महाराष्ट्र राज्य निर्मिती | maharashtra rajya nirmiti

By | March 8, 2023

maharashtra rajya nirmiti : 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली म्हणून 1 मे हा दिवस महाराष्ट्र दिन म्हणून अतिशय उत्साहात साजरा केला जातो, पण नेमका महाराष्ट्र दिन का साजरा केला जातो त्या वेळेचा राज्यासाठीचा संघर्ष कसा होता हे आपण आजच्या लेखातून जाऊन घेणार आहोत.

maharashtra rajya nirmiti
महाराष्ट्र राज्य निर्मिती (maharashtra rajya nirmiti)

महाराष्ट्र राज्य निर्मिती (maharashtra rajya nirmiti)

1 मे महाराष्ट्र राज्याचा स्थापना दिवस याच दिवशी 1960 साली तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते स्वतंत्र महाराष्ट्र राज्याची मुहूर्तमेढ रोवण्यात आली.पंडित नेहरू यांनी यशवंतराव चव्हाण यांच्या हातात महाराष्ट्राचा मंगल कलश दिला आणि नव्या महाराष्ट्राच्या नेतृत्वाची जबाबदारी ही दिली. महाराष्ट्र खरंतर सांस्कृतिक, ऐतिहासिक, सामाजिक अशा सगळ्यांचा समृद्ध वारसा असलेले एक राज्य.

महाराष्ट्रात संत निवृत्तीनाथ,संत ज्ञानेश्वर,संत मुक्ताबाई,संत तुकाराम, समर्थ रामदास अशा संतांच्या छत्रछायेत संवर्धित झालेल्या राज्य,सामाजिक विचारात पुरोगामी विचारात पुढारलेल्या महाराष्ट्र महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, छत्रपती शिवाजी महाराज,शाहू महाराज,डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महर्षी आण्णासाहेब कर्वे यासारख्या समाज सुधारकांनी महाराष्ट्रात अपार बदल घडवून आणले.

द्विभाषिक राज्याचे शक्तिशाली राज्यभाव यासाठी लोकनेते, विचारवंत लेखक या सगळ्यांनी कस्ष्ट घेतले. एस एम जोशी,श्रीपाद डांगे,प्रबोधनकार ठाकरे यांच्यासह अनेक जण संयुक्त महाराष्ट्रासाठी एकत्र आले आणि आपले स्वप्न साकार केले. खरंतर महाराष्ट्र राज्य निर्मितीचा संघर्ष साधा नव्हता कारण भारत स्वतंत्र झालं त्याचवेळी भाषावार प्रांत रचनेचा मुद्दा समोर आला. मात्र देशाची एकात्मता धोक्यात येईल असं म्हणत भाषेनुसार प्रांत विभागणी करण्यास नकार देण्यात आला.

परंतु 1953 साली केंद्र सरकारने देशातील भाषिक राज्यांना वेगळ्या राज्याचा दर्जा दिला मात्र त्यावेळी महाराष्ट्राने गुजरात यांना वगळण्यात आलं. महाराष्ट्र राज्याला वेगळ्या राज्याचा दर्जा देण्याची अडचण होती ती मुंबईची करण्यात या काळामध्ये मुंबईचा ज्या पद्धतीने झपाट्याने विकास होत गेला त्यामुळे मुंबई सोडण्यास भांडवलदार तयार नव्हते. पुढे मागे जरी महाराष्ट्र स्वतंत्र झालं तरीही मुंबई देण्यास सरकारने नेमलेल्या समितीने नकार दिला.

महाराष्ट्र आणि गुजरात वगळता देशातील इतर राज्य स्वतंत्र झाली.खरंतर 1938 साली मराठी साहित्य संमेलनात स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी मराठी राज्याचा प्रस्ताव मांडला होता. तेव्हापासून संघर्षाला धार मिळत गेली, मुंबई सह महाराष्ट्र होत नाही यामुळे महाराष्ट्रातील जनता पेटून उठली 1955 साली काँग्रेस वर्किंग कमिटीने मुंबई महाराष्ट्र आणि गुजरात अशा त्री राज्याचा प्रस्ताव मांडला, या त्री राज्याला जनतेने कडाडून विरोध केला.

जनतेचा रोष पाहून 1956 साली विदर्भ महाराष्ट्रात आणि कच्छ गुजरात मध्ये समाविष्ट करण्यात आलं, तर मुंबईला मात्र केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा देण्यात आला मुंबई महाराष्ट्रात समाविष्ट केली जावी यासाठी अनेक मोर्चे आंदोलन झाली.त्यावेळी तत्कालीन मुख्यमंत्री मोरारजी देसाई यांनी आंदोलकांवर गोळीबार करण्याचे आदेश दिले.

अनेकांनी महाराष्ट्र राज्यासाठी आपल्या प्राणाची आहुती दिली. शेतकरी,कामगार संघटना,कम्युनिस्ट,सोशलिस्ट समाजवादी हे सर्व एकवटले आणि मुंबई सह महाराष्ट्र अखंड राज्यासाठी लढा दिला. अखेर 8 मार्च 1960 रोजी मुंबई सह महाराष्ट्र एकत्र करत द्विभाषिक राज्याचा शेवट करण्याची घोषणा देण्यात आली.30 एप्रिल 1960 रोजी नेहरूंनी महाराष्ट्र राज्याची घोषणा केली.

