समास | samas in marathi

Samas in marathi: समास म्हणजे जेव्हा दोन किंवा अनेक शब्दांमध्ये परस्पर संबंध दाखविणारे प्रत्येय किंवा शब्द यांचा लोक होऊन त्याचा एक जोडशब्द तयार होतो तेव्हा शब्दाच्या एकीकरणात समास असे म्हणतात.
उदाहरणार्थ साखर भात, साखर घालून केलेला भात.
राजवाडा, राजाचा वाडा. आजच्या या पोस्ट मध्ये आपण समास (samas in marathi) पाहणार आहोत.

Samas in marathi
समास (samas in marathi)

समास (samas in marathi)

समासाचे एकूण चार प्रकार पडतात

  • अव्ययीभाव समास
  • तत्पुरुष समास
  • द्वंद्व समास
  • बाहुव्रिही समास

अव्ययीभाव समास

अव्ययीभाव समास म्हणजे जेव्हा समासातील पहिले पद हे अव्यय संत महत्त्वाचे असते किंवा संपूर्ण शब्द क्रियाविशेषण असते. तेव्हा त्यास अव्ययीभाव समास असे म्हणतात.

उदाहरणार्थ

  • आजन्म जन्मापासून
  • प्रतिदिन प्रत्येक दिवशी

तत्पुरुष समास

तत्पुरुष समास म्हणजे ज्या समासातील दुसरी पद महत्त्वाचे असते व अर्थाच्या दृष्टीने गाळलेल्या शब्द किंवा विभक्ती प्रत्यय विग्रह करताना घालावा लागतो त्यास तत्पुरुष समास असे म्हणतात.

उदाहरणार्थ

  • तोंडपाट – तोंडाने पाट
  • देवपूजा – देवाची पूजा

तत्पुरुष समासाचे एकूण सात प्रकार पडतात ते पुढीलप्रमाणे

  • विभक्ती तत्पुरुष समास
  • कर्मधारय तत्पुरुष समास
  • द्विगु समास
  • अलुप तत्पुरुष समास
  • उपपद तत्पुरुष समास
  • नत्र तत्पुरुष समास
  • मध्यम पडलोपी समास

विभक्ती तत्पुरुष

विभक्ती तत्पुरुष म्हणजे ज्या तत्पुरुष समासात एखाद्या विभक्तीचा किंवा विभक्तीचा अर्थ व्यक्त करणाऱ्या शब्दयोगी अव्ययचा लोक करून दोन्ही पदे जोडली जातात त्यास विभक्ती तत्पुरुष समास असे म्हणतात.

उदाहरणार्थ

  • गर्भश्रीमंत – गर्भापासून श्रीमंत
  • गायरान – गाईंचे रान

कर्मधारय तत्पुरुष समास

कर्मधारय तत्पुरुष समास म्हणजे ज्या तत्पुरुष समासातील दोन्ही पदे एकाच विभक्तीत किंवा या समासातील दोन्ही पदे प्रथम विभक्तीत असते तेव्हा त्यास कर्मधारय तत्पुरुष समास असे म्हणतात.

उदाहरणार्थ

  • पितांबर – पीत असे अंबर
  • चंद्रवधन – चंद्रासारखे वधन

या समासात पहिले पद हे विशेषण व दुसरे पद नाम असते. यातील दोन्ही पदार्थातील संबंध हा उपमान व उपमेय स्वरूपाचा असतो.

द्विगु समास

द्विगु समास म्हणजे ज्या समासातील पहिले पद संख्या विशेषण असते व त्या सामासिक शब्दावरून समुदायाचा बोध होतो त्यास द्विगु समास असे म्हणतात.

उदाहरणार्थ

  • नवरात्री – नवरात्रींचा समूह
  • पंचवटी – पाच वडांचा समुह

अलुप तत्पुरुष समास

अलुप तत्पुरुष समास म्हणजे अलुप म्हणजे लोक न पाळणारे ज्या विभक्ती तत्पुरुशात पहिलं पदाच्या विभक्ती प्रत्ययाचा लोभ होत नाही त्यास अलुप तत्पुरुष समास असे म्हणतात.

उदाहरणार्थ

  • अग्रेसर, कर्तरी प्रयोग, कर्मणी प्रयोग इत्यादी.

उपपद तत्पुरुष समास

उपपद तत्पुरुष समास म्हणजे ज्या तत्पुरुष समासातील दुसरे पद प्रधान असून ते धातू साधित किंवा कृदंत असतो त्याला उपपद तत्पुरुष समासअसे म्हणतात.

उदाहरणार्थ

  • ग्रंथकार – ग्रंथ करणारा
  • वंशज – जन्मणार

नत्र तत्पुरुष समास

नत्र तत्पुरुष समास म्हणजे ज्या तत्पुरुष समासातील पहिले पद हे नकारार्थी असते त्यास नत्र तत्पुरुष समास असे म्हणतात. या शब्दातील पहिले पद अ, अन्, न, नी, गैर, ना, यासारखी निषेध दर्शवणारी असतात.

उदाहरणार्थ

  • अनावधान, नापासन, बेडर, गैरहजर, निरोगी इत्यादी.

मध्यम पडलोपी समास

मध्यम पडलोपी समास म्हणजे ज्या समासात दोन शब्दांमधील विभक्ती प्रत्यय शिवाय संबंध दाखविणाऱ्या शब्दाचा लोभ झालेला असतो. त्याला मध्यम पडलोपी समास असे म्हणतात.

उदाहरणार्थ

  • साखरभात – साखर घातलेला भात.
  • चुलतभाऊ – चुलत्या चा मुलगा म्हणून भाऊ.

द्वंद्व समास

द्वंद्व समास म्हणजे ज्या समासातील दोन्ही पदे सारखेच महत्त्वाची असतात त्यांना द्वंद्व समास असे म्हणतात.

उधरणार्थ

  • ताटवाटी
  • विटी दांडू
  • धर्माधर्म

द्वंद्व समासाचे एकूण तीन उपप्रकार पडतात ते पुढील प्रमाणे

  • इतरेतर द्वंद्व समास
  • वैकल्पिक द्वंद्व समास
  • समहार द्वंद्व समास

इतरेतर द्वंद्व समास

इतरेतर द्वंद्व समास म्हणजे ज्या समासाचा विग्रह करताना आणि, व या समुच्चय बोधक उभयान्वयी अव्ययाचा उपयोग करावा लागतो त्यास इतरेतर द्वंद्व समास असे म्हणतात.

उदाहरणार्थ

  • मातापिता – माता आणि पिता
  • हरिहर – हरि आणि हर

वैकल्पिक द्वंद्व समास

वैकल्पिक द्वंद्व समास म्हणजे ज्या समासाचा विग्रह करताना किंवा, अथवा, अगर, वा या विकल्प दाखविणाऱ्या उभयान्वयी अव्ययांचा उपयोग करावा लागतो त्यास वैकल्पिक द्वंद्व समास असे म्हणतात.

उदाहरणार्थ

  • पापपुण्य – पाप किंवा पुण्य
  • तीनचार – तीन किंवा चार

समहार द्वंद्व समास

समहार द्वंद्व समास म्हणजे ज्या समासातील विग्रह करताना त्यातील दोन पदाचा अर्थ शिवाय त्या जातीच्या इतर पदार्थाचा ही समावेश होतो व त्याचा विग्रह करताना वगैरे इत्यादी आधी या शब्दाचा उपयोग होतो त्यास समहार द्वंद्व समास असे म्हणतात.

उदाहरणार्थ

  • भाजीपाला – भाजीपाला व इतर पदार्थ.
  • चहापाणी – चहापाणी व इतर पदार्थ.

बाहुव्रिही समास

बाहुव्रिही समास म्हणजे ज्या समासातील दोन्ही पदे महत्वाची नसून ही दोन्ही पदे मिळून तिसरी गोष्टीचा जेव्हा बोध होतो त्यास बाहुव्रिही समास असे म्हणतात.समास (samas in marathi)

उदाहरणार्थ

  • एकदंत – एक आहे दंत ज्याचा तो म्हणजे गणपती
  • नीलकंठ – निळा आहे कंठ ज्याचा तो म्हणजे शंकर

बहुव्रिही समासाचे एकूण चार उपप्रकार पडतात ते म्हणजे

  • विभक्ती बाहुव्रिही समास
  • नत्र बाहुव्रिही समास
  • सह बाहुव्रिही समास
  • प्राधी बाहुव्रिही समास

निष्कर्ष (summary)

आजच्या या लेखात आपण समास (samas in marathi) जाणून घेतली. समास (samas in marathi) माहिती कशी वाटली हे कॉमेंट मध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांना पण नक्कीच शेअर करा.

Leave a Comment