कोल्हापूर जिल्ह्यातील धरणे माहिती मराठी | Dams in kolhapur districts in marathi

Dams in kolhapur districts in marathi : पंचगंगा नदीच्या किनाऱ्यावर वसलेले कोल्हापूर हे महाराष्ट्रातील एक जिल्हा आहे. कोल्हापूर जिल्ह्यात साधारण 41 धरणे आहेत. आजच्या या लेखात आपण कोल्हापूर जिल्ह्यातील धरणे माहिती मराठी (Dams in kolhapur districts in marathi) याविषयी माहिती जाणून घेणार आहोत.

Dams in kolhapur districts in marathi
कोल्हापूर जिल्ह्यातील धरणे माहिती मराठी (Dams in kolhapur districts in marathi)

Contents

कोल्हापूर जिल्ह्यातील धरणे माहिती मराठी (Dams in kolhapur districts in marathi)

जिल्हाकोल्हापूर
राज्यमहाराष्ट्र
क्षेत्रफळ7,685 चौकिमी
लोकसंख्या38,74,015 (2011)
विभागपुणे विभाग
कोल्हापूर जिल्हा माहिती मराठी (Kolhapur information in marathi)

कोल्हापूर जिल्ह्यातील प्रमुख धरणे माहिती मराठी (Dams in kolhapur districts in marathi)

जंगम हट्टी धरण

हे धरण चंदगड तालुक्यातील जंगम हट्टी गावाजवळ आहे. हे धरण चंदगड गवापासून 24 किलोमीटर अंतरावरआहे. हे धरण कोल्हापूर शहरापासून 115 किलोमीटर अंतरावर आहे. जंगम हट्टी धरण हे जंगम हट्टी या नदीवर बांधण्यात आलेले आहे.

जंगम हट्टी धरणाचे बांधकाम 1995 साली झाले. या धरणाची उंची 28.9 मीटर म्हणजेच 94 फूट आहे. या धरणाची लांबी 960 मीटर म्हणजेच 3149 फूट आहे. जंगम हट्टी या धरणाची पाणी साठवण्याच्या क्षमता 1.21 टीएमसी म्हणजेच 1210 दशलक्ष घन फूट इतकी आहे.

चिकोत्रा धरण

चिकोत्रा हे धरण आजरा तालुक्यातील झुलपे गावाजवळ आहे.हे धरण आजरा शहरा पासून 28 किलोमीटर अंतरावर आहे. हे धरण कोल्हापूर शहरापासून 65 किलोमीटर अंतरावर आहे. चिकोत्रा हे धरण चिकोत्रा या नदीवर बांधण्यात आलेले आहे.

चिकोत्रा धरणाचे बांधकाम 2007 साली पूर्ण झाले. चिकोत्रा या धरणाची उंची 64.8 मीटर म्हणजेच 212 फूट आहे. या धरनाची लांबी 3225 फूट आहे. चिकोत्रा या धरणाची पाणी साठवण्याची क्षमता 1.52 टीएमसी 1520 दशलक्ष घनफूट इतकी आहे.

कडवी धरण

हे धरण शाहूवाडी तालुक्यातील परले निनाई या गावा जवळ आहे.कडवी हे धरण शाहुवाडी शहरापासून 18 किलोमीटर अंतरावर आहे. हे धरण कोल्हापूर शहरापासून 64 किलोमीटर अंतरावर आहे. कडवी हे धरण कडवी या नदीवर बांधण्यात आले आहे.

कडवी ही वारणा नदीची उपनदी तसेच वारणा ही कृष्ण नदीची उपनदी आहे. कडवी धरणाचे बांधकाम 2007 साली झाले. कडवी धरणाची उंची 36.5 मीटर म्हणजेच 118 फूट आहे. या धरणाची लांबी 1519 मीटर म्हणजेच 4983 फूट आहे. या धरणाची पाणी साठवण्याची क्षमता 2. 52 टीएमसी म्हणजेच 2520 दशलक्ष घनफूट आहे.

कुंभी धरण

हे धरण गगनबावडा तालुक्यातील गगनबावडा गाव जवळ आहे. हे धरण कोल्हापूर शहरापासून 57 किलोमीटर अंतरावर आहे. कुंभी हे धरण कुंभी या नदीवर बांधण्यात आलेल आहे .कुंभी नदी पंचगंगेची उपनदी तसेच पंचगंगा ही कृष्णा नदीची उपनदी आहे. कुंभी हे धरण 2007 बांधण्यात आलेले आहे. या धरणाची उंची 42.58 मीटर म्हणजेच 139 फूट आहे.

या धरणाची लांबी 906 मीटर म्हणजेच 2972 फूट आहे. कुंबी या धरणाची पाणी साठवण्याची क्षमता 2.75 टीएमसी म्हणजेच 2750 दशलक्ष घनफूट इतकी आहे.या धरणाला 3 दरवाजे आहेत. या धरणाच्या जलाशयाला गगनबावडा जलाशय किंवा गगनबावडा लेख असे म्हणतात.

कासारी अर्थात गेळवडे धरण

हे धरण शाहूवाडी तालुक्यातील गिरवडे गावाजवळ आहे. कासारी हे धरण शाहूवाडी शहरापासून 26 किलोमीटर अंतरावर आहे. हे धरण कोल्हापूर शहरापासून 65 किलोमीटर अंतरावर आहे. कासारी हे धरण कासारी नदीवर बांधण्यात आलेले आहे. कासरी ही नदी पंचगंगा नदीची उपनदी आहे.

तसेच पंचगंगा ही कृष्ण नदीची उपनदी आहे. कासारी धरणाचे बांधकाम 1990 साली झाले. कासारी धरणाची उंची 44.24मीटर म्हणजेच 145 फूट आहे. या धरणाची लांबी 297 मीटर म्हणजेच 974 फूट आहे. कासारी या धरणाची पाणी साठवण्याची क्षमता 2.77 टीएमसी म्हणजेच 2770 दशलक्ष घनफूट इतकी आहे.

तुळशी धरण

तुळशी हे धरण राधानगरी शहरापासून 19 किलोमीटर अंतरावर आहे. हे धरण कोल्हापूर शहरापासून चाळीस किलोमीटर अंतरावर आहे. तुळशी हे धरण तुळशी या नदीवर बांधण्यात आलेले आहे. तुळशी ही पंचगंगा नदी ची उपनदी आहे आणि पंचगंगा ही कृष्णा नदीची उपनदी आहे.

तुळशी धरणाचे बांधकाम 1978 साली झाले. तुळशी धरणाची उंची 48.68 मीटर म्हणजेच 159 फूट आहे. या धरणाची लांबी 1512 मीटर म्हणजेच 4960 फूट आहे. तुळशी या धरणाची पाणी साठवण्याची क्षमता 3.47 टीएमसी म्हणजेच 3470 दशलक्ष घनफूट इतकी आहे. तुळशी धरणाला 3 दरवाजे आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील धरणे माहिती मराठी (Dams in kolhapur districts in marathi)

पाटगाव धरण

हे धरण भुदरगड तालुक्यातील पाटगाव जवळ आहे. पाटगाव हे धरण कोल्हापूर शहरापासून 88 किलोमीटर अंतरावर आहे. पाटगाव हे धरण वेदगंगा या नदीवर बांधण्यात आलेले आहे. वेदगंगा ही नदी दूधगंगा नदीची उपनदी तसेच दूधगंगा ही कृष्णा नदीची उपनदी आहे.

या धरणाचे बांधकाम 1990 साली झाले. पाटगाव धरणाची उंची 39.19 मीटर म्हणजेच 128 फूट आहे. या धरणाची लांबी 1101.5 मीटर म्हणजेच 3613 फूट आहे. पाटगाव या धरणाची उंची 3.72 टीएमसी म्हणजेच 3720 दशलक्ष घनफूट इतकी आहे. पाटगाव धरणावर 2.5 मेगावॉट इतकी वीज निर्मिती केली जाते.

तिल्लारी धरण

तिल्लारी प्रोजेक्टमध्ये तीन धरणे आहेत. त्यामधील कोल्हापूर जिल्ह्यातील हे एक महत्त्वाचे धरण आहे. या प्रोजेक्टमधील दुसरे मोठे धरण सिंधुदुर्ग जिल्ह्यात आहे. हे धरण चंदगड तालुक्यातील तिल्लारी गावाजवळ आहे. हे धरण कोल्हापूर शहरापासून 141 किलोमीटर अंतरावर आहे. तिल्लारी हे धरण तिल्लारी या नदीवर बांधण्यात आलेले आहे.

तिल्लारी धरणाची बांधकाम 1986 मध्ये झाले. तिल्लारी धरणाची उंची 38.5 मीटर म्हणजेच 124 फूट आहे. या धरणाची लांबी 485 मीटर म्हणजे 1591फूट आहे. तिल्लारी या धरणाची पाणी साठवण्याची क्षमता 3.77 टीएमसी म्हणजेच 3770 दशलक्ष घनफूट इतकी आहे. या धरणाला तीन दरवाजे आहेत.

राधानगरी धरण

हे धरण राधानगरी तालुक्यातील राधानगरी गावाजवळ आहे. हे धरण राधानगरी शहरापासून पाच किलोमीटर अंतरावर आहे. राधानगरी हे धरण कोल्हापूर शहरापासून 53 किलोमीटर अंतरावर आहे. राधानगरी हे धरण भोगावती या नदी वर बांधण्यात आले आहे. भोगावती ही पंचगंगा नदीची उपनदी आहे. पंचगंगा ही कृष्णा नदीची उपनदी आहे. राधानगरी धरणाचे बांधकाम 1908 ते 1954 या कालावधीमध्ये झाले.

या धरणाची संकल्पना होती छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांची. शाहू महाराजांनी या धरणाची पायाभरणी केली. राधानगरी या धरणाचे पाणी साठवण्याची क्षमता 8.36 टीएमसी म्हणजेच 8360 दशलक्ष घनफूट इतकी आहे. या धरणाला 7 स्वयंचलित दरवाजे आहेत. त्या धरणाचे स्वयंचलित दरवाजे धरण 100% भरल्यानंतर आपोआप उघडतात. राधानगरी धरणावर 10 मेगावॉट एवढी वीजनिर्मिती होते.

दूधगंगा धरण (कळमादेवी धरण)

हे राधानगरी तालुक्यातील कळंबा देवी गावाजवळ आहे. दूधगंगा धरण राधानगरी शहरापासून 12 किलोमीटर अंतरावर तसेच हे धरण कोल्हापूर शहरापासून 54 किलोमीटर अंतरावर आहे. या धरणाचे बांधकाम 1983 साली पूर्ण झाले.

महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या धरणांच्या यादीमध्ये दूधगंगा धरणाचा अकरावा क्रमांक येतो. दूधगंगा या धरणाची उंची 73 मीटर म्हणजेच 239 फूट आहे. या धरणाची लांबी 1280 मीटर म्हणजेच 4200 फूट आहे. दूधगंगा धरणाची पाणी साठवण्याची क्षमता 28 टीएमसी म्हणजेच 28 हजार दशलक्ष घफूट इतकी आहे. दूधगंगा धरणाला पाच दरवाजे आहेत.

वारणा धरण

या धरणाला चांदोली धरण असे ही म्हणतात. वारणा हे धरण शाहूवाडी तालुक्यातील चांदोली गावाजवळ आहे. हे धरण सांगली आणि कोल्हापूर या दोन जिल्ह्यांच्या सीमेवर आहे. त्यामुळे या धरणाचा समावेश या दोन्ही जिल्ह्यांच्या धरणांच्या यादीमध्ये होतो. हे धरण शाहुवाडी या शहरापासून 42 किलोमीटर अंतरावर आहे. वारणा हे धरण सांगली शहरापासून 94 किलोमीटर अंतरावर आहे. हे धरण कोल्हापूर शहरापासून 76 किलोमीटर अंतरावर आहे. वारणा हे धरण वारणा या नदीवर बांधण्यात आलेले आहे. वारणा ही नदी कृष्णा नदीची उपनदी आहे. वारणा या धरणाचे बांधकाम 2000 साली झाले. वारणा धरणाची उंची 88.80मीटर म्हणजे 291 फूट आहे.

या धरणाची लांबी 1580 मीटर म्हणजे 5183 फूट आहे. हे धरण महाराष्ट्रातील सर्वात जास्त जलसाठा असलेल्या धरणांच्या यादीमध्ये सातव्या क्रमांकाचे धरण आहे. वारणा या धरणाची पाणी साठवण्याची क्षमता 30.40 टीएमसी इतकी आहे. या धरण परिसरात चांदोली राष्ट्रीय उद्यान आहे. या धरणाला चार दरवाजे आहेत.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)

वारणा धरण कुठे आहे?

वारणा हे धरण शाहूवाडी तालुक्यातील चांदोली गावाजवळ आहे.

चांदोली धरण कोणत्या नदीवर आहे?

चांदोली धरण वारणा नदीवर आहे.

दूधगंगा धरण कोठे आहे?

दूधगंगा धरण कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी तालुक्यातील कळंबा देवी गावाजवळ आहे.

राधानगरी धरण कोणी बांधले?

राधानगरी धरण राजर्षी शाहू महाराज यांनी बांधले आहे.

राधानगरी धरण कोणत्या नदीवर आहे?

राधानगरी धरण भोगावती नदीवर आहे.

राधानगरी धरण कोणत्या जिल्ह्यात आहे?

राधानगरी धरण कोल्हापूर जिल्ह्यात आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील धरणांची नावे

वारणा धरण
दूधगंगा धरण (कळमादेवी धरण)
राधानगरी धरण
तिल्लारी धरण
पाटगाव धरण
तुळशी धरण
कासारी अर्थात गेळवडे धरण
कुंभी धरण
कडवी धरण
चिकोत्रा धरण
जंगम हट्टी धरण
कोल्हापूर जिल्ह्यातील धरणे माहिती मराठी (Dams in kolhapur districts in marathi)

radhanagari dharna chi nirmiti koni keli

राजर्षी शाहु महाराजांनी राधानगरी धरणाची निर्मिती केली होती.

राधानगरी धरण कोणत्या नदीवर आहे?

राधानगरी धरण कोल्हापूर जिल्ह्यातील एक धरण आहे. हे धरण भोगावती नदीवर बांधण्यात आले असून त्याचा उपयोग शेतीच्या पाणी पुरवठ्यासाठी व वीज निर्मितीसाठी होतो.

निष्कर्ष

आजच्या या लेखात आपण कोल्हापूर जिल्ह्यातील धरणे माहिती मराठी (Dams in kolhapur districts in marathi) याविषयी माहिती जाणून घेतली. कोल्हापूर जिल्ह्यातील धरणे (Kolhapur jilhyatil dharane mahiti Marathi) ही माहिती कशी वाटली हे कॉमेंट मध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांना पण नक्कीच शेअर करा.

Leave a Comment