maharani tarabai information in marathi : राजाराम राजांच्या पत्नी महाराणी ताराबाईंनी म्हणजे मराठ्यांच्या इतिहासातील असामान्य व्यक्तिमत्व स्वराज्याचे सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या कन्या छत्रपती संभाजीराजांनी राज्याभिषेक झाल्यानंतर त्यांचे सावत्र भाऊ राजाराम राजांचे ताराबाईशी लग्न लावून दिले ताराबाई या राजाराम राजांच्या द्वितीय पत्नी होत्या.
Contents
महाराणी ताराबाई माहिती मराठी (maharani tarabai information in marathi)
रायगडावरच त्यांना भालाफेक,घोडेस्वारी,तलवारबाजी यांचे शिक्षण मिळाले.राज कुटुंबात प्रवेश झाल्याने चिवडा सुखाचा आनंद घ्यावा लागणार होता तसेच दुःखाचे डोंगरही पचवावे लागणार होते.इसवीसन 1687 मध्ये हंबीररावांचा तोफेचा गोळा लागून मृत्यू झाल्याचे समजतात ताराबाईंना प्रचंड दुःख झाले.
छत्रपती संभाजी राजांच्या वधा नंतर महाराणी येसूबाईंच्या सल्ल्याने राजाराम महाराज आणि त्यांचा कुटुंबकबिला त्यांच्यासोबत रायगडाबाहेर पडला राजाराम राजांनी कर्नाटकात जाताना महाराष्ट्राचा कारभार महाराणी ताराबाई यांच्याकडे देऊन त्यांच्या मदतीला रामचंद्रपंत अमात्य,शंकराजी नारायण,संताजी घोरपडे,धनाजी जाधव यांसारखे वीर ठेवले होते.ताराबाईंनी लवकरच स्वतःच्या बुद्धिमत्तेच्या जोरावर स्वतःचा ठसा उमटवायला सुरुवात केली.
औरंगजेब मराठा सरदारांना वतनाची लालच दाखवून स्वतःकडे खेचून घेण्याचा प्रयत्न करत होता.त्यामुळे शिवाजीराजांनी बंद केलेली वतनदारी पद्धत परत चालू करण्याचा निर्णय अगदी नाइलाजाने ताराबाईंना घ्यावा लागला होता.राजाराम राजांचा आज्ञेने विशाल गडावर असलेल्या ताराबाई गुप्तरित्या जिंजी किल्ल्यावर पोहोचल्या जिंजीच्या वास्तव्यात असताना दिनांक 9 जून 1696 रोजी ताराबाईंना मुलगा झाला.
महाराणी ताराबाई यांची माहिती
त्या मुलाचे नाव शिवाजी ठेवण्यात आले जिंजी किल्ला जुल्फीकार खानाने जिंकून घेतल्यानंतर ताराबाई या राजाराम राजांसोबत महाराष्ट्रात परतल्या सततची दगदग आणि प्रवासामुळे सिंहगडावर असताना छत्रपती राजाराम राजांच्या मृत्यू झाला.त्यावेळी ताराबाई या विशाल गडावर होत्या एकीकडे औरंगजेबाचा वाढता जोर आणि दुसरीकडे स्वराज्याचे छत्रपती मृत्युमुखी पडले असताना जराही विचलित न होता ताराबाईंनी स्वतःला सावरले.
नाव | ताराबाई राजारामराजे भोसले |
जन्म साल | 1675 |
मृत्यू दिनांक | 9 डिसेंबर 1761 |
वडीलांचे नाव | हंबीरराव मोहिते |
पती | छत्रपती राजाराम महाराज |
राजघराणे | भोसले |
ताराबाईंनी स्वतःच्या मुलाला शिवाजी राजांना राज्याभिषेक करऊन त्यानं छत्रपती म्हणून घोषित केले. शिवाजी राजे लहान असल्याने स्वराज्याच्या कारभाराची सर्व सूत्रे ताराबाई यांनी स्वतःच्या हाती घेतली.रामचंद्रपंत अमात्य,शंकराजी नारायण,परशुराम पंथ खंडो बल्लाळ,धनाजी जाधव,संताजी घोरपडे,खंडेराव दाभाडे,सिद्धोजी घोरपडे,उदाजी चव्हाण,कान्होजी आंग्रे अशा अनेक सरदारांच्या मदतीने ताराबाईंनी औरंगजेबाला सळोकी-पळो करून सोडले होते .
मोगलानी वेडा दिलेला किल्ला जास्तीत जास्त लढवायचा शत्रूची जेवढी हानी करता येईल तेवढी करायची आणि पावसाळा तोंडावर आला की मुघलांकडून जबरदस्त रक्कम घेऊन किल्ला त्यांच्या ताब्यात द्यायचा आणि हाच किल्ला काही दिवसांनी परत घ्यायचा असा सफाटा ताराबाईंनी लावला होता. ताराबाईंच्या ह्या नीतीमुळे औरंगजेब अगदी मेटाकुटीला आला होता.शत्रू च्या कैदी तून सुटून आल्यानंतर शाहू राजांनी सातारा येथे स्वतःला राज्याभिषेक करून घेतला आणि सातारा ही आपली राजधानी घोषित केली.
