औरंगाबाद जिल्ह्यातील धरणे माहिती मराठी | Dams in Aurangabad Districts in Marathi

Dams in Aurangabad Districts in Marathi : औरंगाबाद जिल्हा हा महाराष्ट्र राज्यातील मराठवाडा विभागातील महत्त्वाचा जिल्हा आहे. औरंगाबाद हे जिल्ह्यातील मुख्य शहर असून या शहरात मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ आहे. औरंगाबाद जिल्ह्यात साधारण 18 धरणे आहे. त्यामध्ये प्रमुख मोठी दहा धरणे आहेत आणि इतर आठ छोटी धरणे आहेत. आजच्या या पोस्टमध्ये आपण औरंगाबाद जिल्ह्यातील धरणे माहिती मराठी (Dams in Aurangabad Districts in Marathi) जाणून घेणार आहोत.

Dams in Aurangabad Districts in Marathi
औरंगाबाद जिल्ह्यातील धरणे (Dams in Aurangabad Districts in Marathi)

औरंगाबाद जिल्ह्यातील धरणे (Dams in Aurangabad Districts in Marathi)

  • पूर्णा नेवपुर धरण
  • अंबाडी धरण
  • वाकोड धरण
  • नारंगी धरण
  • ढेकू धरण
  • अंजना पळशी धरण
  • टेभापुरी धरण
  • सुखना धरण
  • शिवना टाकळी धरण
  • जायकवाडी धरण

औरंगाबाद जिल्ह्यातील धरणे माहिती मराठी (Aurangabad Districts Dams information in Marathi)

आता आपण औरंगाबाद जिल्ह्यातील धरणे माहिती मराठी (Dams in Aurangabad Districts in Marathi) जाणून घेणार आहोत.

पूर्णा नेवपुर धरण

पूर्णा नेवपुर धरण हे कन्नड तालुक्यातील नेवपुर गावाजवळ आहे. पूर्णा नेवपुर हे धरण औरंगाबाद शहरापासून 70 किलोमीटर अंतरावर आहे. पूर्णा नेवपुर धरण हे गोदावरी नदीची उपनदी पूर्णा या नदीवर बांधण्यात आलेले आहे. पूर्णा नेवपुर धरणाचे बांधकाम 1998 साली पूर्ण झाले. पूर्णा नेवपुर धरणाची उंची 166 मीटर म्हणजे 54 फूट आहे. या धरणाची लांबी 2725 मीटर म्हणजे 8940 फूट आहे. पूर्णा नेवपुर धरणाची पाणी साठवण्याची क्षमता 0.42 टीएमसी म्हणजेच 420 दशलक्ष घनफूट इतकी आहे.

अंबाडी धरण

हे धरण कन्नड तालुक्यातील तेलवाडी गावाजवळ आहे. अंबाडी हे धरण औरंगाबाद शहरापासून 70 किलोमीटर अंतरावर तसेच कन्नड शहरापासून 5 किलोमीटर अंतरावर आहे. अंबाडी हे धरण गोदावरी नदीची उपनदी शिवना या नदीवर बांधण्यात आलेले आहे. अंबाडी धरणाचे बांधकाम 1978 साली झालेल्या आहे. अंबाडी धरणाची उंची 20 मीटर म्हणजे 66 फूट आहे. अंबाडी या धरणाची पाणी साठवण्याची क्षमता 0.42 टीएमसी म्हणजेच 420 दशलक्ष घनफूट इतकी आहे.

वाकोड धरण

हे धरण सिल्लोड तालुक्या जवळ आहे.वाकोड हे धरण औरंगाबाद शहरापासून 42 किलोमीटर अंतरावर आहे. तसेच हे धरण सिल्लोड शहर पासून 31 किलोमीटर अंतरावर आहे. वाकोड हे धरण गोदावरी नदीची उपनदी पूर्णा या नदीची उपनदी गिरीजा या नदीवर बांधण्यात आलेले आहे. वाकोड धरणाची उंची 14.28 मीटर म्हणजेच 46.9 फूट आहे. या धरणाची लांबी 2975 मीटर म्हणजेच 9760 फूट आहे. वाकोड धरणाची पाणी साठवण्याची क्षमता 0.45 टीएमसी म्हणजेच 450 दशलक्ष घनफूट इतकी आहे.

