Comet information in Marathi: धूमकेतू म्हणजे अवकाशातील उलखे सारखा असणारा पण बर्फापासून बनलेला केरसुळीच्या आकाराचा दिसणारा एक पदार्थ. थोडक्यात सांगायचं झालं तर अवकाशात असणारे खडकांचे गोळे म्हणजेच धूमकेतू. या धूमकेतूचा आकार साधारणता 2 किलोमीटर पासून ते 200 किलोमीटर पर्यंत ईतका असतो. या खडकांच्या भोवती गोठलेल्या वायूंचा आवरण असते. सूर्याच्या उष्णते मुळे गोठलेल्या वायूंच्या मोकळ्या वायू मध्ये रूपांतर होते. म्हणजेच धूमकेतू जसजसा सूर्याच्या जवळ जवळ जातो तसतसा या गोठलेल्या वायूचे रूपांतर वायू मध्ये होतं.

Contents
धूमकेतू माहिती मराठी (Comet information in Marathi)
धूमकेतूला शेपूट तयार झालेली आपल्याला पाहायला मिळते. आपल्याला हा प्रश्न नक्कीच पडला असेल की ही शेपूट कशी तयार होते? तर याचे उत्तर असं आहे की धूमकेतू जसजसा सूर्याच्या जवळ जातो तसतशी ही शेपूट तयार होते आणि धूमकेतू सूर्यापासून जसजसे लांब जाईल तशी ही शेपटी नाहीशी होते. धूमकेतूच्या शीराचा जो भाग (गाभा व कोमा) प्रसारानं पावतो व त्यातून वाळूयुक्त धुळीच्या कणांचे लोट बाहेर फेकले जातात. सूर्यापासून तर नेहमीच वायू व इतर द्रव्ये बाहेर फेकण्याची प्रक्रिया सतत चालूच असते.सूर्याचे प्रकाशकिरण पडून ती शेपटी चमकू लागते व आपल्याला तेजस्वी दिसते. शेपटीची लांबी काही कोटी मैलही असू शकते.
- भूसंपादन कायदा 2013 माहिती मराठी (bhusampadan kayda 2013 information in marathi)
- दुधी भोपळा माहिती मराठी (dudhi bhopla information in marathi)
धूमकेतू ला नाव कसे दिले जाते
आपल्याला प्रश्न पडला असेल की धूमकेतुला नाव कसे दिले जातात? जो शास्त्रज्ञ ज्या धूमकेतू चा शोध लावतो त्या धूमकेतूला त्या शास्त्रज्ञाचे नाव दिले जाते. पण काही याला अपवाद आहेत जसं आपल्या भारतातून दिनांक 2020 पासून पुढील काही दिवस आपणास न्यूवाईस (neowise) या धमकीतूचा अनुभव घेता येणार आहे.(neo) न्यू म्हणजे अवकाश संशोधन करणाऱ्या एका वेधशाळेचे नाव आहे आणि wise या नावाचा एक कॅमेरा आहे neo या अवकाश संशोधन केंद्रातून wise या कॅमेराच्या साह्याने या धमकेतूचा शोध लागल्यामुळे न्यूवाईस (neowise) असं नाव या धूमकेतू ला देण्यात आला आहे.
धूमकेतू कधी दिसतात
काही ठराविक धूमकेतू आपल्याला काही ठराविक वेळे नंतर दिसत असतात. उदाहरणार्थ हेले (hele) चा धूमकेतू आपल्याला दर 76 वर्षांनंतर दिसतो. न्यूवाईस (neowise) हा धूमकेतू आज पर्यंत एकदाच दिसला आहे आणि भविष्यात परत सहा हजार आठशे वर्षांनी दिसेल असा शास्त्रज्ञांचा अंदाज आहे.धूमकेतू पाहिल्याने आपल्याला कोणताही अपाय होत नाहीत धूमकेतू पाहू नये अशा अनेक अंधश्रद्धा आपल्या समाजात असतात.
धूमकेतू म्हणजे काय / धूमकेतू कश्यास म्हणतात
धूमकेतू हे सौरमंडळाचे शरीर आहेत जे खडक, धूळ, बर्फ आणि वायूपासून बनलेले छोटे तुकडे आहेत. धूमकेतू ग्रहांप्रमाणे सूर्याभोवती फिरतो. धूमकेतू सुमारे 6 ते 200 वर्षांमध्ये लंबवर्तुळाकार मार्गाने सूर्याभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करतात. काही धूमकेतूंचा मार्ग कंकणाकृती असतो आणि ते एकदाच दिसतात.लांब मार्ग असलेल्या धूमकेतूंना एक कक्षा पूर्ण करण्यासाठी हजारो वर्षे लागतात.धूमकेतू बर्फ, कार्बन डायऑक्साइड, मिथेन, अमोनिया आणि इतर पदार्थ जसे की सिलिकेट्स आणि सेंद्रिय संयुगे यांनी बनलेले असतात.
तुम्ही आकाशात या गोष्टी पहिले आहेत का ?
आकाशातील ग्रह, तारे, दूरवर दिसणारे क्वेसार हे आपल्याला ठिपक्याच्या स्वरुपात दिसतात. दुर्बिणीतून पाहिल्यास गोलाकार दिसतात. आकाशगंगा लंबवर्तुळाकार दिसतात पण तरीही आकाशगंगा म्हणजे स्वतंत्र अस्तित्व असलेल्या ताऱ्यांचा समूह आहे. धूमकेतूचा आकार मात्र अगदी वेगळाच आहे.
धूमकेतूमध्ये काय असते
जे मुळरूपात दगड, धुळ, बर्फ आणि गॅसपासून तयार झालेले छोटे-छोटे तुकडे असतात. बहुतांश धुमकेतू बर्फ, कार्बन डाय ऑक्साईड, मिथेन, अमोनिया तसेच अन्य पदार्थांसारखे सिलिकेट आणि कार्बनिक मिश्रणाचे बनलेले असतात. यांना सामान्य भाषेत शेपटीवाला तारा सुद्धा म्हटले जाते.
2061 मध्ये कोणता धूमकेतू दिसणार आहे ?
हॅलीचा धूमकेतू 2061 मध्ये परत येण्याचा अंदाज आहे.या अगोदर 1986 हा धूमकेतू पाहिला गेला होता.
धूमकेतू समानार्थी शब्द मराठी
शेंडेनक्षत्र हा धूमकेतू शब्दासाठी समानार्थी शब्द आहे.
धूमकेतू म्हणजे काय ?
धूमकेतू हे सौरमंडळाचे शरीर आहेत जे खडक, धूळ, बर्फ आणि वायूपासून बनलेले छोटे तुकडे आहेत. धूमकेतू ग्रहांप्रमाणे सूर्याभोवती फिरतो.
निष्कर्ष (summary)
आजच्या या लेखात आपण धूमकेतू माहिती मराठी (Comet information in Marathi)जाणून घेतली. ही माहिती कशी वाटली हे कॉमेंट मध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांना पण नक्कीच शेअर करा.