सातारा जिल्ह्यातील पर्यटन स्थळे | Tourist places of Satara in Marathi

Tourist places of Satara in Marathi : सातारा जिल्हा पुण्यापासून 113 किलोमीटर तर मुंबईपासून 267 किलोमीटर एवढ्या अंतरावर आहे हा जिल्हा खास करून येथे असलेल्या पर्यटन स्थळासाठी प्रसिद्ध आहे.सातारा जिल्ह्यात कंधी पेढा हा खूपच प्रसिद्ध आहे.

Tourist places of Satara in Marathi
सातारा जिल्ह्यातील पर्यटन स्थळे (Tourist places of Satara in Marathi)

सातारा जिल्ह्यातील पर्यटन स्थळे (Tourist places of Satara in Marathi)

1.कास पठार 

कास पठार हे संपूर्ण महाराष्ट्रात लोकप्रिय पठार म्हणून ओळखले जाते.हे पठार पाचगणी आणि महाबळेश्वर पासून अगदी काहीच अंतरावर आहे.कास पठारावर तुम्हाला वेगवेगळ्या वनस्पती आणि फुलांचा आनंद घेता येतो येथे जाण्यासाठी पन्नास रुपये इतके तिकीट द्यावे लागते.

2. प्रतापगड किल्ला 

प्रतापगड किल्ला हा सातारा जिल्ह्यातील सर्वात लोकप्रिय किल्ला म्हणून ओळखला जातो.महाबळेश्वर पासून अगदी जवळच प्रतापगड किल्ला आहे हा किल्ला महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय टेकडी म्हणून ओळखला जातो.येथे येणाऱ्या पर्यटकांना प्रतापगड किल्ल्याच्या डोंगर माथ्यावरून एक तलाव आणि संपूर्ण सातारा शहर पाहण्याचा आनंद घेता येईल. 

3. लिंगमाला धबधबा

लिंगमाला हा साताऱ्यातील महाबळेश्वर मधील चित्तथारक धबधबा आहे.हा धबधबा लिंगमाला वन बंगल्याच्या अगदी मागे आहे लिंगमाला हा धबधबा तुमच्या डोळ्याची पार्ले फेडण्यासारखा धबधबा आहे.

4. श्री छत्रपती शिवाजी संग्रहालय 

श्री छत्रपती शिवाजी संग्रहालय हे सातारा संग्रहालय म्हणूनही लोकप्रिय आहे.हे ठिकाण महाराष्ट्रातील आकर्षक ठिकाण आहे.हे संग्रहालय मराठा संस्कृती आनी महान राज्यकर्ते यांचा स्मरण ठेवण्यासाठी बांधण्यात आले होते.तुम्ही या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांची शस्त्रे,वेशभूषा,कलाकृती आणि इतर साहित्य पाहू शकता.

5. लॉडविक पॉईंट

लॉडविक पॉईंट हे महाबळेश्वर मधील एक प्रसिद्ध ठिकाण आहे. खरे तर हे थंड हवेचे ठिकाण आणि निसर्गप्रेमी साठी स्फूर्तीदायक ठिकाण आहे.ट्रेकिंग आणि सहलीसाठी बरेच लोक या ठिकाणाला भेट देत असतात.या ठिकाणची हिरवीगार डोंगराळ झाडी पाहण्याचा आनंद घेता येतो. 

6. कोयना धरण

कोयना धरण हे महाराष्ट्रातील सर्वात प्रसिद्ध आणि सर्वात मोठे धरण आहे सातारा जिल्ह्यामध्ये हे ठिकाण लोकप्रिय पर्यटन स्थळ आहे स्वातंत्र्यानंतर हे धरण बांधण्यात आले तसेच या धरणाला शिवसागर धरण म्हणूनही ओळखले जाते.

7. चार भिंती

चार भिंती हे सातारा जिल्ह्यातील एक ऐतिहासिक स्थान आहे.राजा प्रताप सिंह यांनी हे ठिकाण बांधले होते हे ठिकाण हल्लेखोरंपासून नजर ठेवण्यासाठी बांधण्यात आले होते जर तुम्ही या ठिकाणाला भेट दिली तर तुम्हाला संपूर्ण सातारा शहर पाहता येईल.

8. कास तलाव

सातारा मधील कास तलाव हे पर्यटनासाठी आकर्षक ठिकाण आहे या ठिकाणाला भेट देण्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोऱ्यातून लोक येत असतात.कास पठाराच्या अगदी जवळच असणारे हे ठिकाण पर्यटकांसाठी लोकप्रिय बनला आहे.कास पठाराला भेट देण्यासाठी शंभर रुपये इतकी एन्ट्री फी द्यावी लागते.

9. मायणी पक्षी अभयारण्य 

मायणी पक्षी अभयारण्य हे सातारा जिल्ह्यातील एक लोकप्रिय पक्षी अभयारण्य आहे या अभयारण्यात आपल्याला नवनवीन प्रजाती आणि पक्षाचे प्रकार पाहायला मिळतात.या अभयारण्यात तुम्हाला 400 हून अधिक प्रकारचे पक्षी आणि प्रजाती पाहायला मिळते तसेच येथे जाण्यासाठी तुम्हाला पंधरा रुपये तिकीट मोजावे लागेल.

10. अजिंक्यतारा किल्ला 

सातारा किल्ला म्हणून मोठ्या प्रमाणात उच्चारलेला अजिंक्यतारा हा किल्ला संपूर्ण सातारा शहराच्या कानाकोपऱ्यात दिसतो.अजिंक्यतारा हा किल्ला महाराष्ट्राची चौथी लोकप्रिय राजधानी आहे.दररोज हजारो लोक ट्रेकिंग आणि पर्यटनासाठी येत असतात.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)

प्रतापगड किल्ला कोणी बांधला?

1656 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रतापगड हा किल्ला बांधला.

महाबळेश्वरमध्ये कोणता किल्ला आहे?

महाबळेश्वरमध्ये प्रतापगड हा किल्ला आहे.

महाबळेश्वर जवळील भिलार हे गाव काय म्हणून प्रसिद्ध आहे?

भिलार हे गाव महाराष्ट्रातील पुस्तकांचं गाव म्हणून प्रसिद्धीस आले आहे. ह्या गावात महाराष्ट्र-शासनाच्या राज्य मराठी विकास संस्थेच्या वतीने पुस्तकांचे गाव हा प्रकल्प राबवण्यात येत आहे. हे जगातील दुसरे, (पहिले ब्रिटन मधील हे-ओन-वे हे गाव आहे. जे आपल्याकडे असणाऱ्या पुस्तकांच्या संग्रहाबद्दल प्रसिद्ध आहे.)

पुस्तकांचे गाव म्हणून कोणते गाव ओळखले जाते?

भिलार हे पुस्तकांचे गाव म्हणून ओळखले जाते. 

महाबळेश्वर चा माथा समुद्रसपाटीपासून किती उंचीवर आहे?

समुद्रसपाटीपासून याची उंची १३५३ मीटर(४४३९ फुट) आहे.

निष्कर्ष (summer)

आजच्या या लेखात आपण सातारा जिल्ह्यातील पर्यटन स्थळे (Tourist places of Satara in Marathi) ही माहिती जाणून घेतली. सातारा जिल्ह्यातील पर्यटन स्थळे (Tourist places of Satara in Marathi) ही माहिती कशी वाटली हे कॉमेंट मध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांना पण नक्कीच शेअर करा.

Leave a Comment