सिंधुदुर्ग किल्ला माहिती मराठी | Sindhudurg Fort Information Marathi

By | February 26, 2023

Sindhudurg Fort Information Marathi :सिंधुदुर्ग किल्ला हा महाराष्ट्राच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेला जलदुर्ग आहे. 25 नोहेंबर 1664 रोजी या किल्ल्याच्या बांकामाला सूर्वात झाली. सिंधुदुर्ग किल्ला माहिती मराठी (Sindhudurg Fort Information Marathi) पाहणार आहोत.

Sindhudurg Fort Information Marathi
सिंधुदुर्ग किल्ला माहिती मराठी (Sindhudurg Fort Information Marathi)

सिंधुदुर्ग किल्ला माहिती मराठी (Sindhudurg Fort Information Marathi)

जिल्हासिंधुदुर्ग
उंची 200 फूट
प्रकार जलदुर्ग
स्थापना नोहेंबर,25 इसवी सन 1665
ठिकाण सिंधूदुर्ग, महाराष्ट्र
सिंधुदुर्ग किल्ला माहिती मराठी (Sindhudurg Fort Information Marathi)

सिंधुदुर्ग हा किल्ला पुणे शहरापासून 400 किलोमीटर अंतरावर आहे. रत्नागिरी शहारा पासून हा किल्ला 144 किलोमीटर अंतरावर आहे. भारत सरकार ने या किल्ल्याला दिनांक 21 जून 2010 रोजी महाराष्ट्रातील राष्ट्रीय सौरक्षण स्मारक म्हणून घोषीत केले आहे. शिवाजी महाराजांच्या काळात या किल्ल्याला फार महत्व होते.

किल्ल्याचे क्षेत्र कुरटे बेटावर 48 एकरावर पसरलेले आहे. तटबंदीची लांबी सुमारे तीन किलोमीटर आहे. बुरुजांची संख्या 52 असून 45 दगडी जिने आहेत. या किल्ल्याच्या तटबंदीच्या भिंतीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी त्याकाळी 30-40 शौचालयांची निर्मिती केली होती. या किल्ल्यामध्ये शिवाजी महाराजांचे शंकराच्या रूपातील एक मंदिर आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमारी दलाचे आद्य स्थान मालवण येथील जंजिरा म्हणजेच हा सिंधूदुर्ग  किल्ला आहे. महाराजांकडे 365 किल्ले होते.

या सर्व किल्ल्यांचा पूर्वेस विजापूर, दक्षिणेस हुबळी, पश्चिमेस अरबी समुद्र आणि उत्तरेस खानदेश-वऱ्हाड पर्यंत विस्तार होता. भुईकोट आणि डोंगरी किल्ल्यांच्या बरोबरीने सागरी मार्गावरील शत्रूची स्वारी परतून लावणयासाठी जलदुर्गची निर्मिती महत्वाची आहे हे ओळखून शिवाजी महाराजांनी सागरी किल्ले निर्माण केले. चांगल्या भक्कम आणि सुरक्षित स्थळांचा शोध घेऊन समुद्र किनाऱ्याची पाहणी झाली.

इसवी सन 1664 साली मालवण जवळील कुरटे नावाचे काळा कभीन खडक असलेले बेट किल्ल्यासाठी निवडले. महाराजांच्या हस्ते किल्ल्याच्या तटांची पायाभरणी झाली. आज मोरयाचा दगड या नावाने ही जागा प्रसिद्ध आहे. एका खडकावर गणेशमूर्ती एकीकडे सूर्याकृती आणि दुसरीकडे चंद्रकृती कोरून त्या जागी महाराजांनी पूजा केली.असे म्हणतात की किल्ला बांधण्यासाठी एक कोटी होऊन खर्ची पडले. या किल्ल्याच्या उभारणीसाठी तीन वर्षांचा कालावधी लागला. ज्या चार कोळी लोकांनी सिंधुदुर्ग बांधण्यासाठी योग्य स्थळ शोधले त्यांना गावे इनाम देण्यात आला.

ऐतिहासिक सौंदर्य लाभलेला हा सिंधुदुर्ग किल्ला ज्या कुरटे खडकावर तीन शतके उभा आहे तो शुद्ध काळा कभीन्य मालवण पासून सुमारे अर्धा मैल समुद्रात आहे.या खडकावर समुद्र मार्गाने व्यापलेले क्षेत्र सुमारे 48 एकर आहे. त्याचा तट दोन मएल  इतका आहे. तटाची उंची 30 फूट असून रुंदी 12 फूट आहे. पश्चिमेस आणि दक्षिणेस अथांग सागर पसरलेला आहे. मुख्य म्हणजे या किल्ल्यावर गोड्या पाण्याच्या तीन विहिरी आहेत त्यांची नावे दुधबाव, दहिबाव आणि साखरनाव अशी आहेत. या विहिरींचे पाणी चवीला अत्यंत गोड लागते.

किल्ल्याच्या बाहेर खारे पाणी आणि किल्ल्याच्या आत गोड पाणी हा निसर्गाचा चमत्कारच मानला पाहिजे. यामुळे किल्ल्यावर राहणे सुलभ झाले. पाण्याचा अतिरिक्त साठा करण्यासाठी एक कोरडा तलाव बांधण्यात आला होता. सध्या यातील वापर पावसाळ्यात पिकवल्या जाणाऱ्या भाजीपाला व कपडे धुण्यासाठी होतो. सिंधुदुर्ग किल्ल्याचे प्रवेशद्वार पूर्वेस आहे. परंतु याच जागी प्रवेशद्वार आहे असे समजून येत नाही. हा किल्ला आजही पर्यटकांना आकर्षित करतो.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)

सिंधुदुर्ग किल्ल्याचे प्रवेशद्वार कोणत्या दिशेस आहे ?

सिंधुदुर्ग किल्ल्याचे प्रवेशद्वार पूर्व दिशेस आहे.

सिंधुदुर्ग किल्ला कोणत्या बेटावर आहे ?

सिंधुदुर्ग किल्ला कुरटे बेटावर आहे.

सिंधुदुर्ग किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे ?

सिंधुदुर्ग जिल्ह्यात

निष्कर्ष

आजच्या या लेखात आपण सिंधुदुर्ग किल्ला माहिती मराठी ( Sindhudurg Fort Information Marathi) जाणून घेतली. तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे कॉमेंट मध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांना पण नक्कीच शेअर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *