कोसला कादंबरी माहिती मराठी | Kosla Novel Information Marathi

Kosla Novel Information Marathi:या कथेचा काळ साधारण 1960 चा आहे.या कादंबरी चे इंग्लिश बरोबरच हिंदी, गुजराती, कन्नड, आसामी, पंजाबी, बंगाली अश्या भारतीय भाषांमध्ये सुधा अनुवाद झाले आहेत.या कादंबरी चे लेखक आहेत भालचंद्र नेमाडे.कोसला ही भालचंद्र नेमाडे यांची पहिली कादंबरी.ही कथा म्हणजे पांडुरंग सांगवीकर यांचे आत्मचरित्र त्यांच्या आयुष्यात काय काय घडले ते कसे त्या गोष्टी कडे पाहत होते त्याने केलेली निरीक्षणे त्याने केलेल्या गमती, त्याचे वागणे, त्याला आलेले अपयश हे तो वाचकाला सांगतो.

कोसला कादंबरी माहिती मराठी (Kosla Novel Information Marathi)
कोसला कादंबरी माहिती मराठी (Kosla Novel Information Marathi)

कोसला कादंबरी माहिती मराठी (Kosla Novel Information Marathi)

पैष्याने समृध्द असलेले पांडुरंग चे गावातील कुटुंब पण वडलांच्या धाकात पांडुरंग चे लहानपण झाले.आपल्याला काही थोर करीला पाहिजे पण या खेडे गावात काय थोर होणार हा विचार करून तो आपल्या शिक्षांना साठी पुणे शहराला जातो. तेथे तो बिंदास आयुष्य जगतो.तेथे तो वसतिगृहात राहतो, त्यांचे फारसे मित्र ही नसतात.कारण मित्रांकडून आपण फक्त वापरले जातोय असे आणुभव त्याला आले होते.त्यामुळे त्याला फक्त सुरेश ची मैत्री फार काळ लाभली.

लेखकभालचंद्र नेमाडे
पृष्ठसंख्या 334
प्रकाशन पॉप्युलर प्रकाशन
मूल्यांकन४.९ | ५
कोसला कादंबरी माहिती मराठी (Kosla Novel Information Marathi)

त्यामुळे ते दोघे टेकड्यांवर, गढांवर फिरायला जात असत.सुरेश आणि पांडुरंग यांची गमती वाचताना फार गमती येतात तसेच त्यांच्यातील गमती फार मजेशीर आहेत.काही थोर करायचे म्हणून पांडुरंग कॉलेज च्या कार्यक्रमात त्यांचा सहभाग असायचा.पांडुरंग चे लहानपण,कॉलेज,हॉस्टेल,चहा,गप्पा, टेकडीवरचे फिरणे,अंगाशी आलेली प्रकरणे,त्याचे निरीक्षण,गाव, शहर यांबद्धल वाचताना आर्धे पुस्तक कधी संपते हे कळतच नाही.कॉलेज चालू असतानाच त्याच्या बहिणी चा मृत्यू झालेला त्याला समजते.मृत्यू यावर पांडुरंग व्यापक असा विचार करतो.

बऱ्याच वेळा तो जुनाट विचारांवर बोलत असत.या नंतर तो कायम चा गावी जायचं ठरवतो आणि जातो.पांडुरंग हा देखील त्याच्या गावातील बेरोजगार तरुणांन सारखा एक असतो.गावातील कोण कसा, गावात कोण काय करते, कोणाचे कसं चालालय हे तो आपल्याला सांगत जातो.गावातील बेरोजगार तरुण काय करतात त्यांचे दुःख, आनंद यांचे निरीक्षण तो सांगतो.पुस्तकातील एक वाक्य आहे घर ही पैष्यावर चालणारी गोष्ट आहे, घरात काही आणून टाकले नाही तर तो माणूस घरात राहायला नालायक आहे.

अपयश व आयुष्याला लागलेला आक्रोश पांडुरंग च्या मनात असतोच.असेच वर्षा मागे वर्ष जातात आणि पांडुरंग सुद्धा गावातील कंपूत भरती झालेला असतो.कंपू म्हणजे शहरात चार – सहा वर्ष राहिलेली मूल.या अपयशी मुलांकडे समाज कसा पाहतो व यांच्या बद्द्ल त्या मूल्यांच्या मनात काय विचार असतो हे पांडुरंग बोलतो.गावात वाटते की हे मजेशीर प्राणी आहेत पण त्यांना असे वाटत की आपल्या बरोबर चे पुढे गेले आणि आपण अजून येथेच आहोत.पण पांडुरंग ला हे समजले होते की पुढे जाणाऱ्याना जाऊ द्यावे आणि मागे राहिलेल्यानी एकत्र येवुन हे दाखवावे की आम्ही पण काही कमी नाही.