नारंगी धरण

हे धरण वैजापूर तालुक्यातील वैजापूर गावाजवळ आहे. नारंगी हे धरण औरंगाबाद शहरापासून 73 किलोमीटर अंतरावर आहे. नारंगी हे धरण गोदावरी नदीची उपनदी नारंगी या नदीवर बांधण्यात आलेले आहे. नारंगी या धरणाचे बांधकाम 1998 साली झाले. नारंगी धरणाची उंची 17.63 मीटर म्हणजेच 57 फूट आहे. या धरणाची लांबी 3722 मीटर म्हणजेच 12211 फूट आहे. नारंगी धरणाची पाणी साठवण्याची क्षमता 0.47 टीएमसी म्हणजेच 470 दशलक्ष घनफूट आहे.

ढेकू धरण

ढेकू धरण हे वैजापूर तालुक्यातील भटना गावा जवळ आहे. हे धरण औरंगाबाद शहरापासून 56 किलोमीटर अंतरावर आहे. ढेकू हे धरण गोदावरी नदीची उपनदी शिवणा या नदी ची उपनदी ढेकू या नदीवर बांधण्यात आलेले आहे. ढेकू धरणाचे बांधकाम 1960 साली झाले.ढेकू या धरणाची उंची 20 मीटर म्हणजेच 66 फूट आहे. या धरणाची लांबी 2421 मीटर म्हणजेच 7943 फूट आहे. ढेकू या धरणाची पाणी साठवण्याची क्षमता 0.48 टीएमसी म्हणजेच 480 दशलक्ष घनफूट इतकी आहे.

अंजना पळशी धरण

हे धरण कन्नड तालुक्यातील पिशोरे गावाजवळ आहे. अंजना पळशी हे धरण औरंगाबाद शहरापासून 60 किलोमीटर अंतरावर तसेच कन्नड शहरापासून 31 किलोमीटर अंतरावर आहे.अंजना पळशी हे धरण गोदावरी नदीची उपनदी पूर्णा या नदीची उपनदी अंजन या नदीवर बांधण्यात आलेले आहे. अंजना पळशी धरणाचे बांधकाम 1999 साली झाले.अंजना पळशी धरणाची उंची 19.4 मीटर म्हणजे 64 फूट आहे. या धरणाची लांबी 1952 मीटर म्हणजे 6404 फूट आहे. अंजना पळशी या धरणाची पाणी साठवण्याची क्षमता 0.55 टीएमसी म्हणजेच 550 दशलक्ष घनफूट इतकी आहे.

सोलापूर तालुक्यातील टेंबापुरी गावाजवळ आहे तेव्हा कुठे हे धरण औरंगाबाद शहरापासून 33 किलोमीटर अंतरावर धरण गंगापूर शहरापासून 28 किलोमीटर अंतरावर आहे उपनदी नागझरी या नदीवर बांधण्यात आलेले आहे पुढील धरणाचे बांधकाम 1994 साली झाली. पुरी धरणाची उंची सोलापूर पूर्णांक 42 मीटर म्हणजेच 53.9 फूट आहे या धरणाची लांबी पाच हजार तीनशे मीटर म्हणजेच पंधरा हजार चारशे फूट आहे तेंबापुरी या धरणाची पाणी साठवण्याची क्षमता शून्य पूर्णांक 75 टीएमसी म्हणजेच 750 दशलक्ष गण फोडी

टेभापुरी धरण

टेभापुरी हे धरण औरंगाबाद शहरापासून 33 किलोमीटर अंतरावर आहे. तसेच हे धरण गंगापूर शहरापासून 28 किलोमीटर अंतरावर आहे. टेभापुरी हे धरण गोदावरी नदी ची उपनदी नागझरी या नदीवर बांधण्यात आलेले आहे. टेभापुरी या धरणाचे बांधकाम 1994 साली झाले. टेभापुरी धरणाची उंची 16.42 मीटर म्हणजेच 53.9 फूट आहे. या धरणाची लांबी 5300 मीटर म्हणजेच 15400 फूट आहे. टेभापुरी धरणाची पाणी साठवण्याची क्षमता 0.75 टीएमसी म्हणजेच 750 दशलक्ष घनफूट इतकी आहे.

