वाक्यांचे प्रकार माहिती मराठी | vakyache prakar in marathi

vakyache prakar in marathi : या लेखात आपण वाक्य व वाक्यांचे प्रकार यांचा अभ्यास करणार आहोत.प्रत्येक वाक्य शब्दांचे बनलेले असते आणि वाक्य म्हणजेच अर्थपूर्ण शब्दांचा समूह.प्रत्येक वाक्यात कर्ता आणि क्रियापद महत्त्वाचे असते. त्याचबरोबर शब्दांच्या सर्व जातींच्या प्रकारातील शब्दांचा समावेश वाक्यात होतो प्रत्येक शब्दांचा परस्परांशी काहीतरी संबंध जोडलेला असतो.

vakyache prakar in marathi
वाक्यांचे प्रकार माहिती मराठी (vakyache prakar in marathi)

वाक्यांचे प्रकार माहिती मराठी (vakyache prakar in marathi)

मराठीत वाक्याचे दोन प्रकारात वर्गीकरण केले जाते.

 1. अर्थावरून पडणारे प्रकार
 2. स्वरूपावरून पडणारे प्रकार

1.अर्थावरून पडणारे प्रकार

 1. विधानार्थी वाक्य
 2. प्रश्नार्थी वाक्य
 3. उद्गारार्थी वाक्य
 4. होकारार्थी वाक्य
 5. नकारार्थी वाक्य
 6. आज्ञार्थी वाक्य
 7. संकेतार्थ वाक्य

1.विधानार्थी वाक्य

विधानार्थी वाक्य म्हणजे ज्या वाक्यात कर्त्याने केवल विधान केलेले असते त्या वाक्याला विधानार्थी वाक्य म्हणतात.म्हणजेच साधे व सरळ वाक्य.

उदाहरणार्थ
 • मी खेळतो.
 • रिया काम करते.
 • मी वाचतो.

वरील वाक्यांमध्ये सर्व शब्द व वाक्य हे अगदी साधे व सरळ आहेत.

2.प्रश्नार्थी वाक्य

प्रश्नार्थी वाक्य म्हणजे ज्या वाक्यत कर्त्यांनी प्रश्न विचारलेला असतो त्या वाक्याला प्रश्नार्थी वाक्य म्हणतात.म्हणजेच आपण इतरांना प्रश्न विचारतो असं या वाक्यातून स्पष्ट होतो.

उदाहरणार्थ
 • तू काय काम करतोस.
 • कोण आहे मैदानात.

या दोन्ही वाक्यात काय काम करतेस व कोण आहे हे शब्द आपल्याला प्रश्न दर्शवतात.

3.उद्गारार्थी वाक्य

उद्गारार्थी वाक्य म्हणजे ज्या वाक्यामध्ये कर्त्याच्या मनातील भावना व्यक्त केल्या जातात त्या वाक्याला उद्गारार्थी वाक्य म्हणतात.म्हणजेच आपण आपल्या भावना ज्या शब्दाने व्यक्त करतो ते वाक्य किंवा शब्द.

उदाहरणार्थ
 • अबब केवढा मोठा साप.
 • शाब्बास शेवटी तुझा पहिला नंबर आलाच.

या दोन्हीही वाक्यांमध्ये अबब,शाब्बास या दोन्ही शब्दांनी आपण आपल्या भावना व्यक्त केलेल्या आहेत.

4.होकारार्थी वाक्य

होकारार्थी वाक्य म्हणजे ज्या वाक्यांमधून होकार दर्शविला जातो त्या वाक्याला होकारार्थी वाक्य म्हणतात.

उदाहरणार्थ
 • मला जेवण करायला आवडते.
 • मला डॉक्टर व्हायचे आहे.

या दोन्ही वाक्यामध्ये आपण होकार दर्शवतो म्हणून अश्या प्रकारच्या वाक्यांना होकारार्थी वाक्य असे म्हणतो.

5.नकारार्थी वाक्य

नकारार्थी वाक्य म्हणजे ज्या वाक्यातून स्पष्टपणे नकार दर्शवला जातो त्या वाक्याला नकारार्थी वाक्य म्हणतात. म्हणजेच आपण अश्या प्रकारच्या वाक्यांमधून नाही असं म्हणतो.

उदाहरणार्थ
 • मला मासे आवडत नाही.
 • आई कधी आराम करत नाही.

या दोन्ही वाक्यांमध्ये नाही या शब्दांचा वापर केला आहे म्हणजेच हे वाक्य नकारार्थी वाक्य आहे.

6.आज्ञार्थी वाक्य

आज्ञार्थी वाक्य म्हणजे ज्या वाक्यामधून आज्ञा,आशीर्वाद,विनंती,प्रार्थना इत्यादी गोष्टींचा बोध होतो अशा वाक्यांना आज्ञार्थी वाक्य म्हणतात.अश्या प्रकारच्या वाक्यांतून आपण आज्ञा दर्शवतो.

उदाहरणार्थ
 • कृपया शांत बसा.
 • देवा सर्वांना सुखी ठेव.

पहिल्या वाक्यामध्ये आपण विनंती दर्शवतो आणि दुसऱ्या वाक्यांतून आपण प्रार्थना करतो.

7.संकेतार्थ वाक्य

संकेतार्थ वाक्य म्हणजेच जेव्हा वाक्यात एक गोष्ट केली असती तर दुसरी गोष्ट घडली असती असा संकेत दिला जातो तेव्हा त्या वाक्यात संकेतार्थ वाक्य असे म्हणतात.

उदाहरणार्थ
 • जर गाडी मिळाली असती तर वेळेवर पोहोचलो असतो.
 • जर चांगला अभ्यास केला असता तर पास झालो असतो.

म्हणजेच जर आपण एखादी गोष्ट केली असती तर काय झालं असतं अशा प्रकारे आपण संकेत देतो.

स्वरूपावरून पडणारे प्रकार

 • केवल वाक्य
 • संयुक्त वाक्य
 • मिश्र वाक्य

1.केवल वाक्य

केवल वाक्य म्हणजे ज्या वाक्यात एकच उद्देश व एकच विधेय असते त्यास केवल वाक्य असे म्हणतात.म्हणजेच अगदी साधा व सरळ वाक्य.

उदाहरणार्थ

ही दोन्हीही अगदी सरळ व साधे वाक्य आहेत. कर्ता,कर्म व क्रियापद यांचा यात समावेश झालेला आहे.

2.संयुक्त वाक्य

संयुक्त वाक्य म्हणजेच जेव्हा एका वाक्यात दोन किंवा अधिक केवळ वाक्य उभयान्वयी अव्ययांनी जोडली जातात त्या वाक्याला संयुक्त वाक्य असे म्हणतात.म्हणजेच दोन वाक्यही जोडली जातात.

उदाहरणार्थ
 • मी मदत केली तसे सर्व काम संपले.
 • शाळा सुटली आणि राम घरी आला.

तसे,आणि या दोन्ही शब्दांनी वाक्य जोडले गेले आहेत यालाच आपण संयुक्त वाक्य असे म्हणतो.

3.मिश्र वाक्य

मिश्र वाक्य म्हणजेच जेव्हा वाक्यातील एक प्रधान वाक्य आणि एक किंवा अधिक गौण वाक्य ही उभयान्वयी अव्ययाने जोडलेली असतात त्या वाक्यात मिश्र वाक्य असे म्हणतात.

उदाहरणार्थ
 • पुढे नोकरी लागावी म्हणून तो शहरात आला.
 • आईने हाक मारली म्हणून सीमा घरी आली.

या दोन्ही वाक्यात म्हणून या उभयान्वयी अव्ययांनी दोन वाक्य जोडली गेलेली आहेत.

निष्कर्ष

आजच्या या लेखात आपण वाक्यांचे प्रकार (vakyache prakar in marathi) जाणून घेतली. ही माहिती कशी वाटली हे कॉमेंट मध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांना पण नक्कीच शेअर करा.

वाक्यांचे प्रकार माहिती मराठी (vakyache prakar in marathi)

Leave a Comment