पुणे पर्यटन स्थळे | Tourist places in pune information in Marathi

Tourist places in pune information in Marathi
पुणे पर्यटन स्थळे (Tourist places in pune information in Marathi)

Tourist places in pune information in Marathi : पुणे हे शहर महाराष्ट्रातील प्रमुख शहरांपैकी एक आहे.हे शहर भारतातील सहाव्या क्रमांकाचे आणि महाराष्ट्रातील दुसरे सर्वात मोठे शहर आहे.पुणे शहर हे खास करून उद्योग आणि माहिती तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये अग्रेसर आहे. अनेकदा भारतातील सर्वात राहणे योग्य शहर म्हणून पुणे शहराकडे पाहिले जाते महाराष्ट्रातील सांस्कृतिक शहर व विद्येचे माहेरघर म्हणूनही पुणे शहर प्रसिद्ध आहे.पुणे शहरामध्ये अनेक प्रसिद्ध पर्यटन स्थळे आहेत जी इथे येणाऱ्या पर्यटकांना आकर्षित करत असतात.आज आपण पुणे शहरातील दहा पर्यटन स्थळांची माहिती जाणून घेणार आहोत.

पुणे पर्यटन स्थळे (Tourist places in pune information in Marathi)

दगडूशेठ गणपती मंदिर 

दगडूशेठ गणपती मंदिर हे महाराष्ट्रातील सर्वात प्रसिद्ध आणि श्रीमंत मंदिरांपैकी एक आहे. हे भव्य आणि प्रसिद्ध मंदिर भगवान श्री गणेश यांना समर्पित आहे दररोज दगडूशेठ गणपती मंदिरामध्ये हजारो भाविक दर्शन घेण्यासाठी येत असतात.2.2 मीटर उंच आणि एक मीटर लांब असलेली भगवान श्री गणेशाची मूर्ती ही 40 किलो शुद्ध सोन्याने सुशोभित केलेली आहे.दगडूशेठ गणपती मंदिरातील वास्तू कला आणि सुंदर नक्षीकाम हे येथे येणाऱ्या भक्तांना आकर्षित करत असते.या मंदिरामध्ये दररोज भक्तगण मोठ्या संख्येने गर्दी करत असतात त्यामुळे हे पुणे शहरातील प्रमुख पर्यटन स्थळ म्हणून ओळखले जाते स्वारगेट या बस स्थानकापासून हे मंदिर 3 किलोमीटर इतक्या अंतरावर आहे.

राजीव गांधी प्राणी संग्रहालय 

राजीव गांधी प्राणी संग्रहालय हे पुणे शहरातील एक प्रसिद्ध आणि आकर्षक पर्यटन स्थळ आहे.राजीव गांधी प्राणीसंग्रहालयात कात्रज सर्प उद्यान किंवा कात्रज प्राणी संग्रहालय म्हणून ही ओळखले जाते.पुणे शहरातील कात्रज परिसरात असलेले हे उद्यान इसवी सन 1999 साली स्थापन करण्यात आले या ठिकाणी आपल्याला सस्तन प्राणी,पक्षी व सरपटणाऱ्या प्राण्यांच्या एकूण 66 प्रजाती पाहायला मिळतात.हे उद्यान साधारणतः 130 एकर इतक्या मोठ्या क्षेत्रामध्ये वसलेले आहे कात्रज प्राणी संग्रहालयात आपल्याला बंगाली वाघ बिबट्या सांबर डेकर शिंकारा काळवीट माकड इत्यादी प्राणी आढळून येतात कात्रज प्राणी संग्रहालय हे बुधवारचा दिवस सोडून आठवड्यातील सर्व दिवस सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत खुले असते.

शनिवार वाडा 

शनिवार वाडा हे पुणे शहरातील एक प्रसिद्ध आणि लोकप्रिय पर्यटन स्थळ आहे जी महाराष्ट्रातील ऐतिहासिक वास्तू म्हणून ओळखली जाते. शनिवार वाडा हा केशव कालीन वास्तू आहे या  ठिकाणी पेशव्यांचे निवासस्थान होते इसवी सन 1736 मध्ये पहिला बाजीराव पेशवा यांनी हा राजवाडा बांधला होता पूर्वीच्या काळी हा राजवाडा पुण्याच्या वैभवशाली संस्कृतीचे प्रतीक म्हणून ओळखले जायचे सध्याच्या परिस्थितीत शनिवार वाड्यातील सर्व अवशेष हे नष्ट झालेले असून वाड्याचा पाया आणि तटबंदीचा काही भाग हा आज देखील भक्कम स्थितीत उभा आहे.महाराष्ट्रातील बरेच पर्यटक आवर्जून हा ऐतिहासिक वाडा पाहण्यासाठी येत असतात पुण्यातील रविवार पेठ या परिसरामध्ये हे ऐतिहासिक ठिकाण वसलेले आहे. (Tourist places in pune information in Marathi))

