रत्नागिरी पर्यटन स्थळे | Tourist places in Ratnagiri information in Marathi

Tourist places in Ratnagiri information in Marathi : रत्नागिरी हे ठिकाण महाराष्ट्राची राजधानी मुंबई पासून जवळ जवळ 350 किलोमीटर येवढ्या अंतरावर आहे तसेच हा जिल्हा महाराष्ट्राच्या नैऋत्य भागात असून कोकण विभागाचा भाग आहे.रत्नागिरी हा जिल्हा पर्यटन विभागासाठी महत्त्वाचा जिल्हा म्हणून ओळखला जातो या ठिकाणी आपल्याला समुद्रकिनारी ऐतिहासिक वास्तू,मंदिर व त्याचबरोबर नैसर्गिक पर्यटन स्थळांचा आनंद घ्यायला येतो.रत्नागिरी पर्यटन स्थळे (Tourist places in Ratnagiri information in Marathi)

रत्नागिरी पर्यटन स्थळे (Tourist places in Ratnagiri information in Marathi)

Tourist places in Ratnagiri information in Marathi
रत्नागिरी पर्यटन स्थळे (Tourist places in Ratnagiri information in Marathi)

1.गणपतीपुळे

गणपतीपुळे हे ठिकाण कोकण विभागातील एक प्रसिद्ध ठिकाण म्हणून ओळखले जाते.रत्नागिरी रेल्वे स्थानकापासून साधारणता 30 किलोमीटर येवढ्या अंतरावर हे ठिकाण आहे महाराष्ट्रातील सर्वात प्रसिद्ध ठिकाणांपैकी हे एक ठिकाण आहे.गणपतीपुळे येथील प्रमुख आकर्षण म्हणजे तेथे असलेले 1600 वर्षांपूर्वीचे स्वयंभू गणपती मंदिर आहे हे मंदिर एका टेकडीच्या पायथ्याशी वसलेले आहे.तसेच तसेच गणपतीपुळे हा समुद्रकिनारा कोकण किनारपट्टीवरील सर्वात प्रेक्षणीय किनारा म्हणून ओळखला जातो.गणपतीपुळे हा बीच स्वच्छ आणि सुंदर समुद्र किनारा आहे.या समुद्रकिनाऱ्याला भेट देण्यासाठी भारतातूनच नव्हे तर संपूर्ण जगभरातून पर्यटक येथे येत असतात.

2.मांडवी बीच 

मांडवी बीच हा समुद्रकिनारा रत्नागिरी शहरापासून 4 किलोमीटर येवढ्या अंतरावर आहे.रत्नागिरी शहरातील सर्वात गजबजलेला समुद्रकिनारा म्हणून या बीच ला ओळखतात.मांडवी बीच हा अतिशय स्वच्छ व सुंदर समुद्रकिनारा आहे जो राजीवंत बंदरापर्यंत पसरलेला आहे या समुद्रकिनाऱ्याच्या पश्चिमेला रत्नदुर्ग किल्ला तर दक्षिणेला अरबी समुद्र आहे हा बीच काळ्या वाळूसाठी ओळखला जातो तसेच या समुद्रकिनाराच्या माथ्यावर बुरुज असल्यामुळे या बीचला रत्नागिरीचे प्रवेशद्वार म्हणून ही ओळखले जाते.सूर्यास्ताच्या वेळेस बरेच पर्यटक या मांडवी बीच ला भेट देण्यासाठी येत असतात.