ही कादंबरी वाचताना पांडुरंग मनात एक घर करून जातो. पुस्तकाचे मुखपृष्ठ केले आहे नितीन दादरवला यांनी, पुस्तकाच्या मुखपृष्ठावर एका रिकाम्या खोली चे चित्र आहे.खाली लेखक आणि कादंबरी चे नाव लीहले आहे.पुस्तकाच्या मागील बाजूस उश्या पाठनकर यांच्या पत्राचा उतारा आहे या पत्र्याच्या खाली लिहले आहे कोसला वयाच्या 18 व्या वर्षी भेटली, कादंबरीला आता 50  वर्ष झाली.

भालचंद्र नेमाडे यांची माहिती

भालचंद्र वणाजी नेमाडे यांचा जन्म 27 मे 1938 रोजी जळगाव जिल्ह्यातील सांगवी या गावी झाला. 1955 मध्ये जळगाव जिल्ह्यातील भालूच्या न्यू इंग्लिश स्कूल मधून प्रथम श्रेणी शालांत परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर पुण्याच्या फरगुशन महाविद्यालयातून भाषाविज्ञान या विषयात एमए केल्यानंतर 1964 मध्ये मुंबई विद्यापीठातून एम ए इंग्रजी मध्ये केले.

1981 मध्ये औरंगाबादच्या मराठवाडा विद्यापीठातून त्यांनी पीएचडी केली. अहमदनगर,धुळे,औरंगाबाद,गोवा,लंडन,मुंबई अशा विविध ठिकाणी 1964 ते 1998 पर्यंत ते अध्यापक विभाग प्रमुख म्हणून कार्यरत होते. 1991 ते 1998 मध्ये त्यांनी मुंबई विद्यापीठाच्या गुरुदेव ठाकूर दैनिक साहित्य अध्यासन मध्ये अध्यापन केले. नेमाडे वाचा या अनियतकालिकाचे संपादक सुद्धा होते.

इंग्रजी भाषा आणि साहित्य, वाड्मय प्रकार, भाषाविज्ञान, भारतीय साहित्य, मराठी भाषा आणि साहित्य इत्यादी त्यांचे अध्यापनाचे आणि संशोधनाचे विषय आहेत. राज्य तसेच राष्ट्रीय पातळीवरील साहित्यिक मंडळावर सल्लागार सदस्य म्हणून येथे कार्यरत आहेत.

त्यांची इंग्रजी आणि मराठी ग्रंथसेवा विपुल आहे.नेमाडे यांच्या वाङ्मयीन कारकिर्दीची सुरुवात फेब्रुवारी 1956 पासून झाली. निळे मनोरे ही त्यांची पहिली कविता, फरगुशन महाविद्यालयाच्या नियतकालिकात प्रथम प्रकाशित झाली. त्यानंतर विविध नियतकालिकांमधून त्यांच्या कविता प्रसिद्ध होत होत्या.

1970 मध्ये मेलडी हा त्यांचा पहिला कविता संग्रह प्रकाशित झाला. त्यानंतर 1991 मध्ये देखणी काव्यसंग्रह प्रसिद्ध झाला आहे या कविता संग्रहातील कवितांची हिंदी आणि इंग्रजी भाषांतरे प्रकाशित झाली आहेत. पण त्यांना ओळख मिळाली ती 1963 मध्ये प्रकाशित झालेल्या कोसला या कादंबरी मुळे,आणि नंतरच्या त्यांच्या समीक्षा लेखनामुळे.

भालचंद्र नेमाडे यांचे पहिली कादंबरी कोसला ही प्रसिद्ध होण्यापूर्वी त्यांच्या कविता छंद प्रतिष्ठान यामधून प्रसिद्ध झाल्या होत्या.कोसला ही कादंबरी नेमाडे यांच्या वयाच्या 25 व्यां वर्षी प्रकाशित झाली. कोसला हे पांडुरंग सांगवीकर या खेड्यातून आलेल्या व पुण्यात शिकणाऱ्या तरुणाची आत्मकथा आहे.

ती कादंबरी सर्वसाधारणपणे मराठी वाङ्मय प्रवाहाच्या बाहेरील कलाकृती मांडली जाते.कोसला चा नायक पांडुरंग सांगवीकर नैतिकतेच्या आधारावर गाव सगळे यांना नाकारतो अशा व्यक्तिमत्त्वावरील कथा असलेली कोसला ही कादंबरी प्रस्थापित कादंबऱ्यांचे स्वरूप विषय भाषाशैली संकल्पना अशा सर्वांना दूर ठेवणारी ठरली.

निष्कर्ष (summary)

आजच्या या लेखात आपण कोसला कादंबरी माहिती मराठी (Kosla Novel Information Marathi) जाणून घेतली. ही माहिती कशी वाटली हे कॉमेंट मध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांना पण नक्कीच शेअर करा.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)

कोसला कादंबरीचे लेखक कोण ?

भालचंद्र वनाजी नेमाडे यांनी कोसला ही कादंबरी लिहली.

कोसला ह्या कादंबरीत लेखकाने कोणत्या निवेदन पद्धतीचा अवलंब केला आहे ?

कोसला प्रथमपुरुषी निवेदनात लिहिली आहे.

Leave a Comment