क्रियाविशेषण माहिती मराठी | kriyavisheshan in marathi

kriyavisheshan in marathi : क्रियाविशेषण म्हणजे जे शब्द क्रियापदाबद्दल विशेष माहिती सांगतात त्यांना क्रियाविशेषण असे म्हणतात.

उदा.१) राम अधाशासारखा खातो. २) ती लगबगीने घरी पोहोचली. ३) बाहेर जोरदार पाऊस पडतो. ४) वैशाली चांगली मुलगी आहे. वरील वाक्यात – अधाशासारखा, लगबगीने, जोरदार, चांगली ही क्रियाविशेषण आहेत.

उदाहरणार्थ

 • मांजराने उंदराला पटकन पकडले. (पटकन)
 • तू फार लबाड मुलगा आहेस. (फार)

पटकन व फार ही क्रियाविशेषण आहे.

kriyavisheshan in marathi
क्रियाविशेषण माहिती मराठी (kriyavisheshan in marathi)

क्रियापदाबद्दल विशेष माहिती सांगून जी अविकारी राहतात,त्यांनाच क्रियाविशेषण अव्यय असे म्हणतात

क्रियाविशेषणाचे पुढील प्रमाणे सहा प्रकार पडतात

 • कालवाचक क्रियाविशेषण
 • स्थलवाचक क्रियाविशेषण
 • रीतीवरच्या क्रियाविशेषण
 • संख्यावाचक क्रियाविशेषण
 • प्रश्नार्थक क्रियाविशेषण
 • निषेधार्थ क्रियाविशेषण

क्रियाविशेषण माहिती मराठी (kriyavisheshan in marathi)

कालवाचक क्रियाविशेषण

कालक्रियाविशेषण म्हणजे ज्या वाक्यातील क्रिया केव्हा, किती वेळ किंवा किती वेळा घडली व ज्यावरून काळाचा बोध होतो त्यास कालवाचक क्रियाविशेषण असे म्हणतात.

कालवाचक क्रियाविशेषणाचे मुख्य तीन उपप्रकार पडतात

 • कालदर्शक
 • सातत्यदर्शक
 • आवृत्तीदर्शक

कालदर्शक

कालदर्शक म्हणजे ज्या वाक्यातील क्रिया ही कोणत्या वेळेस म्हणजे कधी घडली याचा बोध होतो त्यास कालदर्शक असे म्हणतात.

उदाहरणार्थ

आता, आधी, सध्या, तूर्त, हल्ली, उद्या, परवा, लगेच, केव्हा, जेव्हा, पूर्वी मागे, दिवसा, रात्री, नंतर, मग, काल,

सातत्यदर्शक

सातत्यदर्शक म्हणजे ज्या वाक्यातील क्रिया ही किती वेळा घडली याचा बोध होतो त्यास सातत्यदर्शक असे म्हणतात. नित्य, सदा, सर्वदा, आजकाल, सतत, नेहमी, दिवसभर.

आवृत्ती दर्शक

आवृत्ती दर्शक म्हणजे ज्या वाक्यातील क्रिया ही एकंदर किती वेळा घडली याचा बोध होतो. त्यास आवृत्ती वाचक असे म्हणतात.

उदाहरणार्थ

वारंवार, फिरून फिरून, पुन्हा पुन्हा, दररोज, सालो साल, क्षणोक्षणी, तासंतास, दिवसेंदिवस.

स्थलावाचक क्रियाविशेषण

स्थलावाचक क्रियाविशेषण म्हणजे ज्या वाक्यावरून स्थळाचा किमान ठिकाणांचा बोध होतो. त्यास स्थलवाचक क्रियाविशेषण असे म्हणतात.

स्थलावाचक क्रियाविशेषणाचे मुख्य दोन उपप्रकार पडतात.

 • स्थितीदर्शक
 • गतीदर्शक

स्थितीदर्शक

स्थितीदर्शक म्हणजे ज्या वाक्यावरून क्रिया ही कोणत्या ठिकाणी घडली याचा बोध होतो. त्या स्थितीदर्शक असे म्हणतात.

उदाहरणार्थ

जेथे, तेथे, येथे, खाली, वर, मागे, पुढे, जिकडे, तिकडे, अलीकडे.

गतीदर्शक

गतीदर्शक म्हणजे ज्या वाक्यात क्रिया ही कोणत्या ठिकाणांवर घडली याचा बोध होतो. त्यास गतीदर्शक असे म्हणतात.

उदाहरणार्थ

येथून, जिथून, तेथून, खालून, वरून, पुढून, मागून, जिकडून, तिकडून.

रीतीवाचक क्रियाविशेषण

रीतीवाचक क्रियाविशेषण म्हणजे ज्या वाक्यातील क्रिया घडण्याची रीत किंवा क्रिया कशी घडते याचा ज्यावरून बोध होतो त्यास रिती वाचक क्रियाविशेषण असे म्हणतात.

रीतीवाचक क्रियाविशेषनाचे मुख्य तीन प्रकार पडतात ते पुढीलप्रमाणे

 • प्रकार दर्शक
 • अनुकरणदर्शक
 • निश्चयाअर्थक

प्रकार दर्शक

प्रकार दर्शक मध्ये हे शब्द येतात जसे, तसे, उगीच, व्यर्थ, फुकट, आपोआप, मुद्दाम, हळू, सावकाश, जलद, जेवी, तेवी.

अनुकरणदर्शक

अनुकरणदर्शक मध्ये हे शब्द येतात. झटकन, पटकन, टकटक, गटगट, चमचम, पटापट, व पटापट.

निश्चयाअर्थक

निश्चयाअर्थक मध्ये हे शब्द येतात. क्वचित, खरोखर, मुळीच, व निश्चित.

संख्यावाचक क्रियाविशेषण

संख्यावाचक क्रियाविशेषण म्हणजे ज्यावरून संख्या परिणाम किंवा ती क्रिया किती वेळा घडली याचा बोध होतो त्यास संख्यावाचक क्रियाविशेषण असे म्हणतात.

उदाहरणार्थ

नेहमी, अनेकदा, भरपूर, किंचित, जरा, काहीसा, बऱ्याच, वेळा, क्वचित, थोडा, अधिक, अतिशय, अत्यंत, अगदी, बिलकुल, एकदा, दोनदा.

प्रश्नार्थक क्रियाविशेषण

प्रश्नार्थक क्रियाविशेषण म्हणजे ज्या वाक्यातील विधानांना प्रश्नाचे स्वरूप दिलेले असते त्यास प्रश्नार्थक क्रियाविशेषण असे म्हणतात.

उदाहरणार्थ

तुम्ही त्याच्याकडे जाल का, मला बगीच्या न्याल ना, सुधाला घरी ठेवला का.

निषेधार्थ क्रियाविशेषण

निषेधार्थ क्रियाविशेषण म्हणजे ज्यांच्या अर्थावरून क्रियेसंबंधी नकारांचा किंवा निषेदाचा बोध होतो त्यास निषेधार्थ क्रियाविशेषण असे म्हणतात.

उदाहरणार्थ

तो न चुकता येतो, तोंड उघडेल तर ना.

क्रियाविशेषण म्हणजे काय ?

क्रियाविशेषण म्हणजे जे शब्द क्रियापदाबद्दल विशेष माहिती सांगतात त्यांना क्रियाविशेषण असे म्हणतात.

क्रियाविशेषणाचे प्रकार किती व ते कोणते ?

क्रियाविशेषणाचे पुढील प्रमाणे सहा प्रकार पडतात
कालवाचक क्रियाविशेषण स्थलवाचक क्रियाविशेषण रीतीवरच्या क्रियाविशेषण संख्यावाचक क्रियाविशेषण प्रश्नार्थक क्रियाविशेषण निषेधार्थ क्रियाविशेषण

स्थलावाचक क्रियाविशेषनाचे किती व कोणते प्रकार पडतात ?

स्थलावाचक क्रियाविशेषणाचे मुख्य दोन प्रकार पडतात
गतीदर्शक
स्थितीदर्शक

निष्कर्ष (summary)

आजच्या या पोस्ट मध्ये आपण क्रियाविशेषण माहिती मराठी (kriyavisheshan in marathi) ही माहिती बघितली. तुम्हाला क्रियाविशेषण माहिती मराठी (kriyavisheshan in marathi) ही माहिती कशी वाटली हे कॉमेंट मध्ये नक्की सांगा, जर ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्रांना पण नक्कीच शेअर करा.

Leave a Comment