हरिहर किल्ला माहिती मराठी | Harihar Fort Information In Marathi

Harihar Fort Information In Marathi : महाराष्ट्रातील जवळपास प्रत्येक जिल्ह्यात सुंदर डोंगरी किल्ले आहेत. या किल्ल्यांचा स्वतःचा समृद्ध इतिहास आहे. तसेच हे किल्ले काळानुरूप पर्यटकांचे खास ठिकाण बनले आहेत. यापैकी एक किल्ला महाराष्ट्रातील हरिहर किल्ला आहे, जो पर्यटकांसाठी ट्रेकिंग आणि प्रेक्षणीय स्थळांचे मुख्य केंद्र बनला आहे.हरिहर किल्ला किंवा हर्षगड हा सह्याद्रीच्या हिरव्यागार टेकड्यांवर असलेला एक किल्ला आहे, ज्याला पश्चिम घाट असेही म्हणतात.

Harihar Fort Information In Marathi
हरिहर किल्ला माहिती मराठी (Harihar Fort Information In Marathi)

हरिहर किल्ला माहिती मराठी (Harihar Fort Information In Marathi)

हा किल्ला घोटी आणि नाशिक शहरापासून 40 किमी अंतरावर आहे, महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील इगतपुरीपासून 48 किमी इतक्या अंतरावर आहे. महाराष्ट्राला गुजरातशी जोडणाऱ्या गोंडा घाटमार्गे व्यापारी मार्गाकडे लक्ष ठेवण्यासाठी हा महत्त्वाचा किल्ला बांधण्यात आला होता. आज हा किल्ला ट्रेकर्सचे केंद्र बनला आहे.हरिहर किल्ला हा पश्चिम घाटातील त्र्यंबकेश्वर पर्वतात वसलेला आहे. या किल्ल्याची स्थापना यादव राजवटीत (9व्या ते 14व्या शतकादरम्यान) झाली असे म्हटले जाते.

त्यावेळी हा किल्ला गोंडा घाटातून जाणाऱ्या व्यापारी मार्गाच्या सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा होता. त्याच्या स्थापनेपासून, हरिहर किल्ला ब्रिटिश सैन्याच्या ताब्यात येईपर्यंत विविध आक्रमणकर्त्यांनी हल्ला केला आणि तो ताब्यात घेतला.हरिहर हा किल्ला महाराष्ट्रातील प्रमुख किल्ल्यांपैकी एका आहे.सह्याद्री पर्वतरांगांमध्ये वसलेला हा किल्ला आपल्या वेगळेपणामुळे ओळखला जातो.हरिहर किल्ल्याचे खास वैशिष्ट्य म्हणजे हा किल्ला चढाई करण्यासाठी कातळ पायऱ्या आहेत.

हरिहर किल्ला नाशिक

या पायऱ्या चढण्याचा आणि उतरण्याचा चित्तथरारक अनुभव आपल्याला या ठिकाणी येतो.महाराष्ट्रातील बरेच पर्यटक व इतिहास प्रेमी आवर्जून या किल्ल्याला भेट देण्यासाठी येत असतात.हरिहर हा किल्ला महाराष्ट्र नाशिक या जिल्ह्यातील एक ऐतिहासिक स्थळ आहे.नाशिक जिल्ह्यातील टाके या गावाजवळ एका डोंगरावरती हा किल्ला वसलेला आहे.हरिहर हा किल्ला गिरीदुर्ग प्रकारात येत असून तो चढाई करण्यासाठी कठिण स्वरूपाचा समजला जातो.

