Seven Wonders of the World in Marathi : मित्रानो जगातील सात आश्चर्ये याविषयी तुम्ही नक्कीच कधीतरी ऐकले असेल. आणि तुम्हाला त्यांच्याविषयी माहिती जाणून घ्यायची इच्छा ही झाली असेल. म्हणून तर तुम्ही इथे आला आहात. आज आपण जगातील सात आश्चर्य माहिती मराठी (Seven Wonders of the World in Marathi) पाहणार आहोत.
Contents
जगातील सात आश्चर्ये माहिती मराठी (Seven Wonders of the World in Marathi)
- पेट्रा
- चीन ची भिंत
- कलॉसियम
- चीचेन इट्झा
- माचू पिचू
- ताजमहाल
- ख्रिस्त द रिडीमर
ख्रिस्त द रिडीमर
जगातील सात आश्चर्ये या यादीमध्ये सातव्या क्रमांकावर आहे ख्रिस्त द रिडीमर हा ब्राझील देशाच्या रियो दि जानेरो शहरांमधील येशू ख्रिस्ताचा एक पुतळा आहे. 39.6 मीटर उंच व 30 मीटर रुंद असलेला हा पुतळा येशू ख्रिस्ताचा जगातील पाचव्या क्रमांकाचा सर्वात मोठा पुतळा आहे. या मूर्तीचे वजन 635 टन मानले जाते हे महान मूर्तिकार लेने दोअस्थी यांनी हा पुतळा तयार केला होता.
हा पुतळा व जवळील कोरकू वधू नावाच्या 700 मीटर उंच डोंगरावर असून तो इसवी सन 1922 ते 1931 या काळात बांधण्यात आला होता. हा पुतळा क्रिस्तो रेदेंतोर आणि ब्राझील च्या सर्वात खेळत पूर्ण पैकी एक असून ब्राझीलमधील ख्रिस्ती धर्माचे प्रतीक मानले जाते. 2007 सालीच प्रकाशित झालेल्या जगातील सात नवी आश्चर्ये आणि पैकी ख्रिस्त द रिडीमर हे एक आहे.
ताजमहाल
जगातील सात आश्चर्ये यादीमध्ये सहाव्या क्रमांकावर आहे ताजमहाल. हे भारतातील आग्रा शहरात यमुना नदी काठी असलेले स्मारक आहे. ताजमहल हा मोगस्थापत्यकलेचा उत्कृष्ट नमुना आहे त्याची आर्किटेक्चरल शैली पर्शियन ऑटोमन भारतीय आणि इस्लामिक आर्किटेक्चरच्या घटकांची एक अनोखी समिश्रता आहे. ताजमहल चे बांधकाम इसवी सन 1632 ते 1653 मध्ये पूर्ण झाले. ताजमहल ची उंची 73 मीटर आहे. ताजमहाल बांधण्यासाठी मार्बल राजस्थानच्या मकराना येथून आणला होता.
ताजमहाल ही वास्तू एक मकबरा असून शहाजाने त्याची पत्नी मुमताज हिच्या निधनानंतर तिच्या स्मरणार्थ ताजमहल ची निर्मिती केली त्यामुळे याला प्रेमाचे प्रतीक म्हणून ओळखले जाते. युनेस्को या जागतिक संस्थेने 1983 मध्ये ताजमहल ला जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित केले होते. ताजमहाल बांधण्यासाठी अंदाज 28 प्रकारचे दगड वापरण्यात आले होते या वास्तूचे निर्माण उस्ताद अहमद लाहौरी यांच्या मार्गदर्शनाखाली एकूण 20000 कामगारांनी काम पूर्ण केले होते. भारतातील अतिशय सुंदर अशा वास्तूला दरवर्षी अंदाजे 30 लाख लोक भेट देतात.
माचू पिचू
जगातील सात आश्चर्यांची या यादीमध्ये पाचव्या क्रमांकावर आहे माचू पिचू या दक्षिण अमेरिकन देशात स्थिती कोलंबस युग हे इंकासबे त्याची संबंधित एका ऐतिहासिक स्थळ आहे. या शहराची निर्मिती पंधराव्या शतकात करण्यात आली होती. त्यावेळी येथे इंका जातीचे लोक राहत होते. या प्राचीन शहराला लॉस्ट सिटी ऑफ इंका म्हणून ओळखली जाते. माचू पिचू वरील इमारतींची रचना वारंवार होणारे भूकंप पासून वाचण्यासाठी अत्यंत काळजीपूर्वक करण्यात आली होती.
हे शहरी इंका लोकांच्या उत्तम अभियांत्रिकीचा एक नमुना आहे. हे शहर उर्बाबे वेलीच्या वरच्या डोंगरावर वसलेले आहे. ज्यातून उर्बाबे नदी वाहते. माचू पिचू हे इंका साम्राज्यातील सर्वात परिचित प्रतिकार पैकी एक आहे. माचू पिचू हे 7 जुलै 2007 रोजी जाहीर केलेल्या जगातील सात आश्चर्यांपैकी एक आहे. आणि सुमारे शंभर वर्षांनंतर जेव्हा इंका स्पॅनिश लोकांनी जिंकले तेव्हा ते सोडून दिले गेले जरी स्थानिकांनाही सुरुवातीपासून माहीत असले तरी संपूर्ण जगाला याची ओळख हिरम बिंघम यांनी करून दिली. याचे श्रेय अमेरिकन इतिहासकार ला जाते.