3.रत्नदुर्ग किल्ला

रत्नागिरी बस स्थानकापासून फक्त 4 किलोमीटर येवढ्या अंतरावर असणारा रत्नदुर्ग हा किल्ला अरबी समुद्राच्या काठावर वसलेला ऐतिहास किल्ला आहे.रत्नदुर्ग हा किल्ला महाराष्ट्रातील लोकप्रिय किल्ल्यांपैकी एक आहे.रत्नदुर्ग हा किल्ला बहामनी सुलतानाच्या काळात बांधला गेला.हा किल्ला तिन्ही बाजूंनी अरबी समुद्राला वेढलेला आहे किल्ल्याच्या भिंतीचे काही भाग आज देखील शाबूत आहेत.या किल्ल्याच्या मध्यभागी भगवती देवीचे मंदिर असल्याने याला भगवती किल्ला असे देखील म्हणले जाते.सूर्यास्ताच्या वेळेस या किल्ल्याला बरेचसे पर्यटक भेट देत असतात.

4.थिबा पॉईंट

थिबा पॉईंट हे ठिकाण रत्नागिरी मधील लोकप्रिय पर्यटन स्थळांनपैकी एक आहे तसेच हे ठिकाण सर्वात आदर्श आणि प्राचीन ठिकाण म्हणून ओळखले जाते मेन्मार चा राजा थीबु याला या ठिकाणी आणून तुरुंगात टाकण्यात आले होते असे या जागे बद्दल मानले जाते.थिबा पॉईंट हे ठिकाण मुळातच हिरव्यागार शेतांनी वेडलेला किल्ला आहे पर्यटक या ठिकाणी येऊन त्यांची रचना आणि ऐतिहासिकतेचा आनंद घेत असतात. रत्नागिरी बस स्थानकापासून हे ठिकाण फक्त 2 किलोमीटर येवढ्या अंतरावर आहे.

5.भातेये समुद्रकिनारा

कोकण किनारपट्टी वर स्तिथ असणारा भातेये हा समुद्रकिनारा एक अद्भुत समुद्रकिनारा म्हणून ओळखला जातो.भातेये समुद्रकिनारा हा 1.5 किलोमीटर येवढ्या परिसरामध्ये विस्तारलेला आहे.या बीचवर तुम्ही निळे पाणी,चंदेरी वाळूचा परीसर आनी निसर्गरम्य परसराचा आनंद घेऊ शकता. सूर्यास्ताच्या वेळेस बरेच पर्यटक या बीच वर गर्दी करत असतात.भातेये हा समुद्रकिनारा पर्यटकांमध्ये लोकप्रिय पर्यटन स्थळ म्हणून ओळखले जातो.रत्नागिरी बस स्थानकापासून हा समुद्रकिनारा साधारणता 3 किलोमीटर येवढ्या अंतरावर आहे.

6.लोकमान्य टिळक म्युझियम 

लोकमान्य टिळक या म्युझियमला टिळकालीन संग्रहालय या नावाने देखील ओळखले जाते. टिळकालीन हे संग्रहालय लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचे वडीलोपार्जित घर आहे.हे घर मूळ म्हणजे कोकणी वस्तू कलेचा उत्कृष्ट नमुना आहे या म्युझियम मध्ये लोकमान्य टिळक यांच्या जीवन आणि चित्रे व रेखाचित्रे यांच्या माध्यमातून स्वतंत्र साठी केलेल्या संघर्षाचे चित्रण केलेले आहे.

7.जयगड किल्ला 

जयगड हा किल्ला कोकण विभागातील लोकप्रिय किल्ल्यांपैकी एक आहे तसेच हा किल्ला सागरी दुर्ग किल्ला आहे या किल्ल्याची बाहेरील तटबंदी अजूनही मजबूत आहे.चार एकर एवढ्या जागेत विस्तारलेल्या या किल्ल्याच्या दक्षिण टोकाला खंदक आणि मजबूत बुर्जानी वेडलेले आहे. तसेच या किल्ल्याच्या मध्यभागी कान्होजी आंग्रे यांचा वाडा,गणपती मंदिर आणि पाणी साठवण्यासाठी तीन विहिरी आहेत.जयगड या किल्ल्याच्या जवळ जयगड लाईट हाऊस हे देखील ठिकाण आहे. जयगड हा किल्ला रत्नागिरी या शहरापासून जवळपास 42 किलोमीटर इतक्या अंतरावर आहे.

8.रत्नागिरी मरीन फिश म्युझियम

रत्नागिरी बस स्थानकापासून साधारणता 3 किलोमीटर एवढे अंतरावर हे सागरी मत्स्यालय आणि संग्रहालय आहे.1985 मध्ये या सागरी संग्रहालयाची स्थापना करण्यात आली होती या संग्रहालयात आपल्याला दुर्मिळ आणि सुंदर नमुने पाहण्याचा आनंद घेता येईल जसेकी सीहॉर्स फिश, लॉयन फिश,ट्रिगर फिश,स्टार फिश अशा बऱ्याच सागरी माशांचा अनुभव घेता येतो. हे ठिकाण खास करून लहान मुलांसाठी खूपच आवडीचे ठिकाण आहे. 

9.आरेवारे बीच 

रत्नागिरी या शहरापासून साधारणता 12 किलोमीटर येवढ्या अंतरावर असणारा आरेवारे हा बीच अतिशय स्वच्छ व शांत समुद्रकिनारा आहे.या बीचवर असणारी शांतता व स्वच्छता आपल्या मनाला एक वेगळीच शांती देऊन जाते.आरेवारे बीच वर असणाऱ्या सौंदर्यामुळे आणि प्रसन्न वातावरणामुळे बरेच पर्यटक या बीच ला सकाळी आणि संध्याकाळी भेट देण्यासाठी येत असतात तसेच या ठिकाणी आपल्याला सागरी पक्षांना देखील पाहण्याचा अनुभव घेता येतो.

10.जयगड लाईट हाऊस 

जयगड लाईट हाऊस हे ठिकाण रत्नागिरी मधील लोकप्रिय पर्यटन स्थळांपैकी एक आहे. या लाईट हाऊस ची स्थापना 1931 मध्ये करण्यात आली होती तसेच हे लाईट हाऊस 100% कास्ट आयर्न पासून बनवलेले आहे. ब्रिटिशांच्या काळात या लाईट हाऊस ची निर्मिती करण्यात आली होती.अरबी समुद्रामध्ये असणाऱ्या मोठ-मोठ्या जहाजांना या लाईट हाऊस द्वारे मार्ग दाखवले जातात. तसेच या लाईट हाऊस वरून आपल्याला अरबी समुद्र आणि रत्नागिरी शहराचे रोमांचक आणि अविस्मरणीय क्षण पाण्याचा आनंद घेता येईल.रत्नागिरी बस स्थानकापासून हे लाईट हाऊस जवळ जवळ 42 किलोमीटर येवढ्या अंतरावर आहे.

सतत विचारले जाणारे प्रश्न (FAQ)

रत्नागिरी जिल्ह्यातील तालुके किती व कोणते?

मंडणगड, दापोली, खेड, चिपळूण, गुहागर, संगमेश्वर, रत्‍नागिरी, लांजा, राजापूर

रत्नागिरी ला किती समुद्र किनारा लाभला आहे?

रत्नागिरी जिल्ह्यात 167 कि. मी. लांबीचा समुद्र किनारा आहे, ज्यामध्ये अनेक मनोरंम्य किनारे व किल्ले आहेत. 

रत्नागिरी जिल्ह्यात काय प्रसिद्ध आहे?

हापूस आंबा, काजू, नारळ, भात, इ. साठी रत्‍नागिरी प्रसिद्ध आहे.

रत्नागिरी जिल्ह्याचे क्षेत्रफळ किती आहे?

8,208 km²

निष्कर्ष (summer)

आजच्या या लेखात आपण रत्नागिरी पर्यटन स्थळे (Tourist places in Ratnagiri information in Marathi) ही माहिती जाणून घेतली. ही माहिती कशी वाटली हे कॉमेंट मध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांना पण नक्कीच शेअर करा.

रत्नागिरी पर्यटन स्थळे (Tourist places in Ratnagiri information in Marathi)

Leave a Comment