Yayati Novel : ययाती कादंबरी ही मराठी साहित्याला लाभलेले एक अनमोल रत्न आहे. मराठी साहित्य जगतातले महारथी वि.स.खांडेकर यांच्या सिद्धहस्त लेखणीतून ययाती कादंबरी अवतरली आहे. १९५९ साली या कादंबरीची पहिली आवृत्ती निघाली ययाती कादंबरी ही बरीच गौरवान्वित झालेली कादंबरी आहे. या कादंबरीला १९६० चा साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला.

१९७४ चा ज्ञानपीठ पुरस्कार ययाती कादंबरीनेच मिळवला होता. ययाति’ ही मुळात एका पौराणिक उपकथेचा आधार घेत लिहिलेली एक प्रतीकात्मक कादंबरी आहे. कारण खांडेकरांनी ययातिची सगळी कथा काही या कादंबरीच्या माध्यमातून सांगितलेली नाही. त्यांनी ययातिचे जे भोगवादी चित्रण केले आहे, तेही अर्धसत्य आहे. पण खांडेकरांना जे सांगायचे आहे, त्याचा प्रतिनिधी म्हणून त्यांनी ययातिला घेतला आहे
Contents
ययाती कादंबरी मराठी (Yayati Novel )
1. सगळी सुखं ज्याच्या पायात लोळण घेऊ शकतात असा महापराक्रमी राजा ययाति आपल्या पत्नीपासून मनाने आणि शरीराने नेहमी दूर राहिला.
2. ययातीने देवयानीचं बाह्यरूप पाहताक्षणी कुठलाही विचार न करता तिच्याशी लग्न करण्याचा निर्णय घेतला आणि नंतर तिचे स्वभावदोष पाहून पस्तावला.
3. देवयानी ही एक गरीब ऋषिकन्या होती. पण ती नेहमीच तिच्या ऐश्वर्यसंपन्न मैत्रिणीवर, म्हणजेच राजकन्या शर्मिष्ठावर कुरघोडी करायच्या प्रयत्नात असे. या आपल्या बालमैत्रिणीचा सूड उगवण्यासाठी तिला आपली दासी बनून राहायला भाग पाडलं.
4. आपल्या वडिलांचं राज्य वाचवण्यासाठी राजकन्या शर्मिष्ठा राजवाडा सोडून देवयानीची दासी बनली.
5. ययातीचा भाऊ यति मोक्षप्राप्ती साठी रानावनात निघून गेला, खुळचट कल्पनांच्या आहारी जाऊन सगळी सुखं लाथाडली, अर्ध आयुष्य वाया घालवलं, पण हे सगळं करून यशस्वी झाला नाही.
6. ययातीचा मुलगा पुरु बरीच वर्षे त्याच्यापासून दूर राहिला पण वडिलांच्या इच्छेखातर आपलं तारुण्य त्यांना देऊन टाकलं
7. कच हा एक ध्येयवेडा ऋषी असतो जो आपला मित्र ययाती आणि मानलेली बहीण शर्मिष्ठा यांच्यावर भक्तिभावाने प्रेम करतो. त्याच्यावर जीव ओवाळणारी देवयानी त्याला भुलवू शकत नाही, उलट कच तिला तिची खरी जागा दाखवतो.
8. राक्षसांचे गुरु शुक्राचार्य, आपल्या मुलीच्या म्हणजेच देवयानीच्या सुखासाठी जंग जंग पछाडतात, तपश्चर्या करून सिद्धी मिळवतात पण मुलीविषयी अतीव प्रेमापायी जावयालाच वेठीस धरतात आणि तिथेच सगळं फिसकटतं.
9. देवयानी आपल्या वडिलांच्या छायेतून बाहेर येतच नाही. शेवटपर्यंत ती नवऱ्याची तुलना आपल्या वडिलांसोबत करत राहते आणि नवयाला झुकतं माप देते
10. फक्त कचाला आणि शर्मिष्ठेला धडा शिकवावा म्हणून देवयानीने ययातीशी लग्न केलं, त्याच्या असहायतेचा फायदा घेत त्याच्यासमोर बऱ्याच अटी व शर्ती ठेवल्या आणि त्या पुरी करण्यास जेव्हा तो अपुरा ठरला तेव्हा त्याला कायमचं वाळीत टाकलं, परिणामी तो वासनेच्या आहारी जाऊन चंगळवादी बनला.
