जगातील सर्वात जास्त जलविद्युत निर्मिती करणारी धरणे | World’s largest hydroelectric generating dams

World’s largest hydroelectric generating dams in marathi : मित्रांनो या जगामध्ये अनेक धरणे आहेत. परंतु यातील फक्त काही ठरावीक धरणे आपल्याला माहीत असतात. आजच्या या लेखामध्ये आपण जगातील सर्वात जास्त जलविद्युत निर्मिती करणारी धरणे (World’s largest hydroelectric generating dams) याविषयी माहिती जाणून घेणार आहोत.

World's largest hydroelectric generating dams
जगातील सर्वात जास्त जलविद्युत निर्मिती करणारी धरणे (World’s largest hydroelectric generating dams)

जगातील सर्वात जास्त जलविद्युत निर्मिती करणारी धरणे (World’s largest hydroelectric generating dams)

  • थ्री जॉर्जेस धरण
  • इताईपू धरण
  • झिलुओठी धरण
  • गोरी धरण
  • तुकुरुई धरण

तुकुरुई धरण

या यादीमध्ये पाचव्या क्रमांकाचे धरण आहे तुकुरुई धरण. हे धरण ब्राझील देशातील पारा राज्यात आहे. हे धरण 1975 ते 1984 च्या दरम्यान बांधण्यात आले. या धरणाची उंची 78 मीटर म्हणजेच 256 फूट इतके आहे. त्या धरणाची लांबी 6.1 किलो मीटर एवढी आहे. या धरणाचा जलसाठा 1568 टीएमसी एवढा प्रचंड आहे. या धरणाची वीजनिर्मिती क्षमता 8370 मेगावॅट एवढी प्रचंड असल्यामुळे या धरणाचा जागांमध्ये पाण्यावरती वीजनिर्मिती करणाऱ्या धरणांच्या मध्ये पाचवा क्रमांक लागतो. या धरणावर ती एकूण 25 वीजनिर्मितीचे टर्बाइन लावलेले आहे.

गोरी धरण

सर्वात जास्त जलविद्युत निर्मिती करणाऱ्या जगातील सर्वात मोठ्या धरणाच्या यादीमध्ये चौथ्या क्रमांकाचे धरण आहे गोरी धरण. हे धरण वेनु जेयला देशातील बेलिवर राज्यात आहे ते धरण या कॅरोनी नदीवर बांधण्यात आलेले आहे. हे धरण 1963 ते 1988 सालि बांधण्यात आले. या धरणाची उंची 165 मीटर म्हणजेच 531 फूट आहे. या धरणाची लांबी 7426 मीटर म्हणजेच 24364 फूट एवढी आहे. या धरणाचा जलसाठा 4767 टीएमसी एवढा प्रचंड आहे. या धरणाची वीजनिर्मिती क्षमता 10235 मेगावॅट एवढी प्रचंड असल्यामुळे या धरणाचा जगामध्ये पाण्यावरती वीजनिर्मिती करणाऱ्या धरणांच्या मध्ये चौथा क्रमांक लागतो. या धरणावर टोटल 10 वीजनिर्मिती टर्बाइन्स लावलेली आहेत.

झिलुओठी धरण

जागांमध्ये सर्वात जास्त जलविद्युत निर्मिती करणाऱ्या जगातील सर्वात मोठ्या धरणांच्या यादीमध्ये तिसऱ्या क्रमांकाचे धरण आहे झिलुओठी धरण. हे धरण चीन देशातील सिचुआन राज्यात आहे. हे धरण जिनशा या नदीवर बांधण्यात आलेले असून हे धरण 2005 ते 2013 सालि बांधण्यात आले आहे. या धरणाची उंची 285.5 मीटर म्हणजेच 937 फूट आहे. या धरणाची लांबी 700 मीटर म्हणजे 2300 फूट एवढी आहे. या धरणाचा जलसाठा 447. 36 टीएमसी एवढा आहे. या धरणाची वीजनिर्मिती क्षमता 13860 मेगावॅट एवढी प्रचंड आहे. या धरणाचा जगामध्ये पाण्यावरती वीजनिर्मिती करणाऱ्या धरणांच्या मध्ये तिसरा क्रमांक लागतो. या धरणावर टोटल 18 वीजनिर्मिती टरबाइन लावलेली आहे. हे धरण जगातील सर्वात उंच धरणांच्या यादीमध्ये चौथ्या क्रमांकाचे धरण आहे.

इताईपू धरण

सर्वात जास्त जलविद्युत निर्मिती करणाऱ्या जगातील सर्वात मोठ्या धरणांच्या यादीमध्ये दुसऱ्या क्रमांकाचे धरण आहे इताईपू धरण. हे धरण ब्राझील तसेच प्यारा जुवाई या दोन देशांच्या सीमेवर आहे. ब्राझील देशातील पारणा राज्याच्या सीमेवर आहे. हे धरण 1971- 1974 सालि बांधण्यात आले. या धरणाची उंची 196 मीटर म्हणजे 643 फूट एवढी आहे. या धरणाची लांबी 7919 मीटर म्हणजे 25181 फूट एवढी आहे. या धरणाचा जलसाठा 1045.44 टीएमसी एवढा आहे. या धरणाची वीजनिर्मिती क्षमता 14 हजार मेगावॅट एवढी प्रचंड असल्यामुळे या धरणाचा जगामध्ये पाण्यावरती वीजनिर्मिती करणाऱ्या धरणांच्या मध्ये दुसरा क्रमांक लागतो. या धरणावर ती एकूण 20 वीजनिर्मितीचे टरबाइन लावलेले आहेत.

थ्री जॉर्जेस धरण

सर्वात जास्त जलविद्युत निर्मिती करणाऱ्या जगातील सर्वात मोठ्या धरणाच्या यादीमध्ये पहिल्या क्रमांकाचे धरण आहे थ्री जॉर्जेस धरण हे धरण चीन देशातील हुबई प्रांतात आहे. हे धरण यांगत्झ या नदीवर बांधण्यात आलेले आहे. हे धरण 1994 ते 2003 सालि बांधण्यात आले या धरणाची उंची 181 मीटर म्हणजे 594 फूट एवढी आहे. या धरणाची लांबी 2335 मीटर म्हणजेच 7661 फूट एवढी आहे. या धरणाचा जलसाठा 1389.56 टीएमसी एवढा आहे. त्या धरणाची वीजनिर्मिती क्षमता 22500 मेगावॅट एवढी प्रचंड असल्यामुळे या धरणाचा जगामध्ये पाण्यावरती वीज निर्मिती करणार या धरणांच्या मध्ये पहिला क्रमांक लागतो. 700 मेगावॅट वीज निर्मितीचे एक अशी 32 टरबाइन तसेच 50 मेगावॅटचे दोन असे एकूण 34 टरबाइन आहेत. 34 टरबाइन मिळून जगातील सर्वात मोठी जलविद्युत निर्मिती केली जाते. ती म्हणजे 22500 मेगावॅट एवढी यामुळेच हे धरण जगातील सर्वात जास्त वीजनिर्मिती करणारे धरण म्हणून ओळखले जाते.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न

भारतातील पहिला जलविद्युत प्रकल्प

भारतातील पहिला जलविद्युत प्रकल्प कावेरी नदीवरिल शिवसमुद्रम प्रकल्प आहे.

महाराष्ट्रातील सर्वात मोठे जलविद्युत निर्मिती केंद्र कोठे आहे?

महाराष्ट्रातील सर्वात मोठे जलविद्युत निर्मिती केंद्र कोयना आहे. हे केंद्र कोयना नदीवर आहे.

सारांश

आजच्या या लेखामध्ये आपण जगातील सर्वात जास्त जलविद्युत निर्मिती करणारी धरणे (World’s largest hydroelectric generating dams in marathi) याविषयी माहिती जाणून घेतली. आशा करतो की तुम्हाला ही माहिती आवडली असेल. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांनाही नक्की शेअर करा.

Marathispeak.in

Leave a Comment