Narnala fort information in Marathi:भारताच्या महाराष्ट्र राज्यातील अकोला या जिल्ह्यात हा किल्ला असून या किल्ल्याचे शासक सोलंकी राजपूत राजा नरनाळा सिंह स्वामी यांच्या नावावर या किल्ल्याचे नामकरण झाले.पुढे याच नरनाळा सिंह स्वामी याचे वंशज रावराना नरनाळा सिंह स्वामी सोलंकी हे इथले द्वितीय किल्लेदार झाले.अशा या नरनाळा किल्ल्याची उंची 3161 फूट असून हा किल्ला गिरिदुर्ग या प्रकारात मोडतो.
Contents
नरनाळा किल्ला माहिती मराठी (Narnala fort information in Marathi)
नरनाळा या किल्ल्याचे स्थान हे अकोट तालुक्याच्या उत्तरेला साधारण 24 किलोमीटर अंतरावर आहे. सातपुड्याच्या उंच डोंगरावर हा किल्ला पसरलेला आहे. अकोला पासून याचे अंतर 66 किलोमीटर एवढे असून गडाच्या खाली शहानुर नावाचे गाव आहे. गडाच्या पायथ्यापासून मेळघाट व्याघ्र प्रकल्प सुरू होतो
नरनाळा या किल्ल्याचे स्थान हे अकोट तालुक्याच्या उत्तरेला साधारण 24 किलोमीटर अंतरावर आहे. सातपुड्याच्या उंच डोंगरावर हा किल्ला पसरलेला आहे. अकोला पासून याचे अंतर 66 किलोमीटर एवढे असून गडाच्या खाली शहानुर नावाचे गाव आहे. गडाच्या पायथ्यापासून मेळघाट व्याघ्र प्रकल्प सुरू होतो.
नाव | नरनाळा |
उंची | 3161फूट |
प्रकार | गिरीदुर्ग |
चढाईची श्रेणी | दुर्गम |
ठिकाण | अकोला जिल्हा |
जवळचे गाव | अकोट |
पायथ्या पासून गडावर जाण्याकरिता आता गाडीवाट आहे तरीही कित्येक दुर्गप्रेमी पायीच गड चढणे पसंत करतात.गडाचा विस्तार हा 382 एकर एवढा असून गडाच्या कोटाची लांबी ही 24 मैल आहे. एकूण दोन लहान व एक मोठा असा मोठा परिसर असणारा हा बहुदा महाराष्ट्रातील सर्वात विस्तीर्ण गिरीदुर्ग असावा. मुख्य गड नरनाळा या नावाने ओळखला जात असून तेलीया गड आणि जाफ्राबाद या नावाचे दोन उपदुर्ग पूर्व आणि पश्चिमेला आहेत.
- हार्मोनियम माहिती मराठी (harmonium information in Marathi)
- कडुलिंब झाडाची माहिती मराठी (Neem tree information in marathi)
गडाच्या प्रवेशाला पाच दरवाजे लागतात सर्वात आधी शहानुर दरवाजा मग मोंढा दरवाजा त्यानंतर अत्यंत सुरेख कलाकुसर असलेला महाकाली दरवाजा असे करीत गडावर पोहोचतो. गडाच्या मध्यावर सत्कर्त तलाव नावाचा विस्तीर्ण जलाशय याला बारा महिने पाणी असते. हा तलाव याच्या औषधी गुणाकरिता पंचकृशित प्रसिद्ध आहे.कुणाला कुत्रा चावलास त्यांनी या तलावात स्नान करून येथील दर्ग्यावर गुळ फुटाणे वहावे व गड उतरावा तसेच गड उतरताना मागे वळून पाहू नये असे म्हणतात.
गडावरील पाहण्यासारखे ठिकाणे
गडावर आजही राणी महाल व बाजूची मशी अस्तित्वात आहे त्या समोरचा सभा मंडप आता नसला तरी त्याचा स्तंभ त्याच्या विस्ताराचे भान करून देतो.सरळ पुढे गेल्यास तुपाच्या टाक्या लागतात या टाक्या खोल असून त्यात विभागणी केलेली आहे.युद्धकाळात तेल तूप साठवण्यासाठी त्या वापरल्या जात असत.
गडाच्या तटाच्या बाजूने फिरत गेल्यास थोड्या अंतरावर नऊ गजी तोफ दिसते ही तोफ अष्टधातूची आहे.या तोफेवर पारशीत लेख कोरलेला आहे.तोफेचे तोंड शहानुर गावाकडे रोखलेल्या आपणास लक्षात येते बाजूला खूप खोल असे चंदन खोरे आहे या खोऱ्यात चंदनाच्या व सागाच्या झाडांची फार दाट पसरट आहे.
नरनाळा किल्ल्याचे ऐतिहासिक महत्त्व
हा गड नेमका कोणी आणि कोणत्या काळात बांधला याबाबत नक्की माहिती नाही पण स्थापत्य व ऐतिहासिक पुराव्यांवरून हा गड गोंड राजांनी बांधला असल्याचे बोलले जाते त्यानंतर राजपूत राजा नरनाळा सिंह यांनी या किल्ल्यात बदल करून बुरुज बांधले. गडावर राम तलाव व धोबी तलाव यासहित 22 तलाव आहेत गडाला 64 बुरुज आहेत.
भक्कम तटबंदी आणि दुर्गम पहाडी यांच्या सहित हा दुर्ग सातपुड्याच्या दारावर उभा राहून उत्तरेकडून येणाऱ्या आक्रमकांना तोंड देत झुंझला असेल.या किल्ल्याला 7 जून इसवी सन 1916 रोजी राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित करण्यात आले आहे.
सतत विचारले जाणारे प्रश्न (FAQ)
नरनाळा किल्ला ला किती दरवाजे आहेत?
गडाच्या प्रवेशाला 5 दरवाजे आहेत.
नरनाळा किल्ला कोणी बनवला?
ऐतिहासिक पुराव्यांवरून हा गड गोंड राजांनी बांधला असल्याचे बोलले जाते त्यानंतर राजपूत राजा नरनाळा सिंह यांनी या किल्ल्यात बदल करून बुरुज बांधले.
लाल किल्ल्याच्या आत कोणती इमारत आहे?
लाल किल्ल्याच्या आत मुमताज महल आहे.
नरवार किल्ला कोणी बांधला?
कचवाह राजपूतांनी 10व्या शतकात नरवर ताब्यात घेतल्यावर किल्ला बांधला (किंवा पुनर्बांधणी) केली असे म्हटले जाते.
निष्कर्ष (summary)
आजच्या या लेखात आपण नरनाळा किल्ला माहिती मराठी (Narnala fort information in Marathi) ही माहिती जाणून घेतली. ही माहिती कशी वाटली हे कॉमेंट मध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांना पण नक्कीच शेअर करा.