आगाखान पॅलेस

आगाखान पॅलेस ही पुणे शहरातील एक महत्त्वाची ऐतिहासिक वास्तू आहे जे पुणे शहरातील लोकप्रिय पर्यटन स्थळ म्हणून ओळखले जाते इसवी सन 1892 ते इसवी सन 1897 दरम्यान सुलतान मोहम्मद शहा यांनी या इमारतीचे बांधकाम पूर्ण केले होते.आगाखान पॅलेस या इमारतीचे संपूर्ण बांधकाम इटालियन बनावटीची आहे.भारत छोडो या आंदोलनांमध्ये महात्मा गांधी,कस्तुरबा गांधी व महादेव यांना या ठिकाणी नजर कैदेमध्ये ठेवण्यात आले होते.आगाखान पॅलेस ऐतिहासिक वास्तू साधारणतः 19 एकर इतक्या मोठ्या क्षेत्रामध्ये विस्तारलेली आहे या पॅलेस मध्ये एक सुंदर संग्रहालय देखील आहे या ठिकाणी येणाऱ्या पर्यटकांना गांधीजींची छायाचित्रे व वैयक्तिक गोष्टी पाहता येतात आगाखान पॅलेस हे ठिकाण पुण्यातील कल्याणी नगर या परिसरामध्ये स्थित आहे. 

पु.ल. देशपांडे उद्यान 

पु.ल. देशपांडे उद्यान हे पुणे शहरातील एक प्रसिद्ध आणि लोकप्रिय पर्यटन स्थळ आहे जी पुण्यातील सिंहगड रोड या परिसरामध्ये आहे.या उद्योगाची रचना ही जपानी पद्धतीची आहे पू.ल. देशपांडे या उद्यानालाच पूर्वी पुणे ओकायमा मैत्री उद्यान या नावाने ओळखले जायचे.हे उद्यान साधारणतः 10 एकर इतक्या मोठ्या क्षेत्रामध्ये विस्तारलेले आहे.वर्षभर बदलत्या ऋतू नुसार या ठिकाणी आपल्याला निसर्गाचे सौंदर्य अनुभवायला मिळते.या उद्यानात फिरताना आपल्याला हिरवळ, तळे, पाण्याचे झरे,टेकड्या या सर्वांचा अनुभव घेता येतो.त्याचबरोबर जवळपासच्या परिसरातील अनेक लोक दररोज सकाळी व्यायाम करायला आणि सकाळची शुद्ध हवा घेण्यासाठी या उद्यानात येत असतात.हे उद्या सकाळी 6 ते 11 वाजेपर्यंत व सायंकाळी 4.30 ते 8 वाजेपर्यंत खुले असते.

लाल महाल 

लाल महाल हे ठिकाण पुण्यातील प्रसिद्ध आणि लोकप्रिय पर्यटन स्थळ आहे हा मान पुणे शहराच्या अगदी मधोमध बसलेला आहे.छत्रपती शिवाजी महाराजांचे वास्तव्य असलेल्या या लाल महालाची गिनती ऐतिहासिक वास्तूमध्ये केली जाते.छत्रपती शिवाजी महाराजांचे बालपण हे याच वास्तूमध्ये गेले आहे. सध्या या लाल महालाची पुनर्बांधणी ही पुणे महानगरपालिकेने केलेली आहे त्यामुळे ही वास्तू आणखीन पाहण्यासारखी झाली आहे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून अनेक पर्यटक मोठ्या उत्सुकतेने लाल महालाला भेट देण्यासाठी येत असतात.स्वारगेट या बस स्थानकापासून लाल महाल हा 2-3 किलोमीटर इतक्या अंतरावर आहे.

राजा दिनकर केळकर संग्रहालय 

राजा दिनकर केळकर म्युझियम हे पुणे शहरातील एक सुंदर आणि आकर्षक ठिकाण आहे हे ठिकाण भारतीय कलाकृतीचा एक खजिनाच आहे असे जरी म्हटले तरी वावगे ठरणार नाही त्याचबरोबर हे म्युझियम पुणे शहरातील सर्वाधिक भेट दिल्या जाणाऱ्या ठिकाणांपैकी एक आहे.या म्युझियममध्ये आपल्याला वेगवेगळ्या देशातील अनेक सुंदर कलाकृतीची नमुने पाहायला मिळतील राजा दिनकर केळकर म्युझियम हे भारतातील दुसरे सर्वात मोठे म्युझियम आहे. या संग्रहालयात आपल्याला अनेक वस्तू,सुंदर मूर्त्या,हत्यार,वस्त्र,शिक्के,लेखन सामग्री अशा अनेक वस्तू पाहायला मिळतात.स्वारगेट बस स्थानकापासून हे म्युझियम मात्र दोन किलोमीटर इतक्या अंतरावर आहे.

