भारतातील सर्वात मोठी 5 धरणे | Largest dams in India in Marathi

Largest dams in India in Marathi : आपल्या भारत देशामध्ये मध्यम मोठ्या स्वरूपाची तब्बल 3200 धरणे आहेत. त्यामध्ये काही धरणांचा पाणीसाठा खूप जास्त आहे तर काहींचा खूप कमी आहे. आजच्या या पोस्टमध्ये आपण भारत देशामधील सर्वात मोठा जलसाठा असलेली 5 धरणे कोणती आहेत हे पाहणार आहोत. चला तर मग भारतातील सर्वात मोठी 5 धरणे (Largest dams in India in Marathi) याविषयी माहिती जाणून घेऊयात.

Largest dams in India in Marathi
भारतातील सर्वात मोठी 5 धरणे (Largest dams in India in Marathi)

भारतातील सर्वात मोठी 5 धरणे (Largest dams in India)

  • इंदिरा सागर
  • नागार्जुन सागर धरण
  • रीहंद धरण
  • सरदार सरोवर धरण
  • भाक्रा धरण

भारतातील सर्वात मोठी 5 धरणे माहिती मराठी (Largest dams in India information in Marathi)

भारतातील सर्वात मोठी 5 धरणे (Largest dams in India in Marathi) याविषयी माहिती जाणून घेऊयात.

इंदिरा सागर

इंदिरा सागर धरणाचा पाणीसाठा सर्वात जास्त म्हणजेच 430.84 टीएमसी असल्यामुळे हे धरण भारतातील सर्वात मोठा पाणीसाठा असलेले धरण आहे. हे धरण भारत देशातील मध्य प्रदेश राज्यात मुंडी गावाशेजारी आहे. हे धरण नर्मदा नदीवर बांधण्यात आलेले आहे. हे धरण 1983 ते 2005 साली बांधण्यात आले. या धरणाची उंची 92 मीटर म्हणजेच 302 फूट इतकी आहे.

या धरणाची लांबी 653 मीटर म्हणजेच 2142 फूट एवढी आहे. या धरणाचा जलसाठा 430.84 टीमसी एवढा प्रचंड आहे. या धरणाची वीजनिर्मती क्षमता 1000 मेगावॉट एवढी आहे. या धरणावर आठ वीज वीजनिर्मिती टरबाइन आहेत. या धरणाला विसर्गासाठी 20 दरवाजे आहे. इंदिरासागर धरणाचा जलसाठा 430.84 टीएमसी असल्यामुळे हे धरण भारतातील सर्वात मोठा पाणीसाठा असलेले धरण आहे.

नागार्जुन सागर धरण

नागार्जुन सागर धरण नागार्जुन सागर धरण देशातील सर्वात मोठा जलसाठा असलेल्या धरणाच्या यादी मध्ये दुसऱ्या क्रमांकाचे धरण आहे. हे धरण भारत देशातील तेलंगणा राज्यात नालगोंडा जिल्ह्यात आहे. हे धरण कृष्णा नदीवर बांधण्यात आलेले. आहे हे धरण 1955 ते 1967 साली बांधण्यात आले. आहे नागार्जुन सागर धरण हे जगातील सर्वात मोठे दगड आणि विटांचा वापर करून बांधण्यात आलेले धरण आहे. त्या धरणाची उंची 124 मीटर म्हणजेच 407 फूट इतकी आहे. या धरणाची लांबी पंधराशे पन्नास मीटर म्हणजेच 5085 फूट एवढी आहे. या धरणाचा जलसाठा 405 टीएमसी एवढा प्रचंड आहे.

या धरणाची वीज निर्मिती क्षमता 816 मेगावॉट एवढी आहे. या धरणाचा पाणीसाठा सर्वात जास्त म्हणजेच 405 टीएमसी इतका आहे. भारतातील सर्वात मोठा पाणीसाठा असलेल्या धरणांच्या यादीमध्ये दुसऱ्या क्रमांकाचे धरण नागार्जुन सागर धरण आहे. त्या धरणाचे भूमिपूजन भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी केले. या धरणावर एकूण 8 वीज निर्मिती टरबईन्स आहेत.

यामध्ये 110 चा एक व 100.8 चे 7 असे एकूण आठ टर्बन्स आहे. त्या टर्बन्स मिळून 816 मेगावॉट वीजनिर्मिती निर्मिती केली जाते. धरणाला विसर्गासाठी 26 मुख्य दरवाजे आहेत. धरणातून दोन जातात त्यातील उजव्या कॅनल चे नाव आहे जव्हार कॅनॉल हा 203 किलोमीटर वाहत जातो. तर डाव्या कॅनॉलचे नाव आहे लालबहादुर शास्त्री कॅनल हा 179 किलोमीटर वाहत जातो. त्या धरणाचा पाणीसाठा सर्वात जास्त म्हणजे 405 टीएमसी इतका प्रचंड असल्यामुळे हे धरण भरत देशामधील सर्वात मोठे दुसऱ्या क्रमांकाचे धरण आहे.