- नरनाळा किल्ला माहिती मराठी (Narnala fort information in Marathi)
- सातारा जिल्ह्यातील पर्यटन स्थळे (Tourist places of Satara in Marathi)
शाहू महाराज हे स्वराज्याचे खरे वारसदार होते पण ताराबाईंना हे मान्य नव्हते त्यांचे असे म्हणणे होते की छत्रपती संभाजी राजांच्या मृत्यूनंतर विस्कटलेले राज्य राजाराम राजांनी राखले होते.त्यामुळे शाहू महाराज हे वारसदार ठरू शकत नाहीत त्यामुळे ताराबाईंना मानणारा आणि शाहू राजांना मानणारा असे दोन गट तयार झाले.ताराबाईंनी पन्हाळा ही राजधानी घोषित केली होती ताराबाईंना अनपेक्षित अशी घटना पन्हाळगडावर घडली राजाराम राजांच्या तिसऱ्या पत्नी राजेशबाईंना ताराबाईंना कैद करून स्वतःच्या मुलास संभाजी राजांना गादीवर बसवले .
या कैदेत असतानाच ताराबाईंचे पुत्र शिवाजी राजांचा मृत्यू झाला इसवीसन 1730 साली वारणेच्या काठी झालेल्या युद्धात राजेशबाई पुत्र संभाजी राजे यांचा पराभव झाला.संभाजी राजांचे संपूर्ण कुटुंब शाहू राजांच्या ताब्यात आले पण ताराबाईंनी शाहून बरोबर साताऱ्यात जाण्याची इच्छा व्यक्त त्यांच्या इच्छेप्रमाणे त्यांना साताऱ्यात आणण्यात आले.दिनांक 10 डिसेंबर 1761 रोजी साताऱ्याच्या मुक्कामातच महाराणी ताराबाईंचा मृत्यू झाला महाराणी ताराबाईंनी आपल्या वडिलांचा शौर्याचा पराक्रमाचा वारसा पुढे चालवला.
ताराबाईंनी शिवाजीराजांप्रमाणेच माणसे जपली नव्याने निर्माण केली.आपल्या हुशारीच्या जोरावर औरंगजेबाला त्याचे उरलेले आयुष्य मोहिमा करण्यात आणि किल्ले घेण्याच्या कामी खर्च करायला भाग पाडले.ताराबाईंच्या एकंदर काम करण्याच्या कार्यपद्धतीचा गौरव करताना मोगली इतिहासकार म्हणतो की ताराबाई या राजाराम राजांच्या थोरल्या पत्नी त्या अतिशय बुद्धिमान आणि शहाणे होत्या सैन्याची व्यवस्था आणि कारभार याबाबतीत राजाराम राजांच्या हयातीतच ताराबाईंनी मोठा लौकिक मिळवला होता.पुढे जाऊन तो म्हणतो राजाराम राजांच्या पत्नी ताराबाईंनी विलक्षण धामधूम उडवली होती त्यात त्यांच्या सैन्यच्या नेतृत्वाचे आणि मोहिमेच्या व्यवस्थेचे गुण प्रकट झाले आहेत.(महाराणी ताराबाई माहिती मराठी | maharani tarabai information in marathi)
त्यामुळे मराठ्यांचे आक्रमण आणि त्यांची धामधूम दिवसेंदिवस वाढतच गेली.भीमसेन सक्सेना नावाचा मोगली इतिहासकार म्हणतो की ताराबाईंनी इतकी उत्तम व्यवस्था केली की मराठी सरदार त्यांच्या आज्ञेशिवाय काहीही करत नसत.कवी परमानंद यांचे पुत्र देवदत्त हे महारानी ताराबाईंच्या पराक्रमाचे वर्णन करताना म्हणतात की.दिल्ली झाली दीनवाणी दिल्लीशाच्या चे गेले पाणी ताराबाई रामराणी भद्रकाली कोपली.महाराणी ताराबाईंची समाधी संगम माऊली जिल्हा सातारा येथे आहे.तर ताराबाई पुत्र शिवाजी राजांची समाधी पन्हाळगडावर आहे.
महाराणी ताराबाई जन्म
महाराणी ताराबाई यांचा जन्म 1675 साली झाला.
सतत विचारले जाणारे प्रश्न (FAQ)
महाराणी ताराबाई यांनी स्वतंत्र राज्य कोठे स्थापन केले ?
12-1-1708 रोजी शाहूराजे यांचा साताऱ्यात राज्याभिषेक झाला.काही काळानंतर ताराराणी यांनी पन्हाळा, विशाळगड पुन्हा जिंकून घेतले आणि 1710 साली कोल्हापूर राज्याचा पन्हाळ्यावरती पाया रचला. त्यामुळे 1710 साली एका स्वतंत्र राज्याची निर्मिती झाली.
महाराणी ताराबाई यांच्या मुलाचे नाव काय ?
महाराणी ताराबाई यांच्या मुलाचे नाव शिवाजी होते.
महाराणी ताराबाई पुण्यतिथी
ताराबाईंचे निधन ९ डिसेंबर १७६१ रोजी साताऱ्यातील अजिंक्यतारा किल्ल्यावर झाले.
छत्रपती राजाराम महाराज यांच्या पहिल्या पत्नीचे नाव काय ?
छत्रपती राजाराम महाराज यांच्या पहिल्या पत्नी महाराणी जानकीबाई या होत्या.
निष्कर्ष (summary)
आजच्या या लेखात आपण महाराणी ताराबाई माहिती मराठी (maharani tarabai information in marathi) ही माहिती जाणून घेतली. ही माहिती कशी वाटली हे कॉमेंट मध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांना पण नक्कीच शेअर करा.