Zashichi Rani Laxmibai In Marathi : झाशीची राणी लक्ष्मीबाई यांचा माहेरचं नाव मणिकर्णिका तांबे असे होते.पण झाशीचे राजा गंगाधरराव नेवाळकर यांच्याशी विवाह झाल्यावर त्यांना सगळे झाशीची राणी म्हणून ओळखू लागले राणी लक्ष्मीबाई यांचा जन्म 19 नोव्हेंबर 1828 ला उत्तर प्रदेश मधील वाराणसी मध्ये झाला.लहानपणी त्यांना मणिकर्णिका आणि प्रेमाने मनु पण म्हणायचे. त्यांच्या वडिलांचे नाव मोरोपंत तांबे व आईचे नाव भागीरथीबाई होत.
Contents
झाशीची राणी लक्ष्मीबाई मराठी माहिती (Zashichi Rani Laxmibai In Marathi)
पण लक्ष्मीबाई यांच्या आईचा लक्ष्मीबाई चार वर्षाच्या असतानाच निधन झालं होतं त्यामुळे त्यांचा सांभाळ मोरोपंत यांनीच केला. लक्ष्मीबाई यांचे वडील आधुनिक व उच्च विचारा श्रेणी चे होते.मुलींना समाजात स्वातंत्र्य मिळायला हवं असं त्यांना वाटायचं आणि मुली शिकल्यामुळे नक्कीच पुढील अनेक पिढ्या सुशिक्षित होतील असं त्यांना विश्वास होता.वडिलांच्या विचारांचा लक्ष्मीबाईंवर फार प्रभाव होता.लक्ष्मीबाईंना त्यामुळे त्यांच्या वडिलांनी त्या काळातील इतर मुलींच्या तुलनेत अधिक स्वातंत्र्य दिलं होतं.
राणी लक्ष्मीबाईंनी शिक्षणासोबतच आत्मरक्षा,घोडेस्वारी,तलवार चालवणे,धनुर्विद्या याच देखील प्रशिक्षण घेतलं होतं.राणी लक्ष्मीबाई या रोज न चुकता योगाभ्यास पण करायच्या वयाच्या चौदाव्या वर्षी म्हणजे 1842 ला लक्ष्मीबाईंचं लग्न उत्तर भारतातील झाशीचे महाराज गंगाधरराव नेवाळकर यांच्याशी झाले.यामुळेच काशीच्या मणिकर्णिका या झाशीच्या राणी लक्ष्मीबाई झाल्या वैवाहिक जीवन आनंदात चालू असताना 1851 मध्ये त्यांना मुलगा झाला त्या मुलाचं नाव दामोदरराव असं ठेवण्यात आलं पण या बाळाचा चार महिन्यानंतर मृत्यू झाला.
मुलाच्या मृत्यूमुळे राजे गंगाधर राव आजारी राहू लागले म्हणून गंगाधरराव व लक्ष्मीबाईंनी नातेवाईकांच्या मुलाला दत्तक घेण्याचा निर्णय घेतला आणि त्यांनी एक मुलगा दत्तक घेतला आणि त्याचे नाव दामोदर ठेवले.नेहमी आजारी असल्याने अखेर 21 नोव्हेंबर 1853 ला राजा गंगाधरराव नेवाळकर यांचे निधन झालं आधी मुलगा आणि नंतर पतीच्या निधनामुळे राणी लक्ष्मीबाईंनवर दुःखाचा डोंगर कोसळला होता पण लक्ष्मीबाईंनी या दुःखातून स्वतःला सावरलं आणि राज्यकारभार स्वतः चालवण्याचा निर्णय घेतला.(झाशीची राणी लक्ष्मीबाई मराठी माहिती | Zashichi Rani Laxmibai In Marathi)
राणी लक्ष्मीबाई यांची माहिती
पण राणी लक्ष्मीबाईंनी राज्यकारभार सांभाळावा असे इंग्रजांना वाटत नव्हतं म्हणून ते त्याचा विरोध करू लागले लक्ष्मीबाईंनी ज्या वेळेला राज्यकारभाराची सूत्रे हाती घेतली त्यावेळी असा नियम होता की कोणत्याही राजाचा मृत्यू झाल्यास त्या राजाचा मुलगा राजा होईल पण मुलगा नसेल तर ते राज्य पूर्ण इस्तइंडिया कंपनीच्या ताब्यात जाईल या नियमामुळे लक्ष्मीबाईंना खूप संघर्षाचा सामना करावा लागला.राजा गंगाधर रावांच्या मृत्यूनंतर इंग्रजांनी झाशीवर ताबा मिळवण्यासाठी खूप प्रयत्न केले राणी लक्ष्मीबाईंना इंग्रजांच्या सततच्या त्रासामुळे झाशीचा किल्ला सोडून राणी महालामध्ये राहायला जावं लागले.
टोपणनाव | मनिकर्णिका, मनू, बाईसाहेब, छबिली |
जन्म | नोव्हेंबर 19, 1835काशी |
मृत्यू | १७ जून, १८५८ ग्वालियर, मध्य प्रदेश |
धर्म | हिंदू मराठी |
वडील | मोरोपंत तांबे |
झाशीची राणी लक्ष्मीबाई
पण एवढे संकट येऊन पण त्या घाबरला नाही राज्य इंग्रजांच्या ताब्यात जाऊ द्यायचं नाही या निर्णयावर त्या ठाम होत्या काहीही करून राज्य वाचवायचं या विचाराने त्यांनी सैन्य एकत्र करण्यास सुरुवात केली.झाशी ताब्यात घेण्याचा 7 मार्च 1854 ला इंग्रजांनी आदेश काढला त्यात झाशी राज्याला इंग्रजांच्या साम्राज्यात समाविष्ट करण्याचा निर्णय घेण्यात आला होता राणी लक्ष्मीबाईंनी या आदेशाला विरोध करत मे मेरी झांशी नही दुंगी असे इंग्रजांना कळवले आणि इथूनच इंग्रज आणि लक्ष्मीबाई यांच्यामध्ये संघर्ष वाढला.
10 मे 1857 ला इंग्रजांच्या विरोधातला संघर्ष चांगलाच पेटला आणि यामध्ये इंग्रजांच्या काही कृत्यामुळे हिंदू धर्मियांच्या भावना दुखावल्या.आनी देशात सगळीकडे इंग्रजांविरोधात संघर्षाने भेट घेतला त्यामुळे इंग्रजांनी हे प्रकरण मिटवले व झाशीच्या लक्ष्मीबाईंना त्यांचे राज्य देऊन टाकले.नंतरच्या युद्धात लक्ष्मीबाईंच्या सैन्यात युद्धकूषल आणि विद्वान असे गुलाम खान,खुदाबक्ष,सुंदरमुंदर काशीबाई,मोतीबाई, लालाभाऊबक्षी,दिवान रघुनाथ सिह यांच्यासोबतच 1400 सैन्य सहभागी होते.
पण झाशी मिळवण्याचा हट्ट असलेले इंग्रजांनी झाशीवर पुन्हा हल्ला केला यावेळी झाशीच्या सैनिकांनी इंग्रज सैनिकांना चोक प्रत्युत्तर दिले आणि दोन आठवड्या पर्यंत त्यांना रोखून धरलं पण इंग्रजांच्या बलाढ्य अशा सैन्यासमोर राणी लक्ष्मीबाई यांना पराजय पहावा लागला.1858 साली इंग्रजांनी झाशी ताब्यात घेतल्यानंतर राणी लक्ष्मीबाई ही आपल्या सैन्यासोबत काल्पी येथे पोहचल्या.कालबी येथे राणी लक्ष्मीबाई यांना तात्या टोपे यांनी मदत केली. त्यांनी लक्ष्मीबाई यांना तेथे आश्रय तर दिलाच आणि त्यांचं सैन्य पण त्यांच्या मदतीसाठी दिलं.
22 मे 1858 ला सर भुईरोज यांच्या नेतृत्वात इंग्रजांनी कालबी वर हल्ला केला.यावेळी राणी लक्ष्मीबाई यांनी आपल्या सैन्याच्या व स्वतःच्या अतुलनीय शौर्याने विजय मिळवला पण काही दिवसानंतर लगेच इंग्रजांनी परत कालबी वर हल्ला केला आणि यावेळी मात्र लक्ष्मीबाईंना पराजय पत्करावा लागला.कालबीच्या पराभवानंतर राणी लक्ष्मीबाईंनी तात्या टोपेंच्या मदतीने ग्वालियरच्या राजा विरोधात युद्ध केलं आणि विजय मिळवला यानंतर लक्ष्मीबाईंनी किंग रॉयल आयरिश विरोधात युद्ध पुकारला खरं राणी लक्ष्मीबाई च रूप या युद्धात दिसलं दोन्ही हातात धारदार तलवार आणि मुलाला पाठीवर बांधून राणी लक्ष्मीबाई या इंग्रज सैनिकांसोबत लढत होत्या.
- जयगड किल्ला माहिती मराठी (Jaigad fort information in Marathi)
- महाबळेश्वर माहिती मराठी (mahableshwar information in marathi)
या युद्धात महिला सैनिकांची पण चांगली साथ मिळाली होती पण या युद्धात राणी लक्ष्मीबाई फार जखमी झाल्या आणि त्या घोड्यावरून खाली कोसळल्या. पण पुरुषी पोशाख घातल्या असल्याने इंग्रज लक्ष्मीबाई यांना ओळखू शकले नाहीत आणि त्यांना युद्ध मैदानात सोडून निघून गेले. राणी लक्ष्मीबाईंना त्यांचे सैनिक एका मठात घेऊन गेले कोणताही इंग्रज माझ्या देहाला स्पर्श करणार नाही ही त्यांनी शेवटची इच्छा व्यक्त केली होती आणि 17 जून 1858 ला कोठा येथील सराईजवळ ग्वालियर मधील फुलबाग येथे राणी लक्ष्मीबाई यांना वीरमरण आले.
सतत विचारले जाणारे प्रश्न (FAQ)
झाशीच्या राणीचे नाव काय होते ?
झाशीच्या राणीचे नाव मणिकर्णिका तांबे हे होते.
झाशीची राणी कशासाठी प्रसिद्ध होती ?
झाशीची राणी 1857 च्या भारतीय बंडातील एक प्रमुख व्यक्तिमत्व होती.
झाशीची राणी लक्ष्मीबाईची अशी कोणती मागणी होती जी इंग्रजांनी नाकारली होती ?
झाशीच्या राणी लक्ष्मीबाईंना ईस्ट इंडिया कंपनीने तिच्या पतीच्या मृत्यूनंतर राज्याचा वारस म्हणून दत्तक मुलाला मान्यता द्यावी अशी इच्छा होती . ही मागणी इंग्रजांनी नाकारली.
राणी लक्ष्मीबाई यांचा जन्म कधी झाला ?
राणी लक्ष्मीबाई यांचा जन्म 19 नोव्हेंबर 1835 रोजी झाला.
निष्कर्ष (summary)
आजच्या या लेखात आपण झाशीची राणी लक्ष्मीबाई मराठी माहिती (Zashichi Rani Laxmibai In Marathi) ही माहिती जाणून घेतली. ही माहिती कशी वाटली हे कॉमेंट मध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांना पण नक्कीच शेअर करा.