पुरंदर किल्ला माहिती मराठी | Purandar Fort Information in Marathi

Purandar Fort Information in Marathi : पुरंदर हा किल्ला पुणे शहरापासून 41 किलोमीटर अंतरावर तसेच हा किल्ला सासवड या तालुक्याचे ठिकाणापासून पंधरा किलोमीटर अंतरावर आहे. पुरंदर किल्ल्याचे सर्वात मोठे ऐतिहासिक महत्त्व म्हणजे या किल्ल्यावर स्वराज्याचे दुसरे महत्व म्हनजे छत्रपती संभाजी महाराज यांचा जन्म झाला होता. आज आपण पुरंदर किल्ला माहिती मराठी (Purandar Fort Information in Marathi) पाहणार आहोत.

Purandar Fort Information in Marathi
पुरंदर किल्ला माहिती मराठी (Purandar Fort Information in Marathi)

पुरंदर किल्ला माहिती मराठी (Purandar Fort Information in Marathi)

ठिकाण पुणे जिल्हा
उंची 1500 मीटर
डोंगररांगा सह्याद्री
स्थापना1350
जवळचे गावसासवड
पुरंदर किल्ला माहिती मराठी (Purandar Fort Information in Marathi)

सह्याद्रीच्या दक्षिणोत्तर पसरलेल्या मूळ रांगेतून काही फाटे पूर्व दिशेला फुटले आहेत. त्यापैकी एक फाटा 24 किलोमीटर अंतरावर भुलेश्वर पर्यंत पसरलेला आहे. त्याच फाट्यावर सिंहगड,पुरंदर आणि वज्रगड हे किल्ले वसलेले आहेत. पुरंदर किल्ल्यावर पुण्याहून जाण्यासाठी कात्रज आणि दिवे या घाटातून पुरंदरच्या पायथ्याशी जाता येते. पुरंदरच्या पायथ्याशी नारायणपूर हे दत्त महाराजांचे प्रसिद्ध ठिकाण आहे. या ठिकाणापासूनच या किल्ल्यावर जाता येते. किल्ल्याच्या चौकात बाजूला माच्या आहेत. पुरंदरच्या वायव्येला 42 किलोमीटर अंतरावर सिंहगड किल्ला तसेच पश्चिमेला 54 किलोमीटर अंतरावर राजगड आणि 60 किलोमीटर अंतरावर तोरणा किल्ला आहे.

पुरंदर किल्ला तसा विस्ताराने मोठा आहे. किल्ला मजबूत असून बचावला जागा उत्तम आहे. गडावर मोठी शिवबंदी राहू शकते. दारूगोळा आणि धान्याचा मोठा साठा करून गड दीर्घकाळ लढवता येऊ शकत होता. एक बाजू सोडली तर गडाच्या इतर सर्व बाजू दुर्गम आहेत. गडावरून समोरच्या प्रदेशावर बारीक नजर ठेवता येते. हा किल्ला सण १४८९ च्या सुमारास निजामशाहीचा सरदार मलिक अहमदनगर यांनी जिंकून घेतला. पुढे शके १५५० मध्ये तो किल्ला आदिलशाहीत आला इसवी सन १६४९ मध्ये आदिलशाहीने शहाजीराजांना कैदेत टाकले. त्याच वेळी शिवाजी महाराजांनी अनेक आदिलशाहीचे किल्ले आपल्या ताब्यात घेतली म्हणून शिवरायांचा बंदोबस्त करण्यासाठी आदिलशहाने पत्रिकानाच पाठवले परिस्थिती फारच बिकट होती.

एकीकडे आपले वडील कैदेत होते. तर दुसरीकडे प्रत्येकानाच्या स्वारी मुळे स्वराज्याला धोका निर्माण झाला होता. महाराजांनी यावेळी लढाईसाठी पुरंदर किल्ल्याची जागा निवडली. मात्र यावेळी गड मराठ्याच्या ताब्यात नव्हता माझी निळकंठ राव यांच्या ताब्यात हा किल्ला होता. त्यांच्या भावाभावांमधील भांडणाचा फायदा उठवून महाराजांनी किल्ल्यात प्रवेश करण्यात यश मिळवले. या पुरंदर किल्ल्याच्या सहाय्याने मराठ्यांनी पत्रिकानाशी झुंज दिली आणि लढाई जिंकली शिवाजी महाराजांना या पहिल्या लढाईतच मोठे यश प्राप्त झाले. सन 1655 मध्ये शिवाजी राजांनी नेताजी पालकर याच गडाचे सरनोबत नेमले. 14 मे 1657 अर्थात गुरुवार या दिवशी संभाजी राजांचा जन्म पुरंदर वर झाला. संभाजी राजांनी नक्की सात शतक आणि बुधभूषण हे ग्रंथ लिहिले.

माचीवर खानाचे आणि मुरबाजींचे गणगोत झाले. या ठिकाणी मुरारबाजी पडले आणि त्यांच्याबरोबरच पुरंदरही पडला. ही वार्ता जेव्हा राजांना कळली तेव्हा त्यांनी जयसिंगाची कहाणी इतिहास प्रसिद्ध पुरंदरचा तह झाला. या तहात काही किल्ले राजांना मोगलांना द्यावे लागले. त्यांची नावे पुढीलप्रमाणे आहेत. पुरंदर ,रुद्रमाळ, कोंढाणा, लोहगड, विसापूर, तुंग, तिकोना, प्रबळगड, माहुली, कर्नाळा, सोनगड, पळसगड, भंडारगड, नळदुर्ग मार्ग, वसंतगड, नंदगड, सागरगड आणि मानगड. 1670 साली संभाजीराजांच्या मृत्यू नंतर किल्ला औरंगाबाद जिंकला आणि त्याचे नाव आजमगड ठेवले.

पुढे मराठ्यांच्या वतीने शंकराची नारायण सचिव यांनी मोघलांशी भांडून पुरंदर परत घेतला. नंतर इंग्रजांनी गड आपल्या ताब्यात घेतला. गडावरील पाहण्याची ठिकाण पुरंदरेश्वराची मंदिर ,रामेश्वर मंदिर, दिल्ली दरवाजा, खंदखडा पद्मावती तळे, केदारेश्वर पुरंदर,गडावर जाण्याच्या वाटा, सासवड, नारायणपूर मार्गे गडावर जाता येते. पुणे सातारा हायवे वरून कापूरहोळ या गावापासून वीस किलोमीटर अंतरावर पुरंदर किल्ला आहे. हा किल्ला भारतीय सैन्याच्या ताब्यात असल्यामुळे या किल्ल्यावर तुम्हाला जायचे असेल तर एखादी ओळखपत्र घेऊन जावे लागते.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)

छत्रपती संभाजी महाराज यांचा जन्म कोठे झाला ?

छत्रपती संभाजी महाराज यांचा जन्म पुरंदर या किल्ल्यावर झाला.

पुरंदरच्या वायव्येला कोणता किल्ला आहे ?

पुरंदरच्या वायव्येला 42 किलोमीटर अंतरावर सिंहगड हा किल्ला आहे.

पुरंदरच्या पश्चिमेला कोणता किल्ला आहे?

पुरंदरच्या पश्चिमेला 54 किलोमीटर अंतरावर राजगड आणि 60 किलोमीटर अंतरावर तोरणा किल्ला आहे.

स्वराज्यात किती किल्ले होते ?

स्वराज्यात 111 किल्ले होते.

निष्कर्ष

आजच्या या लेखात आपण पुरंदर किल्ला माहिती मराठी ( purandar Fort Information Marathi) जाणून घेतली. तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे कॉमेंट मध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांना पण नक्कीच शेअर करा.

Leave a Comment