दापोली पर्यटन स्थळे | Tourist places of Dapoli in Marathi

Tourist places of Dapoli in Marathi : दापोली हे ठिकाण महाराष्ट्रातील सर्वात प्रसिद्ध आणि लोकप्रिय पर्यटन स्थळांपैकी एक आहे दापोली हे महाराष्ट्राच्या रत्नागिरी या जिल्ह्यातील एक तालुक्याचे ठिकाण आहे. ब्रिटिश काळात दापोली कॅम्प म्हणून ही दापोली या ठिकाणाला ओळखले जायचे.निसर्गाचे वरदान लाभलेले दापोली हे ठिकाण पर्यटकांचे मुख्य आकर्षण आहे.दापोली हे ठिकाण समुद्र किनारे,मासोळी बाजार,ऐतिहासिक गड किल्ले व नैसर्गिक वातावरणासाठी प्रसिद्ध आहे या ठिकाणी असणाऱ्या सुंदर वातावरणामुळे याला मिनी महाबळेश्वर म्हणूनही ओळखले जाते.

Tourist places of Dapoli in Marathi
दापोली पर्यटन स्थळे (Tourist places of Dapoli in Marathi)

दापोली पर्यटन स्थळे (Tourist places of Dapoli in Marathi)

1.मुरुड बीच 

मुरुड बीच हा दापोलीतील एक सुंदर आणि आकर्षक समुद्रकिनारा आहे.मुरुड बीच हा समुद्रकिनारा तुलनेने स्वच्छ आणि आनंददायी असा आहे.या ठिकाणी बोटीतून समुद्राच्या शेवटी डॉल्फिन पाण्यासाठी देखील जाता येते.याच बरोबर सकाळच्या स्वच्छ वातावरणामध्ये उंच झेपवणारे पक्षांचे मनमोहन दृश्य या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते.या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सिंगल पक्षाचे थवे देखील येत असतात.मुरुड बीच समुद्रकिनाऱ्यावर पर्यटक क्रिकेट किंवा फुटबॉल खेळाचा ही मनसोक्त आनंद घेत असतात दापोली शहरापासून मुरुड बीच हा समुद्रकिनारा बारा किलोमीटर इतके अंतरावर आहे. 

2.हर्णे बंदर 

हरणे बंदर हे दापोलीतील एक प्रसिद्ध आणि लोकप्रिय पर्यटन स्थळ आहे हरणे बंदर हे दापोलीपासून साधारणता 15 किलोमीटर इतक्या अंतरावर आहे.हरणे बंदर परिसर हा बीच आणि फिश मार्केट साठी ओळखला जातो.हर्णे बंदरावरील दररोज होणारा माशाचा निलाव हा खूपच प्रसिद्ध आहे त्याचबरोबर हरणे बंदरामध्ये सुवर्णदुर्ग आणि कनकदुर्ग हे दोन किल्ले देखील आहेत.सुवर्णदुर्ग हा सागरी किल्ला आहे तर कनकदुर्ग हा जमिनीवरील किल्ला आहे.

3.केशवराज मंदिर 

केशवराज मंदिर हे दापोलीतील एक लोकप्रिय मंदिर आहे हे मंदिर दापोलीतील आसूद या गावांमध्ये आहे.या गावाला निसर्गाने अगदी भरभरून सौंदर्य दिलेले आहे.केशवराज मंदिर हे भगवान विष्णूला समर्पित आहे.साधारणत 1000 वर्ष जुने असलेले हे मंदिर दरदशा झाडीमध्ये वसलेले आहे.या मंदिराचे बांधकाम हे दगडी प्रकारातील असून याची रचना ही अतिशय उत्तम अशी आहे.या मंदिराचा परिसर हा अगदी मनाला भरवून टाकतो दापोली शहरापासून हे मंदिर मात्र सहा किलोमीटर इतक्या अंतरावर आहे.

4.लाडगर बीच

लाडगर बीच हे दापोलीतील एक सुंदर आणि आकर्षक समुद्रकिनारा आहे.हा समुद्रकिनारा पर्यटकांची आवडते ठिकाण आहे या किनाऱ्यावरील वाळू ही संपूर्णता तांबड्या रंगाची आहे त्यामुळे किनाऱ्यावरील पाणी हे तांबड्या रंगाचे असल्याचे आपल्याला पाहायला मिळते यामुळे याला तामस किंवा तीर्थ असे देखील म्हटले जाते.लाडगर बीच हा प्रामुख्याने डॉल्फिन आणि केसरी सूर्यास्त पाण्यासाठी ओळखला जातो.प्राचीन शिवमंदिर आणि दत्त मंदिरामुळे या किनाऱ्याला धार्मिक महत्त्व देखील लाभलेले आहे त्याचबरोबर या ठिकाणी असणाऱ्या खडकांवरून आपल्याला दूरवर पसरलेला समुद्राचे नजारे पाहण्याचा आनंद घेता येईल.

5.सिद्धिविनायक मंदिर 

दापोलीतील लोकप्रिय मंदिर म्हणून सिद्धिविनायक या मंदिराला ओळखले जाते.सिद्धिविनायक हे मंदिर माधवराव पेशवे यांनी 18 व्या शतकात बांधलेले आहे भगवान गणेशाला समर्पित असलेले हे मंदिर एक महत्त्वाचे तीर्थक्षेत्र आहे.हे मंदिर एका डोंगर माथ्यावर हिरवाईने वेढलेले आहे.सिद्धिविनायक मंदिर परिसरातून अंजर्ले समुद्रकिनारा आणि त्याच्या सभोवतांच्या सुखाचे निसर्गरम्य दृश्य पाहता येते.दापोली शहरापासून हे मंदिर मात्र एक किलोमीटर इतके अंतरावर आहे.

6.केळशी बीच

केळशी बीच हा समुद्रकिनारा दापोली या ठिकाणचे एक लोकप्रिय पर्यटन स्थळ आहे.अस्पर्शित निसर्गरम्य किनारपट्टी म्हणून केळशी या समुद्रकिनाऱ्याला ओळखले जाते.हा समुद्रकिनारा दूरवर पसरलेला आहे सुमारे तीन किलोमीटर लांबीचा हा सुंदर समुद्रकिनारा हिरवळ आणि घनदाट जंगलाने व्यापलेला आहे. हिवाळ्यामध्ये पक्षी निरीक्षणासाठी हे एक उत्तम ठिकाण आहे.शांत व नितांत असणाऱ्या परिसरामध्ये वाहनांची वर्दळ ही कमी असल्याने पर्यटकांना मनमोराचा आनंद घेता येतो.दापोलीपासून केळशी बीच समुद्रकिनारा हा 30 किलोमीटर इतक्या अंतरावर आहे.

7.परशुराम भूमी 

परशुराम भूमी हे ठिकाण निसर्ग सौंदर्यासाठी प्रसिद्ध असलेली एक सुंदर टेकडी आहे.संपूर्ण कोकण भूमी हीच परशुरमाने निर्माण केलेली आहे.या ठिकाणी वीस फूट उंच असलेल्या पृथ्वीच्या अर्ध्या भागावर भगवान परशुरामाची 21 फुट उंच मूर्ती स्थापित केलेली आहे.भगवान परशुरामाची ही मूर्ती या ठिकाणी येणाऱ्या पर्यटकांचे मुख्य आकर्षण केंद्र आहे त्याचबरोबर जवळपासचे निसर्ग सौंदर्य पाहण्यासाठी देखील हे एक सर्वोत्तम ठिकाण आहे.

8.पन्हाळे काजी लेणी 

पन्हाळे काजी लेणी ही दापोलीतील पुरातन लेणी आहे.पन्हाळे काजी लेणीत साधारणता 30 बौद्ध लेणी आहेत.या लेणी समूहामध्ये गणपती,त्रिपुर सुंदरी,सरस्वती यांच्या देखील मुर्त्या कोरलेले आहेत.इनियान पंताने ईसविसन तिसऱ्या शतकामध्ये ही लेणी कोरण्यास सुरुवात केली होती.दापोली दबिळ पांगरी मार्गाने पन्हाळ काजी लेणी पर्यंत पोहोचता येते हा रस्ता खराब असला तरी तो लेणीपर्यंत पोहोचतो.पन्हाळे काजी ही लेणी जंगल आणि नदीने वेढलेली आहे त्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पक्षी आणि सरपटणारे प्राणी पाहायला मिळतात.

9.उन्हवरे

उन्हवरे हे ठिकाण दापोली जवळील एक लोकप्रिय पर्यटनस्थळ आहे या गावाजवळ गंध मिश्रीत गरम पाण्याच्या सरांचे कुंड आहेत.या कुंडात स्नान केल्याने त्वचेचे विकार व वाताचे विकार बरे होतात असे म्हटले जाते.हे गरम पाण्याचे झरे सल्फर ने समृद्ध असतात या भागातील व जवळपासच्या परिसरातील लोक गरम पाण्याचा झरास्नान करण्यासाठी येथे येत असतात. दापोली पासून उन्हवरे हे ठिकाण 30 किलोमीटर इतक्या अंतरावर आहे.

10.कोलथरे बीच 

कोलथरे बीच हा समुद्रकिनारा दापोली या ठिकाणचे एक प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे समुद्रकिनारा आणि निसर्गप्रेमींसाठी परिपूर्ण असलेला हा बीच दापोली तालुक्यातील कोलथरे या गावांमध्ये आहे.कोलथरे बीच हा अतिशय स्वच्छ आणि शांत समुद्रकिनारा आहे या बीचवर मोठ्या प्रमाणात शांतता असल्याने पर्यटक रोजच्या तणामुक्त जीवनातून बाहेर येण्यासाठी या ठिकाणाला भेट देत असतात.कोलथरे बीचवर सकाळच्या वेळेस उगवत्या सूर्याचे दर्शन घेण्यासाठी पर्यटक नेहमीच उत्सुक असतात ल.दापोलीपासून हा समुद्रकिनारा मात्र 19 किलोमीटर इतक्या अंतरावर आहे. 

निष्कर्ष (summer)

आजच्या या लेखात आपण दापोली पर्यटन स्थळे (Tourist places of Dapoli in Marathi) ही माहिती जाणून घेतली. ही माहिती कशी वाटली हे कॉमेंट मध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांना पण नक्कीच शेअर करा.

दापोली पर्यटन स्थळे (Tourist places of Dapoli in Marathi)

Leave a Comment