विशेषण माहिती मराठी | visheshan in marathi

By | March 1, 2023

visheshan in marathi : विशेषण ज्या नामा बद्दल विशेष माहिती सांगतो त्यां नामाला विशेषन असे म्हणतात.

विशेषण माहिती मराठी (visheshan in marathi)

उदाहरणार्थ

हुशार मुलगा, हिरवे रान, सुंदर फुल यामध्ये विशेष मुलगा रान फुल हे विशेष आहे.

नामाबद्दल जो शब्द विशेष किंवा अधिक माहिती सांगून नामाची व्याप्ती मर्यादित करतो अशा विकार शब्दांना विशेषण असे म्हणतात.

उदाहरणार्थ

हुशार मुलगा, हिरवे रान, सुंदर फुल यामध्ये विशेषण हे सुंदर आहे. म्हणजे मुलाबद्दल विशेष माहिती दिली आहे हुशार मुलगा. रानाबद्दल माहिती हिरवे रान, सुंदर फुला बद्दल अधिक माहिती सुंदर.

visheshan in marathi
visheshan in marathi

विशेषणाचे पुढील प्रमाणे सात प्रकार पडतात

 • गुणविशेषण
 • संख्या विशेषण
 • सर्वनामिक विशेषण
 • विधी विशेषण
 • नामसदीत विशेषण
 • धातुसतीत विशेषण
 • अव्यय साधित विशेषण

गुणविशेषण

गुणविशेषण म्हणजे जो शब्द नामाचा कोणत्याही प्रकारचा गुण किंवा विशेषता दाखवतो त्यास गुणविशेषण असे म्हणतात.

उदाहरणार्थ उंच डोंगर, सुंदर तरुण, गोड द्राक्ष, तर उंच डोंगर यामध्ये डोंगराचा गुण दाखवलेला आहे उंच. तरुणाचा गुण सुंदर, गोड द्राक्ष मध्ये द्राक्षाचा गुण गोड.

संख्या विशेषण

संख्या विशेषण म्हणजे ज्या विशेषणाच्या योगाने नामाची संख्या दाखविली जाते त्या संख्या विशेषण असे म्हणतात.

उदाहरणार्थ दोन कुत्रे, पाचवा वर्ग, काही लोक, सातपट रुपये, यामध्ये दोन, पाचवा, काही, सातपट, हे संख्या विशेषण आहे.

संख्या विशेषणाचे आणखी पाच उपप्रकार पडतात

 • गणना वाचक संख्या विशेषण
 • क्रमवाचक संख्या विशेषण
 • आवृत्ती वाचक संख्या विशेषण
 • पृथकत्व वाचक संख्या विशेषण
 • अनिश्चित संख्या विशेषण

गणना वाचक संख्या विशेषण

संख्या विशेषणातील पहिला उपप्रकार म्हणजे गणना वाचक संख्या विशेषण म्हणजे ज्या विशेषणाचे उपयोग केवळ गणती करण्यासाठी किंवा मोजण्यासाठी केला जातो त्यास गणना वाचक संख्या विशेषण असे म्हणतात.

गणना वाचक संख्या विशेषणचे आणखी तीन उपप्रकार पडतात

 • पूर्णांक विशेषण
 • अपूर्णांक विशेषण
 • साकल्य विशेषण

गणना वाचक संख्या विशेषण मधला पहिला प्रकार म्हणजे

पूर्णांक विशेषण

पूर्णांक विश्लेषण म्हणजे पूर्णांक ज्याची गणना होते त्यास पूर्णांक वाचक विशेषण असे म्हणतात. उदाहरणार्थ 18 भाषा ,100 रुपये, 54 मुले यामधील 18, 100, 54 हे पूर्णांक वाचक विशेषण आहे.

अपूर्णांक वाचक विशेषण

अपूर्णांक वाचक विशेषण म्हणजे अपूर्णांकात ज्याची गणना होते त्यास अपूर्णांक वाचक संख्या विशेषण असे म्हणतात.

उदाहरणार्थ अर्धा लिटर पेट्रोल, पाव किलो पेढा, 2 पंचम अंश मुली यामधलं अर्धा, पाव, दोन पंचम अंश हे अपूर्णांक वाचक विशेषण होय. विशेषण माहिती मराठी (visheshan in marathi)

साकल्यवाचक विशेषण

साकल्यवाचक विशेषण म्हणजे असलेल्या तिथल्या वस्तू पैकी सर्व वस्तूंना साकल्यवाचक विशेषण असे म्हणतात.
उदाहरणार्थ
तुम्ही पाचही, तुम्ही दोघेही, तुम्ही उभयता यामधील पाचही, दोघेही, उभयता हे साकल्यवाचक विशेषण होय.

क्रमवाचक संख्या विशेषण

क्रमवाचक संख्या विशेषण म्हणजे ज्यावेळी विशेषणे वस्तूचा क्रम दाखवितात त्यांना क्रम वाचक संख्या विशेषण असे म्हणतात. उदाहरणार्थ पाचवा बंगला, साठावे वर्ष, तिसरा वर्ग यामधील पाचवा, साठावे, तिसरा हे क्रमवाचक संख्या विशेषण होय.

आवृत्ती वाचक संख्या विशेषण

आवृत्ती वाचक संख्या विशेषण म्हणजे ज्यावेळी विशेषण हे संख्येची किती वेळा बोध किंवा आवृत्ती झाली हे दाखवितात त्यांना आवृत्ती वाचक संख्या विशेषण असे म्हणतात.

उदाहरणार्थ विघूनीत आनंद ,चौपदरी घडी ,तीपेढी पोळी, दहा पट रक्कम, यामधील द्विगुणीत, चौपदरी ,तीपेढी, 10 पट हे आवृत्ती वाचक संख्या विशेषण आहेत.

पृथकत्व वाचक संख्या विशेषण

पृथकत्व वाचक संख्या विशेषण म्हणजे ज्यावेळी विशेषण वेगवेगळ्या पृथक असा बोध करून देतात त्याला पृथकत्व वाचक संख्या विशेषण असे म्हणतात.

उदाहरणार्थ
एकेक मुलगा, दहा दहा चा गट, चारचारांचा कळप यामधील एक एक, दहा दहा, चार चार हे पृथकत्व वाचक संख्या विशेषण होय.

अनिश्चित संख्या विशेषण

अनिश्चित संख्या विशेषण म्हणजे ज्यावेळी संख्या विशेषण निश्चित अशी संख्या दाखवत नाही त्यांना अनिश्चित संख्या विशेषण असे म्हणतात.

उदाहरणार्थ
सर्व मुली, खूप साहित्य, काही लोक इत्यादी देश ल, यामधील सर्व, खूप, काही इत्यादी हे अनिश्चित संख्या विशेषण होय.

सार्वनामिक विशेषण

सार्वनामिक विशेषण सर्वनामिक विशेषण म्हणजे सर्वनामापासून तयार होऊन नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या विशेषणासार्वनामिक विशेषण असे म्हणतात.
उदाहरणार्थ
कोणते गाव, आमची माणसं, कसला भाव, तिच्या बांगड्या यामधील कोणते, आमची, कसला, तिच्या ही सर्वनामिक विशेषण होय.

विधि विशेषण

विधि विशेषण म्हणजे नामांतर येणाऱ्या विशेषणाला विधी विशेषण असे म्हणतात.
उदाहरणार्थ
आजची पिढी बंडखोर आहे, तो विद्यार्थी हुशार आहे यामधील बंडखोर व हुशार ही विधी विशेषण होय.

नाम साधित विशेषण

नाम साधित विशेषण म्हणजे नामापासून तयार होणाऱ्या विशेषणास नाम साधित विशेषण असे म्हणतात.

उदाहरणार्थ
सातारी पेढे, नागपूर संत्री, समाधानी मनुष्य, पैठणी शालू यामधील सातारी, नागपुरी, समाधानी व पैठणी हे नाम साधित विशेषण होय.

धातूसाधित विशेषण

धातुसधीत विशेषण म्हणजे धातूंना निरनिराळी प्रत्यय लागून बनलेले जे शब्द विशेषणाचे कार्य करतात त्यांना धातू साधित विशेषण असे म्हणतात.

उदाहरणार्थ
पीक, पिकलेला आंबा, रांग रांगणारा मुलगा,हस, हसरी मुलगी या धातूपासून पिकलेला, रांग या धातूपासून रांगणारा, हस या धातूपासून हसरी, हे धातू साधित विशेषण होय.

अव्यय साधित विशेषण

अव्यय साधित विशेषण म्हणजे मूळ अवयवांना सा, ला, ई, ल, हे प्रत्यय लागून बनलेल्या विशेषणाला अव्यय साधित विशेषण असे म्हणतात. उदाहरणार्थ वरचा भाग, खालचा भाग, मागील चाक, पुढील रस्ता. यामधील वरचा, खालचा, मागील, पुढील हे अव्यय साधित विशेषण होय.

विशेषण म्हणजे काय ?

विशेषण ज्या नामा बद्दल विशेष माहिती सांगतो त्यां नामाला विशेषन असे म्हणतात

विषेशनाचे किती प्रकार पडतात ?

विशेषणाचे पुढील प्रमाणे सात प्रकार पडतात
गुणविशेषण
संख्या विशेषण
सर्वनामिक विशेषण
विधीविशेषण
नामसदीत विशेषण
धातुसतीत विशेषण
अव्यय साधित विशेषण

निष्कर्ष (summary)

आजच्या या पोस्ट मध्ये आपण विशेषण माहिती मराठी (visheshan in marathi) ही माहिती बघितली. विशेषण माहिती मराठी (visheshan in marathi) तुम्हाला कशी वाटली हे कॉमेंट मध्ये नक्की सांगा, जर ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्रांना पण नक्कीच शेअर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *