महाबळेश्वर माहिती मराठी | mahableshwar information in marathi

mahableshwar information in marathi:महाबळेश्वर हे ठिकाण महाराष्ट्रातील प्रमुख आणि आकर्षक पर्यटन स्थळांपैकी एक आहे. हे ठिकाण महाराष्ट्राचा सातारा जिल्ह्यातील एक थंड हवेचे ठिकाण आहे. पश्चिम घाटाच्या रांगेत असलेले महाबळेश्वर हे ठिकाण समुद्रसपाटीपासून जवळपास 1372 मीटर इतक्या उंचीवर वसलेले आहे.महाबळेश्वर या ठिकाणाला नैसर्गिक सौंदर्याचा अनमोल वारसा लाभलेला आहे, हे ठिकाण महाराष्ट्राचे नंदनवन म्हणून ही ओळखले जाते. महाराष्ट्रातील बरेच पर्यटक उन्हाळ्याच्या आणि दिवाळीच्या सुट्टीमध्ये या ठिकाणी आवर्जून भेट देत असतात.महाबळेश्वरला जुन्या मुंबई प्रांताची उन्हाळ्यातील राजधानी म्हणूनच संबोधले जात होते.

mahableshwar information in marathi
महाबळेश्वर माहिती मराठी (mahableshwar information in marathi)

Contents

महाबळेश्वर माहिती मराठी (mahableshwar information in marathi)

महाराष्ट्रातील सर्वात प्रसिद्ध पर्यटन स्थळांमध्ये महाबळेश्वर हे देखील आहे. महाबळेश्वर हे महाराष्ट्रातील थंड हवेचे ठिकाण आहे जे सह्याद्री पर्वतरांगेवर समुद्रसपाटीपासून 4500 फूट एवढ्या उंचीवर वसलेले आहे. इंग्रजांच्या काळात महाबळेश्वरला सुंदर अशी गिरीस्थान लाभलेले आहेत.महाबळेश्वर हे ठिकाण निसर्गरम्य आणि नैवेदन्य असून वर्षभर पर्यटक या ठिकाणाला भेट देत असतात. तसेच महाबळेश्वर या ठिकाणाला महाराष्ट्राचे नंदनवन म्हणूनही ओळखले जाते.

जिल्हासातारा
उंची1438
तालुकामहाबळेश्वर
लोकसंख्या 12780(2001)
महाबळेश्वर माहिती मराठी (mahableshwar information in marathi)

महाबळेश्वर मध्ये आपल्याला सुंदर बगीचे, हिरवा निसर्ग,उद्याने आणि मनमोहक वातावरण या सर्वांचा आनंद घेता येईल.सातारा जिल्ह्यातील एक नगरपालिका असणारा हे एक तालुक्याचे ठिकाण आहे. साताऱ्याच्या डोंगरावर वसलेले महाबळेश्वर येथे सर्वात जास्त हिंदी आणि मराठी या दोन भाषांचा प्रयोग केला जातो.महाबळेश्वर हे एक पठार असून या पठाराच्या आजूबाजूस खोल दऱ्या देखील आहेत, जे विल्सन किंवा सनराइज पॉइंट हे महाबळेश्वर येथील सर्वात उंच ठिकाण आहेत.

महाराष्ट्र,कर्नाटक,तेलंगणा आणि आंध्र प्रदेश या राज्यातून वाहणाऱ्या कृष्णा नदीचा उगम हा महाबळेश्वर मध्ये झालेला आहे. महाबळेश्वर हे ठिकाण थंड हवेचे ठिकाण आणि सहलीचे ठिकाण आहे.मार्च ते जून या कालावधीत सर्वात जास्त पर्यटक हे महाबळेश्वरला भेट देत असतात. स्ट्रॉबेरीच्या उत्पादनासाठी लागणारे योग्य हवामान हे महाबळेश्वरचेच आहे. त्यामुळेच येथे सर्वात जास्त स्ट्रॉबेरीचे उत्पादन केले जाते. एकट्या महाबळेश्वर मध्ये जवळजवळ 85% स्ट्रॉबेरी चे उत्पादन केले जाते.

महाबळेश्वरला पावसाचे प्रमाण हे सर्वात जास्त असल्याकारणाने हा परिसर सतत जलमय असतो.लोणावळा, खंडाळा प्रमाणेच निसर्ग सौंदर्य आणि इथले विल्सन पॉईंट, ऑर्थर सीट पॉईंट हि पर्यटन स्थळ नेहमीच पर्यटकांना आकर्षित करतात. महाबळेश्वर येथे स्ट्रॉबेरी, रासबेरी,जांभळीचे मध लाल मुळे व गाजर प्रसिद्ध आहेत.गुलकंद ही या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मिळतो आणि तो खूप प्रसिद्ध ही आहे. महाबळेश्वर हे पाच नद्याचे उगम स्थान म्हणून ओळखले जाते.

महाबलेश्वर मधील पर्यटन स्थळे (Tourist places in mahableshwar)

  • कॅनॉट पिक पॉईंट (Connaught pick point)
  • लॉडविक पॉईंट
  • मेप्रो गार्डन
  • लिंगमळा धबधबा
  • विल्सन पॉईंट
  • एलिफंट हेड पॉईंट
  • आर्थर सीट पॉईंट
  • महाबळेश्वर मंदिर
  • वेण्णा तलाव
  • प्रतापगड किल्ला

कॅनॉट पिक पॉईंट (Connaught pick point)

कॅनॉट पिक हे ठिकाण महाबळेश्वर मधील दुसरे सर्वात उंच शिखर आहे जे समुद्रसपाटीपासून 1400 मीटर एवढ्या उंचीवर आहे.महाबळेश्वर पासून हे ठिकाण पाच किलोमीटरच्या अंतरावर आहे.कॅनॉट पीक या ठिकाणाहून वेण्णा तलाव, प्रतापगड, कृष्णा खोऱ्यातील विस्मयकारक दृश्य पाहायला मिळतात.हे शिखर पूर्वी ऑलिम्पिया या नावाने ओळखले जायचे.

लॉडविक पॉईंट

लॉडविक पॉईंटहे ठिकाण महाबळेश्वर मधील प्रमुख ठिकाणांपैकी एक आहे. हे ठिकाण समुद्रसपाटीपासून जवळ जवळ 4000 फूट इतक्या उंचीवर आहे. ब्रिटिश अधिकारी जनरल लॉडविक यांच्या नावावरूनच या ठिकाणाला लॉडविक असे नाव देण्यात आले आहे. कारण सर्वप्रथम या टेकडीवर चालणारे पहिले अधिकारी हे जनरल लॉर्ड विकत होते. जनरल लॉडविक यांच्या स्मरणार त्यांच्या मुलाने 25 फुटाचा स्तंभ बांधला. महाबळेश्वरला भेट देणारे बरेच पर्यटक आवर्जून या ठिकाणी येत असतात.

मेप्रो गार्डन

मेप्रो गार्डन हे ठिकाण महाबळेश्वर मधील प्रमुख आणि आकर्षक ठिकाणांपैकी एक आहे ते ठिकाण महाबळेश्वर पासून जवळ पास 12 किलोमीटर अंतरावर आहे. इसवी सन 1980 मध्ये ही जागा मेप्रो ने बांधली आहे.या ठिकाणी असणारे सुंदर दृश्य आणि हिरवळ ही अनेक पर्यटकांना मोहित करते.मेप्रो हे ठिकाण या ठिकाणी असणाऱ्या स्वादिष्ट स्ट्रॉबेरी उत्पन्नासाठी ओळखले जाते.

लिंगमळा धबधबा

लिंगमळा धबधबा हा महाबळेश्वर मधील एक सुंदर धबधबा आहे निसर्गरम्य वातावरणात आणि खडकाळ डोंगराच्या मधोमध असलेला हा धबधबा अनेक पर्यटकांना आकर्षित करतो.लिंगमळा या धबधब्याची उंची ही जवळपास 600 फूट इतकी आहे. या धबधब्याचे उंचावरून पडणारे पाणी हे बऱ्याच पर्यटकांचे मनमोहून घेते. फोटोग्राफीचा छंद असणारे बरेच पर्यटक पावसाळ्यामध्ये या धबधब्याला भेट देण्यासाठी येत असतात. महाबळेश्वर पासून लिंगमळा हा धबधबा जवळपास आठ किलोमीटर एवढे अंतरावर आहे. 

विल्सन पॉईंट

विल्सन पॉइंट हे ठिकाण महाबळेश्वर मधील प्रमुख ठिकाणांपैकी एक आहे महाबळेश्वर मधील सर्वात उंच पर्यटन स्थळ म्हणून विल्सन पॉईंट कडे पाहिले जाते. विल्सन पॉईंट वरून सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या वेळेस चे सुंदर व आकर्षक दृश्य पाहायला मिळते.विल्सन पॉईंट ला सनराइज पॉइंट म्हणून देखील ओळखले जाते. महाबळेश्वर पासून विल्सन पॉईंट हे ठिकाण जवळपास दोन ते तीन किलोमीटर एवढे अंतरावर आहे.

एलिफंट हेड पॉईंट

एलिफंट हेड पॉईंट हे ठिकाण महाबळेश्वर मधील सर्वात लोकप्रिय पर्यटन स्थान पैकी एक आहे. हे ठिकाण हुबेहूब हत्तीच्या तोंडा सारखे दिसते त्याचबरोबर या ठिकाणाला नीडल हेड पॉईंट या नावाने देखील ओळखले जाते. सह्याद्री पर्वतरांगेचे सुंदर आकर्षक तसे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. पावसाळ्यामध्ये एलिफंट हेड पॉईंट हे ठिकाण संपूर्ण हिरवेगार वातावरनात बहरलेले असते. सुट्टीच्या दिवसात या ठिकाणी बरेच पर्यटक हिरव्यागार निसर्गाचा मनमुराद आनंद घेत असतात.

आर्थर सीट पॉईंट

आर्थर सीट पॉईंट हे महाबळेश्वर मधील प्रमुख आणि आकर्षक पर्यटन स्थान पैकी एक आहे.आर्थर सीट पॉईंट हे ठिकाण समुद्रसपाटीपासून 1470 मीटर इतक्या उंचीवर स्थित आहे. या ठिकाणाला बिंदूची राणी म्हणून ही ओळखले जाते त्याचबरोबर या ठिकाणाला ऑर्थर मॉलिट च्या नावावरून नाव देण्यात आले आहे. आर्थर ने आपली पत्नी व एक महिन्याची मुलगी एका नाव अपघातामध्ये गमावली. महाबळेश्वर पासून आर्थर सीट पॉईंट हे ठिकाण जवळपास 12 किलोमीटर एवढे अंतरावर आहे.

महाबळेश्वर मंदिर

महाबळेश्वर मंदिर हे सातारा जिल्ह्यातील एक प्राचीन मंदिर आहे. हे मंदिर भगवान शिवाला समर्पित आहे, जे महाबळेश्वर पासून जवळपास 6 किलोमीटर एवढ्या अंतरावर आहे. हे प्राचीन मंदिर सोळाव्या शतकात राजा चंद्रराव यांनी बांधले होते.या मंदिरामध्ये भगवान शंकराचे आकर्षक व सुंदर शिवलिंग आहे. त्याचबरोबर हे मंदिर डोंगरांच्या मधोमध असल्याने या ठिकाणचे दृश्य अतिशय सुंदर दिसते.दरवर्षी लाखो भावीक या मंदिरामध्ये दर्शनासाठी येत असतात. 

वेण्णा तलाव

वेण्णा तलाव हे ठिकाण महाबळेश्वर मधील प्रमुख आणि आकर्षक ठिकाणांपैकी एक आहे. हा तलाव एक मानवनिर्मित तलाव असून हे महाबळेश्वर मधील सर्वात लोकप्रिय पर्यटन स्थळांपैकी एक आहे. हा तलाव साताऱ्याचे राजे श्री आप्पासाहेब महाराजांनी बांधला होता.हा संपूर्ण तलाव गवत आणि झाडांनी वेढलेला आहे, हा विना तलाव महाबळेश्वर मधील पर्यटन स्थळांना खूप आकर्षित करतो. महाबळेश्वरला भेट देणारे बरेच पर्यटक आवर्जून या वेण्णा तलावाला भेट देण्यासाठी येत असतात. महाबळेश्वर पासून हा तलाव जवळपास 3 किलोमीटर एवढ्या अंतरावर आहे.

प्रतापगड किल्ला

प्रतापगड हा किल्ला महाबळेश्वर मधील प्रमुख पर्यटन स्थळांपैकी  एक आहे. प्रतापगड या किल्ल्याची समुद्रसपाटीपासून ची उंची 100 मीटर इतकी आहे. हा किल्ला एक ऐतिहासिक किल्ला आहे.इसवी सन 1656 मध्ये मराठा शासक छत्रपती शिवाजी महाराजांनी या किल्ल्याचे निर्माण केले होते. हा किल्ला ऐतिहासिक दृष्ट्या खूप महत्त्वाचा किल्ला आहे.कारण याच ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज आणि अफजल खान यांच्यात युद्ध झाले होते.महाराष्ट्रातील बरेच पर्यटक व इतिहास प्रेमी या किल्ल्याला भेट देण्यासाठी आवर्जून येत असतात.

महाबळेश्वरला कसे पोहोचायचे(How To Reach Mahabaleshwar)

जर तुम्ही रेल्वे मार्गाने महाबळेश्वरला भेट देणार असाल तर महाबळेश्वरच्या जवळचे रेल्वे स्टेशन हे सातारा रेल्वे स्टेशन आहे. महाबळेश्वर हे सातारा रेल्वे स्टेशन पासून 61 किलोमीटर पुणे रेल्वे स्टेशन पासून 124 किलोमीटर तर कोल्हापूर रेल्वे स्टेशन पासून 178 किलोमीटर एवढे अंतरावर आहे. तसेच तुम्ही रोड ने जाणार असाल तर महाबळेश्वर हे पुण्यापासून 121 किलोमीटर तर कोल्हापूर पासून 178 किलोमीटर एवढे अंतरावर आहे.

सतत विचारले जाणारे प्रश्न (FAQ)

महाबळेश्वर हे पर्यटन स्थळ कोणत्या जिल्ह्यात आहे ?

महाबळेश्वर हे पर्यटन स्थळ सातारा जिल्ह्यात आहे.

महाबळेश्वर ची समुद्र सापटीपासूनची उंची किती आहे ?

महाबळेश्वर हे ठिकाण समुद्रसपाटीपासून जवळपास 1372 मीटर इतक्या उंचीवर वसलेले आहे.

महाबळेश्वर चे हवामान थंड का आहे ?

समुद्री सपाटीपासून जसजसे उंच जावे तसतसे हवेचे तापमान कमी होते आणि महाबळेश्वर हे ठिकाण सह्याद्री पर्वत रांगेत उंच ठिकाणी आहे म्हणून महाबळेश्वर चे हवामान थंड आहे.

सातारा ते महाबळेश्वर चे अंतर किती आहे ?

सातारा ते महाबळेश्वर चे अंतर 57 किलोमीटर इतके आहे.

महाबळेश्वर ला भेट देण्यासाठी उत्तम वेळ कोणती आहे ?

मार्च ते जून या कालावधीत सर्वात जास्त पर्यटक हे महाबळेश्वरला भेट देत असतात.

सर्वात जास्त स्ट्रॉबेरी चे उत्पादन कोठे घेतले जाते ?

महाबळेश्वर मध्ये जवळजवळ 85% स्ट्रॉबेरी चे उत्पादन केले जाते.

लिंगमळा धबधबा कोठे आहे ?

लिंगमळा धबधबा महाबळेश्वर मध्ये आहे.

निष्कर्ष (summary)

आजच्या या लेखात आपण महाबळेश्वर माहिती मराठी (mahableshwar information in marathi) ही माहिती जाणून घेतली. ही माहिती कशी वाटली हे कॉमेंट मध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांना पण नक्कीच शेअर करा.

महाबळेश्वर माहिती मराठी (mahableshwar information in marathi)

Leave a Comment