Longest rivers of Maharashtra in marathi :महाराष्ट्रातून वाहणाऱ्या सर्वात लांब नद्यांच्या यादीमध्ये पहिल्या क्रमांकाची नदी आहे गोदावरी नदी. गोदावरी नदीचा उगम नाशिक शहराजवळ त्र्यंबकेश्वर या ठिकाणी ब्रह्मगिरी पर्वतावर होतो. गोदावरी नदीची लांबी 1465 किलोमीटर आहे. त्यापैकी महाराष्ट्रातील गोदावरीची लांबी 668 किलोमीटर आहे. आज आपण महाराष्ट्रातील सर्वात लांब नद्या (Longest rivers of Maharashtra in marathi) पाहणार आहोत.

महाराष्ट्रातील सर्वात लांब नद्या (Longest rivers of Maharashtra in marathi)
- गोदावरी
- पैनगंगा
- वर्धा नदी
- भीमा नदी
- वैनगंगा
- कृष्णा
- तापी नदी
महाराष्ट्रातील सर्वात लांब नद्या माहिती मराठी (Longest rivers of Maharashtra information in marathi)
गोदावरी नदी
महाराष्ट्रातून वाहणाऱ्या सर्वात लांब नद्यांच्या यादीमध्ये पहिल्या क्रमांकाची नदी आहे गोदावरी नदी. गोदावरी नदीचा उगम नाशिक शहराजवळ त्र्यंबकेश्वर या ठिकाणी ब्रह्मगिरी पर्वतावर होतो. गोदावरी नदीची लांबी 1465 किलोमीटर आहे. त्यापैकी महाराष्ट्रातील गोदावरीची लांबी 668 किलोमीटर आहे. या नदीचे महाराष्ट्रातील खोरे एक लाख 53 हजार चौरस किलोमीटर आहे. हे क्षेत्र भारताच्या दहा टक्के तर महाराष्ट्राच्या एकुन 50% आहे.
या नदीतून वाहणाऱ्या पाण्यापैकी 80 टक्के पाणी जुलै ते ऑक्टोबर या चार महिन्यातच वाहून जाते. गोदावरी नदीच्या प्रवाहाची रुंदी पूर्व घाट पार करताना काही ठिकाणी 200 मीटर तर काही ठिकाणी समुद्रास मिळण्याआधी 6.5 किलोमीटर इतकी होते. त्याचबरोबर नांदेड शहराला गोदावरी चे नावस्थान म्हणून ओळखले जाते.
प्रभू रामचंद्रांनी वनवास काळात गोदावरी तटावर आश्रम बांधला होता असा रामायण उल्लेख आहे. गोदावरी नदीच्या खोऱ्याने एकूण तीन लाख 12 हजार आठशे बारा चौरस किलोमीटर क्षेत्र व्यापलेले आहे. जगातील सर्वात लांब नद्यांच्या यादीमध्ये गोदावरीचा 92 वा क्रमांक लागतो. गोदावरी नदीच्या उपनद्या पुढील प्रमाणे आहेत तारना, प्रवरा, मुळा, दुधना,पूर्णा, ढोर, पुंडलिका ,मनासुपणा आसणा, सीता, लेंडी, इंद्रावती इत्यादी गोदावरी नदीच्या उपनद्या आहेत.
पैनगंगा ही नदी वर्धा नदीची उपनदी आहे. पैनगंगा या नदी वर सर्वात मोठे चौथ्या क्रमांकाचे इसापूर हे धरण आहे. वर्धा आणि वैनगंगा या नद्या एकत्र येऊन गोदावरी या नदीला मिळतात. गोदावरी नदीला मिळण्या अगोदरच्या प्रवाहाला प्राणहिता असे म्हणतात. गोदावरी नदी वरील धरणे तसेच तिच्या उपनद्या वरील धरणे पुढील प्रमाणे आहेत. गंगापूर हे धरण नाशिक या जिल्ह्यात आहे. नांदूरमध्यमेशवर हे धरण गोदावरी आणि कडवा या दोन नद्यांच्या संगमावर नाशिक जिल्ह्यात आहे. जायकवाडी हे महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाची धरण औरंगाबाद जिल्ह्यात आहे.
श्रीराम सागर हे धरण तेलंगणातील निजामाबाद जिल्ह्यात आहे. आळंदी नदीवरील आळंदी धरण पालखेड, ओझरखेड, कारंजवन वाघेळ कुनेगाव ही धरणे कळवा नदीवर आहे. तारणा,अप्पर वैतरणा,कुरणे, ही धरणे तारणा नदीवर आहेत. पेंच आणि तोतला डोह हे धरण पैनगंगेच्या उपनद्यांवर बांधलेली आहेत.
कृष्णा आणि गोदावरी या नद्या उगमापासून स्वतंत्रपणे बंगालच्या उपसागराला मिळतात. या नद्या एकमेकांना मिळत नव्हत्या पण आंध्र प्रदेश सरकारने या दोन्ही नद्यांचा कृत्रिम रित्या संगम घडवून आणला आहे. त्या प्रकल्पास पट्टी सीमा प्रकल्प असे म्हणतात. पट्टी सीमा प्रकल्प हा 2016 साली पूर्ण झाला. त्या प्रकल्पासाठी सोळाशे साठ कोटी इतका खर्च आला.
पैनगंगा नदी
महाराष्ट्रातून वाहणाऱ्या सर्वात लांब नद्यांच्या यादीमध्ये दुसऱ्या क्रमांकाची नदी आहे पैनगंगा नदी. ही महाराष्ट्रात विदर्भाच्या दक्षिण भागातून वाहणारी एक महत्त्वाची नदी आहे. पैनगंगा नदीचा उगम बुलढाणा जिल्ह्यातील अजिंठा डोंगर रांगेमध्ये होतो. उगमानंतर ही नदी बुलढाणा, हिंगोली, वाशिम, नांदेड आणि यवतमाळ या जिल्ह्यातून वाहत जाऊन वर्धा नदीला चंद्रपूर जिल्ह्यातील वडा येथे मिळते वर्धा नदीला मिळण्या अगोदर ही नदी महाराष्ट्र आणि तेलंगणा या राज्यांच्या सीमेवरून वाहते. या नदीची एकूण लांबी 495 किलोमीटर आहे. ही विदर्भातील सर्वाधिक लांबीची नदी आहे.
या नदीला डाव्या बाजूने अरुणावती,खुनी, अडाण या नद्या येऊन मिळतात. या नदीवर नांदेड जिल्ह्यामध्ये सहस्त्रकुंड नावाचा मोठा धबधबा आहे. या नदीवर यवतमाळ जिल्ह्यात ईसापुर नावाचे एक मोठे धरण बांधण्यात आले आहे. या धरणातून कालवे काढून हिंगोली, नांदेड आणि यवतमाळ या जिल्ह्याच्या जमिनीसाठी पाणीपुरवठा केला जातो. पैनगंगा नदी वर्धा नदीची प्रमुख उपनदी आहे. महाराष्ट्रातील सर्वात मोठे चौथ्या क्रमांकाचे ईसापुर हे धरण या नदी वर आहे.
वर्धा नदी
महाराष्ट्रातून वाहणाऱ्या सर्वात लांब नद्यांच्या यादीमध्ये तिसऱ्या क्रमांकाची नदी आहे वर्धा नदी. वर्धा नदीचे खोरे हे विदर्भातील सर्वात मोठे नदीचे खोरे आहेत. तसेच ही नदी सर्वाधिक लांबीची दक्षिण वाहिनी नदी आहे. वर्धा नदीचा उगम मध्य प्रदेश राज्यातील सातपुडा पर्वतरांगेतील दक्षिण उतारावर होतो. वर्धा नदीची महाराष्ट्रातील लांबी 455 किलोमीटर आहे.
वर्धा आणि तिच्या उपनद्यांच्या खोऱ्याचा विस्तार 46 हजार 182 चौरस किलोमीटर आहे. वर्धा, पुलगाव, हिंगणघाट इत्यादी महत्त्वाची शहरे आहेत. वर्धा नदीची प्रमुख उपनदी पैनगंगा ह्या नदीवर महाराष्ट्रातील सर्वात मोठे चौथ्या क्रमांकाचे ईसापुर हे धरण आहे. वर्धा आणि वैनगंगा या दोन नद्यांचा संगम गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्याचा सीमेवर चपराळा होतो. यांच्या पुढील संयुक्त प्रवाहाला प्राणहिता असे म्हणतात. संगमापासून पुढे प्राणहिता नदी महाराष्ट्र तेलंगणा राज्यांच्या सीमेवरून 120 किलोमीटर वाहत जाते गडचिरोली जिल्हा आणि तेलंगणा राज्य यांच्या सीमेवर गोदावरीस मिळते.
भीमा नदी
महाराष्ट्रातून वाहणाऱ्या सर्वात लांब नद्यांच्या यादीमध्ये चौथ्या क्रमांकाची नदी आहे भीमा नदी. भीमा नदीचा उगम पुणे जिल्ह्यातील सह्याद्री पर्वत रांगेतील भीमाशंकर या ठिकाणी होतो. हे ठिकाण सुमारे 975 मीटर उंची वर आहे. हे ठिकाण अरबी समुद्रापासून 70 किलोमीटर अंतरावर आहे. भीमा नदी उपगमाजवळ पूर्व वाहिनी नदी आहे. ती पुढे खेड पासून ते आग्नेय दिशेला वाहते. भीमा नदी ची एकूण लांबी 860 किलोमीटर आहे त्यापैकी महाराष्ट्रातून 451 किलोमीटर ही नदी वाहते.
या नदी खोऱ्याने 77 हजार चौरस किलोमीटर क्षेत्र व्यापलेले आहे. त्यापैकी 60 टक्के म्हणजेच 46184 चौरस किलोमीटर क्षेत्र महाराष्ट्रात आहे. भीमा नदी काही ठिकाणी पुणे, सोलापूर आणि पुणे, अहमदनगर या जिल्ह्याच्या नैसर्गिक सीमा तयार करते. भीमा नदी आग्नेय दिशेला सोलापूर जिल्ह्यातून वाहत जाऊन कर्नाटकात रायचूर जवळ कुरगुडी येथे कृष्णला मिळते. उत्तरेस हरिश्चंद्र, बालाघाट डोंगर आणि दक्षिणेस शंभू महादेवाचे डोंगर यामध्ये भिमचे खोरी असून या खोऱ्यात पुणे आणि सोलापूर हे संपूर्ण जिल्हे तसेच सातारा जिल्ह्याचा उत्तर भाग अहमदनगर जिल्ह्याचा दक्षिण भाग तसेच बीड आणि उस्मानाबाद जिल्ह्याचा काही भाग येतो.
महाराष्ट्र च्या पठारावर भीमा नदीचे खोरे कृष्ण नदीच्या खोऱ्यापासून वेगळी असल्यामुळे भीमा कोरेयाचा स्वतंत्र उल्लेख केला जातो. कोणाकडे भीमा नदी खोल दरीतून वाहते. पुढे तिचे पात्र रुंद होते. पंढरपूर जवळ भीमा नदीचे पात्र चंद्रकोरी सारखे दिसते. म्हणून तिला चंद्रभागा असे म्हणतात. या नदीच्या भीमाशंकर देहू आळंदी पंढरपूर तुळजापूर इत्यादी धार्मिक स्थळे आहेत. तसेच पुणे अहमदनगर सोलापूर ही महत्त्वाची शहरे आहेत. सह्याद्रीमध्ये उगम पावणाऱ्या मुळा आणि मूठा या नद्या पुणे शहरांमध्ये संगम होऊन पुढे रांजणगाव सांडस येथे भिमेला येऊन मिळते. निरा ही नदी पुणे जिल्ह्यातील नरसिंगपूर येथे येऊन मिळते. भीमा नदीच्या खोऱ्यामध्ये उसाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात केले जाते.
वैनगंगा नदी
महाराष्ट्रातून वाहणाऱ्या सर्वात लांब नद्यांच्या यादीमध्ये पाचव्या क्रमांकाची नदी आहे वैनगंगा नदी ही नदी पूर्व महाराष्ट्राच्या विदर्भातून वाहणारी एक महत्त्वाची नदी आहे. महाराष्ट्रातील प्रमुख दक्षिण वाहिनी नदी आहे वैनगंगा नदीचा उगम मध्य प्रदेश राज्यातील मैकल या डोंगरावर सिल्वी येथे होतो. महाराष्ट्रात गोंदिया,भंडारा, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यातून वाहत जाऊन वर्धा या नदीस मिळते. वैनगंगा नदी चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्याच्या सीमेवरून वाहते.
महाराष्ट्रात वैनगंगा या नदी ची लांबी 295 किलोमीटर आहे. या नदीला डावीकडून वाघ, गडवी इत्यादी तर उजवीकडून कणाल, अंथारी या उपनद्या येऊन मिळतात. वैनगंगा आणि तिच्या उपनद्यांनी 38 हजार चौरस किलोमीटर इतका प्रदेश व्यापलेला आहे. वहिनी गंगेच्या उपनद्या वाघ व कणाम या नद्यांवर धरणे बांधलेली आहे. भंडारा जिल्ह्यात या नदीच्या खोऱ्यात आता शेतीचा विकास झालेला आहे. गोंदिया नागपूर भंडारा गडचिरोली आणि चंद्रपूर ही महत्त्वाची शहरे आहे.
ही सीमा तयार करणारी वैनगंगा आणि तिच्या उप नद्या नागपूर आणि भंडारा, वैनगंगा, भंडारा आणि गोंदिया वैनगंगा, भंडारा आणि चंद्रपूर वैनगंगा,चंद्रपुर आणि यवतमाळ पैनगंगा. वैनगंगा आणि वर्धा या दोन नद्यांचा गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्याच्या सीमेवर चपराळा येथे संगम होतो. या दोन नद्यांच्या संयुक्त प्रवाहाला प्राणहिता असे म्हणतात. संगमापासून पुढे प्राणहिता महाराष्ट्र व तेलंगणाच्या सीमेवरून 120 किलोमीटर वाहते जिल्हा गडचिरोली आणि तेलंगाना यांच्या सीमेवर हिरोची जवळ ती गोदावरीस मिळते. वैनगंगा नदीवरील गोसीखुर्द हे मोठे आणि महत्त्वाचे धरण आहे. शिरपूर आणि पुजारी टोला ही धरणे वैनगंगेची उपनदी बाग या नदीवर आहेत.
कृष्णा नदी
महाराष्ट्रातून वाहणाऱ्या सर्वात लांब नद्यांच्या यादीमध्ये सहाव्या क्रमांकाची नदी आहे कृष्णा नदी. हि नदी महाराष्ट्रातील महाबळेश्वर जवळ उगम पावून सुमारे 1300 किलोमीटर अंतर पार करत आंध्र प्रदेशातील राजमहेंद्री येथे बंगालच्या उपसागराला मिळते. वाटेमध्ये माहुली, सातारा, कराड, औदुंबर, सांगली, नरसोबाच्या वाडी, वरून कर्नाटक राज्यात प्रवेश करते. महाराष्ट्र राज्यात कृष्णा नदीचा प्रवास 281 किलोमीटर आहे.
महाराष्ट्रातून कर्नाटकात गेलेली कृष्णा नदी पुढे पूर्वेकडे आंध्रप्रदेशात जाते. कर्नाटकात कृष्णाला दक्षिणेकडून घेणारी घटप्रभा नदी मिळते. आंध्रप्रदेश कर्नाटकाच्या सीमेवर महाराष्ट्रातून येणारी भीमा नदी कृष्णा यांचा संगम होतो. कृष्णा नदी आंध्रप्रदेशातल्या मच्छलीपटनम् च्या दक्षिणेस बंगालच्या उपसागराला मिळते. कृष्णा नदीच्या खोर्याचा आंध्रप्रदेशातील भाग अधिक विस्तृत व सुपीक आहे. तिच्या उघमाकडील विभागातील पावसाचा पाणी पुरवठा कमी असल्याने उगमाकडे उन्हाळ्यात पाणी खूपच कमी असते.
आंध्रप्रदेशातील नागार्जुन सागर कृष्णा नदीवरील मोठे धरण आहे. तुंगभद्रा नदी वरील तुंगभद्रा धरण व कोयना धरण यांच्यावरील मुख्य धरण्यात कृष्णा व गोदावरी नद्यांच्या त्रिभुज प्रदेश कालव्यांनी जोडलेले आहे. इसवी सन 1215 मधील यादव राजांनी बांधलेल्या महाबळेश्वरच्या हेमाडपंती शिवमंदिर जवळ चंद्रराव मोरे यांनी पंचगंगा मंदिर बांधून त्या देवळाच्या आसपास कृष्णा, कोयना, वेण्णा,सावित्री व गायत्री या पाच नद्यांचा उगम होतो. दक्षिण भारतातील इतर काही ठिकाणी यांच्याप्रमाणे कृष्णा खोरे अश्मयुगीन अवशेष आढळून आले आहे. कृष्णा नदीवर महाराष्ट्रात वाई, कराड, सांगली, वाळवा ही शहरे आहे.
आंध्र प्रदेश मधील प्रसिद्ध विजयवाडा हे शहर कृष्णा नदीच्या काठावर वसलेले आहे. कृष्णा नदीच्या खोऱ्याचे क्षेत्रफळ 3 लाख 68 हजार 55 चौरस किलोमीटर आहे. यात एकूण क्षेत्रफळापैकी 27% क्षेत्र महाराष्ट्रात आहे. तर ती 44% कर्नाटकातून 29% क्षेत्र आंध्र प्रदेशात आहे. कृष्णा नदीच्या उपनद्या पुढीलप्रमाणे आहेत उरमोडी नदी, गंगा नदी, भीमा नदी, मलप्रभा नदी, वारणा नदी.
सांगली जिल्ह्यातील कृष्णा नदीवर पुढीलप्रमाणे धरणे आहेत. धूम, अलमट्टी, बसव, सागर, नागार्जुन, सागर, ही धरने कृष्णा नदीवर आहेत. तर महाराष्ट्रातील सर्वात मोठे कोयना धरण कृष्णेची उपनदी कोयना या नदीवर आहे, वारणा आणि कडवी ही धरने वारणा नदीवर आहे, तर राधानगरी हे धरण पंचगंगेची उपनदी भोगावती या नदीवर आहे. तुळशी हे धरण तुळशी या नदीवर असून दूध गंगासागर धरन दूधगंगा नदीवर आहे. महाराष्ट्रातील सर्वात लांब नद्या (Longest rivers of Maharashtra in marathi)
तापी नदी
महाराष्ट्रातून वाहणाऱ्या सर्वात लांब नद्यांच्या यादीमध्ये सातव्या क्रमांकाची नदी आहे तापी नदी. तापी नदी ही खान्देश उत्तर महाराष्ट्रातून वाहणारी एक महत्त्वाची नदी आहे. तापी नदीचा उगम मध्य प्रदेश राज्यातील बैतुल जिल्ह्यात सातपुडा पर्वत रांगेतील मुलताई डोंगरावर होतो. ही नदी भारतातील पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहणारी एक महत्त्वाची नदी आहे.
तापी नदीची एकूण लांबी 724 किलोमीटर आहे. त्यापैकी 208 किलोमीटर ही नदी महाराष्ट्रातील तापी या भागातून वाहते. तापी ज्या भागातून वाहते तो खचदरी चा भाग आहे. या नदीने खोल दरी निर्माण केली आहे. ही पश्चिम वाहिनी नदी असून अमरावती, जळगाव, धुळे, नंदुरबार या जिल्ह्यातून वाहत जाऊन गुजरात मध्ये प्रवेश करते नंतर ती सुरत या शहराजवळ अरबी समुद्राला जाऊन मिळते. तापी नदी उमा नंतर वाहत जाऊन अमरावती जिल्ह्याच्या उत्तर सीमेवरून सुमारे 48 किलोमीटर पर्यंत वाढते पुढे ती मध्यप्रदेश राज्यात प्रवेश करते. तेथून मोहनपूर जवळून वाहत जाऊन जळगाव जिल्ह्यातील रावेर च्या पूर्वेकडे महाराष्ट्रात प्रवेश करते.
तापी ही महाराष्ट्रातील सर्वाधिक लांबीची पश्चिम वाहिनी नदी आहे. तसेच सर्वाधिक गावाचा विस्तार असलेले तापीचे खोरे आहे. महाराष्ट्रात तापी नदीला डाव्या बाजूने पूर्णा ही उपनदी येऊन मिळते. म्हणून या दोन्ही नद्यांच्या संयुक्त खोऱ्याला तापी-पूर्णा खोरे असे म्हणतात. तापी नदीला अनेक उपनद्या येऊन मिळतात तापीला डावीकडून पूर्णा, वाघूर, गिरणा, पांझरा व बुराई या नद्या मिळतात.
पूर्णा ही तापी नदीची प्रमुख उपनदी असून ती गाविलगडचा डोंगरात उगम पावली आहे. पूर्णा नदी अमरावती व अकोला जिल्ह्यात पश्चिमेकडे वाहत जाऊन जळगाव जिल्ह्यात चांगदेव येथे तापी नदी ला मिळते. आणि तापी नदीला येऊन मिळतात वाघुर नदी अजिंठ्याच्या डोंगरात उगम पावून भुसावळच्या पश्चिमेस तापी नदीला येऊन मिळते. तापीचे खोरे केवळ पन्नास किलोमीटर आहे.
तापी नदीच्या खोऱ्यामध्ये अमरावती, अकोला, बुलढाणा, जळगाव, धुळे ,नंदुरबार या जिल्ह्यांचा समावेश होतो म्हणून हा प्रदेश दुर्गम स्वरूपाचा बनला आहे.तापी च्या उपनद्यांनी 31200 चौरस किलोमीटर प्रदेश व्यापलेला आहे. या एकूण क्षेत्राच्या 53.79% क्षेत्र महाराष्ट्रात आहे. हा भाग असतील तर सुपीक आहे तापीच्या खोऱ्यात काटेपूर्णा नळगंगा या नद्यांवर धरणे बांधलेली आहेत.
वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)
कृष्णा आणि गोदावरी नदीचा संगम कोणी केला ?
कृष्णा आणि गोदावरी नदीचा संगम आंध्र प्रदेश सरकारने केला
पट्टी सीमा प्रकल्प किती साली पूर्ण झाला?
पट्टी सीमा प्रकल्प हा 2016 साली पूर्ण झाला.
पट्टी सीमा प्रकल्प म्हणजे काय?
कृष्णा आणि गोदावरी नदीचा कृत्रिम संगमला पट्टी सीमा प्रकल्प असे म्हणतात. आंध्र प्रदेश सरकारने या प्रकल्पाला पट्टी सीमा प्रकल्प असे नाव दिले आहे.
महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी कोणती ?
गोदावरी ही महारा्ट्रातील सर्वात लांब नदी आहे.
महाराष्ट्रातील सर्वात लांब दुसऱ्या क्रमांकाची नदी कोणती आहे ?
पैनगंगा ही नदी महाराष्ट्रातील सर्वात लांब दुसऱ्या क्रमांकाची नदी आहे.
महाराष्ट्रातील सर्वात मोठे धरण कोणते आहे ?
उजनी हे महाराष्ट्रातील सर्वात मोठे धरण आहे.
महाराष्ट्रातील सर्वात मोठे धरण कोणत्या नदीवर आहे ?
महाराष्ट्रातील सर्वात मोठे धरण भीमा नदीवर बांधले आहे.
निष्कर्ष
आजच्या या लेखात आपण महाराष्ट्रातील सर्वात लांब नद्या (Longest rivers of Maharashtra in marathi) याविषयी माहिती जाणून घेतली. महाराष्ट्रातील सर्वात लांब नद्या माहिती मराठी (Longest rivers of Maharashtra information in marathi) तुम्हाला कशी वाटली हे कॉमेंट मध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांना पण नक्कीच शेअर करा.