अक्षवृत्ते व रेखावृत्ते | Axes and Circles in marathi

By | February 13, 2023

अक्षवृत्ते व रेखावृत्ते (Axes and Circles in marathi):पृथ्वी भोवती ज्या काही काल्पनिक रेषा काढल्या जातात त्यालाच अक्षवृत्ते व रेखावृत्ते असे म्हणतात.अक्षवृत्ते व रेखावृत्ते यांचा अभ्यास करत असताना आपल्याला पृथ्वी ची लांबी माहित असणे महत्वाचे आहे. पृथ्वी ची पूर्व पश्चिम लांबी 12756 किलोमीटर इतकी आहे, आणि उत्तर दक्षिण लांबी ही 12714 किलोमीटर इतकी आहे.यावरून आपल्याला हे लक्षात येते की पृथ्वी ची पूर्व पश्चिम लांबी ही उत्तर दक्षिण लांबी पेक्षा जास्त आहे. पृथ्वी ला जर आपण आडव्या दोन समान भागात विभागले तर वर चा जो भाग आहे त्याला आपण उत्तर गोलार्ध असे म्हणतो आणि खालचा जो भाग आहे त्याला आपण दक्षिण गोलार्ध असे म्हणतो.

Axes and Circles in marathi
अक्षवृत्ते व रेखावृत्ते (Axes and Circles in marathi)

अक्षवृत्ते व रेखावृत्ते (Axes and Circles in marathi)

याच पद्धतीने आपण जर पृथ्वी ला उभ्या दोन समान भागात विभागले तर एका भागाला आपण म्हणणार पूर्व गोलार्ध आणि दुसऱ्या भागाला आपण म्हणणार आहोत पश्चिम गोलार्ध.जर आपण जगाच्या भुगोलामध्ये भारताचे स्थान बागितले तर भारताचे स्थान हे उत्तर पूर्व गोलार्ध या मध्ये आहे.जर आपण पृथ्वी ला आडव्या दोन भागामध्ये विभागले तर भारत हा उत्तर गोलार्धा मध्ये येतो आणि जर पृथ्वी ला आपण उभ्या दोन भाग मध्ये विभागले तर भारत पूर्व गोलार्ध मध्ये येतो. म्हणून भारताचे जर स्थान बगितले तर भारत  हा उत्तर पूर्व गोलार्ध मध्ये स्तिथ आहे.

अक्षवृत्ते व रेखावृत्ते म्हणजे काय

भूपृषठावरील कोणत्याही बिंदू चे स्थान दर्शवण्यासाठी अक्षवृत्ते व रेखावृत्ते या दोन वृतांचा उपयोग केला जातो.अक्षवृत्ते हे पूर्व,पश्चिम कल्पेलेलि असतात आणि रेखावृत्ते ही दक्षिण,उत्तर कल्पेलेलि असतात.अक्षांश व रेखांश या पृथ्वीवरील काल्पनिक रेषा आहेत, त्यांचा उपयोग हा भौगोलिक स्थान निश्चित करण्यासाठी होतो.उत्तर ध्रुव हे सर्वात वर असते आणि दक्षिण ध्रुव हे सर्वात खाली आहे. पृथ्वी च्या बरोबर मधी जी आडवी रेश असते त्या रेषेला विषुववृत असे म्हणतात.

अक्षवृत्ते

विषुववृत्त ला समांतर कल्पेलेलि वर्तुळांना अक्षवृत्ते असे म्हणतात. एकाच अक्षवृत्तावरील सर्व स्थानांचे अक्षांश हे सारखेच असतात. म्हणजेच दोन अक्षवृत्तांवरील अंतर हे समानच असते. कारण ते विश्ववृत्तापासून समांतर कल्पवलेली असतात. विषुववृत्त हे सर्वात मोठे व मूळ अक्षवृत्त होय त्यावरील सर्व स्थळांचे अक्षांश 0 डिग्री असतात.

बाकीची वृत्ते त्यांच्या ध्रुवांकडे बारीक होत जातात. उत्तर ध्रुव व दक्षिण ध्रुव हे सर्वात लहान बिंदू मात्र अक्षवृत्त होय. त्यांचे अक्षांश अनुक्रमे 90 डिग्री उत्तर व 90 डिग्री दक्षिण असतात.विषुववृत्तापासून उत्तरेकडे 90 अक्षवृत्त आहेत आणि विषुववृत्तापासून दक्षिणेकडे 90 अक्षवृत्त आहेत आणि आणि  एक विषुववृत्त एक असे 181 अक्षवृत्त आहेत. यापेक्षा कमी अक्षवृते असू शकत नाहीत आणि जास्तही असू शकत नाहीत.

रेखावृत्त

उत्तर ध्रुवा पासून ते दक्षिण ध्रुवा पर्यंत विषुववृत्ताला काटकोनातून छेदून जाणाऱ्या व एक डिग्री अंतरावर काढण्यात आलेल्या काल्पनिक अर्धवर्तुळाकार रेषेला रेखावृत्त म्हणतात.उत्तर ध्रुवा पासून ते दक्षिण ध्रुवापर्यंत रेखावृत्त हे जोडले जातात.मुळ रेखावृत्त म्हणजेच झिरो डिग्री रेखावृत्त इंग्लंड जवळील ग्रीन बीच या बेटावरून गेले आहे. मुळ रेखावृत्तापासून पूर्वेस व पश्चिमेस तर एक अंश अंतरावर या 180 पश्चिम आणि 180 पूर्व अशी एकूण 360 रेखावृत्त मानली गेलेली आहेत. ग्रीन बीच च्या पूर्वेकडील रेखावृत्तांना पूर्व रेखावृत्त व पश्चिमेकडील रेखावृत्तांना पश्चिम रेखावृत्त असे म्हणतात.

