छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म व मृत्यू | Birth and Death of Chhatrapati Shivaji Maharaj in marathi

Birth and Death of Chhatrapati Shivaji Maharaj in marathi : ते भारतातील महान राजांपैकी एक होते. आपण स्वराज्य स्थापन करू असे त्यांचे लहानपणापासूनच स्वप्न होते. लहानपणापासूनच त्यांनी युद्धकौशल्य मिळवले. जन्मापासूनच, ते एक कुशाग्र बुद्धीचा माणूस होता जो गुप्त गुप्ततेने त्याच्यावर हल्ला करून शत्रूला चकमा देत असे. त्यांच्या या रणनीतीला गनिमी युद्ध धोरण असेही म्हणतात.

Birth and Death of Chhatrapati Shivaji Maharaj in marathi
छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म व मृत्यू (Birth and Death of Chhatrapati Shivaji Maharaj in marathi)

Contents

छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म व मृत्यू (Birth and Death of Chhatrapati Shivaji Maharaj in marathi)

छत्रपती शिवाजी महाराजांच्या वडिलांचे नाव शहाजी भोंसले होते, ते आदिल शाहच्या दरबारात काम करत होते आणि त्यांची आई जिजाबाई पुण्यात राहत होती. त्यामुळे शिवाजी महाराज वडिलांपासून दूर राहून आई जिजाबाईंकडे राहिले. त्यांचे बालपण दादा कोंडदेव यांच्या देखरेखीखाली गेले.बाल शिवाजीला त्याची आई जिजाबाई आणि पालक कोंडदेव यांनी प्राचीन भारतीय ग्रंथ महाभारत, रामायण आणि इतर धर्मग्रंथांचे संपूर्ण ज्ञान दिले आणि त्याना युद्धनीती शिकवली.

छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म

शिवरायांचा जन्म फाल्गुन तृतीय शके पंधराशे एक्कावन म्हणजेच 19 फेब्रुवारी 1630 साली शिवनेरी किल्ल्यावर झाला. पुणे जिल्ह्यातील जुन्नर शहराजवळ वसलेल्या शिवनेरी या डोंगरावर छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म छत्रपती शहाजीराजे भोसले यांच्या पत्नी जिजाऊ यांच्या पोटी झाला.छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म झाल्यावर शिवनेरी च्या नगारख्यानात सनई चौघडा वाजत होता.

शिवाजी हे नाव त्यांना शिवाई देवीच्या नावावरून देण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज यांचे थोरले बंधू संभाजी राजे हे होते. हे जास्त काळ त्यांच्या वडिलांसोबत म्हणजेच छत्रपती शहाजी राजे यांच्या बरोबर रहायचे. छत्रपती शहाजीराजे यांच्या दुसऱ्या पत्नी तुकाबाही मोहिते या होत्या ज्यांच्या पासून शहाजी राजांना एक पुत्र रत्न प्राप्त झाले होते.छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मातोश्री जिजाऊ या विलक्षण प्रतिभावंत महिला होत्या.

छत्रपती शिवाजी महाराज सामर्थ्यवान सामंत होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या व्यक्तीत्वावर त्यांच्या आई-वडिलांचा खूप प्रभाव होता. लहानग्या वयातच त्यांना त्या काळातील वातावरण आणि घटनांची खूप चांगली जाण होती सत्ताधारी वर्गावर ते फार चिडायचे आणि अस्वस्थ व्हायचे स्वातंत्र्याची ज्योत लहानपणापासूनच त्यांच्या मनात पेटली.त्यांनी लहानपणीच आपले काही विश्वासू मित्र एकत्र केले जसजसं वय वाढली परकीय सत्तेचे बंधन तोडण्याचा त्यांचा संकल्प अधिकच होत गेला. 

छत्रपती शिवाजी महाराजांचा मृत्यू

छत्रपती शिवाजी महाराजांचा मृत्यू हा विषय आपणास सर्वांना भावनिक करून टाकणारे विषय आहे 3 एप्रिल 1680 रोजी रयतेच्या राजाने देह ठेवला आणि त्यानंतर विलीन झाले. छत्रपती शिवाजी महाराजांचा मृत्यू वर चर्चा करणे हा एक खरंच गंभीर विषय आहे.पण यावर चर्चा करणे गरजेचे आहे. मराठा साम्राज्याची स्थापना शिवाजी महाराजानी केली.काहींच्या मनात महाराजांच्या मृत्यू याबद्दल वेगवेगळी मत आहेत यावरच आपण चर्चा करणार आहोत.

