पन्हाळा किल्ला माहिती मराठी | Panhala Fort Information in Marathi

Panhala Fort Information in Marathi :आज आपण स्वराज्यातील एक अति महत्त्वाचा आणि रंजक इतिहासाची साक्ष असलेला किल्ला पाहणार आहोत तो म्हणजे किल्ले पन्हाळा.आज आपण पन्हाळा किल्ला माहिती मराठी (Panhala Fort Information in Marathi) पाहणार आहोत.

Panhala Fort Information in Marathi
पन्हाळा किल्ला माहिती मराठी (Panhala Fort Information in Marathi)

पन्हाळा किल्ला माहिती मराठी (Panhala Fort Information in Marathi)

किल्ल्याचे नावपन्हाळा किल्ला
उंची4040 फूट
जिल्हाकोल्हापुर
स्थापनाईसवी सन 1178-1209
कोणी बांधलाशिलाहार शासख भोज
डोंगररांगाकोल्हापुर
पन्हाळा किल्ला माहिती मराठी (Panhala Fort Information in Marathi)

पन्हाळा हा किल्ला कोल्हापूर जिल्ह्यातील एक किल्ला आहे. पावनखिंडीची लढाई आपणास माहीतच असेल त्या ऐतहासिक प्रसंगाची साक्ष देणारा किल्ला म्हणजेच पन्हाळा किल्ला. पन्हाळा हा किल्ला पुणे शहरापासून 251 किलोमीटर अंतरावर आहे. पन्हाळा किल्ला कोल्हापूर शहरापासून 20 किलोमीटर अंतरावर असून समुद्र सपाटी पासून 977.2 मीटर म्हणजेच 4040 फूट उंच आहे.

हा गढ सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये येतो. पन्हाळा हे महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा तालुक्याचे मुख्य गाव आहे.सध्या पन्हाळा हे एक पर्यटन स्थळ म्हणून ओळखले जाते. याच पन्हाळगडाला सिद्धी जोहार ने  वेढा दिला तेव्हा छत्रपती शिवाजी महाराज यांनी मोठ्या शिताफीने स्वतःची सुटका करून घेऊन विशाळगडा वर पोहोचले.

बाजीप्रभू देशपांडे व शिवा काशीद यांनी या सुटकेत महाराजांना मदत केली. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मृत्यूनंतर युवराज संभाजी महाराज यांनी स्वराज्यची सूत्रे येथूननच हाती घेतली. पन्हाळा च्या बाजूने कोकणात जायला अनेक मार्ग उपलब्ध आहेत. पन्हाळगड हा कोल्हापूर भागातील महत्त्वाचा किल्ला आहे.

मराठ्यांच्या उत्तर काळात आणि करवीर राज्य संस्थापनेच्या काळात मराठ्यांची काही काळ राजधानी असणारा हा किल्ला इतिहासाच्या दृष्टीने आणि आज पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांच्या दृष्टीने महत्त्वाचा किल्ला आहे. महाराष्ट्र मधील एकमेव टिकून राहिलेला किल्ला म्हणून याकडे पाहिले जाते. भारत सरकारने या किल्ल्याला दिनांक 2 जानेवारी 1954 रोजी महाराष्ट्रातील राष्ट्रीय सौरक्षित स्मारक स्थळ म्हणून घोषित केले आहे. जेथे आपण आपली सुट्टी घालवण्यासाठी जाऊ शकतो.

हा किल्ला धक्खन पठारातील सर्वात मोठा किल्ला आहे. याचे क्षेत्रफळ सुमारे 14 किलोमीटर आहे. इसवी सन 1178 ते 1209 मध्ये राजा भोज नरसिंह यांनी या किल्ल्याची बांधणी केली.

गडावरील पाहण्यासारखी ठिकाणे

राजवाडा

पन्हाळगडावर गेल्यावर आपल्याला एक राजवाडा बघायला मिळेल. हा राजवाडा महाराणी ताराबाईंचा असून या वाड्यातील देवघर खूप सुंदर आणि आकर्षक आहे.हा वाडा महाराणी ताराबाई यांनी इसवी सन 1708 मध्ये किल्ल्यावर बांधला. सध्या येथे नगरपालिका कार्यालय, पन्हाळा हायस्कूल व मिलिटरी बॉईज हॉस्टेल आहे. 

राजदिंडी

ही दुर्गम वाट गळाखाली उतरते. याच वाटेचा उपयोग करून शिवाजी महाराज सिद्धी जोहार च्या वेड्यातून निसटले होते. हीच विशाल गडावरील जाणारी एकमेव वाट आहे. यास दरवाजातून 45 मैल अंतर कापून महाराज विशाळगडावर पोहोचले.  

अंबरखाना

अंबरखाना हा पूर्वीचा बालेकिल्ला.येथेच गंगा, यमुना आणि सरस्वती अशी तीन धान्य कोठारे आहे.यात वरी नागली, आणि भात असे सुमारे पंचवीस हजार खंडी धान्य मावत असे. या शिवाय येथे सरकारी कचेऱ्या दारू गोळ्यांची कोठारे आणि तामसाळ होती.

सोमाळे तलाव

गडाच्या पेठे लगत हे एक मोठे तळे आहे.या तळाच्या काठावर सोमेश्वर मंदिर आहे. या मंदिराला महाराजांनी व त्यांच्या सहस्त्र मावळ्यांनी लक्ष चाफ्याची फुले वाहिली होती. 

रामचंद्रपंत अमात्य यांची समाधी 

सोमेश्वर तलावापासून थोडे पुढे गेल्यावर दोन  समाध्या दिसतात. त्यातील उजवीकडची रामचंद्रपंत अमात्य व बाजूची त्यांच्या पत्नीची आहे.

छत्रपती संभाजी महाराज मंदिर

ही एक छोटी घडी व दरवाजा आहे. हे छत्रपती संभाजी महाराजांचे मंदिर आहे.

अंदरबाव

तीन दरवाजाच्या वरच्या बाजूला माळावर एक तीन कमानीची काळया दगडांची वास्तु दिसते. ही वास्तू तीन मजली आहे. सर्वात तळाला खोल पाण्याची विहीर आहे. तर मधला मजला हा चांगला आईस पैस आहे. त्यातून तटाबाहेर जाण्यासाठी चोर दरवाजा दिसतो.

तीन दरवाजा 

तीन दरवाजा हा पश्चिमेचा  महत्त्वाचा दरवाजा आहे. दरवाजावरील नक्षीकाम हे प्रक्षनीय आहे. इसवी सन 1673 मध्ये कोंडाजी फर्जंद यांनी अवघ्या 60 मावळ्यांबरोबर हा किल्ला जिंकला. 

बाजीप्रभूंचा पुतळा 

पन्हाळा बस स्टॉप वरून थोडे खाली आल्यावर एका ऐसपैस चौकात वीर रत्न बाजीप्रभू देशपांडे यांचा आवेश पूर्ण पुतळा आहे. 

दुतोंडी बुरूज 

पन्हाळा गडावरील या बुरूजाला दोन्हीं बाजूंनी पायऱ्या आहेत. त्यामुळे या बुरुजाला दुतोंडी बुरूज असे ही म्हणतात. हा बुरूज गडावरील न्यायालयाजवळ आहे आणि या बुरुजाच्या काही अंतर पुढे दौलत बुरुज आहे. 

कलावंती महाल

कलावंती महाल या इमारतीला नायकिन सज्ज या नावानी देखील ओळखले जाते.हा महाल बहामनीच्या कब्जा नंतर स्त्रियांसाठी निवासस्थान म्हणून ओळखले  गेले होते. 

पुसाटी बुरूज

पुसाटी बुरूज ला पिछाडी या नावाने देखील ओळखले जाते. पूर्वी च्या काळा मध्ये बर्जांचा वापर शत्रून वर नजर ठेण्यासाठी होत असे. पुसाटी बुरूज हा पन्हाळा किल्ल्याच्या पश्चिमेला आहे.  

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)

पन्हाळा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे ?

कोल्हापूर

पन्हाळा किल्ला कोणी बांधला ?

शिलाहार शासक राजा भोज

निष्कर्ष

आजच्या या लेखात आपण पन्हाळा किल्ला माहिती मराठी (Panhala Fort Information Marathi) जाणून घेतली. तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे कॉमेंट मध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांना पण नक्कीच शेअर करा.

Leave a Comment