्रकार
गायकाला गाण्यांमध्ये सातसंगत व्हावी म्हणून वेगवेगळ्या प्रकारच्या पेट्या बनविलेल्या असतात. पेट्यांमध्ये साधारणतः तीन प्रकार बघायला मिळतात.
- मादीपेटीमध्ये महिलांच्या आवाजाला सूट होईल असा आवाज बनविलेला असतो जो अतिशय सॉफ्ट असतो.पातळ बासरी मधून आवाज निघावा असा स्वरध्वनी या मादी पेटीचा असतो मादी पेटी ही महिलांच्या आवाजात असल्या कारनी ही पेटी महिलांसाठी उपयुक्त असते.या पेटीची किंमत साधारणता 3000 ते 7000 पर्यंत असते.
- नरपेटी – नरपेटी मध्ये पुरुषांच्या नैसर्गिक आवाजाला जुळणे अशी फ्रिक्वेन्सी (वारंवारता) सेट केलेली असते.नरपेटि पुरुषांना नैसर्गिक रित्या उपयुक्त ठरते म्हणून पुरुष शक्यतो नरपेटी वापरतात.नरपेटी ही 7000 ते 15000 पर्यंत आपल्याला उपलब्ध होऊ शकते.
- खर्ज पेटी -खर्ज ची वेगळी अशी पेटी नसते पण नर किंवा मादी पेटीला खर्ज बसवून त्या पेटीमध्ये खर्ज साधना वाढविण्याच्या हेतून हा प्रकार बनविण्यात आलेला आहे.संगीतामध्ये खर्ज साधनेला खूप महत्त्व आहे गायक जेवढा या पेटीवर सराव करेल तेवढा सप्तकामध्ये गायकाचा आवाज वर पोहोचण्यास मदत होईल.ज्या पुरुषांचा घोगरट आणि जाड आवाज असतो त्यांना सरावासाठी ही पेटी फार महत्त्वाची ठरते.
सध्या भारतीय संगीताचा एक अविभाज्य घटक असणारे हार्मोनियम हे वाद्य विदेशातून भारतात आले आहे. शास्त्रीय संगीताप्रमानेच चित्रपट संगीतातही हे वाद्य आता आवश्यक बनले आहे. या वाद्याचा शोध पॅरिस शहरातील अलेक्झांडर डिबेन यांनी इ.स. 1770 मध्ये लावला. भारतात हे वाद्य इ. स. 1800 नंतर युरोपीय लोकांनी आणले. एका चौकटीमध्ये धातूची पट्टी टोक खुले राहील अशा बनवतात त्यात हवा फुंकल्याने पट्टी कंप पावून ध्वनी निर्माण होतो. हार्मोनियमला संवादिनी किंवा पेटी असेही म्हणतात.
पूर्वी हार्मोनियमचे रिड्स परदेशातून मागवावे लागत होते. परंतु आता ती रिड्स कोलकत्ता व गुजरातमध्ये बनवण्यात येतात. आता पूर्ण हार्मोनियम भारतात बनवले जाते.सारंगी, सतार या वाद्यांच्या मानाने हार्मोनियम वाजवायला सोप आहे. गाण्यांना चाली लावताना संगीतकार हार्मोनियमला प्राधान्य देतात. हे वाद्य गायकांच्या साथीसाठी वापरले जाते.
निष्कर्ष (summary)
आजच्या या लेखात आपण हार्मोनियम माहिती मराठी (harmonium information in Marathi) ही माहिती जाणून घेतली. ही माहिती कशी वाटली हे कॉमेंट मध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांना पण नक्कीच शेअर करा.