निसर्ग पर्यटन स्थळे | Nature tourism places information in Marathi

Nature tourism places information in Marathi : संपूर्ण जगातील पर्यटकांना भारत देशाबद्दल एक वेगळीच ओढ असल्याचे पाहायला मिळते संस्कृती आणि जगामध्ये सर्वश्रेष्ठ मानले जातात भारताला जसे नैसर्गिक सौंदर्य लाभलेला आहे तसेच पृथ्वीवरील इतर कोणत्या देशाला लाभलेला नाही या ठिकाणी अनेक सुंदर पर्यटन स्थळे आहेत भारतातील बदलनाऱ्या वातावरणामध्ये प्रत्येक पर्यटन स्थळाचे महत्व हे वाढत जाते

Nature tourism places information in Marathi
निसर्ग पर्यटन स्थळे (Nature tourism places information in Marathi)

निसर्ग पर्यटन स्थळे (Nature tourism places information in Marathi)

ताजमहल

आग्रा येथे अनेक वास्तू कला आहेत भारतातील सर्वात जास्त भेट दिल्या जाणाऱ्या ठिकाणांमध्ये ताजमहल हे ठिकाण नंबर एक वर येते जगातील सात आश्चर्यापैकी एक असणारे ताजमहल हे ठिकाण यमुना नदीच्या काठावर आहे युनेस्को ने जागतिक वारसा स्थळांमध्ये ताजमहालचा समावेश केलेला आहे मानवाने साकार केलेला सर्वोत्कृष्ट कार्यांपैकी एक म्हणून ताजमहालचा गौरव केला जातो. भारतातील प्रत्येक नागरिकाने किमान एकदातरी ताजमहल ला भेट दिली पाहिजे. भारताच्या उत्तर प्रदेश राज्यातील आग्रा येथे ताजमहल ही वस्तू कला असून मुगल सम्राट शहाजान यांनी आपली प्रीय पत्नी मुमताज यांच्या स्मरणार्थ बांधून घेतला आहे.

गोवा

गोवा हे भारतातील आकाराने सर्वात छोटे राज्य असून पर्यटनाच्या बाबतीत देशात अग्रेसर आहे.51 समुद्रकिनाऱ्या असणारे गोवा हे राज्य भारतातीलच नव्हे तर संपूर्ण जगातील प्रसिद्ध पर्यटन स्थळांपैकी एक आहे.देश वीदेशातून पर्यटन या ठिकाणाला भेट देण्यासाठी येत असतात.तरुणांसह वयोवृद्ध लोक ही गोव्याला जायला पसंती दर्शवतात खास करून तरुण वर्ग हा गोव्याला जायला सदैव तयार असतो.

मेघालय

मेघालय हे भारताच्या पूर्वेकडील राज्य आहे.भारतातील प्रमुख पर्यटन राज्यामध्ये मेघालय या राज्याची गिनती केली जाते.मेघालय हे राज्य सेवन सिस्टर म्हणजेच सात बहिणी म्हणून ही ओळखले जाते. संस्कृत मध्ये मेघालय याचा अर्थ ढगांचे घर असंही होतो मेघालय मध्ये आपल्याला सुंदर धबधबे उंच पर्वत शिखरे नैसर्गिक वातावरण सदाहरित जंगले पाहण्याचा आनंद घेता येईल.पर्यटनाच्या बाबतीत मेघालय हे भारतातील प्रमुख राज्य असल्याने वर्षभर पर्यटकांची गर्दी येथे आपल्याला पाहायला मिळते.

शिमला

शिमला हे शहर हिमाचल प्रदेश या राज्याची राजधानी असून उत्तर भारतातील लोकप्रिय पर्यटन स्थळ आहे. हिमाचल प्रदेश या राज्याला देवभूमी म्हणूनही ओळखले जाते. शिमला हे ठिकाण समुद्र सपाटीपासून 2200 मीटर एवढ्या उंचीवर आहे. भारतातील सर्वात सुंदर पर्यटन स्थळ पैकी एक आहे या ठिकाणचे नैसर्गिक सौंदर्य व उल्हासदायी वातावरण हे देश विदेशातील पर्यटकांबरोबर नवविवाहित जीवनासाठी हनिमून डेस्टिनेशन म्हणून ही प्रसिद्ध आहे शिमला या पर्यटन स्थळ ला भेट देणारे पर्यटक पुन्हा पुन्हा या ठिकाणी येत असतात.

उटी

उटी हे तामिनाडू राज्यांतील हील स्टेशन आहे.आनंददायी वातावरण,भारताच्या पश्चिम घाटाचे दृश्य आणि शांत वातावरण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. उटी हे ठिकाण चहा लागवड,समृद्धीच्या बागा,ब्रिटिश काळातील बंगले आणि मसालेदार खाद्य यासाठी प्रसिद्ध आहे. उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये बहुदा या ठिकाणी अनेक पर्यटक कुटुंबासोबत येथे भेट देण्यासाठी येत असतात उटी हे वर्षभर गजबजणारे पर्यटन स्थळ आहे.

