पावनखिंड माहिती मराठी | Pawankhind information in Marathi

Pawankhind information in Marathi:पावनखिंड तथा घोडखिंड ही महाराष्ट्रात पन्हाळगड आणि विशाळगड यांच्यामधील रस्त्यावर असलेली खिंड आहे. अतिशय अवघड व अरुंद असलेली ही खिंड या दोन्ही किल्ल्यांमधील अंतर कमी करते. दोन उंच डोंगरांच्या मध्ये असलेल्या या खिंडीतील वाट इतकी अरुंद आहे येथून एकावेळी फक्त एक घोडेस्वार पार जाऊ शकतो. हत्ती, मेणे किंवा इतर वाहनांनी ही खिंड पार करणे अशक्य आहे. यामुळे या खिंडीला घोडखिंड असे नाव आहे.शिवभारतप्रमाणे ही लढाई विशाळगडच्या पायथ्याशी गजापूरच्या घाटात झाली. तरी पण त्यामुळे बाजी प्रभू, फुलाजी आणि बांदल सेनेचा पराक्रम अजिबात कमी होत नाही. त्यांचे शौर्य आणि बलिदान अलौकिक आहे.पावनखिंड माहिती मराठी (Pawankhind information in Marathi)

Pawankhind information in Marathi
पावनखिंड माहिती मराठी (Pawankhind information in Marathi)

पावनखिंड माहिती मराठी (Pawankhind information in Marathi)

छत्रपती शिवाजी महाराजांचे आयुष्य अनेक नाट्यमय घटनांनी भरले आहे. किल्ले पन्हाळ्याच्या वेढ्यामधून त्यांनी शिताफीने स्वतःची करून घेतलेली सुटका ही त्यापैकीच एक घटना होय. पावनखिंडीच्या या रणसंग्रामाची पार्श्वभूमी सापडते ती याच पन्हाळागडाच्या वेढ्यात.10 नोव्हेंबर 1659 रोजी प्रतापगडाच्या पायथ्याशी शिवरायांनी आदिलशाही सेनापती अफजलखानाचा वध केला व त्यांनी लगेच कोल्हापूर व पन्हाळागड जिंकून घेतला. याच पन्हाळगडावर राहून शिवरायांनी पुढे नवीन जिंकून घेतलेल्या प्रदेशांची व्यवस्था लावली.

अफजल खानाच्या वधामुळे चिडलेला विजापूरकरांनी शिवाजी महाराजांना पकडण्यासाठी आणि पन्हाळगड परत जिंकून घेण्यासाठी सिद्धी जोहर याला सालाबाद खान हा किताब देऊन सोबत चाळीस हजारचे प्रचंड सैन्य देऊन पाठवले. या सिद्धी जोहरने व त्याच्याबरोबर आलेल्या सिद्धी मसूद खान,फाजल खान,आदींच्या सैन्याने पन्हाळ्याला वेढा दिला. सिद्धीने घातलेला हा वेढा फारच कठीण होता यामुळे महाराज गडावरच अडकून पडले.अखेरेस महाराजांनी या वेढ्यातून निघून जाण्यासाठी एक योजना आखली.

त्यांनी विशाळगडावरून पन्हाळगडावर आलेल्या रसद पुरवण्यासाठी आलेल्या बांधल मावळ्यांची एक तुकडी सोबत घेतली. या तुकडी मध्ये होते बाजीप्रभू आणि फुलाजी प्रभू हे बंधू याच 600 बांधल मावळ्यांसोबत महाराज विशाळगडाकडे जाण्यासाठी निघाले ती होती 12 जुलै 1660 ची एक पावसाळी रात्र.सिद्धीच्या सैन्याला चकवण्यासाठी महाराजांनी आपल्या सैन्यातील शिवा काशीद यांना एका पालखीमध्ये बसवून मलकापूरच्या दिशेने पाठविले आणि स्वतः महाराज आणि त्यांच्यासोबत असलेले बांधल सैन्य हे शोधून ठेवलेल्या मार्गाने विशाळगडाकडे दोडू लागले.

शत्रू सैन्याने शिवा काशीद यांना शिवराय समजून पकडले आणि सिद्धी जोहर च्या छावणीत आणले. मात्र हे शिवाजी महाराज नाहीत हे समजल्यावर लगेच सिद्धी जोहरने शिवा काशिद यांना ठार मारले. सिद्धी जोहरने आपला जावई सिद्धी मसूद खान याला महाराजांच्या पाठीमागे पाठवले. या सर्व घटने दरम्यान मिळालेल्या वेळेचा फायदा घेत बरेसे अंतर कापले होते. मसुद च्या सैन्याने मराठ्यांना गजापूर जवळील घोडखिंडच्या जवळचे पांढरे पाणी या ठिकाणी गाठले आणि आता खरा रणसंग्राम होणार होता.

बांधल सैन्याचे सेनापती बाजीप्रभू देशपांडे यांनी महाराजांना 300 बांधल मावळे सोबत घेऊन किल्ल्याकडे जायला सांगितले व ते स्वतः निम्म्या सैन्यांबरोबर घोडखिंडीत शत्रूंना अडवायला उभारले. विशाळगडाकडे जाणाऱ्या महाराजांना ते म्हणाले आम्ही शत्रूस घोडखिंडीत रोखून धरू आपण विशाळगडावर पोचल्यावर जोपर्यंत तोफांचा इशारा करत नाही तोपर्यंत आम्ही ही खिंड प्राणपणाने लढू. महाराज विशाळगडाकडे निघाले, आता येणार प्रत्येक क्षण महत्त्वाचा होता. मसुदाचे सैन्य येऊन खिंडीला भिडले आणि सगळे बांधल मावळे बाजीप्रभू देशपांडे यांच्याकडे पाहायला लागले,आता फक्त तीनशे बांधलं शिल्लक राहिले होते.

बाजी म्हणाले पाहता काय महाराज गडापर्यंत जाईपर्यंत एकही गनिमी खिंडीतून जाता कामा नये आणि डरकाळी फुटली ती हर हर महादेव. राजांच्या मावळ्यांनी पराक्रमाची शर्थ केली आणि विशाळगड जिंकण्यासाठी युद्ध सुरू झाले. महाराज तर सुटले पण त्यांचा बाजी मात्र पुरता अडकला होता. बाजींची 300 ची फौज आता निम्मीही राहिली नव्हती, ज्याला जखम नव्हती असा एकही मावळा राहिला नव्हता. बलदंड शरीराचे बाजी शत्रूंवर द्वेषाने पिरंग चालवत होते. मसुदाच्या हे लक्षात आले की हा बाजी असेपर्यंत खिंड काय काबीज होणार नाही, म्हणून त्यांनी बंदूक आणायला सांगितली आणि नेम लावला.

बंदुकीचा आवाज झाला आणि बाजी कोसळले पण बांधलांचा प्रतिकार इतका प्रबल होता की खिंड अजिंक्यच राहिली. थोड्यावेळाने बाजींना शुद्ध आली बाजींनी विचारले राजे पोहोचले का? तेव्हा मावळ्यांनी नकारार्थी माना हलविल्या. तसेच बाजी मावळ्यांना मागे सरकवत परत युद्धास तयार झाले. रक्तबंबाळ बाजी पुढे दिसताच गनीम घाबरून मागे हटला. तेव्हाच महाराजांनी विशाळगड ताब्यात घेतलेल्याचे इशारांच्या तोफांचा आवाज कडकडला, बाजींच्या चेहऱ्यावर हसू फुटले आणि बाजी कोसळले. मसुदांचे सैन्य तुटून पडले गेले सात प्रहर मृत्यूशी झुंज देणारी बांधल सेना कृतार्थ झाली. गजापूरची खिंड आता बाजी,फुलाजी आणि बांधलांच्या रक्तांनी पावन झालेली होती आणि ती खिंड आता पावनखिंड झाली.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)

पावनखिंड चे जुने नाव काय होते?

घोडखिंड

पावनखिंड कुठे आहे?

पावनखिंड तथा घोडखिंड ही महाराष्ट्रात पन्हाळगड आणि विशाळगड यांच्यामधील रस्त्यावर असलेली खिंड आहे. अतिशय अवघड व अरुंद असलेली ही खिंड या दोन्ही किल्ल्यांमधील अंतर कमी करते.

पावनखिंड युद्ध कधी झाले?

पावनखिंडीतील लढाई 13 जुलै, 1660 रोजी झाली.

बाजीप्रभू देशपांडे कुठे लढले?

बाजी प्रभू देशपांडे हे एक मराठा साम्राज्याचे शूर योद्धे होते. घोडखिंडीतील लढाईत यांनी अतुलनीय पराक्रम गाजवला व छत्रपती शिवाजी महाराज विशाळगडापर्यंत पोहोचेपर्यंत शत्रुसैन्याला खिंडीत रोखून ठेवले.

बांदल सेना म्हणजे काय?

बांदल सेना म्हणजे मराठा योद्धा होय.

भारतीय नौदलाचे जनक कोण आहे?

भारतीय नौदल १७ व्या शतकातील मराठा सम्राट, छत्रपती शिवाजी महाराज भोसले यांना “भारतीय नौदलाचे जनक” मानले जाते.

विशाळगड किल्ल्यावरून निघताना शिवाजी बाजी प्रभूंना काय म्हणाले?

आपण पुढे विशाळगडाकडे जाऊ. किल्ला जिंकताच तोफा डागल्या जातील. हेच आपल्या सुरक्षित आगमनाचे संकेत असेल.

शिवाजी महाराजांना भारतीय नौदलाचे जनक का म्हणतात?

छत्रपती शिवाजी महाराजांना भारतीय नौदलाचे जनक म्हटले जाते. मध्ययुगात भारतीय सैन्याच्या नौदल विभागाच्या विकासातील त्यांच्या भूमिकेसाठी महान मराठा सम्राटाला ही पदवी मिळाली.

निष्कर्ष (summary)

आजच्या या लेखात आपण पावनखिंड माहिती मराठी (Pawankhind information in Marathi)जाणून घेतली. ही माहिती कशी वाटली हे कॉमेंट मध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांना पण नक्कीच शेअर करा.

Leave a Comment