कराड माहिती मराठी | karad information in marathi

karad information in marathi : कोहिनेला प्राचीन काळी कऱ्हा असे म्हणतात. तर कऱ्हाच्या च्या  काटी असलेले  कऱ्हाटक म्हणजेच आजचे कराड शहर होय. अगदी प्राचीन काळापासून कराड या ठिकाणी लक्ष्मीचे मंदिर होते. मुसलमानी राजवटीमध्ये या मंदिराचा  विदहंस झाला आणि आज त्या ठिकाणी देवीचा फक्त चौथरा आहे. आजच्या या लेखात आपण कराड माहिती मराठी (karad indormation in marathi) जाणून घेणार आहोत.

कराड शहर महाराष्ट्रभर प्रसिद्ध आहे ते कृष्णा व कोयना संगमासाठी  कृष्णा कोयना संगमाला या ठिकाणी प्रीतीसंगम असे म्हणतात. महाराष्ट्राची पहिले मुख्यमंत्री व भारताचे उपपंतप्रधान राहिलेल्या यशवंतराव चव्हाण यांची कराड ही कर्मभूमी होती. प्रीती संगमावर यशवंतराव चव्हाण यांची समाधी आहे. कराड जवळच झाकीणवाडी या ठिकाणी बौद्ध धर्मीय लेणी आहेत. व या ठिकाणच्या सहाव्या लेण्यांमध्ये धम्मचक्र आढळते.

karad indormation in marathi
कराड माहिती मराठी (karad indormation in marathi)

कराड माहिती मराठी (karad information in marathi)

तालुका कराड
जिल्हा सातारा
राज्य महाराष्ट्र
लोकसंख्या 56,149 (2001)
वाहन संकेतांकMH-50
कराड माहिती मराठी (karad information in marathi)

कराड तालुक्यातील काही महत्त्वपूर्ण स्थळे 

कराड तालुक्यातील पाली हे गाव विशेष प्रसिद्ध आहे  ते खंडोबा देवस्थानासाठी. पुणे बेंगलोर महामार्गावर असणाऱ्या काशीळ या गावापासून आत सुमारे सात किलोमीटर अंतरावर तारळा नदीकाठी हे तीर्थक्षेत्र वसले आहे. या मंदिराचे बांधकाम हेमाडपंथी असून मंदिराला चारही बाजूने तटबंदी आहे.

सातारा जिल्ह्यातील 27 ऐतिहासिक वैभवशाली किल्ल्यांपैकी एक असणारा सदाशिवगड हा किल्ला कराड तालुक्यामध्ये आहे. या गडावर असणाऱ्या शंभू महादेव मंदिरामुळे या गडाला शिवगड असेही म्हणतात. कराड शहरापासून सात किलोमीटर अंतरावर हा किल्ला आहे. हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधला होता. आणि या किल्ल्याचे क्षेत्रफळ 27 एकर इतके आहे.

दरवर्षी श्रावणातल्या शेवटच्या सोमवारी या ठिकाणी मोठी यात्रा भरते. सदाशिवगड च्या पायथ्याला राजमाची, वनवासमाची, हजरमाची व बावरमाची असे चार  माच्या आहेत. कराड तासगाव रोडवर यशवंत पायथ्याला  अंदाजे 22 मंदिरे आहेत. हा सर्व अभयारण्याचा परिसर आहे. या सर्व परिसरामध्ये सागरेश्वर, कुबेर, कपिलेश्वर, त्र्यंबकेश्वर, नागेश्वर, सोमेश्वर इत्यादी देवांची मंदिरे आहेत.

करकोट नावाच्या ऋषींची समाधी या ठिकाणी आहे. सागरेश्वर अभयारण्यामध्ये हरिण, काळवीट, मोर, ससे, लांडगे इत्यादी प्राणी पाहायला मिळतात. कराड तालुक्यातील आगाशिवनगरचा प्रदेश पूर्वी गोळीबार म्हणून ओळखला जात असे. आज हा परिसर मलकापूर किंवा कृष्णा हॉस्पिटल यां नावाणी प्रसिद्ध आहे. या  असणारे शिवमंदिर प्राचीन आहे. या ठिकाणी असलेले  शिवमंदिरा जवळच  काळया दगडामध्ये कोरलेल्या 22 गुहा असून एका  गुहेच्या बाहेर धम्मचक्र कोरले आहे.

कराड जवळ असणाऱ्या तळबीड गावाला लागून वसंतगड हा किल्ला आहे. 1669 साली  अफजलखानाच्या वदानंतर हा किल्ला शिवरायांच्या अधिपत्याखाली आला होता. 1699 मध्ये औरंगजेबाने हा किल्ला परत घेऊन विजय किल्ले असे त्याचे नामकरण केले होते. या गडावर दरवर्षी मोठी जत्रा भरते या गडाच्या उत्तरेला असणारा मोठा बुरुज इतिहासाची साक्ष देतो. कराड शहराजवळ प्रीती संगम नाजिकच असणारा भुईकोट किल्ल्यावर कराडकर यांचे दुर्लक्ष झाले आहे.

कराड तालुक्यातील पाहण्यासारखी ठिकाणे

पाल

पाल हे खंडोबाच्या मंदिरासाठी प्रसिद्ध आहे. तारळी नदीकाठी वसलेल्या पाल येथे खंडोबाचे जागृत देवस्थान आहे. तारळा नदीच्या काठी वसलेले हे गाव खंडोबाच्या मंदिरामुळे प्रसिद्ध पावले आहेत. चारी बाजूला तटबंदी असलेले हेमाडपंती मंदिर आहे. मंदिराच्या आजूबाजूला पिंड,नाग,नदी यांचे चित्र कोरलेले आहेत. तसेच खंडोबाची दुसरी बायको बाळुबाई यांचीही मूर्ती येथे दिसते. 

कृष्णा घाट (प्रीतीसंगम)

कृष्णा घाट म्हणजेच प्रीतीसंगम तर या कराड शहराच्या उत्तरेकडे पवित्र अशा कृष्णा कोयना संगम झाला आहे. यशवंतराव चव्हाण यांची याठिकाणी समाधी आहे. या समाधीस्थाना जवळ एक सुंदर उद्यान सुद्धा तयार करण्यात आलेले आहे. यशवंतरावांची समाधी आणि बाजूला उद्यान अतिशय रमणीय असा परिसर या उद्यानात एका बाजूला लहान मुलांना खेळायला सुद्धा भरपूर अशी खेळणी आहेत. व येथे जो प्रवेश आहे तो मोफत आहे. या समाधीचे दर्शन घेण्यासाठी स्थानिक जनतेचे व पर्यटक यांची ही वर्दळ येथे असते.सर्वात जुना जे मंदिर आहे ते  रत्नेश्वराचे याच घाटावर आहे.

सदाशिवगड

या सातारा जिल्हा असा ऐतिहासिक जो जिल्हा आहे. ज्याला जबरदस्त अशी ऐतिहासिक पार्श्वभूमी लागले त्याच्यात 27 किल्ले आहेत. त्या 27 किल्ल्यांपैकी सदाशिवगड हा शिवकालीन किल्ला आहे कराड शहरापासून पूर्वे 7 किलोमीटर अंतरावर आहे. गडावर असणाऱ्या शिवशंभू महादेवाचे मंदिर या मंदिरामुळे सुद्धा या गडाला शिवगड असे नाव पडले. हा किल्ला शिवाजी महाराजांनी बांधला असून याचा क्षेत्रफळ 23 एकर एवढे आहे. शिवकाळात या गडाचा उपयोग शत्रूचे टेहळणी करण्यासाठी केला जायचा. या किल्ल्याच्या माथ्यावरील शिवशंभू महादेवाचे मंदिर प्रेक्षणीय आहे. गाभाऱ्यात पिंडीशेजारी भगवान शंकर व गणेश यांच्या मिश्रधातूंच्या मूर्ती बसवलेले आहेत. या मंदिरात दरवर्षी श्रावणातल्या सोमवारी मोठी गर्दी असते. शेवटच्या सोमवारी यात्रा भरते किल्ले सदाशिवगड या गडाच्या पायथ्यास चारही बाजूला राजमाची, वनवासमाची, हजार माची ,बाबर माची अशा चार माच्या आहेत. गडावर स्वयंभू शिवमंदिर आहे तर असा इतका सुंदर असा किल्ला कराड शहरापासून अवघ्या सात किलोमीटर अंतरावर पूर्वेला आहे.

