saransh lekhan in marathi:सारांश म्हणजे काय ते आपण बघणार आहोत. आजचे युग हे धावपळीचे युग आहे आणि आपल्याला जे काही बोलायचे असेल ते सर्व समरी मध्ये बोलावे लागते कारण तेवढं सगळं ऐकायला कुणाला वेळ नसतो. जेव्हा आपण एखादा चित्रपट पाहतो तेव्हा आपण त्या चित्रपटाबद्दल इतरांना सांगतो तेव्हा आपण तो चित्रपट थोडक्यात सांगतो,असे सांगतो की त्यामध्ये सर्व मुद्दे येतील.

Contents
- 1 सारांश लेखन मराठी(saransh lekhan in marathi)
- 2 सारांश लेखनाच्या पायऱ्या
- 3 दिलेल्या परिच्छेदाचे वाचन
- 4 परिच्छेदातील आशयाचे आकलन होणे.
- 5 मध्यवर्ती विचार जाणून घेणे.
- 6 समजलेला विचार स्वत:च्या शब्दांत थोडक्यात मांडणे.
- 7 योग्य शीर्षक द्यावे.
- 8 खालील उताऱ्याचा एक तृतीयांश एवढा सारांश तुमच्या शब्दांत लिहा.
- 9 सारांश:
- 10 सत्याग्रह
- 11 खालील उताऱ्याचा एक तृतीयांश एवढा सारांश तुमच्या शब्दांत लिहा.
- 12 खालील उताऱ्याचा एक तृतीयांश एवढा सारांश तुमच्या शब्दांत लिहा.
- 13 निष्कर्ष (summary)
सारांश लेखन मराठी(saransh lekhan in marathi)
तसेच प्रश्नपत्रिके मध्ये एखादा अपठीत उतारा दिलेला असतो आणि तो आपल्याला असा लिहायचा असतो की त्या उताऱ्यामधील सर्व मुद्दे येतील. जो आपल्याला अपठीत उतारा दिलेला असतो त्या उताऱ्याचा सारांश लिहिणे म्हणजे तोच उतारा एक तृतीयांश शब्दात लिहिणे.एखाद्या उताऱ्याचा आपल्याला जर सारांश लिहायचा असेल तर त्याला एक तृतीयांश संक्षिप्त रूप द्यावा लागतं. उताऱ्याला संक्षिप्त रूप प्राप्त करून देण्यासाठी एक कौशल्य आत्मसात हवं लागतं.
सारांश लेखनाच्या पायऱ्या
- दिलेल्या परिच्छेदाचे वाचन.
- परिच्छेदातील आशयाचे आकलन होणे.
- मध्यवर्ती विचार जाणून घेणे.
- समजलेला विचार स्वत:च्या शब्दांत थोडक्यात मांडणे.
- योग्य शीर्षक द्यावे.
दिलेल्या परिच्छेदाचे वाचन
जो उतारा किंवा जो परिच्छेद दिलेला आहे त्याचा आपल्याला किमान दोन वेळा वाचन करायच आहे.तर पहिल्यांदा आपण तो उतारा जेव्हा वाचतो तेव्हा आपल्याला त्या उताऱ्याचा अर्थ उमगतो मग जेव्हा तो उतारा आपण दुसऱ्यांदा वाचतो तेव्हा त्या उताऱ्यामध्ये नेमकं काय सांगितलेलं आहे किंवा त्या उताऱ्यामधील विचार काय आहेत आणि कोण कोणते महत्त्वाचे मुद्दे आहेत हे आपल्याला समजते.
परिच्छेदातील आशयाचे आकलन होणे.
आपल्याला जो उतारा दिलेला असतो तो उतारा कमीत कमी सात ते आठ ओळींचा असतो मग आपल्याला त्या उताऱ्याचा दोन ते तीन ओळींमध्ये सारांश लिहायचा असतो.यासाठी त्या उताऱ्याचे आकलन होणे महत्त्वाचे आहे व त्या उताऱ्यामध्ये काय काय सांगितलेलं आहे हे समजणे देखील महत्वाचे आहे.
मध्यवर्ती विचार जाणून घेणे.
दिलेल्या उताऱ्याची मध्यवर्ती कल्पना काय आहे, मध्यवर्ती विचार काय आहे हे सर्व जाणून घेणे महत्त्वाचे आहे.
समजलेला विचार स्वत:च्या शब्दांत थोडक्यात मांडणे.
दिलेला उतारा वाचल्यानंतर जे काही आपल्याला समजतं जे काही आपल्याला उमगत ते आपल्याला स्वतःच्या भाषेमध्ये लिहायचं आहे. म्हणजेच जे उताऱ्यामध्ये सांगितलेले आहे ते सर्व सविस्तर मध्ये असेसांगितलेला असणार आहे तेच आपल्याला तीन ते चार ओळीत आपल्या भाषेत लिहायचं असतं. आपली भाषा सुद्धा मराठी भाषेला अनुसरून असली पाहिजे.
योग्य शीर्षक द्यावे.
आपण जो सारांश लिहिलेलं आहे त्या उताऱ्याला योग्य शीर्षक देणे हे महत्त्वाचे आहे. शक्यतो प्रश्नांमध्ये शीर्षक द्या असे सांगितलेले असते.आपण जेव्हाही एखाद्या उताऱ्याचा सारांश लिहीत असतो तेव्हा आपल्याला आपल्या मनाच्या कोणत्याही गोष्टी त्यामध्ये टाकायचा नाहीत. आपण ज्या उताऱ्यावर सारांश लिहीत असतो त्या उतारातील म्हणी किंवा अलंकार शब्द हे सारांश यामध्ये लिहू नयेत.उताऱ्यामध्ये जी मूळ वाक्य आहेत ती आहे तशी लिहू नयेत.आपण जो मजकूर लिहू तो तृतीय पुरुशात लिहायचा आहे.
खालील उताऱ्याचा एक तृतीयांश एवढा सारांश तुमच्या शब्दांत लिहा.
विचाराने एखादी गोष्ट समजावून दिली की ती माणसाला पटते. समजावून देण्याऐवजी भय दाखवून मार देण्याची भीती दाखवून पटवण्याचा प्रयत्न केला, तर भीती निर्माण होते; भीती न दाखवावी; तर माणूस स्वच्छंदी बनतो. सिंहाचे बळ त्याच्या दातांत आहे. हत्तीचे सामर्थ्य सोंडेत आहे. गाई-बैलांची शक्ती त्यांच्या शिंगांत आहे, तसे मानवाचे सर्वस्व कोणते–तर माणसाची शक्ती, ती त्याच्या बुद्धीत आहे.
शारीरिक शक्तीला मर्यादा असते, पण बुद्धीला मर्यादा नसते. म्हणून माणूस प्राण्यांचा राजा बनला. या पृथ्वीवर राज्य करू लाग पण याच बुद्धीमुळे माणूस अहंकारी बनला. बुद्धीचा वाईट उपयोग करू लागला. निर्बुद्धपणाने वागून तो आपले सामर्थ्य न ओळखील तर आपली शक्ती तो गमावून बसेल. माणसाच्या या बुद्धिसामर्थ्याला नीट मार्गावर ठेवण्यासाठी जो प्रयत्न केला जातो तो सत्याग्रह किंवा सत्यदर्शन !
- अक्षवृत्ते व रेखावृत्ते (Axes and Circles in marathi)
- अर्ज कसा लिहावा मराठी (How to write an application in Marathi)
सारांश:
सत्याग्रह
माणसाला वळण लावण्यासाठी मार देण्याची, भय दाखवण्याची गरज नसते. कारण तो बुद्धिमान आहे. त्याला एखादी गोष्ट पटवून दिली की समजते, पण माणूस कधी ना कधी बुद्धीचा उपयोग चुकीच्या पद्धतीने करतो. ही चूक दुरुस्त करण्याचा सत्याग्रह हा मार्ग आहे.
खालील उताऱ्याचा एक तृतीयांश एवढा सारांश तुमच्या शब्दांत लिहा.
भाषा ही मानवाची विशेष निर्मिती आहे. मानवी व्यवहाराचे प्रभावी माध्यम आहे. तसेच ते एक ज्ञान संपादनाचे व अभिव्यक्तीचे प्रभावी साधन आहे. एका शतकाकडून दुसऱ्या शतकाकडे वाटचाल करताना भाषा ही नेहमी भूतकाळाला सोबत घेऊन वर्तमानाला आपल्यात सामावून घेत, भविष्याकडे वाटचाल करीत असते. भाषा आणि सांस्कृतिक वारसा यांचे जैविक नाते असते. सांस्कृतिक वारशाचे जतन आणि पुढच्या पिढीकडे संक्रमण भाषेद्वारा होत असते.
नवे संबोध, नव्या संज्ञा, नव्या कल्पना, नवे विचार यांच्याद्वारे सांस्कृतिक वारशात पडणारी भर भाषेला समृध्द करत असते हे सारे मुख्यतः साहित्याच्या माध्यमातून होत असते. म्हणूनच प्राथमिक स्तरापासून मुलांच्या वयाशी सुसंगत अशा साहित्याचा समावेश अभ्यासक्रमात केला जातो. त्या साहित्यामुळे विद्यार्थ्याचे भावनिक जीवन संतुलित बनते, वैचारिक समृद्धता येते आणि भाषिक कौशल्य सहज साध्य होतात. एवढेच नव्हे तर साहित्यातून मूल्य संस्कार होतात. वाङमयीन अभिरुची वाढते. व्यक्तीमत्त्व संपन्न होते. निसर्ग, राष्ट्र यांच्याबद्दल प्रेम व कर्तव्य वाटून नैतिक संस्कार होतात व त्यातून खऱ्या जीवनाचा आस्वाद घेता येतो.
खालील उताऱ्याचा एक तृतीयांश एवढा सारांश तुमच्या शब्दांत लिहा.
आजपर्यंत संतांनी, विचारवंतांनी प्रेमाचा संदेश घरोघरी पोहोचविला आहे. माणसाची आपल्याकडून किमान अपेक्षा असते, फक्त चार शब्द गोड बोलण्याची! तुम्ही एखाद्याचं काम करा किंवा करू नका. पण तुम्ही सहानुभूतीच्या, प्रेमाच्या चार शब्दांनी त्याला धीर देऊ शकता. तुमचे ते चार शब्द त्याला आधारासारखे वाटतात. पण माणसाचा स्वभाव असा आहे की, आपण प्रत्येक वेळी व्यावहारिक पातळीवर वावरत असतो. |
सध्याच्या जगात कुणालाही व्यावहारिक पातळीवर जगावंच लागतं, हे मान्य करूनही असं वाटतं की त्याला | भावनिक जोड दयायला हवी. सानेगुरूजी जीवनभर या भावनिक पातळीवर जगले. त्यामुळेच ते साऱ्यांना | प्रेम देऊ शकले. ‘दुःखितांचे दु:ख जावो ।’ ही प्रार्थना सतत परमेश्वराजवळ करीत राहिले. आपण स्वत:साठी जगतोच पण त्याचबरोबर आपलं जगणं थोडसं इतरांसाठी असलं तर त्याने जगण्याचे बळ निश्चितच वाढते.
निष्कर्ष (summary)
आजच्या या लेखात आपण सारांश लेखन मराठी(saransh lekhan in marathi) जाणून घेतली. ही माहिती कशी वाटली हे कॉमेंट मध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांना पण नक्कीच शेअर करा.