साहित्य प्रकार | कादंबरी |
लेखक | विष्णू सखाराम खांडेकर |
भाषा | मराठी |
पुरस्कार | ज्ञानपीठ पुरस्कार |
पहिले प्रकाशन | 1959 |
वि. स. खांडेकर यांच्या विषयी माहिती
ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त झालेले पहिले मराठी साहित्यिक विष्णू सखाराम खांडेकर हे मराठी साहित्यातील एक अग्रगण्य कादंबरीकार, एक लोकप्रिय साहित्यिक म्हणून ओळखले जातात. वि. स. खांडेकरांचा जन्म सांगली येथे ११ जानेवारी १८९८
रोजी झाला. खांडेकरांचे मूळ नाव गणेश आत्माराम खांडेकर. त्यांचे वडील आत्माराम बळवंतराव खांडेकर यांचे १९११ साली निधन झाले. त्यावेळी खांडेकरांचे वय अवघे तेरा वर्षांचे होते.
राजस्थान राज्य माहिती मराठी (Rajasthan State Information in Marathi)
कथासंग्रह
- नवमल्लिका
- पाकळ्या
- समाधीवरली फुले
- नवा प्रात:काल
कादंबऱ्या
- हृदयाची हाक कांचनमृग
- उल्का
- दोन मने
- क्रौंचवध
- अश्रु
- ययाति
- अमृतवेल
रूपककथासंग्रह
- कलिका
- सुवर्ण कण
- वनदेवता
- लघुनिबंधसंग्रह
- वायुलहरी
- तिसरा प्रहर
- मंझधार
- झिमझिम
चरित्रात्मक / समीक्षात्मक :
- गडकरी : व्यक्ति आणि वाङ्मय
- आगरकर चरित्र : व्यक्ति व कार्य
- वामन मल्हार जोशी : व्यक्ति आणि विचार
- केशवसुत : काव्य आणि कला
टीकालेख व संकीर्ण लेखसंग्रह
- मराठीचा नाट्यसंसार
- गोफ आणि गोफण
- रंग आणि गंध
- ते दिवस, ती माणसे
- रेषा आणि रंग
त्यांच्या पटकथा असलेले खालील चित्रपट विशेष प्रसिद्ध आहेत
- छाया
- ज्वाला
- देवता
- सुखाचा शोध
ययाती कादंबरी कोणी लिहिली ?
विष्णू सखाराम खांडेकर यांनी ययाती ही कादंबरी लीहली
वि स खांडेकर यांचे पूर्ण नाव काय?
विष्णू सखाराम खांडेकर
संबंधितवि. स. खांडेकर लिखित ययाती कादंबरीतून काय शिकायला मिळते ?
ययाति ही वि. स. खांडेकर लिखित प्रसिद्ध कादंबरी मनुष्याच्या चिरतरुण राहण्याच्या व भोगवादी प्रवृत्तीवर एक वेगळा प्रकाश टाकते. जेव्हा मनुष्याला हा वर मिळतो त्या वेळेस त्याला हे जीवनातील अंतिम तथ्य नव्हे ह्याची जाणीव होते. इ.स. १९७२ साली वि.स. खांडेकरांना ययाति कादंबरीसाठी भारतातील साहित्यासाठीच्या सर्वोच्च ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
वी स खांडेकर यांचा जन्म केंव्हा झाला ?
११ जानेवारी, १८९८ रोजी वी. स. खांडेकर यांचा जन्म झाला.
निष्कर्ष (summary)
आजच्या या लेखात आपण ययाती कादंबरी मराठी (Yayati Novel) जाणून घेतली. ही माहिती कशी वाटली हे कॉमेंट मध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांना पण नक्कीच शेअर करा.