अलिबाग पर्यटन स्थळे | Alibaug Tourist Places Information in Marathi

Alibaug Tourist Places Information in Marathi : महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील अलिबाग हे ठिकाण सुंदर आणि समृद्ध पर्यटन स्थळ म्हणून ओळखले जाते. अलिबाग मधील समुद्रकिनाऱ्यामुळे हे महाराष्ट्रातील पिकनिक स्पॉट बनलेले आहे.या शहराचे नाव एका इजरायली व्यक्तीच्या नावावरून ठेवण्यात आले होते कारण त्यातील कित्येक उद्याने त्या व्यक्तीने विकसित केली होती. त्या इजरायली व्यक्तीचे नाव अली असे होते त्यामुळेच या शहराला अलिबाग म्हणून ओळखले जाते.(अलिबाग पर्यटन स्थळे | Alibaug Tourist Places)

Alibaug Tourist Places Information in Marathi
अलिबाग पर्यटन स्थळे (Alibaug Tourist Places Information in Marathi)

अलिबाग पर्यटन स्थळे (Alibaug Tourist Places Information in Marathi)

1.मुरुड जंजिरा किल्ला 

मुरुड जंजिरा हा किल्ला अलिबाग पासून 54 किलोमीटर एवढ्या अंतरावर असून 22 एकर परिसरामध्ये पसरलेला आहे.हा किल्ला एक आर्किटेक्चरल चा एक उत्कृष्ट नमुना आहे.चारही बाजूंनी समुद्रकिनाऱ्यांनी वेडलेला हा किल्ला मुरुड तालुक्यात आहे जंजिरा याचा अर्थ समुद्राने वेढलेला किल्ला असाही होतो पर्यटकांमध्ये हा किल्ला खूपच प्रसिद्ध आहे.जर तुमचा कधी अलिबागला जाण्याचा योग आला तर नक्की या किल्ल्याला भेट द्या मुरुड जंजिरा किल्ल्यापर्यंत पोहोचणे अगदी सोपे आहे अलिबाग पुणे मुंबई येथून दिवसभर या ठिकाणी परिवहन बसेस असतात.

2.अलिबाग बीच 

हा बीच अलिबाग मधील सर्वात फेमस समुद्रकिनारा आहे जर तुम्हाला बीच एक्सप्लोर करायला आवडत असेल तर अलिबाग बीच एक उत्तम पर्यटन स्थळ आहे.या बीचची सर्वात चांगली गोष्ट म्हणजे आपण या ठिकाणी येऊन कुलाबा किल्ला आनंदही घेऊ शकतो तसेच सूर्यास्ताच्या वेळेस भव्य असा नजारा तुम्हाला येथे पाहायला मिळेल अलिबाग हे शहर मुंबई पासून जवळपास 100 किलोमीटर एवढे अंतरावर आहे.

3.कुलाबा किल्ला

कुलाबा किल्ला हा महाराष्ट्रातील एक प्राचीन किल्ला आहे तुम्हाला जायला आवडेल अशी अलिबाग मधील एक ठिकाण म्हणजे कुलाबा किल्ला.हा कुलाबा किल्ला अलिबाग पासून एक ते दोन किलोमीटर एवढे अंतरावर आहे.हा संपूर्ण किल्ला जवळपास दोन तासात आरामात फिरून होतो या किल्ल्यावर आपल्याला गणपती मंदिर,हनुमान मंदिर,शिव मंदिर,गोड्या पाण्याची विहीर, दारूगोळा ठेवण्याचे ठिकाण इत्यादी ठिकाने पाहायला मिळतील. 

4.नगोआ बीच

नगोआ बीच हा अलिबाग मधील सर्वात प्रवास प्रसिद्ध बीच आहे.हा बीच कौटुंबिक किनार्‍यापैकी एक आहे स्वच्छ समुद्रकिनारा आणि अखंड किनारपट्टी समुद्रकिनाऱ्यावर खोल निळ्या समुद्राच्या ठिकाणी एकांतात वेळ घालवायला नक्की एकवेळेस जावे.या बीचवर सूर्योदय आणि सूर्यास्त च्या वेळेस एक आकर्षक देखावा पाहायला मिळतो.या ठिकाणी आपण विविध आणि मजेदार पाण्याच्या खेळामध्ये भाग घेऊ शकतो तसेच समुद्रकिनाऱ्याजवळ सुपारी आणि नारळाची लागवड मोठ्या प्रमाणात बघायला मिळते.

5.किहीम बीच 

किहीम बीच हा अलिबाग मधील सर्वात सुंदर आणि शांत बीच आहे.कीहिम किनारपट्टी स्वच्छ पाणी, किनारपट्टीवरील दाट झाडांच्या चाकणाने परिचित असलेल्या या बीच ला एक वेळेस नक्की भेट द्या.किहीम बीच हा समुद्रकिनारा आणि नारळाच्या झाडासाठी देखील ओळखला जातो अलिबाग शहरापासून हा बीच 12 किलोमीटर एवढे अंतरावर आहे. 