सारसबाग 

तळ्यातला गणपती असलेले सारसबाग हे उद्यान पुण्यातील एक लोकप्रिय पर्यटन स्थळ आहे.सुंदर अशा या बागेमध्ये टवटवीत गवत आहे तसेच या बागेत व्यायामासाठी असणारा पदाची मार्ग देखील आहे.या बागेमध्ये एक छोटेसे तळे असून यामध्ये प्रसिद्ध गणपतीचे मंदिर देखील आहे.यालाच तळ्यातला गणपती असे देखील म्हटले जाते त्याचबरोबर सारसबागेत लहान मुलांसाठी खेळणी व फुलराणी नावाची एक छोटी रेल्वे गाडी देखील आहे ज्यामध्ये बसून लहान मुले आनंद व्यक्त करत असतात.पुण्यातील स्वारगेट या बस स्थानकापासून ही बाग मात्र दहा मिनिटाच्या अंतरावर आहे.

तुळशीबाग 

तुळशीबाग हा परिसर पुणे शहरातील महात्मा फुले मंडई जवळ आहे मित्रांनो पुण्यात गेल्यावर जर का तुम्हाला शॉपिंग करायची असेल तर पुण्यातील तुळशीबागेला जरूर भेट द्या तुम्हाला आवश्यक असणाऱ्या जवळजवळ सर्वच वस्तू या ठिकाणी आपल्याला मिळतात तुळशीबागेत आपल्याला कपडे,दागिने,सौंदर्य साधने,देवाच्या पुरत्या,भांडीकुंडी,खेळणी,भेटवस्तू अशा सर्व प्रकारच्या निरनिराळ्या गोष्टी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. बारा महिने तुळशीबागेत ग्राहकांची गजबज असते खास करून सणासुदीच्या काळात हा परिसर गर्दीने प्रचंड भरून गेलेला असतो खऱ्या अर्थाने तुळशीबाग ही पुणे शहराची पारंपारिक बाजारपेठच आहे असे जरी म्हटले तरी चालेल.महात्मा फुले मंडई पासून तुळशीबाग हे ठिकाण पाच मिनिटाच्या अंतरावर आहे.

पर्वती हील 

पर्वती हिल ही पुणे शहरातील एक प्रमुख टेकडी आहे जी पर्यटक व स्थानिक लोकांमध्ये खूप लोकप्रिय ठिकाण आहे.या टेकडीला हिंदू देवी पार्वतीचे नाव देण्यात आले आहे.असे म्हटले जाते की प्राचीन काळी पार्वती देवी या टेकडीवर वास्तव्यास होती. पार्वती देवीच्या मंदिरा व्यतिरिक्त पर्वती टेकडी ही पुणे शहराच्या विस्मयकारक दर्श्यासाठी देखील प्रसिद्ध आहे.या ठिकाणाला चारही बाजूने निसर्गाने वेडा घातलेला आहे.पर्वती हिल ही टेकडी साधारणता 1200 फूट उंचावर असून येथून आपण संपूर्ण शहराच्या चित्तधारक दर्षाचा आनंद घेऊ शकतो पुणे शहरातील स्वारगेट पासून ही टेकडी 3 किलोमीटर इतक्या अंतरावर आहे.

पुणे पर्यटन स्थळे टॉप दहा

  1. दगडूशेठ गणपती मंदिर 
  2. राजीव गांधी प्राणी संग्रहालय 
  3. शनिवार वाडा
  4. आगाखान पॅलेस
  5. पु.ल. देशपांडे उद्यान 
  6. लाल महाल
  7. राजा दिनकर केळकर संग्रहालय 
  8. सारसबाग
  9. तुळशीबाग
  10. पर्वती हील 

निष्कर्ष (summer)

या लेखात आपण फक्त पुणे शहरातील दहा पर्यटन स्थळांची माहिती जाणून घेतलेली आहे. यामध्ये पुणे शहराच्या जवळ असणाऱ्या कोणत्याही पर्यटन स्थळाचा समावेश केलेला नाही. पुणे पर्यटन स्थळे (Tourist places in pune information in Marathi) ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे कॉमेंट मध्ये नक्की सांगा.

Leave a Comment