महाराजांच्या मृत्यू 1680 मध्ये झाला पण महाराजांच्या मृत्यू च्या चार वर्ष आधीपासून साधारण जानेवारी 1676 पासूनच महाराजांचे मृत्यू झालेल्या अफवा पसरत होत्या. इंग्रजांची पत्रे चाळली असता हे तुमच्या लक्षात येऊ शकते हा विषय खूप मोठा आहे.रायगडच्या राजवाड्यात 3 एप्रिल 1680 रोजी शिवाजी महाराजांचा मृत्यू झाला. शिवरायांनी आयुष्यभर स्वराज्य स्थापनेसाठी संघर्ष केला.सर्व पसरलेल्या मराठ्यांना एकत्र आणून आपण राज्यच नव्हे तर राष्ट्रही घडवू शकतो हे त्यांनी सिद्ध केले.ते शेवटचे हिंदू शासक होते ज्यांनी हिंदवी स्वराज्य स्थापन करण्यासाठी मुघलांविरुद्ध लढा दिला आणि आपल्या मातृभूमीचा गौरव केला.

छत्रपती शिवाजी महाराज भाषण

हवा वेगाने नव्हती हवेपेक्षाही त्यांचा वेग होता अन्यायाविरुद्ध लढण्याचा इरादा त्यांचा नेक होता असा जिजाऊंचा शिवबा लाखात नाही तर जगात एक होता. 19 फेब्रुवारी 1630 हा सोन्याचा दिवस आणि अशा या मंगल दिवशी महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यात शिवनेरी किल्ल्यावर महाराणी जिजाऊ यांच्या पोटी शिवरायांचा जन्म झाला. यांच्या वडिलांचे नाव शहाजीराजे तर आईचे नाव जिजाबाई होते.

छत्रपती शिवाजी महाराजांनी वयाच्या पंधराव्या वर्षी स्वराज्याचे स्वप्न मनाशी बाळगले. रायरेश्वराच्या मंदिरात जीवाला जीव देणाऱ्या मावळ्यांसोबत गुलामगिरी नष्ट करून स्वराज्याची स्थापना करण्याची शपथ त्यांनी घेतली. स्वराज्याची निर्मिती करणे काही सोपी गोष्ट नव्हती यावेळी सगळीकडे गुलामगिरी होती आणि समोर होते बलाढ्य शत्रू.

यासाठी अनेक मावळ्यांनी आपले प्राण पणाला लावले होती यामध्ये बाजीप्रभू देशपांडे,तानाजी मालुसरे,मुरारबाजी,नेताजी,पालकर अशा अनेक शूरवीरांनी शिवरायांना साथ दिली आणि अशाप्रकारे हिंदवी स्वराज्याची निर्मिती झाली. 6 जून 1674 साली छत्रपती  शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक करण्यात आला आणि सुमारे 350 वर्ष गुलामगिरीत पडलेल्या जुलमी शासक कर्त्यांच्या अन्यायाने त्रासलेल्या अत्याचाराने त्रासलेल्या गोरगरिब रयतेला लोक कल्याणकारी न्यायप्रिय राजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या रूपाने मिळाले.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)

छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या किल्ल्यावर झाला ?

छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक रायगड किल्ल्यावर झाला.

शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कधी झाला ?

6 जून 1674 ला शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला.

शिवाजी महाराजांचा पहिला राज्याभिषेक कोणाच्या हस्ते झाला ?

स. १६७४ रोजी छत्रपती शिवाजीराजे भोसले यांचा गागाभट्ट यांच्या हस्ते राज्याभिषेक झाला.

शिवाजी महाराजांचा दुसरा राज्याभिषेक कोणी केला ?

शिवाजी महाराजांचा दुसरा राज्याभिषेक निश्चल पुरी गोसावी ह्यांनी केले.

शिवाजी महाराजांचा दुसरा राज्यभिषेक कधी झाला ?

२४ सप्टेंबर १६७४ रोजी शिवाजी महाराजांचा दुसरा राज्याभिषेक तांत्रिक पद्धतीने झाला.

शिवाजी महाराजांचे राज्याभिषेक सोहळा किती वेळा झाला?

