जयगड किल्ला माहिती मराठी | Jaigad fort information in Marathi

Jaigad fort information in Marathi:जयगड हा किल्ला महाराष्ट्रातील प्रमुख किल्ल्यांपैकी एक आहे.या किल्ल्यावर खूप मोठ्या प्रमाणात लढाया झाल्या आहेत कधी पोर्तुगीजांनी या किल्ल्यावर हल्ला केला तर कधी विजापूर मधून या गडावर हल्ला करण्यात आला जयगड किल्ला हा सागरी जलदुर्ग प्रकारातील किल्ला आहे हा किल्ला तीन बाजूने समुद्रांनी वेढलेला आहे. जयगड किल्ला हा महाराष्ट्राच्या रत्नागिरी जिल्ह्यात जयगड या गावांमध्ये आहे. गणपतीपुळ्यापासून १४ किमी अंतरावरअसणारा जयगड किल्ला हा अरबी समुद्र आणि शास्त्री नदीच्या संगमावर जयगड गावाजवळ स्थित आहे.

Jaigad fort information in Marathi
जयगड किल्ला माहिती मराठी (Jaigad fort information in Marathi)

जयगड किल्ला माहिती मराठी (Jaigad fort information in Marathi)

जयगड किल्ला हा एक इतिहास सागरी दुर्ग किल्ला आहे समुद्रसपाटीपासून जयगड किल्ल्याची उंची ही साधारणतः 55 मीटर इतकी आहे.हा किल्ला साधारण 13 एकर इतक्या मोठ्या परिसरामध्ये पसरलेला आहे.महाराष्ट्रातील गणपतीपुळे या लोकप्रिय तीर्थक्षेत्रापासून हा किल्ला जवळच आहे.जयगड किल्ला हा मुख्यता दोन भागात विभागलेला आहे एक म्हणजे बालेकिल्ला आणि दुसरा फडकोट किल्ला.

मुख्य बालेकिल्ल्याला एकूण 14 बुरुज आहेत तर फडकोट किल्ल्याला एकूण 10 बुरुज असे या किल्ल्यावर एकूण 24 बुरुज आहेत.याच बरोबर या किल्ल्याला संरक्षक ततबंदी देखील आहे.जयगड किल्ल्याला जयगाव किल्ला म्हणूनही ओळखले जाते.भारत सरकारने जयगड किल्ल्याला 21 जून 1910 रोजी महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केलेले आहे.

महाराष्ट्रातील बरेच पर्यटक व इतिहास प्रेमी या किल्ल्याला भेट देण्यासाठी येत असतात.जयगड किल्ल्याच्या इतिहासाबद्दल जाणून घ्यायचे झाल्यास जयगड किल्ला हा सोळाव्या शतकामध्ये विजापूर सल्तनतने उभा केला होता.विजापूर राजवटीत राजेशाही ना हा किल्ला फार काळ टिकवता आला नसल्याने संगमेश्वर मधील नाईक यांनी हा किल्ला आपल्या ताब्यात घेतला, परत हा किल्ला मिळवण्यासाठी विजापूर सल्तनत ने आणि पोर्तुगीजांनी बरेच हल्ले केले परंतु त्यांना या किल्ल्यावर विजय मिळवता आला नाही.

पुढे हा प्रदेश छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजवटीचा एक भाग बनला. इसवी सन 1698 मध्ये सरखेल कान्होजी आंग्रे यांच्या ताब्यात हा किल्ला देण्यात आला. इंग्रज मराठा युद्धामध्ये हा किल्ला इसवी सन 1818 मध्ये इंग्रजांच्या ताब्यात गेला.मोठा ऐतिहासिक वारसा लाभलेल्या जयगड किल्ल्याची निर्मिती 16 व्या शतकात बिजापूर येथील राजाकडून करण्यात आली. परंतु बिजापुरी सल्तनत किल्ल्यावरील आपला ताबा फार काळ टिकवून ठेऊ शकली नाही.

आणि या नंतर किल्ल्यावर संगमेश्वर येथील नाईक राजवटीने राज्य केले.हा संघर्ष इथेच थांबला नाही. कधी बिजापुरी सल्तनतने तर कधी पोर्तुगीजांकडून किल्ल्यावर सतत चढाई केली गेली. सरतेशेवटी 1818 साली जयगड इंग्रजांच्या ताब्यात गेला.

जयगड किल्ल्याचे ठिकाण

हा किल्ला रत्नागिरी जिल्ह्यात स्थित असून, गणपतीपुळे या तीर्थक्षेत्रापासून जवळच आहे. समुद्रसपाटीपासून सुमारे 55 मीटर उंचीवर हा किल्ला आहे. या किल्ल्याचे एकूण क्षेत्रफळ सुमारे 12 ते 13 एकर एवढे आहे.

जयगड किल्ल्यावर पाहण्यासारखी ठिकाणे

जयगड किल्ल्यावर पाहण्यासारखी अनेक ठिकाणी आहेत.हा किल्ला शास्त्री नदी आणि अरबी समुद्र यांच्या मुखाशी वसलेला आहे. किल्ल्यावरून आपल्याला अथांग पसरलेला अरबी समुद्र पाहायला मिळतो. भले मोठे प्रवेशद्वार असून प्रवेशद्वार शेजारील बुरुज आजमितीला देखील चांगल्या परिस्थितीत आहेत. गडावर गणपती आणि हनुमानाची मंदिरे आहेत. तसेच किल्ल्यावर 2-3 गोड पाण्याच्या विहिरी देखील खरोखरच पाहण्यासारख्या आहेत. गडाच्या मधोमध कान्होजी आंग्रे यांचा वाडा तसेच दीपगृह देखील आकर्षक आहेत.

महादरवाजा,खंदक, ब्रिटिश काळातील इमारत, गणपती मंदिर, बुरुज अशा अनेक ठिकाणांना भेट देता येईल त्याचबरोबर जयगड किल्ल्याजवळ गणपतीपुळे मंदिर, जयगड लाईट हाऊस, पावस गणपतीपुळे बीच अशी अनेक सुंदर पर्यटन स्थळे आहेत.जयगड किल्ला हा रत्नागिरी पासून 42 किलोमीटर तर गणपतीपुळे पासून 20 किलोमीटर इतक्या अंतरावर आहे.

जयगड किल्ल्याजवळील इतर पर्यटन स्थळे

कोकणातील प्रत्येक गोष्ट हि पर्यटन स्थळ आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. जयगड पासून अगदी 10-15 किमी वर गणपतीपुळे आहे. येथील जागृत गणपती नवसाला पावणारा आहे. शिवाय जयगड दीपगृह, रत्नागिरी मत्स्यालय इ. अनेक ठिकाणं भेट देण्यासारखी आहेत.

जयगडला कसे जावे

यागडला रस्ते, रेल्वे आणि हवाई मार्गाने जात येते. जर तुम्ही रस्ते मार्गाने प्रवास करत असाल तर रत्नागिरी बस स्टॅन्ड वरून तुम्हाला बस, ऑटो किंवा टॅक्सी करावी लागेल. रेल्वेने प्रवास करायचा म्हटल्यास सर्वात नजीकचे रेल्वे स्टेशन रत्नागिरी आहे येथून जवळपास 40-45 किमी वर हा किल्ला आहे. तसेच हवाई मार्गाने प्रवास करत असाल तर सर्वात जवळचे एअर पोर्ट रत्नागिरी आहे आणि येथून 40-45 किमी बस किंवा टॅक्सीने जयगडला पोहोचता येतं.

जयगडला भेट देण्याचा सर्वोत्तम कालावधी

खरं तर येथे वर्षभर पर्यटकांची गर्दी पाहायला मिळते, परंतु जयगडला भेट देण्यासाठी सर्वात उत्तम कालावधी ऑक्टोबर ते मार्च हा आहे.

जयगड किल्ला कुठल्या जिल्ह्यात आहे?

रत्नागिरी

जयगड किल्ला कुणी बांधला?

हा किल्ला बिजापूर येथील राजांनी बांधला.

जयगड किल्ल्याची उंची किती?

समुद्रसपाटीपासून सुमारे 55 मीटर.

जयगड किल्ला इंग्रजांनी केव्हा ताब्यात घेतला?

1818 साली

निष्कर्ष (summary)

आजच्या या लेखात आपण जयगड किल्ला माहिती मराठी (Jaigad fort information in Marathi) ही माहिती जाणून घेतली.जयगड किल्ला माहिती मराठी (Jaigad fort information in Marathi) ही माहिती कशी वाटली हे कॉमेंट मध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांना पण नक्कीच शेअर करा.

Leave a Comment