रीहंद धरण

भारत देशातील सर्वात मोठा जलसाठा असलेल्या धरणांच्या यादीमध्ये तिसऱ्या क्रमांकाचे धरण आहे रीहंद. या धरणाचे अधिकृत नाव गोविंद वल्लभ पंत असे आहे. धरणाचे नाव उत्तर प्रदेशचे पहिले मुख्यमंत्री गोविंद वल्लभ पंत यांच्या नावाने आहे. हे धरण भारत देशातील उत्तर प्रदेश राज्यात सोनभद्रा जिल्ह्यात आहे. हे धरण 1954-1962 साली बांधण्यात आले आहे.

या धरणाचे भूमिपूजन भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी केले. या धरणाची उंची 91.46 मीटर म्हणजेच 300 फूट इतकी आहे. या धरणाची लांबी 934.45 मीटर म्हणजेच 3066 फूट एवढी आहे. या धरणाचा जलसाठा 374.34 टी एम सी एवढा प्रचंड आहे. या धरणाला विसर्ग साठी तेरा मुख्य दरवाजे आहेत. या धरणाची वीज निर्मिती क्षमता 300 मेगावॅट एवढी आहे. या धरणाचा पाणीसाठा सर्वात जास्त म्हणजेच 374.34 टी एम सी इतका आहे. भारतातील सर्वात मोठा पाणीसाठा असलेल्या धरणांच्या यादीमध्ये या धरणाचा क्रमांक तिसरा येतो.

सरदार सरोवर धरण

भारतात सर्वात मोठा जलसाठा असलेल्या धरणांच्या यादीमध्ये चौथ्या क्रमांकाचे धरण आहे सरदार सरोवर धरण. हे धरण भारत देशातील गुजरात राज्यात नावागाम शेजारी आहे. हे धरण नर्मदा नदीवर बांधण्यात आलेले आहे. हे धरण 1987 ते 2017 साली बांधण्यात आले आहे. या धरणाची उंची 163 मीटर म्हणजेच 535 फूट एवढी आहे. या धरणाची लांबी 1210 मीटर म्हणजेच 3970 फूट आहे.

या धरणाचा जलसाठा 335.41 टी एम सी येवडा प्रचंड आहे. या धरणाची वीज निर्मिती क्षमता 1450 मेगा वॅट एवढी आहे. या धरणाला विसर्गासाठी मुख्य 30 दरवाजे आहेत. धरणामधून गुजरात, मध्य प्रदेश ,राजस्थान ,महाराष्ट्र या चार राज्यांना पाणीपुरवठा आणि वीजपुरवठा केला जातो. या धरणावरती वीजनिर्मितीसाठी 200 मेगावॉट चे 6 तसेच 50 मेगावॉट चे 5 असे एकूण 11 टरबाईन्स बसवलेली आहेत. सर्व 11 टरबाईन्स मिळून एकूण 1450 मेगावॉट वीज निर्मिती केली जाते. सरदार सरोवर हे धरण भारतातील सर्वात जास्त वीज निर्मितीमध्ये पाचव्या क्रमांकाचे धरण आहे. या धरणाच्या पाण्यावरती एकूण 17920 चौरस किलोमीटर क्षेत्र ओलताखाली आले आहे.

यामध्ये 12 जिल्हे 62 तालुके 3393 गावांचा समावेश आहे. धरणाची उंची ही टप्प्याटप्प्याने वाढवण्यात आली आहे. 1999 साली या धरणाची उंची होती 88 मीटर आणि 2017 मध्ये या धरणाची उंची 163 मीटर म्हणजेच 535 फूट एवढी करण्यात आली आहे. हे धरण बांधण्यात एवढा वेळ का लागला हा प्रश्न तुमच्या मनात आलाच असेल त्याचे उत्तर असे आहे या धरणाच्या साठ्यामध्ये अनेक लोकांचे नुकसान होत होते म्हणून खूप वेळा आंदोलन झाली त्यामुळे हे धरण थोडे थोडे बांधण्यात आले.

नरेंद्र मोदी हे भारताचे पंतप्रधान झाल्यानंतर त्यांनी या कामांमध्ये लक्ष घालून हे काम पूर्ण करून घेतले. भारताचे पहिले उपपंतप्रधान तसेच भारताचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांचा जगातील सर्वात मोठा पुतळा. ज्याचे नाव आहे स्टॅच्यू ऑफ युनिटी हा याच धरणाचा समोरील बाजूस नर्मदा नदी पात्रामध्ये तयार करण्यात आला आहे. याची उंची 182 मीटर म्हणजेच 597 फुटी आहे.

भाक्रा धरण

या यादीमध्ये पाचव्या क्रमांकाचे धरण आहे भाक्रा धरण. हे धरण भारत देशातील हिमाचल प्रदेश राज्यात बिलास्पुर जिल्ह्यात आहे. हे धरण सतलज नदीवर बांधण्यात आलेले आहे. हे धरण 1948 ते 1963 साली बांधण्यात आले. या धरणाची उंची 226 मीटर म्हणजेच 741 फूट इतकी आहे. त्या धरणाची लांबी 520 मीटर म्हणजेच 1700 फूट एवढी आहे. या धरणाचा जलसाठा 329.84 टी एम सी एवढा प्रचंड आहे. या धरणाची वीजनिर्मिती क्षमता 1325 मेगावॉट येवडी आहे.

या धरणाच्या जलसाठ्याला गोविंद सागर असे म्हणतात. हे धरण भारतातील सर्वात उंच धरणांच्या यादीमध्ये दुसऱ्या क्रमांकाचे धरण आहे. त्या धरणाचा वीज निर्मितीमध्ये सहावा क्रमांक लागतो. या धरणाला विसर्ग साठी मुख्य चार दरवाजे आहेत. भारताच्या स्वातंत्र्यानंतर पंजाब आणि हरियाणा राज्याचा पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या मार्गदर्शनाखाली भाक्रा प्रकल्प चे काम सुरू करण्यात तर आपणास एक प्रश्न नक्कीच पडला असेल की हे धरण तर हिमाचल प्रदेश मध्ये आणि ह्याचे पाणी पंजाब हरियाणा आणि राजस्थान या राज्यांना जाते असे का?

याचे कारण असे हे धरण जरी हिमाचल प्रदेश मध्ये असले तरी याचा विसर्ग हा पंजाब मध्ये आहे. भाक्रा हे सर्वात मोठे व मुख्य धरण आहे. त्याच्या पुढील नदीपात्रामध्ये नांगल हे धरण बांधण्यात आले आहे. नांगल धरण बांधण्याचे कारण म्हणजे भाक्रा धरणाचा 329 टी एम सी एवढा प्रचंड पाणीसाठा असल्यामुळे त्या धरणातून सोडण्यात येणाऱ्या निसर्गावर नियंत्रण ठेवता यावे. भाक्रा धरणाला कोणता ही धोका निर्माण होऊ नये तसेच त्यातून सुटणाऱ्या पाण्याच्या वीसर्गामुळे आसपासच्या परिसराची फार हानी होऊ नये म्हणून नांगल धरणाचा वापर केला आहे.

या धरणापासून 2 कॅनल जातात हरियाणा, पंजाब आणि राजस्थान या तीन राज्यांच्या शेतीला यामधून पाणीपुरवठा केला जातो. या धरणाचा पाणीसाठा सर्वात जास्त म्हणजेच 329.84 टी एम सी इतका प्रचंड असल्यामुळे हे धरण भारतातील सर्वात मोठा जलसाठा असलेल्या धरणाचे यादी मध्ये पाचवा क्रमांकाचे धरण आहे.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)

इंदिरा सागर धरण कोठे आहे?

इंदिरा सागर धरण भारत देशातील मध्य प्रदेश राज्यात मुंडी गावाशेजारी आहे. हे धरण नर्मदा नदीवर बांधण्यात आलेले आहे.

नागार्जुन सागर धरण कुठे आहे?

नागार्जुन सागर धरण तेलंगणा राज्यात नालगोंडा जिल्ह्यात आहे.

सरदार सरोवर धरण कुठे आहे?

सरदार सरोवर धरण भारत देशातील गुजरात राज्यात नावागाम शेजारी आहे.

सरदार सरोवर धरण कोणत्या नदीवर आहे?

सरदार सरोवर धरण नर्मदा नदीवर आहे.

भाक्रा धरण कोणत्या राज्यात आहे?

हिमाचल प्रदेश राज्यात भाक्रा धरण आहे.

निष्कर्ष

आजच्या या पोस्टमध्ये भारतातील सर्वात मोठी 5 धरणे (Largest dams in India in Marathi) याविषयी माहिती जाणून घेतली. भारतातील सर्वात मोठी 5 धरणे माहिती मराठी (Largest dams in India information in Marathi) ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे कॉमेंट मध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांनाही नक्की शेअर करा.

Leave a Comment