नाव हरिहर किल्ला
उंची 3676 फूट
प्रकारगिरिदुर्ग
ठिकाणनाशिक
डोंगररांगसह्याद्री
हरिहर किल्ला माहिती मराठी (Harihar Fort Information In Marathi)

समुद्रसपाटीपासून हरिहर या किल्ल्याची उंची 3676 फूट म्हणजेच 1120 मीटर इतकी आहे.हा किल्ला ज्या डोंगरावरती आहे तो डोंगर त्रिकोणी आकाराचा आहे.हरिहर या किल्ल्याला हर्षगड या नावाने ही ओळखले जाते.निसर्ग सौंदर्याची आवड असणाऱ्या प्रत्येक पर्यटकांसाठी हा किल्ला एक मोठे आकर्षण आहे.या किल्ल्यावरून दिसणारी हिरवळ आणि चित्र परिसरांची दृश्य पाहून मन अगदी थक्क होऊन जाते.त्यामुळेच हरिहर हा किल्ला महाराष्ट्रातील सर्वोत्तम ठिकाणांपैकी एक म्हणून ओळखला जातो.

हरिहर हा किल्ला चढण्यासाठी आपल्याला दोनशे फूट उंचावरील तीव्र आणि सरळ पायऱ्या चढाव्या लागतात.आश्चर्याची बाब तर ही आहे की या पायऱ्या 80 डिग्री ने झुकलेल्या आहेत.कातळ दगडामध्ये कोरलेल्या या पायऱ्यांची संख्या जवळजवळ 117 ते 125 इतकी आहे या किल्ल्याच्या पायऱ्या चडून वरती आल्यानंतर आपल्याला लगेच मुख्य प्रवेशद्वार पाहायला मिळते.त्याचबरोबर हरिहर या किल्ल्यावर आपल्याला शिवमंदिर,हनुमान मंदिर आणि एक तलाव ही पाहायला मिळते.हरिहर किल्ल्याच्या इतिहासाबद्दल जाणून घ्यायचे झाल्यास हा किल्ला यादव काळामध्ये बांधलेला आहे खास करून गोंडा घाटावर होणाऱ्या व्यापारावर लक्ष ठेवण्यासाठी यादवांनी हा किल्ला निर्माण केलेला होता.

यादव घराण्याने हा किल्ला इसवीसन 9 व्या ते इसवीसन 14 व्या शतकात बांधला असावा असे म्हटले जाते.शहाजी महाराजांनी इसवीसन 1636 मध्ये त्रिंबक गड किल्ला घेताना हरिहर किल्ला देखील आपल्या ताब्यात घेतला होता.पुढे हा किल्ला मुघलांच्या ताब्यात गेला त्यानंतर इसवी सन 1670 मध्ये पुन्हा हा किल्ला स्वराज्यामध्ये सामील करण्यात आला मात्र शेवटी हा किल्ला इतर किल्ल्यांप्रमाणे इसवी सन 1818 मध्ये इंग्रजांच्या ताब्यात गेला.सध्या हा किल्ला भारत सरकारच्या अधिपत्याखाली आहे.हरिहर या किल्ल्यावर पाहण्यासारखी अनेक ठिकाणी आहेत.या ठिकाणी आपल्याला दगडात कोरलेल्या कातळ पायऱ्या,स्वच्छ पाण्याचा तलाव,शेंदूर लावलेल्या देवांच्या मुर्त्या,भगवान शिव मंदिर,हनुमान मंदिर आणि एक छोटासा राजवाडा देखील पाहायला मिळतो,हरिहर हा किल्ला नाशिक शहरापासून 42 किलोमीटर तर जवळ असणाऱ्या हर्ष वाडी या गावापासून 1 किलोमीटर इतके अंतरावर आहे.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)

हरिहर किल्ला कुठे आहे ?

हरिहर हा किल्ला नाशिक मध्ये आहे.

हरिहर किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे ?

हरिहर किल्ला नाशिक जिल्ह्यात आहे.

हरिहर किल्ल्याला किती पायऱ्या आहेत ?

हरिहर किल्ल्याला 117 पायऱ्या आहेत.

हरिहर किल्ला कोणी बांधला ?

यादव घराण्याने हरिहर हा किल्ला बांधला.

निष्कर्ष(Summary)

आजच्या या लेखात आपण रायगड किल्ला माहिती मराठी (Raigad Fort Information Marathi) जाणून घेतली. तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे कॉमेंट मध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांना पण नक्कीच शेअर करा.

Leave a Comment