1 मे 1960 महाराष्ट्र राज्य देशाच्या नकाशावर अवतरला संयुक्त महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्यासोबत संयुक्त महाराष्ट्राचा जन्मोत्सव साजरा करण्यात आला, आणि तेव्हापासून 1 मे हा दिवस संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यातील 106 आंदोलकांना श्रद्धांजली आणि वेगळ्या राज्याचा जन्मोत्सव म्हणून अभिमान आणि उत्साहात साजरा केला जातो.महाराष्ट्र हे भारतातील सर्वात जास्त क्षेत्रफळ असणारे तिसरे राज्य आहे.

क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्र भारतातील तिसरे आणि लोकसंख्येच्या दृष्टीने दुसरे मोठे राज्य आहे. महाराष्ट्र राज्याचे क्षेत्रफळ तीन लाख सात हजार सातशे तेरा चौरस किलोमीटर इतके आहे. महाराष्ट्र हे राज्य भारतातील विकसनशील राज्यांपैकी एक आहे महाराष्ट्र राज्याची सीमा गुजरात, मध्य प्रदेश ,छत्तीसगड,तेलंगणा,कर्नाटक,नगर या केंद्रशासित प्रदेशांशी जोडलेली आहे.

राज्याच्या पश्चिमेला अरबी समुद्राची किनारपट्टी आहे. जवळपास 11 कोटी लोकसंख्या असलेल्या महाराष्ट्राची राजधानी मुंबई ही आहे. मुंबईत साधारण 1.8 कोटी लोक राहतात.नागपूर हे शहर महाराष्ट्राची उपराजधानी आहे. राष्ट्रकूट राजवंश, पश्चिम चालुक्य, मुघल आणि मराठ्यांच्या साम्राज्याचा समावेश आहे महाराष्ट्र हा फुले शाहू आंबेडकरांचा पुरोगामी महाराष्ट्र म्हणून ओळखला जातो.

कारण महाराष्ट्राला या तीन समाजसुधारकांचा वैचारिक वारसा लाभलेला आहे.महाराष्ट्र राज्याची स्थापना 1 मे 1960 रोजी झाली. महाराष्ट्राची अधिकृत भाषा मराठी ही आहे.छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचा महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण भारत देशाला अभिमान आहे. महाराष्ट्र राज्यात छोटी मोठी मिळून एकूण 1821 इतकी धरणे आहेत.यामध्ये भारतातील सर्वात मोठे वीज निर्मिती करणारे कोयना धरण हे महाराष्ट्रातच आहे.

उजनी,जायकवाडी अशी अनेक धरणे महाराष्ट्रात आहेत. जगप्रसिद्ध अजिंठा वेरूळ लेणी देखील महाराष्ट्रातच आहेत. महाबळेश्वर हे थंड हवेचे ठिकाण पर्यटकांना नेहमीच आकर्षित करते. महाराष्ट्रात 36 जिल्हे आहेत. 33 जिल्हा परिषद, 27906 ग्रामपंचायती व 355 हून अधिक तालुके आहेत. महाराष्ट्रातील पंचायत समितीची संख्या 351 एवढी आहे. महाराष्ट्रात 26 नगरपालिका आहेत.महाराष्ट्राला 720 किलोमीटर इतक्या लांबीचा समुद्रकिनारा लाभलेला आहे.

महाराष्ट्र राज्याचा दक्षिण उत्तर विस्तार 720  किलोमीटर इतका असून पूर्व पश्चिम विस्तार 800 किलोमीटर आहे. देशातील 12 ज्योतिर्लिंगांपैकी महाराष्ट्रात 5 ज्योतिर्लिंगांचा समावेश होतो. पुढील पाच ज्योतिर्लिंग महाराष्ट्रात स्थित आहेत.

  • भीमाशंकर- (पुणे) 
  • परळी वैजनाथ- (बीड)
  • औंडा नागनाथ- (हिंगोली) 
  • त्र्यंबकेश्वर- (नाशिक)
  • गऋषहणेश्वर – (औरंगाबाद)

महाराष्ट्रातील राष्ट्रीय उद्यान

महाराष्ट्रातील सर्वात मोठे शिखर कळसुबाई महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांनी जिंकलेले व बांधलेले जवळपास साडेतीनशे किल्ले आजच्या महाराष्ट्राची शोभा वाढवतात. महाराष्ट्र राज्यातून साधारण 82 नद्या वाहतात, यामध्ये गोदावरी व कृष्णा या दोन प्रमुख नद्या स्वतंत्रपणे बंगालच्या उपसागरास जाऊन मिळतात.

निष्कर्ष (summary)

आजच्या या लेखात आपण महाराष्ट्र राज्य निर्मिती (maharashtra rajya nirmiti) ही माहिती जाणून घेतली. महाराष्ट्र राज्य निर्मिती (maharashtra rajya nirmiti) ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे कॉमेंट मध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांना पण नक्कीच शेअर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *