महाराष्ट्रातील सर्वात मोठे धरण | largest dam in Maharashtra

largest dam in Maharashtra : धरण हे नदीचा प्रवाह रोखण्यासाठी बांधलेली असतात. धरणे मानवी वापरासाठी पाणी पुरवण्यासाठी, कोरडवाहू शेतजमीनीला सिंचनासाठी किंवा औद्योगिक प्रक्रियांमध्ये वापरण्यासाठी बांधली जातात.नमस्कार मित्रांनो आज आपण महाराष्ट्रातील उपयुक्त जलसाठा असलेले सर्वात मोठी तीन धरणे पाहणार आहोत.

largest dam in Maharashtra
महाराष्ट्रातील सर्वात मोठे धरण (largest dam in Maharashtra)

महाराष्ट्रातील सर्वात मोठे धरण (largest dam in Maharashtra)

1.कोयना धरण

सातारा जिल्ह्यातील कोयना नगर येथील कोयना नदीवरील 105 टीएमसी एवढे प्रचंड साठवण क्षमता असलेल्या या कोयना धरणाची गणना महाराष्ट्रातील प्रथम क्रमांकाचे सर्वात मोठे धरण म्हणूनही होते.कोयना नगर ते थेट तापोळा येवढा प्रचंड विस्तार असलेल्या या धरणाचा जलाशय शिवसागर या नावाने ओळखला जातो.महाराष्ट्राच्या विकासात आणि जडणघडनेत कोयना धरणाचा मोलाचा वाटा आहे.कोयना धरणाची पाणी साठवून क्षमता ही 2797.4 दशलक्ष घनमीटर असून धरणाचे पृष्ठभागाचे क्षेत्रफळ हे 891.78 वर्ग आहे.

कोयना धरणाची उंची ही 103 मीटर म्हणजेच 339 फूट महाराष्ट्रातील सर्वात जास्त उंच असलेले धरण अशी आहे तर लांबी 807 मीटर म्हणजेच 2648 फूट इतके आहे.धरण बांधण्याचा प्रकार हा रबर काँक्रीट आहे.कोयना धरणाला ऐकून 6 वक्राकार दरवाजे आहेत.कोयना बहुउद्देशीय प्रकल्प हा मुंबई राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या शुभहस्ते दिनांक 1 मार्च 1958 रोजी धरणाच्या बांधकामास प्रारंभ झाला आणि 1964 मध्ये हे सुसज्ज धरण राष्ट्राला समर्पित करण्यात आले.

महाराष्ट्रासाठी तत्कालीन विकासात्मक धोरणे, सिंचन,शेती आणि औद्योगिकीकरणासाठी वीज आवश्यक होती ती कोयना धरणाने दिली.विजेची मागणी प्रचंड वाढले असली तरी जेव्हा हे धरण झाले तेव्हा संपूर्ण महाराष्ट्रसह निम्या कर्नाटकला कोयना या धरणाने वीज दिली.

2.जायकवाडी धरण 

जायकवाडी धरण हे गोदावरी नदीवर असलेले महाराष्ट्रातील छत्रपती संभाजी नगर या जिल्ह्यातील पैठण शहरानाजीक जायकवाडी या ठिकाणी असून आशिया खंडातीला सर्वात मोठा मातीचे धरण अशी या धरणाची ओळख आहे मराठवाड्यातील हे एक प्रमुख धरण असून जवळजवळ 2.40 लाख हेक्टर क्षेत्र या धरणा मुळे ओली खाली आलेले आहे.

नाथ महाराजांच्या वास्तव्याने पावन झालेल्या पैठण नगरीतील हे धरण नाथसागर या नावाने देखील ओळखले जाते.जायकवाडी या धरणाची पाणी साठवण क्षमता तब्बल 102 टीएमसी इतकी आहे. हे धरण एकदा भरले तर दोन वर्षे शेतीच्या पाण्याची आणि चार वर्ष पिन्याच्या पाण्याची सोय होते म्हणून या धरणाला मराठवाड्यातला समुद्र असेही म्हटले जाते.या धरणाची लांबी जवळपास 9997 मीटर म्हणजेच 33802 फूट इतकी आहे तर उंची 41 मीटर म्हणजेच 135 फूट इतकी आहे.

या धरणाचे क्षेत्रफळ 350 वर्ग किलोमीटर आहे.या धरणाचा एकूण जलसाठा 102 टीएमसी असून 76 टीएमसी हा उपयुक्त जलसाठा आहे.तर 26 टीएमसी हा मृत पाणीसाठा आहे या धरणाला 27 वक्राकार दरवाजा आहेत.जायकवाडी धरणाचे प्रत्यक्ष बांधकाम 1965 मध्ये सुरू करण्यात आले व या सुसज्ज धरणाचे 1976 मध्ये लोकार्पण करण्यात आले.

जायकवाडी धरणावरती वीजनिर्मिती सुद्धा केली जाते.जवळपास 12 मेगावॉट येवढे विजेचे उत्पादन येथे होते.नाथसागरवर म्हणजे जायकवाडी धरणावरती मराठवाड्यातील छत्रपती संभाजी नगर,बीड,जालना,परभणी आणि नांदेड हे पाच जिल्हे थेट अवलंबून आहेत.

3.उजनी धरण

नंबर तीन ला आहे ते सोलापूर जिल्ह्यातील उजनी धरण उजनी धरण हे महाराष्ट्रातील तिसरे सर्वात मोठे धरण म्हणूनही ओळखले जाते.पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूरच्या माढा तालुक्यातील भीमानगर येथे भीमा नधी वर बांधलेले उजिनी धरण पाणी साठवण क्षमतेच्या बाबतीत जायकवाड या धरणां पेक्ष्या ही मोठे आहे.जवळपास 117 टीएमसी जलसाठा असलेल्या या धरणाचा उपयुक्त जलसाठा हा केवळ 53 टीएमसी एवढा आहे.

म्हणून या धरणाची गणना तिसऱ्या क्रमांकावर होते.उजनी धरणाला यशवंत सागर असे ही संबोधले जाते.उजनी धरणामुळे सोलापूर जिल्ह्यासह पुणे जिल्ह्यातील काही गावांचा कायापालट झाला आहे.उजनी धरणाचे बांधकाम हे तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या शुभहस्ते दिनांक 7 मार्च 1966 रोजी झाले व 1980 ला हे उजनी धरण पूर्ण झालं.

केवळ पावसाच्या पाण्यावर अवलंबून राहून कोरडवाहू शेती करणारे शेतकऱ्यांच्या अंगणात उजनी धरणाच्या पाण्यामुळे विकासाचे गंगा उचलली.उजनी धरणाची उंची ही 56 मीटर म्हणजेच 180 फूट तर लांबी 2534 मीटर म्हणजेच 8314 फूट इतकी आहे. उजनी धरणाला तब्बल 41 वक्राकार दरवाजे आहेत.तसेच या धरणातून 12 मेगावॉट एवढी वीज निर्मिती ही केली जाते. उजनी हे धरण सोलापूरचा अर्थव्यवस्थेचा कणा असणारे धरण बनलेले आहे.सोलापूरकरांच्या दृष्टीने पंढरपूरच्या विठोबा इतकच उजनी धरण दैवत आहे. यशवंतराव चव्हाण यांच्या दूरदृष्टीने आणि शरद पवार व विलासराव देशमुख यांच्या जिद्दीने हा प्रकल्प साकारण्यात आला आहे.

सतत विचारले जाणारे प्रश्न (FAQ)

महाराष्ट्रातील सर्वात मोठे धरण कोणते?

महाराष्ट्रातील सर्वात मोठे धरण कोयना धरण आहे.

सर्वात मोठे धरण कुठे आहे?

टिहरी धरण, उत्तराखंड

महाराष्ट्रातील पहिले धरण कोणते?

महाराष्ट्रातील सर्वात जुने धरण आंद्रा व्हॅली धरण आहे, जे बुलढाणा जिल्ह्यात आहे.

वीर धरण किती टीएमसी आहे?

वीर धरणाची 9.815 टीएमसी क्षमता आहे.

निष्कर्ष (summary)

आजच्या या लेखात आपण महाराष्ट्रातील सर्वात मोठे धरण (largest dam in Maharashtra) ही माहिती जाणून घेतली. ही माहिती कशी वाटली हे कॉमेंट मध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांना पण नक्कीच शेअर करा.

Leave a Comment