शिवाजी महाराजांचे राज्याभिषेक सोहळा दोन वेळा झाला.

राज्याभिषेक म्हणजे काय ?

आपला एक रक्षणकर्ता आहे, आपलं एक तख्त आहे’ याची गोरगरीब रयतेला चिरंजीव हमी देणारा तो सुवर्णक्षण म्हणजे राज्यभिषेक होय.

हिंदवी स्वराज्याची स्थापना कधी झाली ?

1647 मध्ये काही मुख्य मावळ्यांच्या साथीने तोरणा किल्ला आपल्या ताब्यात घेऊन स्वराज्याची स्थापना केली.

शिवाजी महाराजांनी आग्र्याहून येताना संभाजी राजांना कुठे सुरक्षित ठेवले?

शिवाजी महाराजांनी संभाजी राजांना मोरोपंत पेशव्यांच्या मेहुण्याच्या घरी मथुरेला ठेवले.

स्वराज्य म्हणजे काय ?

स्वराज्य म्हणजे स्वतः चे राज्य

शिवराज्याभिषेक कल्पतरू या ग्रंथाचे लेखक कोण ?

छत्रपती संभाजी महाराज

शिवराज्यभिषेकला उपस्थित असणारा इंग्रज अधिकारी कोण होता?

हेन्री ओक्झेडंन

हिंदवी स्वराज्याच्या हेरखात्याचा प्रमुख कोण होता ?

हिंदवी स्वराज्याचे गुप्तहेर प्रमुख, शुरवीर बहिर्जी नाईक हे होते.

शिवाजी महाराजांना किती पुत्र होते ?

शिवाजी महाराजांना दोन पुत्र होते. संभाजी महाराज आणि राजाराम महाराज हे शिवाजी महाराजांचे दोन पुत्र होते.

शिवाजी महाराज आग्रा येथे औरंगजेबाच्या नजरकैदेतून कसे निसटले ?

पेठाऱ्यात बसून महाराज आग्रा येथून औरंगजेबाच्या नजरकैदेतून सुटले होते.

छत्रपती संभाजी राजांचा जन्म कुठे झाला ?

पुरंदर किल्ल्यावर छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म झाला.

संभाजी महाराजांची तलवार किती किलोची होती ?

संभाजी महाराजांची तलवार 65 किलोची होती.

संभाजीराजांच्या आईचे नाव काय ?

महाराणी सईबाईंचे

शिवाजी महाराजांचे वंशज कोण आहेत ?

उदयनराजे भोसले हे शिवाजी महाराजांचे वंशज आहेत.

बहिर्जी नाईक यांची समाधी कुठे आहे ?

बहिर्जी नाईक यांची समाधी बाणूरगड(भूपालगड) येथे आहे.

शिवाजी महाराज यांच्या मुलीचे नाव काय आहे ?

शिवाजी महाराजांना एकूण ८ बायका आणि ८ मुलं. त्यातील २ पुत्र आणि ६ मुली.सखुबाई,राणूबाई,अंबिकाबाई,राजकुंवर उर्फ नानीबाई,दीपाबाई उर्फ बाळाबाई,कमळजाबाई

छत्रपती शिवाजी महाराजांच्या मुलांचे नाव काय ?

छत्रपती संभाजी भोसले, छत्रपती राजारामराजे भोसले

राजाराम महाराजांना किती पत्नी होत्या ?

संभाजीनी आपल्या हातात सर्व सूत्रे घेतल्यानंतर राजाराम रायगडावर नजरकैदेत होते. जानकीबाई वारल्यानंतर संभाजींनी राजारामांची लग्ने हंबीरराव मोहित्यांची ताराबाई व कागलकर घाटग्यांची राजसबाई यांबरोबर केली. यांशिवाय राजारामांस अंबिकाबाई नावाची आणखी एक पत्नी होती व त्यांची नाटकशाळाही मोठी होती.

निष्कर्ष (summary)

आजच्या या लेखात आपण छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म व मृत्यू (Birth and Death of Chhatrapati Shivaji Maharaj in marathi) जाणून घेतली. ही माहिती कशी वाटली हे कॉमेंट मध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांना पण नक्कीच शेअर करा.

छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म व मृत्यू | Birth and Death of Chhatrapati Shivaji Maharaj

Leave a Comment