6.कनकेश्वर वन 

कनकेश्वर वन हे अलिबाग मधील पर्यटन स्थळांपैकी एक प्रसिद्ध ठिकाण आहे.कारण या ठिकाणी दाट जंगल आहेत ज्यामध्ये दुर्मिळ वनस्पती आणि जीव जंतूंचा संग्रह आहे.त्या व्यतिरिक्त तेतील हवामान हे नेहमीच थंड असते पर्यटकांसाठी येथे येण्याची आणखी एक आकर्षण म्हणजे मापगाव या गावाजवळील छोट्या टेकडीवर एक जुने शिव मंदिर आहे ज्याला पाहण्यासाठी पर्यटक येथे येत असतात मुंबई विमानतळावरून एखाद्या गाडीने प्रवास केला तर कनकेश्वर ला जाईल 3 तास येवढा वेळ लागतो.

निसर्ग पर्यटन स्थळे (Nature tourism places information in Marathi)

7.मुरुड बीच 

बीचप्रेमींसाठी मुरुड बीच ही किनारपट्टी एक वेगळीच आनंद देणारे ठरते या बीचवरील काळ्या वाळूमध्ये फिरण्याची वेगळीच मजा आहे मुरुड बीच येथे येणारे बरेच पर्यटक विविध खेळांमध्ये आणि बोटीच्या प्रवासात भाग घेत असतात.या बीच च्या जवळच मुरुड जंजिरा हा किल्ला आहे.आपण पुढे या किल्ल्याबद्दल जाणून घेणार आहोत तसेच मुरुड बीचला जाण्यासाठी अलिबाग येथून टॅक्स आणि बसची सोय आहे.

8.ब्रह्मकुंड 

ब्रह्मकुंड हे अलिबाग मधील सर्वात लोकप्रिय पर्यटन स्थळ आहे ल.याची स्थापना सोळाशे बारा मध्ये केली गेली.अलिबाग पासून वीस किलोमीटर एवढे अंतरावर असणारे हे ठिकाण सगळ्यात जास्त बघितले जाणारे धार्मिक स्थळ आहे.कलेचा हा सुंदर तुकडा आयताकृती आकाराची टाकी असून त्याच्या चारही बाजूस पायऱ्या आहेत.या कुंड जवळ भगवान ब्रम्हाणे भगवान कृष्णाला स्नान केले आणि नंतर हा दिव्य तलाव करण्यासाठी पाण्याचे संग्रह केले. 

9.मांडवा बीच

मांडवा बीच अलिबाग मधील कौटुंबिक पर्यटन स्थळ आहे हा बीच अलिबाग मधील सर्वात सुंदर आणि उत्कृष्ट बीच आहे हा बीच प्रदूषणापासून मुक्त आणि शहराच्या जीवनापासून दूर आहे मांडवा हा बीच बॉलीवूडमधील चित्रपटांमध्ये खूप लोकप्रिय आहे.या बीचवर बऱ्याच चित्रपटांच्या चित्रीकरण देखील केले आहे मांडवा बीचवर आपल्याला सूर्योदय आणि सूर्यास्ताचा अनुभव घेता येईल.स्वच्छ आणि सुंदर हवामान असलेल्या बीचवर उंच उंच नारळाची झाडे आहेत जी या बीच ची शोभा वाढवतात.या बीचवर कायकिग,केळीची सवारी,वॉटर स्कूटर,जेट्स की या सर्व गोष्टींचा आनंद घेता येईल अलिबाग पासून १२ किलोमीटर एवढे अंतरावर हा बीच आहे मोहक आणि प्रसन्न वातावरणासाठी प्रसिद्ध असणाऱ्या बीचवर बस आणि खाजगी टॅक्सीद्वारे पोहोचू शकतो.

10.खांदेरी किल्ला 

खांदेरी हा किल्ला अलिबाग या शहरापासून चार ते पाच किलोमीटर एवढे अंतरावर आहे. खांदेरी हा किल्ला प्राचीन परंतु प्रसिद्ध असे पर्यटन स्थळ आहे.अलिबाग मधील हे एक महत्त्वाचे पर्यटन स्थळ मानले जाते.या किल्ल्यावर कुलाबा या किल्ल्यासारखेच गोड्या पाण्याची वीहीर देखील आहे.खांदेरी या बेटापासून जवळजवळ अर्धा तास बोटीने प्रवास करावा लागेल तेव्हा खांदेरी या किल्ल्याचे दर्शन घेता येईल. 

निष्कर्ष (summer)

आजच्या या लेखात आपण अलिबाग पर्यटन स्थळे (Alibaug Tourist Places Information in Marathi) ही माहिती जाणून घेतली. ही माहिती कशी वाटली हे कॉमेंट मध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांना पण नक्कीच शेअर करा.

अलिबाग पर्यटन स्थळे (Alibaug Tourist Places Information in Marathi)

Leave a Comment