चांदोली अभयारण्य

चांदोली अभयारण्य सांगली जिल्ह्यात असेल तरी पाण्याचा फुगवता सातारा कोल्हापूर रत्नागिरी जिल्ह्यात येतो. हे अभयारण्य 309 चौरस किलोमीटर परिसरात आहे. यात अनेक वनौषधी आहे हे सुद्धा एक वर्षा पर्यटनासाठी अतिशय उत्तम असे ठिकाण आहे. चांदोली अभयारण्य हे जास्त करून सांगली जिल्ह्यात येते पण पाण्याचा फुगवटा इकडे असल्यामुळे बराचसा भाग सातारा जिल्ह्या या साईडला येतो.

सागरेश्वर अभयारण्य

कराड तासगाव रोडवर यशवंत घाटाच्या पायथ्याला अंदाजे 22 मंदिरांचा परिसर आहे. किर्लोस्करवाडी ते देवराष्ट्रीय जवळील 1088 चौरस हेक्टर क्षेत्रात या अभयारण्य विस्तारले आहे. यात सागरेश्वर, कुबेर, कपिलेश्वर, त्रंबकेश्वर, नागेश्वर, रामेश्वर यांची मंदिर आहे. कर्कोटक नावाच्या ऋषींची समाधी येथे आहे. सागरेश्वर अभयारण्यात काळवीट, हरिण,मोर,ससे,लांडगे, ही प्राणी बघाईला मिळतात. प्रांमुख्याने हे अभयारण्य हरणांसाठी प्रसिद्ध आहे.

आगाशिव गुफा

आगाशिवच्या परिसराला पूर्वी गोळीबार म्हणून सुद्धा संबोधला जायचं आज मलकापूर कृष्ण हॉस्पिटल परिसर म्हणून परिचित आहे. या डोंगरावर असणारे शिवमंदिर  प्राचीन आहे. या शिव मंदिराजवळच काळा दगडामध्ये कोरलेल्या एकूण 22 गुण आहेत  6  क्रमांकाच्या गुंफेच्या बाहेर उजव्या बाजूला धम्मचक्र आहे तर डाव्या बाजूला सिंह कोरलेला आहे तर असे हे आघाशीच्या  गुफा एक अतिशय ऐतिहासिक पर्यटन स्थळ म्हटलं जाऊ शकतात याचाही आनंद आपण तिथे जाऊन घेऊ शकतो 

वसंतगड

कराड नाजिक तळबीड या गावाला लागून वसंतगड आहे. इसवी सन 1659 मध्ये अफजलखानाला मारल्यावर लगेचच शिवाजी महाराजांनी हा किल्ला ताब्यात घेतला. 25 ऑगस्ट 1699 रोजी औरंगजेबाने हा किल्ला घेऊन त्याचे विजयाची किल्ली व नामकरण केले. पुढे ताराबाईंनी रामचंद्र पंत प्रतिनिधींच्या पायात रुपयाच्या वेड्या घालून त्यांना येथे कैदेत ठेवले. या गडाच्या उत्तरेस मोठा बुरुज असून तो जुन्या काळाची साक्ष देत उभा आहे.कराड माहिती मराठी (karad indormation in marathi)

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)

कृष्णा आणि कोयनेच्या संगमाला काय म्हणतात ?

कृष्णा आणि कोयनेच्या संगमाला प्रीतिसंगम असे म्हणतात.

पाल हे कराड तालुक्यातील गाव कश्यासाठी प्रसिद्ध आहे ?

पाल हे गाव खंडोबा देवस्थानासाठी प्रसिद्ध आहे.

सदाशिवगड कोणी बांधला ?

सदाशिवगड छत्रपती शिवाजी महाराजानी बांधला.

चांदोली अभयारण्य कोठे आहे

चांदोली अभयारण्य सातारा आणि सांगली जिल्ह्याच्या सीमेवर आहे.

यशवंतराव चव्हाण यांची समाधी कोठे आहे ?

प्रीती संगमावर यशवंतराव चव्हाण यांची समाधी आहे.

महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण होते ?

यशवंतराव चव्हाण हे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री होते.

निष्कर्ष

आजच्या या लेखात आपण कराड माहिती मराठी ( karad information in marathi) जाणून घेतली.कराड माहिती मराठी (karad information in marathi) तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे कॉमेंट मध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांना पण नक्कीच शेअर करा.

Leave a Comment