वाक्य व वाक्याचे प्रकार | Sentences and sentence types in marathi

Sentences and sentence types in marathi : अर्थ स्पष्ट व पूर्ण करणाऱ्या शब्द समूहाला वाक्य असे म्हणतात. किंवा शब्दांचा एक पद्धतशीर गट किंवा अर्थपूर्ण शब्द, ज्यातून वक्त्याच्या विधानाचा अभिप्रेत अर्थ पूर्णपणे स्पष्ट होतो, त्याला वाक्य म्हणतात. आजच्या या लेखात आपण वाक्य व वाक्याचे प्रकार (Sentences and sentence types in marathi) जाणून घेणार आहोत.

Sentences and sentence types in marathi
वाक्य व वाक्याचे प्रकार (Sentences and sentence types in marathi)

वाक्य व वाक्याचे प्रकार (Sentences and sentence types in marathi)

वाक्याचे एकूण बारा प्रकार पडतात ते पुढील प्रमाणे

 • विधानार्थी वाक्य
 • प्रश्नार्थक वाक्य
 • उद्गारवाचक वाक्य
 • होकारार्थी वाक्य
 • नकारार्थी वाक्य
 • स्वार्थि वाक्य
 • आज्ञार्थी वाक्य
 • विद्यार्थी वाक्य
 • संकेतर वाक्य
 • केवल वाक्य
 • मिश्र वाक्य
 • संयुक्त वाक्य

विधानार्थी वाक्य

विधानार्थी वाक्य म्हणजे ज्या वाक्यात केवळ एखादे साधे विधान केलेले असते त्यास विधानार्थी वाक्य असे म्हणतात.

उदाहरणार्थ

 • शिवरायांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली.
 • तो खूप हुशार आहे.

प्रश्नार्थक वाक्य

प्रश्नार्थक वाक्य म्हणजे ज्या वाक्यात एखादा प्रश्न विचारला असतो व प्रश्न कर्त्यास प्रश्न करताना काही उत्तर अपेक्षित असते तेंव्हा त्यास प्रश्नार्थक वाक्य असे म्हणतात.

उदाहरणार्थ

 • संधी कोण बर सोडेल.
 • तुम्ही कुठे गेला होता.

उद्गारवाचक वाक्य

उद्गारवाचक वाक्य म्हणजे ज्या वाक्यात आनंद, आश्चर्य, दुःख यांपैकी एखादी भावना प्रकट झालेली असते. व वाक्याच्या शेवटी उद्गारवाचक चिन्ह दिलेले असते तेव्हा त्यास उद्गारवाचक वाक्य असे म्हणतात.

उदाहरणार्थ

 • शाब्बास चांगले गुण मिळाले तुला.
 • अरेरे त्याला फारच लागले आहे.

होकारअर्थी वाक्य

होकारअर्थी वाक्य म्हणजे ज्या वाक्यातील क्रियापद हे होकार अर्थी असते त्यास होकारार्थी वाक्य असे म्हणतात. यालाच करण रुपी वाक्य असे ही म्हणतात.

उदाहरणार्थ

 • आज रस्त्यावर फारच गर्दी होती.
 • ती मुलगी खूप देखणी आहे.

नकारार्थी वाक्य

नकारार्थी वाक्य म्हणजे ज्या वाक्यातील क्रियापद हे नकारार्थी असते त्यास नकारार्थी वाक्य असे म्हणतात.

उदाहरणार्थ

 • आज रस्ता मोकळा नव्हता.
 • ती मुलगी कमी देखीनी नाही.

स्वार्थी वाक्य

स्वार्थी वाक्य म्हणजे ज्या वाक्यातील क्रियापदावरून फक्त काळाचा बोध होतो व या वाक्य स्वतःचाच समोर अर्थ स्पष्ट होतो त्या स्वार्थी वाक्य असे म्हणतात.

उदाहरणार्थ

 • सर्वजण समारंभासाठी एकत्र जमले.
 • मी चित्रपट पाहतो.

आज्ञार्थी वाक्य

आज्ञार्थी वाक्य म्हणजे ज्या वाक्यातील क्रियापदावरून आज्ञा, अनुज्ञा, विनंती, प्रार्थना, उद्देश अथवा आशीर्वाद देणे असा अर्थ होतो त्यास आज्ञार्थी वाक्य असे म्हणतात.

उदाहरणार्थ

 • मुलांनो नियमित अभ्यास करा.
 • परमेश्वरा त्याला चांगली बुद्धी दे.

विद्यार्थी वाक्य

विद्यार्थी वाक्य म्हणजे ज्या वाक्यातील क्रियापदावरून शक्यता, योग्यता, कर्तव्य, इच्छा व आशा असा अर्थ होतो त्यास विद्यार्थी वाक्य असे म्हणतात.

उदाहरणार्थ

 • कृपया निरोप पोहोचावा, त्यांनी ते केलेले असेल.

संकेतार्थ वाक्य

संकेतार्थ वाक्य म्हणजे ज्या वाक्यातील क्रियापदावरून अटीचा किंवा संकेताचा अर्थ बोध होतो तेव्हा त्यास संकेतार्थ वाक्य असे म्हणतात.

उदाहरणार्थ

 • तू जर हे काम केलेस तरच तुला पगार मिळेल.
 • जर तो आला तरच मी जाईन.

केवळ वाक्य

केवळ वाक्य म्हणजे ज्या वाक्यात एकच उद्देश व एकच विधान असते त्यास केवळ वाक्य किंवा शुद्ध वाक्य असेही म्हणतात.

उदाहरणार्थ

 • संजय परीक्षेत प्रथम आला.
 • संजय खेळत असताना पडला.

मिश्र वाक्य

मिश्र वाक्य म्हणजे दोन किंवा अधिक वाक्य एकत्र येऊन तयार झालेल्या वाक्यास मिश्र वाक्य असे म्हणतात. यातील एक वाक्य मुख्य व दुसरे वाक्य गौण असून ते मुख्य वाक्यावर अवलंबून असते. या वाक्यात जो – तो, ती, जेंव्हा – तेंव्हा, जर – तर, जसे, म्हणून, कारण, हे उभयान्वयी अव्ययवात येतात.

उदाहरणार्थ

 • जे चकाकते ते सोने न्हवे.
 • जो अभ्यास करेल तोच पास होईल.

संयुक्त वाक्य

संयुक्त वाक्य म्हणजे एकापेक्षा अधिक मुख्य वाक्य असतात व ती प्रधानात्व बोधक उभयान्वयी अव्ययाने जोडलेली असतात. तेव्हा त्या संयुक्त वाक्याचे म्हणतात. व, आणि, किंवा, अथवा, पण, परंतु, म्हणून या उभयान्वयी अव्ययवाने जोडलेली असतात.

उदाहरणार्थ

 • रेखा गावाला गेली आणि कामाला लागली.
 • संतोष नागपूरला पोहोचला पण त्याने फोन केला नाही.

निष्कर्ष

आजच्या या लेखात आपण वाक्य व वाक्याचे प्रकार (Sentences and sentence types in marathi) जाणून घेतली. ही माहिती कशी वाटली हे कॉमेंट मध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांना पण नक्कीच शेअर करा.

Leave a Comment