ग्रीन बीच हे इंग्लंड मधील एक बेट आहे या बेटावरून मूळ रेखावृत्त गेले आहे. विश्ववृत्तावर दोन रेखावृत्तांमधील अंतर 111 किलोमीटर असून ध्रुवांकडे जाताना हे अंतर कमी कमी होत जाते व ध्रुवावर शून्य होते. कारण सर्व रेखावृत्ते दोन्ही ध्रुवांवर एकत्र येतात. एका रेखावृत्तवरील सर्व ठिकाणी एकाच वेळी मध्यान होत असल्याने रेखावृत्ताला मध्यानवृत्त असेही म्हणतात. सर्व रेखावृत्त ही समान लांबीची असतात. दोन रेखावृत्तांचा अंतर हा चार मिनिट असतो.

विषुववृत्त म्हणजे काय

पृथ्वीचा गोल पृष्ठावर दोन्ही ध्रुवांपासून सारख्या अंतरावर कल्पीवलेला पूर्व पश्चिम वर्तुळाला विषुववृत्त असे म्हणतात. या वृत्तामुळे गोल भूपृष्ठाचे दोन समान भाग पडतात.विषुववृत्त च्या उत्तरेकडील भागाला उत्तर गोलार्ध दक्षिणेकडील भागाला दक्षिण गोलार्ध असे म्हणतात.जसजसे आपण उत्तर ध्रुवाकडे किंवा दक्षिण ध्रुवाकडे जातो तेव्हा अक्षवृत्तांची लांबी ही कमी कमी होत जाते. दोन अक्षवृत्तांचा अंतर हा समानच असतो परंतु त्यांची लांबी ही कमी कमी होत जाते.

सतत विचारले जाणारे प्रश्न (FAQ)

सर्वात जास्त जैवविविधता कोठे आढळून येते ?

सर्वात जास्त जैवविविधता ही उष्ण कठीबांधित प्रदेशामध्ये आढळून येते म्हणजेच विषुववृत जवळ बगायला मिळते.विषुववृत लगत तापमान हे सर्वात जास्त असते आणि जसजसे उत्तरेकडे जाईल किंवा दक्षिणध्रुवाकडे जाईल तसे तापमान हे कमी कमी होत जाते.

सर्वात मोठे अक्षवृत्त कोणते ?

सर्वात मोठे अक्षवृत्त हे विषुववृत्त होय.

पृथ्वीवर एकूण अक्षांश किती आहेत ?

पृथ्वीवर एकूण अक्षांश 181 आहेत.

पृथ्वीवर एकूण अक्षांश किती आहेत व ती कोणकोणती ?

विषुववृत्तापासून उत्तरेकडे 90 अक्षवृत्त आहेत आणि विषुववृत्तापासून दक्षिणेकडे 90 अक्षवृत्त आहेत आणि आणि  एक विषुववृत्त एक असे 181 अक्षवृत्त आहेत. यापेक्षा कमी अक्षवृते असू शकत नाहीत आणि जास्तही असू शकत नाहीत.

रेखावृत्त म्हणजे काय ?

उत्तर ध्रुवा पासून ते दक्षिण ध्रुवा पर्यंत विषुववृत्ताला काटकोनातून छेदून जाणाऱ्या व एक डिग्री अंतरावर काढण्यात आलेल्या काल्पनिक अर्धवर्तुळाकार रेषेला रेखावृत्त म्हणतात. उत्तर ध्रुवा पासून ते दक्षिण ध्रुवापर्यंत रेखावृत्त हे जोडले जातात.मुळ रेखावृत्त म्हणजेच झिरो डिग्री रेखावृत्त इंग्लंड जवळील ग्रीन बीच या बेटावरून गेले आहे.

मूळ रेखावृत्त कोणत्या बेटावरून गेले आहे ?

ग्रीन बीच हे इंग्लंड मधील एक बेट आहे या बेटावरून मूळ रेखावृत्त गेले आहे.

एकूण रेखावृत्त किती आहेत ?

मुळ रेखावृत्तापासून पूर्वेस व पश्चिमेस तर एक अंश अंतरावर या 180 पश्चिम आणि 180 पूर्व अशी एकूण 360 रेखावृत्त आहेत. 

वृत्तजाळी म्हणजे काय ?

अक्षवृत्त आणि रेखावृत्त या दोघांनाही पृथ्वी गोलावर काढले की वृत्तजाळी तयार होते.

निष्कर्ष (summary)

आजच्या या लेखात आपण अक्षवृत्ते व रेखावृत्ते (Axes and Circles in marathi) ही माहिती जाणून घेतली. ही माहिती कशी वाटली हे कॉमेंट मध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांना पण नक्कीच शेअर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *