विरामचिन्ह माहिती मराठी | viram chinh in marathi

viram chinh in marathi : बोलता ना आपण आवाजात चड-उतार करून बोलतो आणि आपले भाव व्यक्त करतो.बोलण्यातील तोच भाव लेखनात नेमकेपणाने यावा आणि वाचकाला तो आशय सहजपणे समजावा म्हणून लेखनात आपण विरामचिन्हांचा उपयोग करतो.विराम म्हणजे थांबणे मराठी भाषेत पूर्णविराम,स्वल्पविराम,प्रश्नचिन्ह,उद्गारचिन्ह,इत्यादी महत्त्वाची विरामचिन्ह आहेत.आपण बोलताना मध्ये-मध्ये थांबतो वाचताना सुद्धा वाक्य कोठे संपते,प्रश्न कोठे आहे,उद्गार कोणता वाक्यात कोठे व किती थांबावे हे कळले पाहिजे ते समजण्यासाठी जी चिन्हे वापरली जातात त्यांना विरामचिन्ह म्हणतात.विरामचिन्हांचे काही प्रकार आहेत ते पाहूया.

viram chinh in marathi
विरामचिन्ह माहिती मराठी (viram chinh in marathi)

विरामचिन्ह माहिती मराठी (viram chinh in marathi)

1.पूर्णविराम (.)

पूर्णविराम हे पूर्ण विरामचिन्ह आहे वाक्य पूर्ण झाले,हे समजण्यासाठी पूर्णविराम वापरतात.

उदाहरणार्थ 

 • मी दररोज शाळेत जातो.

जातो नंतर पूर्णविराम येतो.

2.अर्धविराम (;)

आहे दोन छोटी वाक्य उभयान्वयी अव्ययांनी जोडले जातात तेंव्हा हे चिन्ह वापरतात. 

उदाहरणार्थ

 • गड आला;पण सिंह गेला.

गड आला या शब्दानंतर अर्धविराम वापरलेला आहे.

3.अपूर्णविराम (:)

वाक्याच्या शेवटी तपशील द्यायचा असल्यास अपूर्णविराम वापरावा.

उदाहरणार्थ 

पुढील उदाहरणे सोडवा:

सोडवा या शब्द नंतर अपूर्णविराम दिलेला आहे.

4.स्वल्पविराम (,) 

एकाच जातीचे शब्द लागोपाठ आल्यास स्वल्पविराम वापरतात किंवा हाक मारून काही सांगताना नावापुढे संबोधनापुढे स्वल्पविराम वापरतात.

उदाहरणार्थ 

 • गंगा,यमुना,सरस्वती,कावेरी,गोदावरी या भारतातील नद्या आहेत.
 • शामल,पुस्तके दे.

5. प्रश्नचिन्ह (?)

वाक्यात प्रश्न विचारला असेल तर वाक्याच्या शेवटी हे चिन्ह वापरतात.

उदाहरणार्थ 

 • तू कोठे गेला होतास ? 

या वाक्यामध्ये वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह वापरले आहे.

विरामचिन्हांची नावेविरामचिन्हे 
पूर्णविराम (.)
अर्धविराम (;)
अपूर्णविराम (:)
प्रश्नचिन्ह (?)
उद्गारवाचक(!)
अवतरण चिन्ह(‘ ‘)
संयोग चिन्ह (-)
अपसारण चिन्ह 
अवग्रह (ऽऽ)
काकपद (^)
विरामचिन्ह माहिती मराठी (viram chinh in marathi)

6.उद्गारवाचक

मनातील भावना व्यक्त करणाऱ्या शब्दाच्या शेवटी हे चिन्ह वापरतात.

उदाहरणार्थ 

 • बापरे! केवढा कासव!

या वाक्यामध्ये बापरे आणि कासव यानंतर उद्गारवाचक चिन्ह आलेली आहे.

7.अवतरण चिन्ह(‘ ‘)

अवतरण चिन्हाचे दोन प्रकार आहेत.

 • एकेरी अवतरण चिन्ह (‘ ‘)
 • दुहेरी अवतरण चिन्ह (” ”)

एकेरी अवतरण चिन्ह (‘ ‘)

एखाद्या शब्दावर जोर देताना किंवा दुसऱ्याचे मत सांगताना एकेरी अवतरण चिन्ह वापरतात 

उदाहरणार्थ 

 • गांधीजींनी ‘चले जाव’ ही घोषणा दिली.

दुहेरी अवतरण चिन्ह (” ”)

बोलणाऱ्याच्या तोंडचे शब्द दाखवताना हे चिन्ह वापरले जाते.

उदाहरणार्थ 

 • शरद म्हणाला ”मी सहलीला येईल”

8. संयोग चिन्ह (-)

दोन शब्द जोडताना संयोग चिन्ह वापरतात त्याबरोबरच ओळीतील शेवटचा शब्द जर तोडावा लागत असेल तर त्याचे दोन भाग करताना संयोग चिन्ह वापरले जाते.

उदाहरणार्थ 

 • आई-वडील. 
 • महाराष्ट्रात अनेक बोली-भाषा वापरल्या जातात.

9.अपसारण चिन्ह —

वाक्याच्यापुढे तपशील द्यायचा नसल्यास अपसारण चिन्ह वापरतात.

उदाहरणार्थ 

 • महाराज तुमचा राजवाडा जळून

जळून या शब्दानंतर अपसारण चिन्ह दिलेली आहे.

10.अवग्रह (ऽऽ)

एखाद्या वर्णाचा दीर्घ (लांब) उच्चार करताना हे चिन्ह वापरले जाते.

उदाहरणार्थ 

 • अहोऽऽ अय्याऽऽ 

11. काकपद (^)

लेखन करताना एखाद्या राहिलेला शब्द लिहिण्यासाठी काकपद वापरले जाते.

उदाहरणार्थ 

फक्त मी खेळतो जर असं वाक्य लिहिले असेल तर क्रिकेट हा शब्द वरती लिहावा आणि क्रिकेटच्या खाली काकपद वापरावी.

  क्रिकेट

मी ^खेळतो

विरामचिन्हे मराठी नावे

 • पूर्णविराम
 • अर्धविराम
 • अपूर्णविराम
 • प्रश्नचिन्ह
 • उद्गारवाचक
 • अवतरण चिन्ह
 • संयोग चिन्ह
 • अपसारण चिन्ह 
 • अवग्रह
 • काकपद 

   सतत विचारले जाणारे प्रश्न(FAQ)


   उद्गारवाचक चिन्ह कसे असते?

   उद्गारवाचक चिन्ह (!) 

   उद्गारवाचक वाक्य म्हणजे काय?

   मेरियम-वेबस्टर डिक्शनरी ‘उद्गार’ या शब्दाची व्याख्या “तीक्ष्ण किंवा अचानक उच्चार” किंवा “निषेध किंवा तक्रारीची तीव्र अभिव्यक्ती” म्हणून करते.

   निष्कर्ष

   आजच्या या लेखात आपण विरामचिन्ह माहिती मराठी (viram chinh in marathi) जाणून घेतली. ही माहिती कशी वाटली हे कॉमेंट मध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांना पण नक्कीच शेअर करा.

   विरामचिन्ह माहिती मराठी (viram chinh in marathi)

   Leave a Comment