सुखना धरण

हे धरण औरंगाबाद तालुक्याजवळील पिप्री गावाजवळ आहे. सुखना हे धरण औरंगाबाद शहरापासून 25 किलोमीटर अंतरावर आहे. सुखना हे धरण गोदावरी नदीची उपनदी शिवना या नदीवर बांधण्यात आहे. सुखना धरणाचे बांधकाम 1668 साली झाले. सुखना धरणाची उंची 16.92 मीटर म्हणजेच 55.5 फूट आहे. या धरणाची लांबी 446 मीटर म्हणजेच 1463 फूट आहे. सुखना धरणाची पाणी साठवण्याची क्षमता 0.75 टीएमसी म्हणजेच 750 दशलक्ष घनफूट इतकी आहे.

शिवना टाकळी धरण

हे धरण कन्नड तालुक्याजवळील टाक या गावाजवळ आहे. शिवना टाकळी हे धरण औरंगाबाद शहरापासून 50 किलोमीटर अंतरावर आहे. तसेच हे धरण कन्नड शहरापासून 23 किलोमीटर अंतरावर आहे. शिवना टाकळी हे धरण गोदावरी नदीची उपनदी शिवना या नदीवर बांधण्यात आलेले आहे. शिवना टाकळी धरणाचे बांधकाम 2005 साली झाले. शिवना टाकळी धरणाची उंची 17.7 मीटर म्हणजेच 58 फूट आहे. या धरणाची लांबी 4524 मीटर म्हणजेच 14843 फूट आहे. शिवना टाकळी या धरणाची पाणी साठवण्याची क्षमता 1.39 टीएमसी म्हणजेच 1390 दशलक्ष घनफूट इतकी आहे.

जायकवाडी धरण

आपण महाराष्ट्रातील उपयुक्त जलसाठा असलेल्या धरणाची यादी केल्यास जायकवाडी धरण दुसऱ्या क्रमांकावर येते. तर महाराष्ट्रातील एकूण जलसाठा असलेल्या धरणांची यादी केल्यास हे धरण तिसऱ्या क्रमांकावर येते. जायकवाडी हे धरण पैठण तालुक्यातील पैठण गावाजवळ आहे. जायकवाडी हे धरण अहमदनगर आणि औरंगाबाद या दोन जिल्ह्यांच्या सीमेवर आहे. जायकवाडी हे धरण औरंगाबाद शहरापासून 54 किलोमीटर अंतरावर तसेच हे धरण पैठण शहरापासून 2 किलोमीटर अंतरावर आहे. जायकवाडी हे धरण गोदावरी या नदीवर बांधण्यात आलेले आहे. जायकवाडी या धरणाचे बांधकाम 1965 ते 1976 साली झाले. या धरणाच्या जलाशयाला नाथसागर जलाशय असे म्हणतात.

जायकवाडी धरणाची उंची 41.30 मीटर म्हणजेच 135 फूट आहे. या धरणाची लांबी 9998 मीटर म्हणजेच 32802 फूट आहे. या धरणाला 27 दरवाजे आहेत.जायकवाडी या धरणाची पाणी साठवण्याची एकूण क्षमता 102.73 टीएमसी आहे. या धरणाची पाणी साठवण्याची एकूण उपयुक्त क्षमता 76.67 टीएमसी इतकी आहे. या धरणातून 2 कालवे जातात. डावा कालवा आणि उजवा कालवा. या कालव्यातून शेतीला पाणीपुरवठा केला जातो. 60 किलोमीटरची लांबी आणि 10 किलोमीटरची रुंदी इतका मोठा पसारा असलेले या नाथसागराची आशिया खंडातील सर्वात मोठे मातीचे धरण अशी ओळख आहे.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)

जायकवाडी धरण कोणत्या जिल्ह्यात आहे?

जायकवाडी धरण औरंगाबाद जिल्ह्यात आहे.

जायकवाडी धरण कोणत्या नदीवर आहे?

जायकवाडी हे धरण गोदावरी या नदीवर बांधण्यात आलेले आहे.

जायकवाडी धरणाचे दुसरे नाव काय?

जायकवाडी धरणाचे दुसरे नाव नाथसागर आहे.

निष्कर्ष

आजच्या या पोस्टमध्ये आपण औरंगाबाद जिल्ह्यातील धरणे (Dams in Aurangabad Districts in Marathi) जाणून घेतली. औरंगाबाद जिल्ह्यातील धरणे माहिती मराठी (Aurangabad Districts Dams information in Marathi) तुम्हाला कशी वाटली हे कॉमेंट मध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांनाही नक्की शेअर करा.

Leave a Comment