Arnala fort information in Marathi:अर्नाळा हा किल्ला महाराष्ट्राच्या पालघर जिल्ह्यातील वसई तालुक्यामध्ये अर्नाळा या गावाजवळ आहे.वसई शहरापासून हा किल्ला फक्त 12 किलोमीटर इतक्या अंतरावर आहे.अर्नाळा हा एक सागरी दुर्ग म्हणजेच जलदुर्ग प्रकारातील किल्ला आहे. हा किल्ला चारही बाजूंनी समुद्राने वेढलेला असल्याने या किल्ल्याला जंजीर अर्नाळा या नावाने देखील ओळखले जाते.

Contents
अर्नाळा किल्ला माहिती मराठी (Arnala fort information in Marathi)
अर्नाळा हा किल्ला महाराष्ट्रातील प्रमुख किल्ल्यांपैकी एक आहे.अर्नाळा हा किल्ला समुद्रातील एका बेटावर आहे त्यामुळे या किल्ल्याला चारही बाजूंनी समुद्र आहे जे या समुद्राच्या सुरक्षेच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे होते. महाराष्ट्रातील बरेच पर्यटक आणि इतिहास प्रेमी या अर्नाळा किल्ल्याला भेट देण्यासाठी येत असतात.
- नरनाळा किल्ला माहिती मराठी (Narnala fort information in Marathi)
- हार्मोनियम माहिती मराठी (harmonium information in Marathi)
अर्नाळा हा किल्ला व्यापारासाठी महत्त्वाचा आहे हे लक्षात घेऊन या किल्ल्यावर वर्चस्व गाजवण्यासाठी पोर्तुगीज, मराठा आणि मुघल यांनी लढाया केल्या.अर्नाळा या किल्ल्याचे क्षेत्रफळ 700 चौरस मीटर असून हा किल्ला आकाराने चौरसाकृती आहे.त्याचबरोबर या किल्ल्याच्या तटबंदीच्या भिंती मजबूत आहेत आणि या तटबंदीच्या भिंतीची उंची जवळजवळ 25 ते 30 फुटी आहे.
अर्नाळा किल्ला हा चारही बाजूंनी समुद्रांनी वेढलेला असल्याने या किल्ल्यावर शत्रूंना हल्ला करणे अवघड जायचे. अर्नाळा किल्ल्याला एकूण तीन दरवाजे असून दोन आकाराने मोठे तर एक छोटा आहे.किल्ल्याच्या मुख्य दरवाजावर सिंह आणि हत्ती या प्राण्यांचे सुंदर नक्षीकाम पाहायला मिळते.
अर्नाळा किल्ल्याच्या इतिहास
अर्नाळा किल्ल्याच्या इतिहासाबद्दल जाणून घ्यायचे झाल्यास अर्नाळा हा किल्ला इसवी सन 1516 मध्ये सुलतान मोहम्मद बेगडा यांनी बांधला.पुढे इसवी सन 1530 मध्ये पोर्तुगीजांनी या किल्ल्यावर आक्रमण करून बेठ आणि किल्ला आपल्या ताब्यात घेतले.या किल्ल्यावर असणारी पूर्वीची घडी पाडून तेथे किल्ल्याची पुनर्बांधणी केली.मराठा साम्राज्यामध्ये पहिला बाजीराव पेशव्यांनी इसवी सन 1734 मध्ये जुना किल्ला पाडून त्या किल्ल्याची पुनर्बाणी केली पुढे पहिले मराठा इंग्रजीमध्ये हा किल्ला इसवी सन 1781 ला इंग्रजांच्या ताब्यात गेला.
अर्नाळा किल्ल्यावर पाहण्यासारखी ठिकाणे
अर्नाळा किल्ल्यावर पाहण्यासारखी बरीच ठिकाने आहेत.या किल्ल्यावर बुरुज, तीन दरवाजे, अष्टकोनी तलाव, मंदिर, कबर अशी अनेक ठिकाणी पाहता येतील.
कसे पोहचावे
अर्नाळा किल्ल्यावर रस्ते मार्गाने आणि रेल्वे मार्गाने पोहोचता येते.रस्ते मार्गाने या किल्ल्यापर्यंत पोहोचण्याकरिता वसई शहरापर्यंत खाजगी किंवा सरकारी बसने येऊ शकतो.अर्नाळा हा किल्ला पुणे शहरापासून 200 किलोमीटर तर मुंबईपासून 70 किलोमीटर इतक्या अंतरावर आहे.
अर्नाळा किल्ल्याची माहिती
- वैतरणा या नदीच्या मुखावर या किल्ल्याची उभारणी केली आहे.
- अर्नाळा किल्ला चौकोनी आकाराचा असून सुमारे दहा मीटर उंचीची अखंड मजबूत तटबंदी त्याचे संरक्षण करते.
- किल्ला समुद्रातील बेटावर असल्याकारणे व्यापारासाठी अत्यंत महत्त्वाचा असल्याने तो भौगोलिक दृष्ट्या महत्त्वाचा होता.
- इसवी सन 1516 साली सुलतान मोहम्मद बेगडा यांनी हा किल्ला बांधला.
- 1530 च्या दशकात पोर्तुगीजांनी गडावर ताबा मिळवला आणि खूप वर्ष गडावर राज्य केले.
- त्यानंतर च्या 1737 च्या लढाईत किल्ला मराठ्यांनी जिंकला आणि 1781 मध्ये तो इंग्रजांकडे गेला पण स्वातंत्र्यप्राप्तीनंतर आता तो भारत सरकारच्या अधिपत्याखाली आहे.
- किल्ल्याचे प्रचंड मोठे प्रवेशद्वार आणि भिंतीवरील प्राण्यांचे कोरीव काम अत्यंत विलोभनीय आहे.
- त्याचबरोबर किल्ल्यावर महादेव भवानी आणि कालीमाता चे मंदिर देखील आहे तसेच एक मस्जिद देखील अर्नाळा किल्ल्यावर आहे.
सतत विचारले जाणारे प्रश्न (FAQ)
अर्नाळा किल्ला कुठे आहे?
अर्नाळा किल्ला हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पालघर जिल्ह्यात आहे.
कर्नाळा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे?
कर्नाळा किल्ला (याला फनेल हिल असेही म्हणतात) हा भारतातील रायगड जिल्ह्यातील पनवेल शहरापासून १० किमी अंतरावर असलेला एक डोंगरी किल्ला आहे.
कर्नाळा किल्ला पाहण्यासाठी सुरक्षित आहे का?
सध्या, हे कर्नाळा पक्षी अभयारण्यात एक संरक्षित ठिकाण आहे . कर्नाळा किल्ला त्याच्या विचित्र शिखरासाठी आणि जंगलात वसलेले पक्षी अभयारण्य यासाठी प्रसिद्ध आहे. आज, किल्ल्याचे अवशेष हे गिर्यारोहण आणि पर्यटनासाठी एक लोकप्रिय ठिकाण आहे.
अर्नाळा किल्ला कोणी बांधला?
सुलतान महमूद बेगदा मूलतः यांनी इ. स. १५१६ मध्ये हा किल्ला बांधण्यात आला.
निष्कर्ष (summary)
आजच्या या लेखात आपण अर्नाळा किल्ला माहिती मराठी (Arnala fort information in Marathi) ही माहिती जाणून घेतली. ही माहिती कशी वाटली हे कॉमेंट मध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांना पण नक्कीच शेअर करा.