ऑनलाइन सातबारा बघणे | online sathbara baghne

online sathbara baghne : आता तुम्ही ऑनलाइन सातबारा बघणे किंवा जमिनीशी सम्बंधित इतर सुविधांचा लाभ ऑनलाइन घेऊ शकता. महाराष्ट्र शासनाने 7/12 उतारा ऑनलाइन, 8 अ चा उतारा, भू नकाशा आणि इतर भूमि सम्बंधित सुविंधासाठी आँनलाईन पोर्टल सुरु केले आहे.चला तर जाणून घेऊया 7/12 कसा शोधायचा.सामान्य माणूस घर बसल्या 7/12 उतारा काढणे किंवा इतर सुविधांचा लाभ कसा घेऊ शकेल हे आपण आजच्या या लेखातून जाणून घेणार आहोत.सातबारा काढण्यासाठी सगळ्यात अगोदर तुम्हाला गुगलवर bhulekh.mahabhumi.gov.in असं सर्च करावं लागेल. आपल्याला विविध शासकीय योजनेसाठी digital satbara उतारा आवश्यकता असते. 

online sathbara baghne
ऑनलाइन सातबारा बघणे (online sathbara baghne)

ऑनलाइन सातबारा बघणे (online sathbara baghne)

महाराष्ट्र राज्याची अशी वेबसाईट आहे जी महाराष्ट्रातील नागरिकांना 7/12 उतारा, 8A उतारा ऑनलाइन प्रदान करते. या वेबसाईटवर दर्शविलेली सातबारा, ८अ व मालमत्ता पत्रक संबंधित माहिती ही कोणत्याही शासकीय अथवा कायदेशीर बाबींसाठी वापरता येत नाही. आपल्याला आपल्या जमिनी बद्दल फक्त माहिती करून घ्यायची असेल, तर त्यासाठी तलाठी कार्यालय सज्जा येथे जाण्याची काहीच गरज नाही. आपल्या जमिनी संबंधित माहिती जसे गाव नमुना नंबर 8अ सातबारा उतारा मलमत्ता पत्रक महाभुलेख वेबसाईटवर सहज मिळते. 

महाभूलेख म्हणजे म्हणजे काय ?

सर्वप्रथम आपण जाणून घेऊया महाभूलेख म्हणजे ?महाराष्ट्र भूमि अभिलेख (Mahabhumi Abhilekh) हे महाराष्ट्र राज्याचे लँड रेकॉर्ड पोर्टल आहे. bhulekh maharashtra या पोर्टल वर तुम्ही तुमचा सातबारा उतारा, ८अ, मालमत्ता पत्रक, फेरफार स्तिथी पाहू शकता

औरंगाबाद विभाग औरंगाबाद , बीड, जालना, , उस्मानाबाद नांदेड, लातूर, परभणी, हिंगोली
अमरावती विभाग अकोला, अमरावती, बुलडाणा, यवतमाळ, वाशिम
नागपूर विभाग भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा
पुणे विभाग कोल्हापूर, पुणे, सांगली, सातारा, सोलापूर
कोकण विभाग मुंबई शहर, ठाणे,पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग
नाशिक विभाग अहमदनगर, धुळे. जळगाव, नंदुरबार, नाशिक
ऑनलाइन सातबारा बघणे (online sathbara baghne)

सातबारा उतारा काय म्हणजे काय/सातबारा उतारा कुठे उपयोगाला येतो ?

सातबारा उतारा एक जमिनीचा दस्तऐवज आहे.जेव्हा कधी जमिनीची खरेदी-विक्री होते तेव्हा या कागदाचा जास्तीत जास्त वापर केला जातो. तसेच याचा वापर तुम्ही बँकेकडून लोन घेण्यासाठी किंवा इतर सरकारी कामांसाठी सातबारा चा उपयोग होतो. 7/12 उताऱ्यावर जमिनीचा सर्वे नंबर, मालकाचे नाव, जमिनीचे क्षेत्रफळ, किंवा त्या जमिनीवर कोणत्या प्रकार चे कर्ज आहे का हि सर्व माहिती मिळते.

सातबारा / 8अ उतारा ऑनलाइन कसा पाहवा ?

  • सर्वात प्रथम 7/12 उतारा काढण्यासाठी तुम्हाला अधिकृत महाभूलेख वेबसाइट ला भेट द्यावी लागेल. 

bhulekh.mahabhumi.gov.in 

  • महाराष्ट्र राज्यात एकूण 6 विभाग आहे त्यातून तुम्हाला तुमचा विभाग निवडावा लागतो. त्यांनतर जिल्हा निवडा.
  • जर तुम्हाला सातबारा उतारा काढायचा असेल तर सातबारा 7/12 हा पर्याय निवडा.
  • जर तुम्हाला 8 अ चा उतारा काढायचा असेल तर 8 अ हा पर्याय निवडा.

आता तुमच्या स्क्रीन वर तुम्हाला तुमचा महाभूलेख सातबारा उतारा/ ८अ चा उतारा दिसेल. या मध्ये तुम्ही जमिनीची सर्व माहिती तपासून बघू शकता. पण हा ऑनलाईन सातबारा उतारा विना स्वाक्षरीचा असल्याने तुम्ही याचा वापर कुठल्याही शासकीय अथवा कायदेशीर बाबीसाठी नाही करू शकत.

(FAQ)

सातबारा म्हणजे काय ?

सातबारा उतारा एक जमिनीचा दस्तऐवज आहे.जेव्हा कधी जमिनीची खरेदी-विक्री होते तेव्हा या कागदाचा जास्तीत जास्त वापर केला जातो.

सातबारा उतारा कोण देतो ?

सात बाराचा उतारा हा जमिनीवरील मालकी हक्क कोणाचा आहे हे समजून घेण्यासाठी शासकीय अभिलेख महसूल विभागातर्फे दिला जातो.

निष्कर्ष (summary)

आजच्या या लेखात आपण ऑनलाइन सातबारा बघणे (online sathbara baghne) जाणून घेतली. ही माहिती कशी वाटली हे कॉमेंट मध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांना पण नक्कीच शेअर करा.

Leave a Comment