बातमी लेखन मराठी | batmi lekhan in marathi

batmi lekhan in marathi : आज आपण मराठी व्याकरण उपयोजित मराठी मधील बातमी लेखन या विषासंदर्भात माहिती जाणून घेणार आहोत. तुम्ही TV वर पाहत असाल कि, न्यूज चॅनेल वर तुम्हाला जगात घडणाऱ्या घटनांविषयी एक रिपोर्टर माहिती सांगत असतो,त्याच प्रकारे जर तुम्ही वृत्तपत्र वाचत असाल तर, त्यात वेगवेगळ्या टॉपिकवर थोडक्यात दिलेली असते, त्यालाच बातमी लेखन असे म्हणतात.

batmi lekhan in marathi
बातमी लेखन मराठी (batmi lekhan in marathi)

बातमी लेखन मराठी (batmi lekhan in marathi)

बातमी लेखन करताना खालील गोष्टी लक्षात ठेवा:

  • 1. बातमीचे शीर्षक – कमीत कमी शब्दात शीर्षक असावे. शीर्षक वाजताच बातमी विषयी कुतुहल निर्माण होते, आशय कळतो उत्सुकता वाढते म्हणून आकर्षक शीर्षक देणे महत्त्वाचे असते.
  • 2. बातमी कोणी दिली हे सांगणे महत्त्वाचे. म्हणजे आमच्या प्रतिनिधीकडून, विशेष वार्ताहराकडून हे लिहावे.
  • 3. स्थळ व दिनांक – वर्णन केलेली घटना कोठे घडली, केंव्हा घडली, हे सांगावे.
  • 4. मुख्य बातमी – बातमी कशासंबंधी आहे हे येथे लिहावे.
  • 5. बातमीचा तपशील किंवा नेमके काय घडले, बातमी काय आहे हे लिहावे. विषयाला अनुसरूनच लिहावे.

बातमी लेखन करताना काय लक्षात ठेवावे:

  • भाषा सोपी सुटसुटीत असावी.
  • स्थळ, काळ यांचा उल्लेख असलाच पाहिजे.
  • बातमी भूत काळात लिहावी.
  • भाषेचे उत्तम ज्ञान असावे.
  • लेखन कौशल्य उत्तम असावे.
  • वाक्य छोटी-छोटी असावीत.
  • परिच्छेद लहान असावा.
  • बातमीत स्वतःचे मत व्यक्त करू नये.
  • भाषा पाल्हाळी नसावी, त्यात नेमकेपणा असावा.

बातमी तयार करण्याचे स्वरूप

  • (१) शीर्षक – बातमीचा मथळा हा संपूर्ण बातमीचा/घटनेचा आरसा असतो.
  • (२) दिनांक, स्थळ, कालावधी संबंधित व्यक्ती यांचा अचूक उल्लेख असावा.
  • (३) घटना घडून गेल्यानंतर बातमी लेखन होत असल्यामुळे बातमी नेहमी भूतकाळातच लिहि ली जावी.
  • (४) जनक्षोभ वाटेल, कुणाच्याही भावना दुखावल्या जातील अशी वाक्ये/शब्द बातमीत नसावेत असे संकेत आहेत.
  • (५) बातमी लिहिताना प्रथम महत्त्वाचा मुद्दा नमूद करून त्यानंतर त्याचा तपशील द्यावा.

बातमी तयार करण्याचे स्वरूप

  • (1) शीर्षक-
  • बातमीचा मथळा हा संपूर्ण बातमीचा/घटनेचा आरसा असतो.
  • बातमीचे शीर्षक दोन शब्दापासून ते कांही शब्दापर्यंत असू शकते.
  • बातमीचे शाषक नेहमी कमीत कमी शब्दात लिहावे.
  • बातमीचे शीर्षक वाचताक्षणी वाचकांना आशयाची ओळख करून देणारे असावे.
  • बातमीचे शीर्षक हे कुतूहल निर्माण करणारे असावे.
  • बातमीचे शीर्षक हे बातमीची उत्कंठा निर्माण करणारे असावे.
  • (2) दिनांक, स्थळ, कालावधी

बातमीत सांगितलेली घटना कोठे घडली हे यात सांगितले जाते. उदा- ‘पुणे, दि. २०’, ‘उस्मानाबाद, दि. १०’ या तपशिल या भागात दिला जातो. त्यानंतर लगेच बातमीला सुरवात केली जाते.

  • (3) बातमीचा स्त्रोत –

बातमी कोणी दिली आहे. हे या भागात सांगितले जाते. “आमच्या प्रतिनिधीकडून’ ‘आमच्या वार्ताहाराकडून’ किंवा ‘ए एन आय वृत्तसंस्थेकडून’ अशा प्रकारची माहिती या ओळीत दिलेली असते.

  • (4) बातमीचा वरचा भाग (शिरोभाग)

बातमीचा सर्वात वरचा भाग म्हणजेच शिरोभाग या भागामध्ये बातमीशी संबंधित अतिशय महत्वाचा भाग दिला जातो. बातमीचा शिरोभाग वाचल्यानंतर बातमीबद्दल असलेली उत्कंठा पूर्ण होत असते.

  • (5) विस्तृत बातमी

शिरोभागाच्या नंतर बातमीचा विस्तृत तपशील दिला जातो. बातमीचा संपूर्ण संदर्भ यामध्ये दिलेला असतो. मागील संदर्भ काय आहे व पुढील संदर्भ तसेच सविस्तर बातमी या मध्ये दिलेली असते. या भागानंतर बातमी संपते.

कोणत्याही घडलेल्या घटनेची बातमी तयार करताना खालील गोष्टींचे भान राखणे महत्त्वाचे असते.
  • घटनेची विश्वासार्हता.
  • तटस्थ भूमिकेतून लेखन
  • घटनेचा अचूक व योग्य तपशील.
  • प्रत्यक्ष घडलेल्या घटनेचे लेखन होणे महत्त्वाचे.
  • स्वतःच्या मनाची कोणतीही बाब त्यात समाविष्ट करू नये.

बातमी लेखनासाठी आवश्यक गुण

  • लेखन कौशल्य
  • भाषेचे उत्तम ज्ञान
  • व्याकरणाची जाण
  • सोपी, सुटसुटीत वाक्य रचना
  • समग्र वाचन.

बातमीचे क्षेत्र

सांस्कृतिक, क्रीडा, राजकीय, शालेय / शैक्षणिक, सामाजिक, वाङ् मयीन, वैद्यकीय, वैज्ञानिक, दैनंदिन घटना या घटकांच्या संदर्भात घडलेल्या घटनांच्या बातम्या तयार होतात.

बातमी तयार करणे (मूल्यमापन कृती )

  • दिलेल्या घटनेवर बातमी तयार करणे.
  • दिलेल्या सूचक शब्दांवरून बातमी तयार करणे.
  • कार्यक्रमाची बातमी तयार करणे.

खालील विषयावर बातमी तयार करा

‘तुमच्या शाळेत भारताचा स्वातंत्र दिन साजरा’

शारदा विद्या मंदिर- भारताचा स्वातंत्र दिन साजरा

दिनांक १५ ऑगस्ट : कर्जत (आमच्या बातांहराकडून) शारदा विद्या मंदिर कर्जत येथे ‘भारताचा स्वातंत्र दिन सोहळा’ उल्हासात साजरा झाला. स्वातंत्रदिनाप्रसंगी शाळेतील मुलांनी राष्ट्रगीत, ध्वजगीत आणि देशभक्तीपर गीत सादर केले. या कार्यक्रमप्रसंगी स्थानिक नगरसेवक श्री. XXX यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

स्वातंत्रदिनाचे औचित्य साधून विद्यालयामध्ये “स्वातंत्र्याची सत्तर वर्षे” या विषयावर वक्त्कृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. प्राथमिक आणि माध्यमिक अशा दोन गटांमध्ये हि स्पर्धा पार पडली. अतिशय चांगला प्रतिसाद या स्पर्धेला विद्यार्थ्यांकडून लाभला. स्पर्धेत यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र आणि सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले.

शानदार शालेय क्रीडा महोत्सव उत्साहात साजरा

या स्पर्धेसाठी महाराष्ट्रातील अनेक शालेय संघ आले होते. नाशिक, मुंबई, पुणे, सोलापूर, नागपूर येथील संघांनी भाग घेऊन विशेष कौशल्य दाखवले. या निमित्ताने धावणे, उंच उडी, खो-खो, कबड्डी, हॉलीबॉल अशा विविध खेळांचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते व खेळाडूंना प्रोत्साहन देत होते.

यशस्वी स्पर्धकांना व संघांना शहराचे क्रीडा अधिकारी सुधीर जोशी यांच्या हस्ते खास पारितोषिके देण्यात आली. त्यांनीही जीवनात खेळाचे महत्त्व विशद केले. राष्ट्रगीत होऊन कार्यक्रम संपला.

मराठी भाषा गौरव दिन उत्साहात साजरा

नाशिक, दि. 28 फेब्रुवारी (आमच्या बातमीदाराकडून ):

सरस्वती विद्यालय नाशिक, येथे काल 27 फेब्रुवारी 2020 रोजी ‘मराठी भाषा गौरव दिन’ मोठ्या उत्साहात साजरा झाला. 27 फेब्रुवारी हा कवी कुसुमाग्रजांचा जन्मदिवस. या अनुषंगाने शाळेत विविध स्पर्धा व उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

यानिमित्ताने कवी कुसुमाग्रज यांच्या सर्व साहित्याचे प्रदर्शन भरविण्यात आले होते. यावेळी ‘मला आवडलेले कुसुमाग्रजांचे पुस्तक’ यावर विद्यार्थ्यांनी मनोगते व्यक्त केली.

मातृभाषेचे वाचन का करावे, कसे करावे, मातृभाषेतून शिक्षण का घ्यावे त्याचप्रमाणे वाचाल तर वाचाल या विषयी शिक्षकांनी मार्गदर्शन केले राष्ट्रगीत होऊन कार्यक्रम संपला.

सारांश(Summary)

आजच्या या पोस्टमध्ये आपण बातमी लेखन मराठी (batmi lekhan in marathi) याविषयी माहिती जाणून घेतली. तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे कॉमेंट मध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांनाही नक्की शेअर करा.

बातमी लेखन मराठी (batmi lekhan in marathi)

Leave a Comment