pratapgadh fort information in marathi: प्रतापगड किल्ल्याची निर्मिती इसवी सन 1657 मध्ये झाल्याची नोंद इतिहासात मिळते. उत्तर साताऱ्याच्या जावळी तालुक्यात महाबळेश्वराच्या पश्चिमेस आठ मैलावर प्रतापगडाचा डोंगर आहे.जावळीच्या प्रांतात पायथ्यापासून प्रतापगड सुरू होतो. नीरा आणि कोयनेच्या काठावर छत्रपती शिवाजी महाराजांनी जी सत्ता मिळवली होती ती सत्ता अबाधित ठेवण्यासाठी एक मजबूत किल्ला निर्माण करण्याची गरज निर्माण झाली. आणि जो किल्ला निर्माण झाला त्याच किल्ल्याला प्रतापगड या नावाने ओळखला जातो.

या किल्ल्याचा इतिहासही धक्क करून सोडणारा आहे. 1657 साली शिवाजी महाराज विजापूरच्या दरबाराला अगदी असाहाय्य झाले होते. महाराजांची शक्ती वाढत होती. नवे नवे मुलुख काबीज करून आदिलशहाचे लचके तोडले जात होते. प्रतापगडाचे दुसरे वैशिष्ट्य म्हणजे अफजलखानचा वध. शिवराय अफजलखानाच्या भेटीत अफजलखानाने दगाफटका केला. त्याचा परिणाम म्हणून महाराजांनी अफजलखानाचा कोतळाच बाहेर काढला. सय्यद बंडा याने तलवार उगारली परंतु जिवा महाल हा सावध असल्याने यांनी सय्यद बंडाला मारले.
Contents
प्रतापगड किल्ला माहिती मराठी (Pratapgadh fort information in marathi)
नाव | प्रतापगड |
उंची | 1080 मीटर (3556 फूट) |
प्रकार | गिरिदुर्ग |
किल्ल्याचे दोन भाग | मुख्य किल्ला आणि बाले किल्ला |
स्थापना | 1656 |
कोणी बांधला | मोरोपंत त्रिंबक पिंगळे |
होता जीवा म्हणून वाचला शिवा या म्हणीच्या रूपाने या गडाचा इतिहास आजरावर झाला. असा हा शिवरायांचा प्रताप आजही महाराजांच्या पराक्रमाची साक्ष देत उभा आहे. प्रतापगड किल्ला भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे. या किल्ल्याची उंची 3556 फूट असून या किल्ल्याची चढायची श्रेनी सोप्या पद्धतीची आहे. प्रतापगड हा किल्ला गिरीदुर्ग या प्रकारात येत असून हा किल्ला सातारा या डोंगर रांगेत येतो. प्रतापगड किल्ल्याची ठिकाण म्हणजे भारतात महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यात आहे. तसेच या किल्ल्याच्या जवळील गाव म्हनजे महाबळेश्वर हे आहे.
- राजस्थान राज्य माहिती मराठी (Rajasthan State Information in Marathi)
- जंजिरा किल्ला माहिती मराठी | janjira fort information in marathi
किल्ल्याचे पर्यटन
किल्ल्याच्या महादरवाज्यातून आत गेले की उजव्या हाताला चिलखती बांधणीचा बुरूज दिसतो. हा बुरुज पाहून पायऱ्यांच्या मदतीने आपल्याला भवानी मंदिराकडे जाता येते. मंदिरात भवानी देवीची प्रसन्न अशी मूर्ती आहे. या मंदिराकडून समोरून बाले किल्याकडे चालू लागल्यास उजव्या बाजूला समर्थ स्थापित हनुमानाची मूर्ती दिसते. पुढे बालेकिल्ल्याचे प्रवेशद्वार ओलांडल्यानंतर आपण केदारेश्वर महादेवाचे मंदिराजवळ येऊन पोहोचतो. या मंदिरात भव्य शिवलिंग आहे या मंदिराच्या मागच्या बाजूला राजमाता जिजाऊंच्या वाड्याचे अवशेष आहेत.
प्रतापगड किल्ल्याचा इतिहास
जावळी खोरे स्वराज्यात आल्यानंतर महाराजांनी मोरोपंत त्रिंबक पिंगळे यांना इसवी सन 1656 मध्ये हा गड बांधून घेण्याची आज्ञा दिली. या प्रतापगड किल्ल्याची मुख्य किल्ला आणि बालेकिल्ला असे दोन भाग पडतात. या किल्ल्यामध्ये तलाव देखील आहे. सुरक्षितेचा दृष्टीने गडाच्या चारही बाजूने भक्कम तटबंदी व बुरुज आहे. मुख्य किल्ल्याचे क्षेत्रफळ बघता ते 3885 चौरस मीटर असून बाले किल्ल्याची 3660 चौरस किलोमीटर इतके क्षेत्रफळ आहे. आजही प्रतापगडाचे नाव उच्चारताच आठवते की महाराजांची आणि अफजलखणाची ऐतिहासिक भेट प्रतापगडाचे ऐतिहासिक महत्त्व देखील याच भेटीमुळे वाढले आहे.
इसवी सन 1659 साली झालेल्या या ऐतिहासिक भेटीची नोंद सुवर्ण अक्षरात इतिहासामध्ये लिहिली आहे. मोठ्या चतुराईने धाडसाने शौर्याने महाराजांनी अफजलखानाचा वध केला. पुढे ब्रिटिश आणि मराठ्यांमध्ये झालेले युद्धानंतर 1818 ला या गडावर ब्रिटिशांनी आपले वर्चस्व प्रस्थापित् केले. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर या प्रतापगड किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पाच मीटर उंच असा भव्य पुतळा उभारण्यात आला.
किल्ल्यावर जाण्याचा मार्ग
किल्ल्यावर जाण्याचा मार्ग म्हणजे उत्तर सातारा जिल्ह्याच्या जावळी तालुक्यात महाबळेश्वराच्या पश्चिमेस 8 मैलावर प्रतापगड हा किल्ला आहे. तसेच पुणे महाबळेश्वर हे अंतर 120 किलोमीटर येवढे असून महाबळेश्वर येथून प्रतापगड 22 किलोमीटर अंतरावर आहे.
वांरवांर विचारले जाणारे प्रश्न (FAQ)
प्रतापगड किल्ला कोणी बांधला ?
छत्रपती शिवाजी महाराजांनी इ.स १६५६ मध्ये प्रतापगड किल्ला बांधला
प्रतापगड किल्ल्याची उंची किती आहे ?
1080 मीटर (3556 फूट)
प्रतापगडाचे बांधकाम कोणाच्या नेतृत्वाखाली झाले ?
पेशवे मोरोपंत पिंगळे यांच्या देखरेखीखाली प्रतापगडाचे बांधकाम इ. स. १६५६ पार पडलेे.
प्रतापगड कोणत्या तालुक्यात आहे ?
प्रतापगड जावळी तालुक्यात आहे.
प्रतापगड किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे ?
प्रतापगड किल्ला सातारा जिल्ह्यात आहे.
निष्कर्ष
आजच्या या लेखात आपण प्रतापगड किल्ला माहिती मराठी (pratapgadh Fort Information Marathi) जाणून घेतली. तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे कॉमेंट मध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांना पण नक्कीच शेअर करा.