निबंध लेखन मराठी | essay writing in marathi

मित्रांनो आपल्या शाळा कॉलेजांमध्ये निबंध लेखन हा अतिशय महत्त्वाचा विषय आहे.या पोस्ट मध्ये आपण निबंध लेखन मराठी (essay writing in marathi) बघणार आहोत. आम्हाला आशा आहे की हा लेख आपण सर्वाच्या कामात येतील.

essay writing in marathi
निबंध लेखन मराठी (essay writing in marathi)

निबंध लेखन मराठी (essay writing in marathi)

निबंधाचे प्रकार

  • वर्णनात्मक निबंध
  • चरितत्रात्मक निबंध 
  • कल्पनात्मक निबंध
  • आत्मकथनात्मक निबंध

निबंध लीहताना घ्यायची काळजी

  • सर्वप्रथम आपण कोणता निबंध लीहणार आहे हे निश्चित करावे.
  • मुद्दे दिलेले नसल्यास आपण थोडक्यात निबंधाचे मुद्दे तयार करावेत.
  • निबंध लेखन करताना एका परिच्छेदामध्ये एक किंवा दोन मुद्द्यांचा विस्तार करावा.
  • निबंधाची सुरुवात निबंधाचा मध्यभाग आणि निबंधाचा शेवट कसा असावा हे पाहणार आहोत.

निबंधाची सुरुवात कशी करावी

  • निबंधाची सुरुवात आपण एखाद्या कवितेने तसेच एखाद्या गाण्याने किंवा प्रसिद्ध व्यक्तींच्या लेखनाने सुद्धा करू शकतो.
  • निबंधाची सुरुवात करताना सुरुवातीला विषयाची व्याख्या लिहू शकतो त्याचप्रमाणे विषयाविषयी हल्लीची चर्चा करून शकतो.
  • निबंध लेखन मध्ये आपल्या निबंधाच्या विषयाला अनुसरून एखादा प्रसंग लिहू शकतो.
  • निबंधामध्ये आपण एखादी म्हण तसेच वाक्यप्रचार याचा देखील वापर करू शकतो.
  • निबंध लेखनामध्ये आपण आपल्या विषयाचे महत्त्व देखील समजावून सांगू शकतो.

निबंधाचा मध्यभाग कसा असावा 

  • निबंधाचा मध्यभाग अत्यंत महत्वपूर्ण भाग असतो आणि त्यामुळे आपण कोणत्या विषयाला अनुसरून लेखन करणार आहोत तो लेख आपण निबंधाच्या मध्य भागामध्ये लिहावा.
  • निबंध लेखन आपण का करणार आहोत किंवा निबंध लेखन आपण का करत आहोत तसेच आपल्या निबंधाचा विषय या निबंधाच्या मध्यभागामध्ये स्पष्ट करावा.
  • निबंध लेखन करत असताना आपल्या विषयाला अनुसरून लेखन करावे. तसेच आपल्या विषयाला सोडून अन्य लेखन करू नये.
  • विषयाची पुनरावृत्ती टाळावी,म्हणजेच तेच-तेच वाक्य पुन्हा लिहिणे टाळावे.
  • निबंध लेखनामध्ये कमीत कमी दोन परिच्छेद होतील याची काळजी घ्यावी.

निबंधाचा शेवट कसा असावा

  • ज्याप्रमाणे निबंधाची सुरुवात महत्त्वाची असते त्याचप्रमाणे निबंधाचा शेवट देखील महत्त्वाचा असतो. आपल्या निबंधाचा शेवट हा अत्यंत स्पष्ट असला पाहिजे.
  • निबंधाचा शेवट हा आकर्षक असावा.वाचणाऱ्याला आपला निबंध भाग पाडले असा असावा.
  • निबंधामध्ये दोन ते तीन परीछेद आसवेत,त्याचप्रमाणे एका परीछेदात स्पष्टीकरण असावे. 
  • आपल्या निबंधामध्ये विचारांची पुनरुक्ती नसावी म्हणजेच एकच विचार पुन्हा-पुन्हा लिहलेले नसावा. 
  • निबंधाची भाषा सोपी व स्पष्ट असावी.
  • निबंध लेखन करताना व्याकरणाच्या तसेच शुद्धलेखनाच्या चुका करू नये.

माझा आवडता खेळ कबड्डी

प्रत्येकाला आपले शरीर निरोगी ठेवण्यासाठी खेळाची अत्यंत गरज असते. मी माझे शरीर निरोगी ठेण्यासाठी कबड्डी हा खेळ खेळतो.कबड्डी हा माझा अत्यंत आवडता खेळ आहे.खेळाचे सर्व नियम आम्हाला आमच्या क्रीडा शिक्षकांनी समजावून दिलेले आहेत.खेळाची सूर्वात आम्ही नाणेफेक ने करतो. कबड्डी खेळताना ‘कबड्डी’ या शब्दाचा सलग व स्पष्ट उच्चार आम्ही करतो कबड्डी खेळताना चढाई करणाऱ्या खेळाडूने स्पर्श करून मध्य रेषेस स्पर्श केला तर तर आम्ही त्याला एक गुण देतो.

चढाई करणाऱ्यास जर विरुद्ध संघाने पकडले तर विरुद्ध संघाला 1 गुण मिळतो. पण जर चढाई करणाऱ्या खेळाडूविरुद्ध संघाने पकडताना त्याने निसटून कुशलतेने जर मध्यरेषेस स्पर्श केला तर मात्र विरुद्ध संघातील त्याला स्पर्श करणारे सर्व खेळाडू बाद होतात हैडी खेळाचे वेगळेपण आहे.

या खेळात खूप बारकावेही आहेत. कबड्डीमध्ये मध्यरेषा, टचलाईन, लॉबी (राखीव क्षेत्र ) यास फार महत्त्व असते. कबड्डीसाठी काही साहित्य लागत नाही. हा खेळ खेळताना आमच्यात खूप उत्साह संचारतो. या खेळामुळे आम्ही स्वतःचे रक्षण कसे करायचे हे शिकतो. आम्हाला आमच्या शारीरिक कुरीची कल्पना येते.

मी कबड्डी खेळात आत्तापर्यंत कॅप्टन म्हणून खूप चांगले काम केले आहे. जिल्हास्तरावर कबड्डीतील अनेक बक्षिसे जिंकली आहेब मला आंतरराष्ट्रीय स्तरावर नाव कमवायचे आह.त्यासाठी मी खूप मेहनत घेणार आहे.

मराठी निबंध यादी

  • माझी शाळा 10 ओळी निबंध.
  • माझा आवडता छंद वाचन मराठी निबंध.
  • माझा आवडता छंद क्रिकेट खेळणे.
  • माझा आवडता छंद नृत्य मराठी निबंध.
  • माझे आवडते पुस्तक श्यामची आई.
  • माझा आवडता अभिनेता / कलाकार मराठी निबंध.
  • माझे आवडते लेखक.
  • आदर्श विद्यार्थी.
  • कष्टाचे महत्व.
  • आदर्श नागरिक मराठी निबंध.

निष्कर्ष

आजच्या या लेखात आपण निबंध लेखन मराठी (essay writing in marathi) ही मराठी जाणून घेतली. तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे कॉमेंट मध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांना पण नक्कीच शेअर करा.

Leave a Comment