जंजिरा किल्ला माहिती मराठी | janjira fort information in marathi

janjira fort information in marathi: राजपूर खाडीच्या तोंडावर मोक्याच्या ठिकाणी अरबी समुद्रामध्ये हा किल्ला वसला आहे. पूर्वी या ठिकाणी  एक बेट होते. अरबी भाषेत बेटाला जजिरा असे म्हणतात. त्यावरूनच या किल्ल्याला जंजिरा असे नाव पडले.

janjira fort information in marathi
जंजिरा किल्ला माहिती मराठी (janjira fort information in marathi)

जंजिरा किल्ला माहिती मराठी (janjira fort information in marathi)

किल्ल्याचे नाव जंजिरा किल्ला
जिल्हा रायगड
तालुकामुरुड
जंजिरा किल्ला माहिती मराठी (janjira fort information in marathi)

किल्ल्यापासून चार ते पाच किलोमीटर अंतरावर मुरुड हे तालुक्याचे ठिकाण असल्यामुळे त्याला मुरुड जंजिरा असेही म्हणतात. मुरुड  मधून पुढे एका छोट्या घाटातून उतरत असताना नारळाच्या झाडात दबलेले एक गाव दिसते  ते राजपुरी गाव. आणि गावच्या पश्चिमेला दिसतो तो किल्ले जंजिरा. 1618 नंतर 1948 पर्यंत अशी तब्बल 330 वर्षे सिद्धी सरदाराने हा किल्ला अजय केरखला पुढे एप्रिल 1948 ला हा भारतीय संघराज्यामध्ये  विलहीत झाला.

राजपुरी गावातून किल्ल्यावर जाण्यासाठी होड्यांची सोय आहे. जंजिरा किल्ल्याचे वैशिष्ट्य म्हणजे या किल्ल्याचे प्रवेशद्वार दुरून दिसत नाही. किल्ला बांधत असताना प्रवेशद्वार खरोखर बुर्जामध्ये असे बसवले आहे की ते 30 ते 40 फूट समोर आल्याशिवाय दिसत नाही त्यामुळे शत्रूला या किल्ल्यामध्ये प्रवेश करणे आव्हानात्मक असायचे. म्हणूनच कदाचित हा किल्ला त्याच्या प्रचंड आत्मविश्वासामुळे व बुलंद तटबंदीमुळे 330 वर्षे अजिंक्य राहिला.

किल्ल्याला सभोवताली  बुलंद व भक्कम वक्राकार बुरुज आहेत. त्याची तटबंदी चाळीस फूट उंच आहे.हा किल्ला 22 एकर जमिनीवर पसरला आहे. बुरुजाच्या तटबंदी मध्ये असंख्य कमानी आहेत. त्या कमानी मध्ये तोफा ठेवलेल्या आजही दिसतात. असे बोलले जाते की किल्ल्यावर त्याकाळी 500 पेक्षा जास्त सोपा होत्या. इतक्या  तोफान मुळे हा किल्ला जिंकणे हे एक मोठे आव्हानच होते. त्यामध्ये एक सर्वात मोठी तोफ आणि लांब पल्ल्याची तोफ म्हणजे  कलालबगडी.

किल्ल्याच्या तटबंदीवर जायला पायऱ्यांची सोय आहे. किल्ल्याच्या तटबंदी वरून आपल्याला किल्ल्याची आतील व बाहेरील बाजू व अथांग सागर पाहायला मिळतो. किल्ल्याच्या आतील बाजूला थोडी तडजड झालेली दिसते. त्यामध्येच एक बहुमजली वाडा दिसतो. किल्ल्यामध्ये लोकांना पाणी पुरवण्यासाठी गोड्या पाण्याचे दोन विस्तीर्ण तलाव बांधले होते. त्यामध्ये आजही पाणी उपलब्ध आहे. गडाच्या पाठीमागे एक दरवाजा आहे. त्याला दर्या दरवाजा असे म्हणतात. हा दरवाजा संकटकालीन परिस्थितीमध्ये वापरला जात असावा. हा किल्ला मराठा ब्रिटिश पोर्तुगीज अशा अनेक राज्यांनी जिंकण्याचा प्रयत्न केला परंतु हा किल्ला शेवटपर्यंत अजिंक्य राहिला.

जंजिरा किल्ल्याचा इतिहास

महाराष्ट्राच्या हिरव्यागार पश्चिम किनार्‍यावर, मुंबईपासून 150 किमी अंतरावर, एक मासेमारीचे गाव आहे. जे त्या वेळी पूर्वीच्या जंजिरा राज्याची राजधानी होती. १७ व्या शतकाच्या उत्तरार्धात मुंबई शहराच्या इतिहासात महत्त्वाची भूमिका बजावणारा जंजिरा हा किल्ला सिद्धी चा होता.मित्रांनो, आपल्याला एक सत्य माहित आहे की सिद्धी मुरुड जंजिरा येथे स्थायिक झाला आणि एक उत्कृष्ठ योद्धा म्हणून सिद्ध झाला, जो त्याच्या शक्तीचा आणि संरक्षणाचा गड होता. एकेकाळी या किल्ल्यावर 500 तोफा असन्याचा दावा केला जात होता, परंतु आज केवळ काही मोजक्याच शिल्लक आहेत आणि त्यांची कथा सांगण्यास ते अतिशय सक्षम आहेत.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)

जंजिरा किल्ला कुठे आहे ?

राजपूर खाडीच्या तोंडावर मोक्याच्या ठिकाणी अरबी समुद्रामध्ये हा किल्ला वसला आहे.

जंजिरा किल्ला कोणी बांधला?

राजा रामराव पाटील यांनी या बेटाची स्थापना केली

छत्रपती शिवाजी महाराजांनी जंजिरा किल्ला जिंकला का?

छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांनी वेळोवेळी प्रयत्न करूनही हा किल्ला जिंकने त्यांना शक्य झाले नाही.

जंजिरा हा किल्ला कोणत्या प्रकारचा आहे किल्ला आहे?

जंजिरा हा एक जलदुर्ग आहे.

जलदुर्ग म्हणजे काय ?

दुर्ग म्हणजे गढ किंवा किल्ला होय. जो किल्ले पाण्या मध्ये बांधलेला असतो त्याला जलदुर्ग असे म्हणतात.

छत्रपती शिवाजी महाराजांना कोणता किल्ला जिंकता आला नाही ?

मुरुड जंजिरा हा किल्ला छत्रपाती शिवाजी महाराजांनी जिंकला नाही.

जंजिरा किल्ला कोणत्या तालुक्यात आहे ?

जंजिरा किल्ला हा मुरुड तालुक्यात आहे.

जंजिरा किल्ल्यावर पिण्याच्या पाण्याची सोय आहे का ?

जंजिरा किल्ला वर पिण्याच्या पाण्या साठी दोन गोड पाण्याच्या विहरी आहेत.

निष्कर्ष

आजच्या या लेखात आपण जंजिरा किल्ला माहिती मराठी (janjira Fort Information Marathi) जाणून घेतली. तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे कॉमेंट मध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांना पण नक्कीच शेअर करा.

Leave a Comment