डिप्लोमा म्हणजे काय | Diploma in Marathi

Diploma in Marathi : महाराष्ट्रात महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण महामंडळ अंतर्गत डिप्लोमा च्या ज्या अनेक शाखा आहेत त्यामध्ये विद्यार्थी दहावी किंवा बारावी नंतर प्रवेश घेऊ शकतात. डिप्लोमा मध्ये इंजिनिअरिंग आणि नॉन इंजिनिअरिंग डिप्लोमा कोर्सेस पण असतात.डिप्लोमा नंतर देखील ऍडव्हान्स डिप्लोमा कोर्सेस असतात.MSBTE अंतर्गत 70 इंजिनिअरिंग कोर्सेस आहेत आणि काही नॉन इंजीनियरिंग कोर्सेस आहेत.हे कोर्सेस AICTE मानांकित आहेत. आजच्या या पोस्ट मध्ये आपण डिप्लोमा म्हणजे काय (Diploma in Marathi) याविषयी माहिती जाणून घेणार आहोत.

Diploma in Marathi
डिप्लोमा म्हणजे काय (Diploma in Marathi)

डिप्लोमा म्हणजे काय (Diploma in Marathi)

आज आपण जाणून घेणार आहोत डिप्लोमा ची डिग्री कशी मिळते? डिप्लोमा म्हणजे काय ?डिप्लोमा किती वर्षाचा असतो ? याबाबत सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. आपल्याला चांगल्यात चांगले शिक्षण घ्यायचे असते. उत्तम करिअरसाठी चांगल्या बोर्डाची डिग्री आपल्याकडे असणे महत्वाचे असते. ज्यामुळे चांगली नोकरीची संधी किंवा आपला स्वतःचा व्यवसाय सुरू करता येऊ शकतो.

यासाठी आपण खूप विचार करतो वेगवेगळ्या क्षेत्रात बद्दल माहिती घेतली जाते, तुलना केली जाते, खर्चही बघितला जातो, शिक्षणासाठी लागणारा कालावधी ही महत्त्वाचा असतो. यातून आपण असा मार्ग निवडतो जो आपल्याला यश ही देईल आणि प्रगती ही होईल. म्हणूनच आपल्याला डिप्लोमा ची माहिती घेणे आवश्यक आहे. एखाद्या विषयावर डिप्लोमा करूनही तुम्ही चांगली नोकरी मिळू शकता.

महाराष्ट्रात महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण महामंडळ अंतर्गत डिप्लोमा च्या ज्या अनेक शाखा आहेत त्यामध्ये विद्यार्थी दहावी किंवा बारावी नंतर प्रवेश घेऊ शकतात. डिप्लोमा मध्ये इंजिनिअरिंग आणि नॉन इंजिनिअरिंग डिप्लोमा कोर्सेस पण असतात.डिप्लोमा नंतर देखील ऍडव्हान्स डिप्लोमा कोर्सेस असतात.MSBTE अंतर्गत 70 इंजिनिअरिंग कोर्सेस आहेत आणि काही नॉन इंजीनियरिंग कोर्सेस आहेत.हे कोर्सेस AICTE मानांकित आहेत.

इंजीनियरिंग कोर्सेस मध्ये खालील कोर्सेस चा समावेश आहे.

 • सिव्हिल इंजिनिअरिंग 
 • कंप्यूटर इंजीनियरिंग 
 • मेकॅनिकल इंजिनिअरिंग 
 • कंप्यूटर टेक्नॉलॉजी 
 • इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी 
 • केमिकल इंजिनिअरिंग

दोन वर्षाचे डिप्लोमा कोर्सेस मध्ये खालील कोर्सेस चा समावेश आहे.

 • सायबर सिक्युरिटी 
 • ड्रेस डिझायनिंग अँड मॅन्युफॅक्चरिंग 
 • इंटीरियर डिझायनिंग
 • रबर टेक्नॉलॉजी 
 • प्रिंटिंग टेक्नॉलॉजी 
 • फायर सेफ्टी 

डिप्लोमा मधील ईतर कोर्सेस

 • कॉम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग
 • ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग
 • इलेक्ट्रॉनिक्स अँड कमुनिकेशन इंजिनिअरिंग
 • इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग 
 • सेरमिक इंजिनिअरिंग
 • मेकॅनिकल इंजिनिअरिंग
 • इन्स्ट्रूमेंटेमेशन अँड कंट्रोल इंजिनिअरिंग
 • इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी इंजिनिअरिंग
 • इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलीकमुनिक्शन इंजिनिअरिंग
 • पेट्रोलिम इंजिनिअरिंग

सतत विचारले जाणारे प्रश्न (FAQ)

डिप्लोमा मधील सर्वात चांगली ट्रेड कोणती आहे ?

या प्रश्नाचे कोणतेही निश्चित उत्तर नाही कारण एका व्यक्तीसाठी सर्वोत्तम अभ्यासक्रम कोणता असू शकतो तो दुसऱ्यासाठी सर्वोत्तम असू शकत नाही. हे प्रत्येक व्यक्तीच्या ध्येये, आवडी आणि क्षमतांवर अवलंबून असते. काही अभ्यासक्रम इतरांपेक्षा अधिक लोकप्रिय असू शकतात, परंतु याचा अर्थ असा नाही की ते प्रत्येकासाठी सर्वोत्तम पर्याय आहेत. निर्णय घेण्यापूर्वी काही संशोधन करणे आणि तुम्ही विचार करत असलेले अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या लोकांशी बोलणे महत्त्वाचे आहे.

डिप्लोमा मध्ये कोणत्या ट्रेड ला सर्वाधिक पगार आहे?

या प्रश्नाचे कोणतेही निश्चित उत्तर नाही कारण अनुभव, स्थान आणि कंपनी यासारख्या अनेक घटकांवर अवलंबून पगार बदलू शकतात. काही शाखांमध्ये इतरांपेक्षा जास्त सरासरी पगार असू शकतो, परंतु याचा अर्थ असा नाही की ते प्रत्येकासाठी सर्वोत्तम पर्याय आहेत. काही संशोधन करणे आणि आधीच क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांशी बोलणे महत्त्वाचे आहे.

कोणत्या डिप्लोमाला सर्वाधिक मागणी आहे ?

सध्या, भारत अनेक क्षेत्रात अनेक अभियंते तयार करत आहे परंतु संगणक अभियांत्रिकी ही आतापर्यंतची सर्वात जास्त मागणी असलेली शाखा आहे.

डिप्लोमा किती वर्षाचा असतो?

दहावीनंतर तीन वर्षांचा इंजिनीअरिंग डिप्लोमा हा शिक्षणाचा चांगला पर्याय उपलब्ध आहे. दहावीला ३५ टक्के गुण मिळवलेले विद्यार्थी डिप्लोमाला पात्र असतात. डिप्लोमा पूर्ण केल्यानंतर इंजिनीअरिंग पदवीच्या दुसऱ्या वर्षाला थेट प्रवेश देखील घेता येतो.

डिप्लोमा नंतर काय करावे?

पॉलिटेक्निक डिप्लोमा कोर्स केल्यानंतर विद्यार्थी लेटरल एंट्री स्कीम अंतर्गत बीटेक (B. Tech) किंवा बीई (B.E) करू शकतात.

10वी नंतर काय करावे ?

दहावीनंतर विद्यार्थी मेकॅनिकल, इलेक्ट्रीशियन, इलेक्ट्रिकल यासारख्या नोकरीसाठी आयटीआय अभ्यासक्रम करू शकतात .

आयटीया म्हणजे काय?

हि शासनाची मान्यताप्राप्त संस्था आहे जी विद्यार्थ्यांना औद्योगिक क्षेत्रातील विविध तांत्रिक आणि विना तांत्रिक विषयांवर शिक्षण देते.

डॉक्टर होण्यासाठी दहावी नंतर काय करावे ?

वैद्यकीय महाविद्यालयामध्ये प्रवेश घेतल्यापासून साडे पाच वर्षांमध्ये तुम्ही डॉक्टर होऊ शकता.

निष्कर्ष (summary)

आजच्या या लेखात आपण डिप्लोमा म्हणजे काय (Diploma in Marathi) जाणून घेतली. ही माहिती कशी वाटली हे कॉमेंट मध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांना पण नक्कीच शेअर करा.

Leave a Comment