महाराष्ट्र

देशाच्या पर्यटन उद्योगांमध्ये महाराष्ट्र हे राज्य अग्रस्थानी आहे दरवर्षी लाखो विदेशी पर्यटक महाराष्ट्राला भेट देण्यासाठी येत असतात.महाराष्ट्र मध्ये आपल्याला समुद्रकिनारी,उंच-उंच पर्वतरांगा,गडकिल्ले,प्राचीन लेण्या, धो-धो कोसळणारे धबधबे अशा अनेक प्राचीन पर्यटन स्थळांचा आनंद घेता येईल. मुंबई शहर हे महाराष्ट्रातील प्रमुख पर्यटन स्थळांमध्ये येते या ठिकाणी अनेक पर्यटन स्थळे आहेत.

जयपूर

राजस्थान राज्याची राजधानी जयपूर या शहराला गुलाबी शहर या नावाने ओळखले जाते आणि तसेच हे शहर भारतातील पर्यटन स्थळ आणि शैक्षणिक स्थळ म्हणूनही प्रसिद्ध आहे हवामान,जंतर मंतर आणि अंबर किल्ला ही या राज्याची प्रसिद्ध पर्यटन स्थळे आहेत. जर तुम्हाला शाही वारसा आणि वस्तू कलेचा अनुभव घ्यायचा असेल तर जयपुर या सिटीला एक वेळेस नक्की भेट द्या.

रत्नागिरी पर्यटन स्थळे (Tourist places in Ratnagiri information in Marathi)

दार्जिलिंग

भारतातील दार्जिलिंग या शहराची प्रसिद्ध पर्यटन स्थळांमध्ये गिनती केली जाते दार्जिलिंग हे शहर भारतातील पश्चिम बंगाल या राज्यांमध्ये आहे दार्जिलिंग हे जगप्रसिद्ध पर्यटन स्थळ असून भारतातच नाही तर जगभरामध्ये दार्जिलिंग चे नाव एक सुंदर पर्यटन स्थळ म्हणून घेतले या शहराचे सौंदर्य शब्दात वर्णन करता येणार एवढे कठीण आहे.दार्जिलिंग च्या अवती भोवती बर्फाच्छादित पर्वत शिखरे, फुलांनी गजबजलेली बगीचे, हिरवीगार नैसर्गिक सौंदर्य पाहिल्यावर आपल्याला जणू काही स्वर्गातच आहोत असा भास होतो. दार्जिलिंगला भेट देणारे कित्येक पर्यटके पुन्हा-पुन्हा या ठिकाणाला भेट देत असतात.

मैसूर

मैसूर हे भारतातील कर्नाटक राज्यातील सुप्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे.मैसूर शहराचे क्षेत्रफळ 128 चौरस किलोमीटर असून भारतातील प्रमुख पर्यटन स्थळांमध्ये या शहराची गीनती केली जाते.मैसूर मध्ये अनेक प्रेक्षणीय स्थळे आहेत महिलांचे शहर म्हणून ही मन्सूर या शहराला ओळखले जाते मैसूर मध्ये एकूण सात महाल आहेत तसेच या शहराला पॅलेस सिटी ऑफ इंडिया म्हणून ओळखले जाते भारतामध्ये ताजमल या पर्यटन स्थळानंतर म्हैसूर हे सर्वात जास्त भेट दिले जाणारे पर्यटन स्थळ आहे.

लडाख

लडाख हे एक केंद्रशासित प्रदेश असून भारतातील सर्वात सुंदर पर्यटन स्थळ आहे 31 ऑक्टोंबर 2019 पासून लडाख या शहराला स्वतंत्र केंद्रशासित प्रदेश म्हणून ओळखले जाऊ लागले.या आधी हा भाग जमू काश्मीर या राज्यांमध्ये होता.लडाख मधील लेह व कारागील हे दोन जिल्हे पर्यटनासाठी प्रसिद्ध आहेत.लडाख हे भारतातील एकमेव ठिकाण आहे जेथे दोन कुबडांचे उंठ पाहायला मिळतात.दरवर्षी लाखो पर्यटक हे उंट पाहायला जात असतात. तसेच लडाख येथे आपल्याला बर्फाच्छादित प्रदेश,उंच-उंच पर्वत शिखरे आणि सहासी पर्यटन स्थळे पाण्याचा आनंद घेता येतो.

निष्कर्ष (summary)

आजच्या या लेखात आपण निसर्ग पर्यटन स्थळे (Nature tourism places information in Marathi) ही माहिती जाणून घेतली. ही माहिती कशी वाटली हे कॉमेंट मध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांना पण नक्कीच शेअर करा.

निसर्ग पर्यटन स्थळे (Nature tourism places information in Marathi)

Leave a Comment