चीचेन इट्झा
जगातील सात आश्चर्यांची यादीमध्ये चौथ्या क्रमांकावर आहे चीचेन इट्झा. हे मेक्सिको देशातील युकाटन या राज्यांमध्ये आहे. चीचेन इट्झा हे माया संस्कृतीतील एक प्राचीन शहर होते. याचे निर्माण कधी झाले याची अचूक माहिती उपलब्ध नाही पण इसवीसन 400 मध्ये याचे निर्माण झाले असावे असा एक अंदाज आहे. चीचेन इट्झा हे तेथील एका भव्य मंदिरासाठी प्रसिद्ध आहे.
चीचेन इट्झा हे दगडा पासून बनलेले हे मंदिर पिरॅमिड सारखे दिसते. यावर विविध प्रकारच्या संस्कृती कलाकृती पहायला मिळतात. ही वास्तू पाच किलोमीटर इतक्या अंतरावर पसरलेली आहे. या मंदिराची उंची 79 फूट आहे. या भव्य मंदिराला 365 पायऱ्या आहेत. या पायऱ्या वर्षातील प्रत्येक दिवसाचे प्रतीक आहे.
कलॉसियम
जगातील सात आश्चर्यांची यादीमध्ये तिसऱ्या क्रमांकावर आहे कलॉसियम. कलॉसियम हे अंडाकृती आकाराचे खुले थेटर आहे. हे थेटर इटलीमधील रोम या शहरांमध्ये असून हे रोम काळात बांधले गेले होते. हे थेटर रोम वास्तु शास्त्र व अभियांत्रिकी चे एक सर्वश्रेष्ठ उदाहरण मानले जाते. या थेटर चे बांधकाम सम्राट व्हस्पासियांच्या मार्गदर्शनाखाली इसवीसन 70 ते 72 या काळामध्ये सुरू झाले. आणि इसवीसन 80 साली पूर्ण झाली. कलॉसियम हे थेटर त्या काळी कला संगीत नाटके लढाया इत्यादी मनोरंजक प्रकारांसाठी वापरले जात असे.
या थेटर ची आसन क्षमता पाच हजार इतकी आहेत. दोन हजार वर्षे जुने कलॉसियम नैसर्गिक भूकंप इत्यादी घटकांमुळे काही अंशी नष्ट झाले असले तरी आजही ते रोमन मधील सर्वात लोकप्रिय पर्यटन स्थळ आहे. 2007 साली प्रकाशित झालेल्या जगातील सात आश्चर्याची यादी मध्ये यांचा समावेश आहे.
चीन ची भिंत
जगातील सात आश्चर्याची यादी मध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे ग्रेट वॉल ऑफ चायना अर्थात चीन ची भिंत. जगातील ग्रेट वॉल ऑफ चायना म्हणून ओळखली जाणारी चीनची भिंत ही अतिप्राचीन काळात उत्तरेकडील सीमेवर मंगोलिया प्रांतातून होणाऱ्या परकीय आक्रमणे थांबविण्यासाठी बांधण्यात आली होती. या भिंतीचे अनेक भाग आहेत जे अनेक राज्यांच्या काळात बांधले गेले होते. चीनचा सम्राट सातव्या शतकामध्ये ही भिंत बांधणे सुरुवात केली. त्याच्या नंतर अनेक राज्यांनी या भिंतीचे बांधकाम केले.
हे बांधकाम पूर्ण होण्यासाठी दोन हजार वर्षे लागली. या भिंतीची लांबी 6450 किलोमीटर आहे. ही भिंत बांधण्यासाठी दगड माती आणि विटा यांचा वापर करण्यात आला आहे. या चीनच्या भिंतीची उंची काही ठिकाणी 35 कुठं पर्यंत आहे. हि भिंत दहा ते पंधरा लोक आरामात चालतील अशी भिंतीची रुंदी आहे. असे म्हटले जाते की लाखो लोकांनी चीन चे भिंत बांधताना त्यांचे प्राण गमावले होते. आणि त्यांचे मृतदेह याच भिंती खाली गाडले गेले होती. त्यामुळे या भिंतीला अनेक जण जगातील सर्वात मोठी स्मशानभूमी ही म्हणतात. ही एवढी मोठी संरक्षक भिंत असून देखील चंगेज खान याने हि भिंत भेधून चीनवर आक्रमण केले होते.
पेट्रा
जगातील सात आश्चर्याची यादी मध्ये पहिल्या क्रमांकावर आहे पेट्रा. हे प्राचीन शहर इसवी सन पूर्व 312 मध्ये बांधण्यात आले होते. पेट्रा हे जॉर्डन देशातील एक प्राचीन शहर आहे. पेट्रा ला अरबी भाषेमध्ये अल बत्रा असे संबोधले जाते. हे शहर सहाव्या शतकामध्ये नावातील साम्राज्याची राजधानी होती. याची निर्मिती ही डोंगर कोरून करण्यात आली आहे.
पेट्रा जॉर्डन मधील एक जगप्रसिद्ध पर्यटनस्थळ आहे. 18 व्या शतकापर्यंत हे शहर आधुनिक जगाला माहीत नव्हते. 1812 साली जोहन बरखा या इतिहासकाराने पेट्रा ची जगाला ओळख करून दिली. असे मानले जाते की पेट्रा चा फक्त 15% भाग शोधला गेला आहे. आणि त्याची 85% भाग अजूनही भूमिगत आहे. युनेस्को या जागतिक संस्थेने 1855 मध्ये जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित केले होते.
सारांश
आजच्या या पोस्टमध्ये आपण जगातील सात आश्चर्ये माहिती मराठी (Seven Wonders of the World in Marathi) याविषयी माहिती जाणून घेतली. तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे कॉमेंट मध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांनाही नक्की शेअर करा.