औरंगाबाद पर्यटन स्थळे | Tourist Places In Aurangabad

Tourist Places In Aurangabad : औरंगाबाद हे शहर मागील चारशे वर्षात सर्वात वेगाने वाढलेले शहर आहे. 52 दरवाजाचे शहर म्हणून औरंगाबाद या शहराची ओळख आहे तसेच हा जिल्हा पर्यटन जिल्हा म्हणून ही घोषित करण्यात आलेला आहे.शैक्षणिक चळवळीने गाजलेला जिल्हा म्हणूनही या जिल्ह्याची ओळख आहे.

Tourist Places In Aurangabad
औरंगाबाद पर्यटन स्थळे (Tourist Places In Aurangabad)

औरंगाबाद पर्यटन स्थळे (Tourist Places In Aurangabad)

1.पितळखोरा 

औरंगाबाद चाळीसगाव रस्त्यावर कन्नड गावाजवळ एक दरीत तेरा लेण्याचा समूह आहे.भारतातील सर्वात जुने लेण्यांमध्ये या लेण्याची गिनती केली जाते.या लेण्यांतील काही गुहा दोन मजली देखील आहेत या ठिकाणी जाण्यासाठी औरंगाबाद येथून एक बस देखील आहे.

2.गौताळा अभयारण्य 

गौताळा अभयारण्य हे मराठवाड्यातील सर्वात मोठे अभयारण्य आहे.औरंगाबाद मधील चाळीसगाव पासून 20 किलोमीटर एवढे अंतरावर हे अभयारण्य आहे.या अभयरण्यात मोर,पोपट, सुगरण,बुलबुल असे पक्षी पाहायला मिळतील.या ठिकाणी पूर्वी गवळी लोक राहायचे त्यांच्या गाई तिथे चरायच्या त्यामुळे या ठिकाणाला गौताळा असे नाव पडले असावे.

3.म्हैसमाळ 

औरंगाबाद येथे वेरूळ जवळच असणाऱ्या डोंगरावर म्हैसमाळ हे थंड हवेचे ठिकाण आहे जे पर्यटकांसाठी एक विशेष स्थान बनलेला आहे.येथील हिल स्टेशन हे पर्यटकांना खूपच आकर्षक करते.पावसाळ्यात निसर्गाचे रुपडे अनुभवण्यासाठी बरेच पर्यटक येथे येत असतात.

4.छत्रपती शिवाजी महाराज म्युझियम

औरंगाबाद महानगरपालिकेने स्थापन केलेल्या संग्रहालय छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वस्तू,शस्त्रे व पाचशे वर्षांपूर्वीच्या सामग्री या म्युझियम मध्ये ठेवलेल्या आहेत हे पाहण्या साठी पर्यटक येथे रोज येत असतात.

5.सिद्धार्थ उद्यान आणि प्राणी संग्रहालय 

1985 मध्ये सुरू करण्यात आलेले हे उद्यान औरंगाबाद मध्ये पर्यटकांचे विशेष स्थान बनलेले आहे.सिद्धार्थ उद्यान व प्राणी संग्रहालय मराठवाड्यातील एकमेव संग्रहालय म्हणून ओळखले जाते येथे विविध प्रकारचे 200 पेक्षा जास्त पक्षी आणि प्राणी आहेत.गौतम बुद्धांचा नावावरून ठेवण्यात आले असून या उद्यानात गौतम बुद्धांचा एक भव्य पुतळा देखील बसवण्यात आलेला आहे.

6.बीबी का मकबरा 

बीबी का मकबरा हा मुघल सम्राट औरंगजेब चा मुलगा आजमशा याने आपल्या आईच्या स्मरणार्थ बांधलेला मकबरा आहे.हे ठिकाण औरंगाबाद बस स्थानकापासून दोन किलोमीटर एवढे अंतरावर आहे.

7.औरंगाबाद लेणी 

औरंगाबाद लेणी ही औरंगाबाद शहरातील बीबी का मकबरा पासून अगदी काही अंतरावर आहे. ही एक बौद्ध लेणी असून डोंगरात खोदलेली लेणी आहे अजिंठा आणि वेरूळ लेणीशी याही लेण्यांचा संबंध येतो.दरवर्षी या ठिकाणी बरेच पर्यटक येत असतात.

8.डॉक्टर सलीम अली सरोवर 

डॉक्टर सलीम अली सरोवर हे या शहराला लाभलेले एक अप्रतिम सरोवर आहे.शहराच्या मध्यवर्ती भागात असूनही निसर्ग परंपरेने नटलेले कदाचित हे महाराष्ट्रातील एकमेव सरोवर असेल मुघल काळाच्या या तलावाला किजरी तलाव म्हणून देखील ओळखले जात असे.हिवाळ्यात परदेशी पक्षी मोठ्या प्रमाणात येथे येत असतात जवळच या ठिकाणी पक्षी निरीक्षण केंद्र आहे त्यामुळे या तलावल पक्षी तज्ञ डॉक्टर सलीम अली सरोवर असे नाव देण्यात आले.

कडुलिंब झाडाची माहिती मराठी (Neem tree information in marathi)

9.सोनेरी महल 

सोनेरी महल हे औरंगाबाद मधील ऐतिहासिक वास्तू कला ठिकाण आहे.औरंगाबाद मधील मराठवाडा विद्यापीठाच्या परिसरात हा महल वसलेला आहे. या ठिकाणावर काही वर्षांपासून वेरूळ औरंगाबाद हा महोत्सव आयोजित केला जातो.या महालातील चित्रे ही खऱ्या सोन्याच्या पाण्याने रंगवलेली आहेत म्हणून या महालाला सोनेरी महल असं म्हटलं जातं.सुट्टीच्या दिवशी बरेच पर्यटक या पर्यटन स्थळाला भेट देत असतात.

10.जायकवाडी धरण 

औरंगाबाद जिल्ह्यातील गोदावरी नदीवर जायकवाडी धरण वसलेले आहे हे धरण औरंगाबाद जिल्ह्यातील प्रमुख धरण म्हणून देखील ओळखले जाते.औरंगाबाद शहराच्या विकासामध्ये जायकवाडी धरणाचा खूप मोठा वाटा आहे.औरंगाबादला जाण्यासाठी रेल्वे,एसटी,बस आणि खाजगी वाहनाची सोय आहे.  

निष्कर्ष (summer)

आजच्या या लेखात आपण औरंगाबाद पर्यटन स्थळे (Tourist Places In Aurangabad) ही माहिती जाणून घेतली.ही माहिती कशी वाटली हे कॉमेंट मध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांना पण नक्कीच शेअर करा.

Leave a Comment